घनदाट नांदते जंगल (शतशब्दकथा)

Submitted by हर्पेन on 6 September, 2013 - 15:10

रात्रीची वेळ होती.

घनदाट नांदते जंगल.

एका मोठ्या थोरल्या तळ्याचा काठ.

जरा म्हणून शांतता नाही. कधी जवळूनच झाडीतून येणारा खुसफुस आवाज तर कधी लांबवरून ऐकू येणारी कोल्हेकुई. कधी तळ्यातून आलेले चुळुक डुबुक आवाज आणि रातकिड्यांचा आवाज हे तर कायमस्वरूपी पार्श्वसंगीत.

अचानक सारे काही स्तब्ध झाले.

एकदम निरव शांतता.

कानठळ्या बसवणारी शांतता.

माझ्या मनात एक अनामिक भीती, हुरहूर, उत्कंठा अशी संमिश्र भावना दाटून आली.

आता काहीतरी घडणार, कोणत्या तरी मोठ्या प्राण्याचे तळ्यावर आगमन होणार! मनामध्ये काहीही संदेह नव्हता.

प्रदीर्घ भासणारे काही क्षण असेच निघून गेले आणि काहीच न घडता सारे काही पुर्ववत झाले.

घनदाट नांदते जंगल.

जरा म्हणून शांतता नाही...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेहेहे .... मस्तच... कहितरी होईल असं वाटतं पण बरेचदा रात्रही निघुन जाते अन ससाही दिसत नाही. Happy