पिंपरीचिंचवडमधिल मृत्युचे सापळे - सौजन्य:- यमदूत बनलेले संघटीत गुन्हेगार

Submitted by limbutimbu on 6 September, 2013 - 05:48

पिंपरी चिंचवडमधिल मृत्युचे सापळे फोटो रुपाने इथे मांडण्यासाठी हा धागा केला असे.

पिंपरी चिंचवडच्या थर्मॅक्स चौकातील हा मृत्युचा सापळा गेले पन्धरा दिवस बळीची वाट बघतो आहे.
कदाचित एखाददोन बळी मिळाल्यानंतरच हा खड्डा बुजेल असे वाटते.

Thermax Chauwk 1 DSCN2510.jpg

संघटीत गुन्हेगारीबाबत एकही गृप मायबोलिवर नाही?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यात संघटीत गुन्हेगारी कुठे आहे ?

सरकारी कार्यवाहीची वाट न बघता, नागरीकांना करता येतील अश्या काही गोष्टी आहेतच. त्याचे कव्हर बाजूलाच पडलेय. चार सहा जणांना ते जागेवर टाकता येईल. किमान झाडाच्या काही फांद्या त्या खड्ड्यात उभ्या करता येतील.

या भागाचा नगरसेवक कोण आहे? त्याला, संबंधित पालिका अधिकार्‍यांना इथल्या नागरिकांनी लिखित रूपात तक्रार केली आहे का? ते काम करतात की नाही ही तर पुढची बाब आहे पण पाठपुरावा करण्यासाठी निदान कागदोपत्री तक्रार दाखल करणे जरूरीचे आहे.
आणि दिनेश म्हणतात तसं, तोपर्यंत चारसहा जणांनी ती शेजारची स्लॅब आणून टाकून तात्पुरती सोय करायला काय हरकत आहे?

भ्रमा, हे चित्र त्यांनी त्यांच्या सदस्यत्वाच्या खाजगी जागेतून अपलोड केलं आहे. मायबोली दिसते म्हणजे असे चित्र टाकायला आणि बघायलाही येणारच.

रस्त्याच्या बाजूने चालता चालता कोणीही ह्यात सहजच पडेल. विशेषतः फोनवर बोलत जाणारे पब्लिक.

वरदा, रोज सन्ध्याकाळी तिथेच पुढे कोपर्यावर ट्रॅफिक पोलिस उभारलेले अस्तात.
नगरपालिकेला "नागरिकांकडून" तक्रार आल्यावरच जाग येणार का? त्यांची स्वतःची कसलीच यंत्रणा नसते का?
ती पांढरी सिमेण्टची स्लॅब खड्ड्यावर टाकणे ही तात्पुरती मलमपट्टी आहे. जवळपास निवासि वस्ती असलेली लोकं ते करतातच, इथे लगेच शेजारी झोपडपट्टीव्यतिरिक्त निवासी वस्ती नाही.
ते झाकणाचे लोखंडी वेल्ड केलेल्या पट्ट्या तुटल्याच कशा, की कोणी मुद्दामहून तोडून्/कापून नेल्या हे प्रश्न आम्हाला पडणारच नाहीत. आम्हि "रितसर" लिखित तक्रार केली की नाही हा प्रश्न मात्र पडेल. अशा तक्रारी करणार्‍यांमागे विविध नियमांचे भुन्गे कसे लावले जातात याचा अनुभव हिम्मत असेल तर घेण्याची बाब आहे.
मुळात या प्रकारे शहरात जिथे जिथे लोखंडी जाळ्या बसविल्या आहेत, त्या वजनाने म्हणा वा कशाने दबुन निखळल्याचे दिसते, त्याचे डिझाईन बरोबर होते का? वरील जाळीच नीट बघता कळते की पलिकडील बाजूस ती वाकलि आहे तिथे खालिल सपोर्ट पुरेसा नाहीच्चे. मग ही अशी अधांतरी कशी काय बसवली गेली? वापरलेले मटेरिअल तरी बरोबर होते का?
हे कापून/तोडून भन्गारात नेऊन टाकणारे चोर कोण?
इतके दिवस नव्हे, दोन आठवडे हे भोक जे ६ फूटान्पेक्षा खोल आहे, व पावसाळ्यात भरुन वहाताना दिसले नाही वा एरवी कुणी दूचाकीस्वार त्यात पडला तर मृत्यु अटळ असे असताना नगरपालिकेच्या कुठल्याच खात्यात रस्तेपहाणिविषयक यंत्रणा असू नये?
परवाच त्यापुढेच चिखलीकडे साने चौकात गेलो अस्ताना, रस्त्याचे काम चाललेले दिसले, चक्क मातीमिश्रित मुरुमाचा अर्धाफूट उन्चीचा थर जेसीबीच्या पंजा/ट्रे ने पसरविण्याचे/चेपण्याचे काम चाललेले, दोन दिवसांनी बघितले तर त्यावर एखाद इंच जाडीचा डांबरी खडीचा थर घालुन वरून तरी रस्ता चकाचक केलेला. रस्ते बांधणिचे २१विसाव्या शतकातील हे कोणते मायावी तंत्र?
ही तंत्रे कोणीच तपासत नाहीत का? तपासण्याची यंत्रणा नाही, की ती कामच करीत नाही? तोच प्रकार गटारांचेवरील झाकणांचा.
अन अशी झाकणे चोरीला गेली/तुटली तरी नविन काम निघते म्हणून खुशी मानणारेही कमी नाहीत
असे माती/मुरुमावर डांबर घालून बनविलेले रस्ते एका पावसात उखडले तरी नविन काम निघते म्हणून खुश होणारे कमी नाहीत.
अशा चोरीस जाणार्‍या भंगारास राजरोस खरेदी करणारेही कमी नाहीत, व त्यान्ना "प्रोटेक्शन" देणारेही कमी नाहीत.

त्या रस्त्यानेच् येणार्याजाणार्या पोलिसांसहित एकाही "सरकारी नोकरास" ही धोकादायक बाब सरकारीच यंत्रणेला कळविण्याची तसदी घ्यावी वाटत नाही. येऊन जाउन, तुम्हाला त्रास होतोय ना, मग केलीत का तुम्ही तक्रार, केलात का तुम्ही पाठपुरावा अशाप्रकारचे फाटेच फुटणार, मूळ प्रश्न तसाच, नगरपालिकेची स्वतःची यन्त्रणा आहे वा नाही, नसेल तर का नाही, असेल तर ती दोन आठवडे काय करीत होती?

याच रस्त्यावर थर्मॅक्स च्या आवारात रस्त्याला लागुन एक एटीएम आहे, जर तिथे सायंकाळ नंतर पैसे काढले तर लुटमारीच्या घटना अनेक घडल्या आहेत. वरील खड्डा हा रात्रीचा अ‍ॅक्सिडेण्ट घडण्याकरता व नंतर अ‍ॅक्सिडेण्टमधे सापडलेल्याला (मे बी तो दुचाकीस्वार असेल वा एखादा बाहेरगावचा ट्रकवाला/गाडीवाला असेल) लुटण्याकरता तर बनविला गेलेला नाही ना? पांढरी स्लॅब तो चौकोन पुर्ण तुटायचे आधीही त्या लोखंडी जाळीवर आधीचा महिनाभर होतीच, मग ती काढली कुणी?

सबब म्हणूनच मी यास संघटीत गुन्हेगारी असे संबोधले, बर का दिनेश भौ..

असो.
अतिशय वहात्या रस्त्यावरचा ऐन मध्यातिल हा खड्डा आता कुणा कुटुंबकबिल्यासहित जाणार्‍या दूचाकीस्वारांचा बळी घेतो ते बघायचे, अन असे झाल्यावर तो दूचाकीस्वार सोबत लहान मुलास (तिबलसीट) नियमबाह्य पद्धतीने बसवुन जात होता म्हणून तोच दोषी, कारण त्यामुळे त्याला खड्डा दिसलाच नाही/चूकविता आला नाही असा चोर सोडून सन्याशाला बळी देण्याचा प्रकारही समजुन घेण्याची मानसिक तयारि करायला हवी.

लिंबू, दुखापत होऊ नये कुणाला, पण ती झालीच तर आपल्यालाच होणार आहे. त्यामूळे ती व्हायची वाट बघत बसण्याऐवजी आपणच काहीतरी करायला नको का ? झाडाच्या फांद्या ( वर दिसतील इतपत ) टाकल्या तर अगदी पाणी भरले असेल, अंधार असेल तरी कल्पना येतेच.

वाटेत मोठा दगड असेल आणि आपल्याला ठेच लागली, तर आपण तो बाजूला करतो कि नाही ?

लिंबूटिंबू, तुम्ही दोन चार लोकांना मदतीला घेऊन ते बाजूला पडलेलं कव्हर तात्पुरतं का होईना पण बसवून टाका आणि भविष्यातले बळी टाळल्याचा आनंद माना.

लिंबुभाऊ, ह्यात नक्की परदेशी शक्तिंनी ब्रिगेडी-कॉन्गी लोकांसह संगनमताने केलेल्या काहितरी मोठ्या गोष्टीचा हात आहे

लिम्बूटिम्बू.....

मूळ लेखापेक्षा तुम्ही दिलेला दीर्घ प्रतिसाद जास्त चांगला आहे कारण तिथे प्रत्यक्ष जागेवर जाऊन केलेला अभ्यास तर प्रकटला आहेच शिवाय सर्वसामान्य जनता खरेच किती सर्वसामान्यपणे अशा अवस्थेकडे पाहते याचेही चित्र उमटले आहे. केवळ पिंपरी-चिंचवडच नव्हे तर आमच्या कोल्हापूरचेही दुखणे यापेक्षाही वेगळे नाही... असलेच तर भयानक आहे यापेक्षा....फक्त आम्ही कंटाळलो आहोत....पोलिस यंत्रणाही हतबल झाली आहे कोर्पोरेशनच्या प्रशासनासमोर....आणि आता त्यातच गल्लीबोळातून रस्त्यारस्त्यातून गणपतराव येऊन ठाकले आहेत. आता तर रस्त्यांनी धाय मोकलून रडलेच पाहिजे.

बाकी...."..सायंकाळ नंतर पैसे काढले तर लुटमारीच्या घटना अनेक घडल्या आहेत...." हे खरंच काळजी करण्यासारखे आहे. याबद्दल बातमी तरी येत असेलच ना पिंपरीचिंचवड जोडपेपरमधून. मी बर्‍याच वेळा आलो आहे या जोडशहरात पण तसे शहर स्वच्छ आणि बरेच अ‍ॅक्टिव्ह वाटले मला....त्यामुळे तुम्ही दिलेला फोटोग्राफ आणि वर्णन अंगावर येण्यासारखे आहे.

"....दूचाकीस्वार सोबत लहान मुलास (तिबलसीट) नियमबाह्य पद्धतीने....." ~ तिघे नाहीत... चौघे आहेत ते. शिवाय मागे बसलेला छोकरा झोपलेला दिसतो. काय आणि कशी काळजी तरी करायची या स्वारांची ?

अशोक पाटील

लिंबू, तू लिहिलंस ते अगदी खरं आहे, मी नाकारत नाहीच्चे. ही परिस्थिती फक्त पिंपरीचिंचवड मधे आहे आणि इतर शहरांत नाही असं काही नाहीये. आम्ही सगळेच कमीअधिक प्रमाणात या असल्या गोष्टींचा सामना करतच असतो..
सगळीकडे आपल्याला लढणं शक्य नसलं तरी जिथे शक्य आहे तिथे जमेल तितका पाठपुरावा करावा अशा मताची मी आहे. हे सगळं 'रॅकेट' आहे हेही बरेच वेळा दिसतंच. पण त्यापुढे एकटादुकटा कुणी नाही ना प्रतिकार करू शकत? मग जेवढं शक्य आहे (स्लॅब जागेवर बसवणं, तक्रारी करणं) ते करायला का काचकूच करायची? कारण नगरपालिकेची यंत्रणा हलवायला कुठली तरी नागरिक हक्क समिती वगैरे आणावी लागणार किंवा मीडियातून सतत कॅम्पेन चालवायला लागणार किंवा मग आपणच राजकारणात वगैरे पडायला हवं... ते आत्ता तुला शक्य असेल तर कर. नाही तर ही भडास इथे काढून फारसा फायदा होईल असं वाटत नाही.

<<अशा तक्रारी करणार्‍यांमागे विविध नियमांचे भुन्गे कसे लावले जातात याचा अनुभव हिम्मत असेल तर घेण्याची बाब आहे.>> हो, घेतलेत की अनुभव.. तरीही जेवढं शक्य असेल तेवढं करावंच म्हणते मी! जिथे रोजच्या धकाधकीत हे शक्य नसेल तिथे आपला आपण आपल्यापुरता मार्ग काढावा आणि चालू पडावं आणि नुसत्याच तक्रारी माबोसारख्या फोरमवर करायच्या असतील तर त्या केवळ कॅथार्सिस या स्वरूपातच रहाणार. त्याचीही मानसिक गरज असतेच हेही तितकंच खरं Happy
असो.

आता त्यातच गल्लीबोळातून रस्त्यारस्त्यातून गणपतराव येऊन ठाकले आहेत
>>
अशोक राव हे बरे नाही. विशिष्ट धर्माची थडगी दिसत नाहीत का रस्त्यातले.? गणपतीला गणपतराव म्हनता म्हनजे तुम्ही नकीच हिन्दुद्वेष्टे आणि ब्रिगेडी वृतीचे आहात Proud

अशा धोकादायक गोष्टींची नगरसेवकाकडे तक्रार केली तर त्याचा पाठपुरावा होतो असा सर्वसामान्य अनुभव आहे. काही ठिकाणी नगरसेवकाच्या निदर्शनास आणून दिल्यावर शक्य असल्यास स्थानिक पातळीवर ते स्वतःच मलमपट्टी करतात. पण लिंबूभाउंनी मांडलेला प्रशासनाची बेपर्वाई हा मूळ मुद्दा हे दुखणं आहेच. त्यासाठी वॉर्डातल्या जागृत नागरिकांचा दबाव्गट उभारणे हे करता येणे का शक्य नसावे ?

पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी झाकण्याच्या लोखंडी पट्या कापुन टाकण्याचा धोकादायक उपाय.
गटारावर सिमेंटची पट्टी टाकणेही धोकादायक. दुचाकीवरच्या ४ जणांचा प्रवासही धोकादायकच.

लिंबुजी,

मला आठवते त्या प्रमाणे तुम्ही फक्त नोकरीला पिंपरी चिंचवड मधे येता. मी तर जन्मापासुन रहातो. इथले लोक पुण्यातल्या जनतेसारखे जागरुक नाहीत.

एखाद्याला वाटल की मला एका विषीष्ठ जागेवरुन रोज रस्ता १० वेळा ओलांडावा लागतो आणि वहातुक जास्त असेल तर ३० सेकंद दर खेपेला जास्त लागतात. तो लगेच नगरसेवकाकडे जातो आणि त्या जागेवर स्पीड ब्रेकर लाउन घेतो.

ही अतिशयोक्ती नाही. हेच टाटा मोटर्स सारख्या मोठ्या उद्योगाने करवुन घेतले आहे.

बर स्पीड ब्रेकर्स कसे असावेत त्याची उंची काय असावी. १००० मीटर्स च्या लांबीच्या रस्त्यावर किती असावेत याचे कोणतेच धोरण अस्तीत्वात नसावे असे चित्र आहे.