फंडा क्लियर आहे - शतशब्दकथा

Submitted by हर्पेन on 31 August, 2013 - 08:52

बूट महागातले होते. त्यासाठी पैसे जमवायला त्याला बराच प्रयास करावा लागला होता. पण त्याला हवे तसे बूट त्याने मिळवलेच शेवटी.

कधी एकदा ते घालुन मिरवतोय असे त्याला झालेले. पण त्याने ठरवले आमच्या एका मित्राच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या दिवशी नवीन बुटांचे उद्घाटन करावे.

अगदी नियम असल्याप्रमाणे, आपले काही लग्नकार्य असले की हमखास पडतो, तसा, त्याही दिवशी पाउस पडला. रिसेप्शन नेमके गावाबाहेर गार्डन लॉनवर होते. सगळीकडे चिखल झालेला. पण ह्याला त्याचे काहीच नव्हते. नवीन कोरे बूट घालून खुशाल हिंडत होता. मी त्याला म्हणालो सुद्धा, अरे काय हे किती चिखल लागलाय तुझ्या बुटांना. जरा चिखल टाळून चालावे.

तो म्हणाला, आपल्यासाठी बूट की बुटांसाठी आपण.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

solid.... maala avadla ha attitude..... mi mpan ashich ani mala lok pan ashich awadtat

bindast... like work hard party harder wali....

सुंदर ...
पाडगावकरांची "कसं जगायचं " कविता आठवली .
सुरवात बूटाने वाचल्यावर " नाताळची भेट " कथा आहे की काय वाटले .