प्रगती प्रतिष्ठान ला मायबोलीकरांची भेट

Submitted by विनय भिडे on 18 August, 2013 - 02:16

नमस्कार मायबोलीकर,
मायबोली टी शर्ट २०१३ या उपक्रमाची देणगी दिली आणि या उपक्रमाच काम पूर्ण झाल. आपण दिलेल्या देणगी बद्दल "प्रगती प्रतिष्ठान" यांनी एक पत्र मायबोलीला दिले आहे. याचबरोबर देणगीचा कसा वापर केला याबद्दल माहिती सुद्धा पुढे पत्रकात दिली आहे.
1.JPG3.JPG

आधी सांगितल्याप्रमाणे या देणगीतुन त्यांनी विद्यार्थ्यांना गणवेश शिवुन घेतले आणि १५ ऑगस्ट च्या कार्यक्रमात सगळ्या मुलांना घालायला मिळाले. आपण सगळ्यांनी दिलेल्या योगदानातुन जे गणवेश विद्यार्थ्यांकरता बनवले गेले आणि ते परिधान केलेल्याचा आनंद पाहण्याकरता आणि या मुलांच्या भेटीकरता आम्ही काही मायबोलीकर १५ ऑगस्ट ला जव्हार येथे "प्रगती प्रतिष्ठान संचलित निलेश ल. मुर्डेश्वर कर्णबधीर विद्यालय" ला भेट देउन आलो. तेथील काही क्षणचित्रे येथे देत आहे.

संस्थेचा परिसर :-
217.JPG

सुनंदा ताई पटवर्धन आणि तिथल्या शाळेचा कर्मचारी वर्ग यांनी आम्हाला शाळेची माहिती करुन दिली.
221.JPG

कर्णबधीर मुलांच्या बाबतीत येणार्‍या समस्या , याचबरोबर असणारे इतर आजार ,पालकांचा अशिक्षीतपणा मुळे अशा मुलांकडे होणार दुर्लक्ष त्याचबरोबर संस्थेत उपलब्ध असणार्‍या सोयी आणि राबवले जाणारे निरनिराळे उपक्रम यांची त्यांनी माहिती करुन दिली.

230.JPG

संदीप खांबेटे( घारुआण्णा ) माहिती वाचताना :-
231.JPG

शाळेत मुलांनी केलेले किल्ले :-
233.JPG

व्यवस्थितपणा :- ( हे बघुन मला माझ कपाट आठवल्याशिवाय राहिल नाही )
239.JPG

तेथील मुलांनी केलेली वारली चित्र परदेशात सुद्धा विकली जातात , त्यातील काही चित्रे दाखवताना मुग्धा कुलकर्णी ( मुग्धानंद ) आणि संदीप खांबेटे ( घारुआण्णा )
270.JPG

तेथील मुलांची माहिती करुन देताना शिक्षक :-
234.JPG2.JPG253.JPG246.JPG242.JPG

सगळ्यात शेवटी मुलांबरोबर एक मायबोलीकरांचा फोटो :-
260.JPG

आणि त्या लहान मुलांनी त्यांच्या भाषेत व्यक्त केलेला आनंद :-
262.JPG
सर्व मायबोलीकरांना हा क्षण नक्कीच आनंद आणि एक छानशी आठवण देउन जाईल. Happy

पुन्हा पुढच्या वर्षी नवीन जोमाने नवीन संयोजकांबरोबर मायबोलीच्या सगळ्याच उपक्रमात आपणही सगळे सहाभागी व्हाल अशी आशा आहे. Happy

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! Happy
खूप चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या पद्धतीने केलेल्या मदतीचा विनियोग होईल ह्याबद्दल शंका नाही. Happy धन्यवाद संयोजक आणि ह्या कामात भाग घेणारे सगळेच Happy

मायबोली संयोजकांचे आभार. अभिमान वाटतोय. गर्व से कहो हम मायबोलीकर है ... शेवटचे प्र.चि. पाहुन खुप आनंद झाला.

Sanyojakanch manaapaasun kautuk..
Chhan vaatal vaachun!
Photonbaddal vishesh aabhar Happy

व्वा. ...खुप छान रे...!!!
मुलांच्या चेहर्‍या वरचा आनंद बघुन मायबोलीने असे उपक्रम दरवर्षी राबवावे असे वाटतय.
टि-शर्ट समितेचे विषेश अभिनंदन...इतकी मेहनत घेऊन उपक्रम तर राबवलाच पण देणगी सत्कारणी लागतेय की नाही हे ही तपासले. खरोखर कौतुक.

मस्त! ववि आणि टी-शर्ट समितींचं खूप कौतुक वाटतंय.

मुलांच्या गणवेशांचा कोरेपणा फोटोतूनही जाणवतोय आणि तो शेवटचा फोटो !! आहे बुवा!!!! Happy

मस्त!!! Happy

विधायक कामाबद्द्ल मायबोलि व संयोजकांचे खूप खूप कौतुक.

तेथील मुलांनी केलेली वारली चित्र परदेशात सुद्धा विकली जातात >>> हे विकत घ्यायचं झालं तर त्यांचा काही कॅटलॉग वगैरे आहे का? किंवा त्यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील तर त्यांचा पत्ता मिळेल का?

किती गोड आणि निरागस मुलं आहेत!

शाळेचा परिसर, तिथली स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. मुलांच्या कलाकृती सुंदर! वारलीकाम तर फार आवडलं.

टी-शर्ट समिती, तुम्हाला मनापासून धन्यवाद!

टी शर्ट समिती खरच खूप खूप धन्यवाद आणी अभिनंदन!!

३ Cheers for टी शर्ट समिती!! Happy

शाळेचा परिसर, तिथली स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. मुलांच्या कलाकृती सुंदर!

उत्तम कल्पना आणी तितकेच उत्तम एक्झेक्युशन देखील. > +१

टिशर्ट समितीचे मनापासुन अभिनंदन Happy

शेवटचा जल्लोषाचा फोटो आणि त्या चिमुकल्यांना अग्रस्थानी ठेवुन काढलेला फोटो फारच बोलके आहेत.

वा! वा! खूपच छान.
स्क्रोल करता-करता गणवेषातल्या मुलांचा पहिला फोटो स्क्रीनवर आला आणि भरूनच आलं एकदम. मुलांची वयं इतकी लहान असतील असं मला अपेक्षित नव्हतं अजिबात.

छान, मला शेवटच्या फोटोतील दृष्य फारच आवडले Happy
उपक्रम राबविल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन व संस्थेला शुभेच्छा

अतिशय सुंदर आणि गौरवास्पद उपक्रम.ठाणे जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा या आदीवासी भागात ठाण्याच्या सुनंदाताई पटवर्धन प्रगती प्रतिष्टान मार्फत अनेक सामाजिक प्रकल्प अगदी उत्तमपणे राबवित आहेत..आदीवासी जनतेच्या विकासासाठी त्यांनी अनेक पथदर्शी असे प्रकल्प सुरू केले आहेत. मी गेल्या १२ वर्षापासून या संस्थेशी परीचीत आहे..माबोकरांचे अभिनंदन..!

काय वाटतं आहे हे फोटो बघून ते नेमक्या शब्दात सांगता येणार नाही. पण मायबोली फक्त एक वेबसाईट, ऑनलाईन फोरमपेक्शा खूप काही आहे याची पुन्हा एकदा प्रचिती आली. टी शर्ट व ववि समिती धन्यवाद, अभिनंदन.

Pages