नमस्कार मायबोलीकर,
मायबोली टी शर्ट २०१३ या उपक्रमाची देणगी दिली आणि या उपक्रमाच काम पूर्ण झाल. आपण दिलेल्या देणगी बद्दल "प्रगती प्रतिष्ठान" यांनी एक पत्र मायबोलीला दिले आहे. याचबरोबर देणगीचा कसा वापर केला याबद्दल माहिती सुद्धा पुढे पत्रकात दिली आहे.
आधी सांगितल्याप्रमाणे या देणगीतुन त्यांनी विद्यार्थ्यांना गणवेश शिवुन घेतले आणि १५ ऑगस्ट च्या कार्यक्रमात सगळ्या मुलांना घालायला मिळाले. आपण सगळ्यांनी दिलेल्या योगदानातुन जे गणवेश विद्यार्थ्यांकरता बनवले गेले आणि ते परिधान केलेल्याचा आनंद पाहण्याकरता आणि या मुलांच्या भेटीकरता आम्ही काही मायबोलीकर १५ ऑगस्ट ला जव्हार येथे "प्रगती प्रतिष्ठान संचलित निलेश ल. मुर्डेश्वर कर्णबधीर विद्यालय" ला भेट देउन आलो. तेथील काही क्षणचित्रे येथे देत आहे.
संस्थेचा परिसर :-
सुनंदा ताई पटवर्धन आणि तिथल्या शाळेचा कर्मचारी वर्ग यांनी आम्हाला शाळेची माहिती करुन दिली.
कर्णबधीर मुलांच्या बाबतीत येणार्या समस्या , याचबरोबर असणारे इतर आजार ,पालकांचा अशिक्षीतपणा मुळे अशा मुलांकडे होणार दुर्लक्ष त्याचबरोबर संस्थेत उपलब्ध असणार्या सोयी आणि राबवले जाणारे निरनिराळे उपक्रम यांची त्यांनी माहिती करुन दिली.
संदीप खांबेटे( घारुआण्णा ) माहिती वाचताना :-
शाळेत मुलांनी केलेले किल्ले :-
व्यवस्थितपणा :- ( हे बघुन मला माझ कपाट आठवल्याशिवाय राहिल नाही )
तेथील मुलांनी केलेली वारली चित्र परदेशात सुद्धा विकली जातात , त्यातील काही चित्रे दाखवताना मुग्धा कुलकर्णी ( मुग्धानंद ) आणि संदीप खांबेटे ( घारुआण्णा )
तेथील मुलांची माहिती करुन देताना शिक्षक :-
सगळ्यात शेवटी मुलांबरोबर एक मायबोलीकरांचा फोटो :-
आणि त्या लहान मुलांनी त्यांच्या भाषेत व्यक्त केलेला आनंद :-
सर्व मायबोलीकरांना हा क्षण नक्कीच आनंद आणि एक छानशी आठवण देउन जाईल.
पुन्हा पुढच्या वर्षी नवीन जोमाने नवीन संयोजकांबरोबर मायबोलीच्या सगळ्याच उपक्रमात आपणही सगळे सहाभागी व्हाल अशी आशा आहे.
धन्यवाद
आशू + १. हा अख्खा बाफ वाचता
आशू + १.
हा अख्खा बाफ वाचता वाचता अंगावर रोमांच उभे राहिले.
टिशर्ट समितीचं अगदी मनापासून कौतुक!
अतिशय स्तुत्य उपक्रम!
अतिशय स्तुत्य उपक्रम!
टी-शर्ट समितीला मनापासून
टी-शर्ट समितीला मनापासून धन्यवाद!
तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच. मस्त वाटले फोटो पाहून.
संयोजक आणि मायबोली यांचे
संयोजक आणि मायबोली यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा

खूप छान वाटले वाचून.
खूप छान वाटले वाचून. मायबोलीकरांचे अभिनंदन!
मुग्धा,मधुरा,विनय, घारू
मुग्धा,मधुरा,विनय, घारू तुम्ही प्रत्यक्ष जाऊन आलात आणि इथे हे सगळं शेअर केलंत त्याबद्दल धन्यवाद लोक्स
किती निरागस मुलं आहेत ही. खुप
किती निरागस मुलं आहेत ही. खुप चांगला उपक्रम.
टी-शर्ट समितीला मनापासून
टी-शर्ट समितीला मनापासून धन्यवाद!
तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच.
समितीचे अभिनंदन , विनय,आण्णा
समितीचे अभिनंदन ,
विनय,आण्णा आणि मुग्धा , फोटो मधील मुलांच्या चेह-यावरचा आनंद बघून मन सुखावले,
धन्यवाद
खूप छान!
खूप छान!
Pages