वॅलेंटाईन डे ! ___ शतशब्दकथा

Submitted by तुमचा अभिषेक on 9 August, 2013 - 12:04

सालाबादाप्रमाणे येणारा प्रेमदिवस.. उधळायला संस्कृतीरक्षकांची जय्यत तयारी होतीच..
निषेधाचे बॅनर शहरभर लागले होते..

कट्ट्यावरच्या राहुल’चीही तयारी झाली होती.. चॉकलेट परफ्यूम ग्रीटींग अन फुले...
आणखी काय लागते..!

गेल्या तीन वर्षांचा त्याचा रेकॉर्ड होता, एकही वॅलेंटाईन डे फेल गेला नव्हता..
यावेळी मात्र अंदाज फसला.. त्याला हसूनच नकार देत ती पुढच्याकडे वळली..

टाय विस्कटतच त्याने पुष्पगुच्छ जमिनीवर आदळला..
अर्थातच, अपमान अन पराभवाची निशाणी कोणाला आवडते !

ते निघून गेले अन एवढा वेळ जवळच उभी.. नुसतेच बघत असलेली ‘ती’ ... लगबगीने पुढे आली..
पडलेली फुले उचलून हृदयाशी कवटाळली..
डोळ्यात काहीतरी तरळले आणि तिच्याही नकळत दोन अश्रू कोसळले..

तिची अन तिच्या पोरांच्या, आजच्या जेवणाची सोय झाली होती !

- तुमचा अभिषेक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या शतशब्दकथेला मिळालेला प्रतिसाद दुसरी लिहिण्याचा हुरुप देण्यास पुरेसा होता..
आता हिच्यावर मिळणारे प्रामाणिक प्रतिसाद सल्ले अन सूचना तिसरीच्या वेळी नक्कीच कामाला येतील.. Happy

थोडे तपशील वगळता ही कथा जमली आहे.
'त्या'चं नाव न लिहून चाललं असतं. आणखी परीणामकारक वाटलं असतं असं मला वाटतं.
शतशब्दकथेचा शेवट धक्कायुक्त, अनपेक्षितच असा असायला हवा असं काही नाही.

सर्व लोक्स __ धन्यवाद Happy

रिया __ तुला जे म्हणायचे ते थोडेसे समजल्यासारखे वाटतेय, मात्र तरीही नक्की कसला संबंध तुला अभिप्रेत आहे, तिच्या पुर्वायुष्याचा काही का?

मंजूडी __ आणि मी नेमका उलटा विचार केला, म्हणजे आधी मी "त्या" चे नाव लिहिलेच नव्हते.. पण मग नंतर त्याला नाव आणि ते देखील खास `राहुल' द्यावेसे वाटले.. Happy

आणि हो, धक्कातंत्र असलेच पाहिजे असे काही नाही, कथेला १०० शब्दांचे बंधन आहे, प्रयोगाला किंवा कल्पनांना नाही.. Happy

नाही, मला समजलीये कथा बरोबर
पण ती त्या गुलाबाचं काय करणार हा प्रश्न मला माझ्या मित्राने विचारला ( हा प्रश्नच यायला नको होता अस मला वाटतय )
यात तुझी चुक काहीच नाही पण साहित्यिक जाण शुन्य असणार्‍यालाही साहित्य कळलं पाहिजे असं मला वाटतं Happy

काय लिहिलय.... व्वा ... एकदम आवडलं. असं काही सुचत नाही यार आम्हाला... Sad त्यामुळे जलनयुक्त अभिनंदन Happy

विदे, किशोर मुंढे __ धन्यवाद Happy

रिया __ काय बोलू यावर आता.. गुलाबाची भाजी किंवा गुलकंद तर नाही ना करणार ती.. विकणारच ना.. उगाच साहित्यिक जाण सारखे मोठाले शब्द आणू नकोस यात Happy

अरे Happy
मी म्हणलं ना मला कळालं Happy
मीत्याला समजुनही सांगितलं
पण तुझी याआधीची कथा समजुन सांगावी लागली नाही Happy
तसं काहीसं होईला हवं होतं का अस मी तुलाविचारतेय Happy
मी काहीही सल्ले देत नाहीये Happy
जे मला येतच नाही त्यात मी सल्ले काय देणार?
एका नॉन वाचकाचा (ज्याला वाचनाची आवड नाही, मी वाचुन दाखवलं तेच ऐकलं जातं) अभिप्राय सांगितला Happy

अत्यंत सुंदर कथा. १०० शब्दांत असे लाखो करोडो भाव अचूक बसवायचे म्हणजे खरोखर कौतुकास्पद आहे.

मस्तच जमली आहे कथा ....भन्नात्ट ........एक्दम डोल्यासमोर उभे राहीले चित्र......

मस्तच. शेवट खरच अनपेक्षीत.

मला उगाचच वाटले होते की शेवटी तो बदला घेतो असे काही असेल म्हणून.

मस्तच , आवडली कथा .
मला उगाचच वाटले होते की शेवटी तो बदला घेतो असे काही असेल म्हणून. > क्राईम पट्रोल पाहण्याचा परीणाम. Happy

Pages