हेल्दि कट्लेट्स

Submitted by दीपमाला on 7 August, 2013 - 08:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ गिलक छोटी / घोसावळे

१ गाजर

तील ३ चमचे

मीठ चविनुसार

धने जीरा पूड

हिरवीमिरची बारीक चिरून

कोथिंबीर

लाल मिरची powder

जराशी हळद

जराशी साखर

गवाचे पीठ साधारण एक छोटी वाटी किंवा मिश्रण चांगले जमेल तेवढे

shallow fry करायला तेल

क्रमवार पाककृती: 

गाजर आणि गिलके किसून घ्या . मग त्यात सगले जिन्नस एकत्र करा आणि पाणी न घालता कणिक घालून एकत्र करा . साधारण भजिन्पेक्शआ घट्ट . आता हाताला तेल किंवा पाणी लाऊन त्याचे कटलेट करून घ्या . पण तवा तापला असेल तेवाच .

आणि पटापट cutlets करून तवयावर टाका . लिंबू एवढा गोळा झाला पाहिजे आणि त्याला चपटा करावा म्हणजे पीठ आणि घोसावला + गजर शिजेलहि। आजूबाजूला तेल सोडा झाकण ठेऊन जऱा वेळ होऊ देणे मग दुसर्या बाजूला थोडं तेल घालून क्रिस्पी होईस्तोवर होऊन देणे .

तवा मोठ्ठा असेल तर एका वेळेला १०-१२ होतात . किंवा जर मोठ्ठे मोठ्ठे गोळे घेऊन मग दाबायचे आणि तव्यावर घालायचे . कंटाळा येत असेल तर

खुप छान लागतात + खूप हेल्दी

अधिक टिपा: 

नवीन आहे सदस्य , चूकभूल माफ करणे

तुम्ही त्यात तुमच्या आवडीचे काही जिन्नस वाढून टाकू शकता
फोटो नाहीये Sad

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट वर रेसीपे शोधतांना सापडलेला पदार्थ
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयडिया आवडली. यात बादशहा रजवाडी गरम मसाला घातला तर अजूनच चव खुलेल.

रच्याकने, मी इतकेवेळा बादशहा मसाले वापरायला सांगते की लोकांना वाटेल माझी बादशहा मसाल्यांची एजन्सी आहे की काय? .... वाटू द्यात पण बादशहा मसालेच वापरा. हवे तर शेअर्स विकत घ्या त्या कंपनीचे. Happy

स्नेहा झुकिनी वापरता येईल नक्कि..

सुमेधाव्ही: थालीपिठ नाहि ग एवढे रुचकर लागणार ..तरि तु करून बघ प्रयत्न … यश आले कि कळव

मामी: ह्म्म्म मसला वापरुन बघेन आता..

सुनिधी: दुधी भोपळा बघ वापरून , कच्ची पपई ।म्हनजे अश्या भाज्या ज्या खाताना नाक वाकडा तिकडा होत ।ते बिनधास्त घालायचं । Happy

ह्म्म. ..चांगली वाट्तेय रेसिपी
म्हनजे अश्या भाज्या ज्या खाताना नाक वाकडा तिकडा होत>>>> Lol
पिन्की ८० - रच्याकने म्हणजे बाय द वे >> सरळ भाषांतर रस्त्या च्या कडेने Wink

छान रेसिपी! करुन खाणार!

मामे, तू बादशाहवाल्यांची नुसती एजंटच नव्हे तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मेंबर वाटतीयेस! Light 1 Biggrin
ते काहीही असो एकदा बादशाह मसाला वापरुनच बघते!

बादशाह मिळत नाही हो इथे. मिळेल तो वापरावा लागतो, कधी पाकिस्तानी कधी बांगलादेशी.... Sad
इथे एजन्सी मिळेल का? Happy

रच्याकने म्हणजे मला इतके दिवस कोणाचा तरी आय डी वाटत होता. >>>> पिन्कि८०... Rofl

धन्यवाद मानुषी, वत्सला. Happy (चला दोन गिर्‍हाईकं तर मिळाली! )