डोंगरदरिच्या कपारितुनी, हत्ती घोडे कुठून आले?
मनी वाटते-चितारताना,अकल्पिता'ही "फुटून" गेले...!
कुण्या देशीचे कोण प्रवासी नुसता हाती छिन्नी हतोडा
हातामधुनी कसा अवतरे? मत्त हाती अन निधडा घोडा!?
गूढ म्हणावे हरेकं शिल्पा... थांग मनासी लागत नाही
जुळता जुळता सर्व गणी ते...हिशेब मन का मागत नाही!?
वॄषभ तसाही खुशाल शिंगी,रोखुनी पाहि मला जणू तो
पुराणातल्या कथे सारिखा,कळे न नक्की काय सांगतो?
गूढ म्हणू की रम्य म्हणू मी?मनास द्यावा कसला परिचय?
हे ही म्हणता,ते ही म्हणता,ढळतो माझा हरेक निश्चय!!!
कथा सूत्र ती ऐकुन झाली,तरी कल्पना ओढत नेते
पुन्हा गुढाचे वस्त्र लेवूनी,सुचता..कधि हुलकाऊन जाते.
सांगिन मी ही गूढ तिच्यातिल,समीप येइल रूप लेऊनी
सुचेल पुन्हा..लिहिन तेंव्हा...आता पाने ठेवितो मिटुनी.
========================================================
डोंगरदरिच्या कपारितुनी, हत्ती घोडे कुठून आले?
मनी वाटते-चितारताना,अकल्पिता'ही "फुटून" गेले...!
कुण्या देशीचे कोण प्रवासी नसता हाती छिन्नी हतोडा
हातामधुनी कसा अवतरे? मत्त हाती अन निधडा घोडा!?
गूढ म्हणावे हरेकं शिल्पा... थांग मनासी लागत नाही
जुळता जुळता सर्व गणी ते...हिशेब मन का मागत नाही!?
वॄषभ तसाही खुशाल शिंगी,रोखुनी पाहि मला जणू तो
पुराणातल्या कथे सारिखा,कळे न नक्की काय सांगतो?
गूढ म्हणू की रम्य म्हणू मी?मनास द्यावा कसला परिचय?
हे ही म्हणता,ते ही म्हणता,ढळतो माझा हरेक निश्चय!!!
कथा सूत्र ती ऐकुन झाली,तरी कल्पना ओढत नेते
पुन्हा गुढाचे वस्त्र लेवूनी,सुचता..कधि हुलकाऊन जाते.
सांगिन मी ही गूढ तिच्यातिल,समीप येइल रूप लेऊनी
सुचेल पुन्हा..लिहिन तेंव्हा...आता पाने ठेवितो मिटुनी.
========================================================
सर्व छायाचित्रे-(आमचे मित्रवर्य-सागर...यांचे कडून..)
कविता उत्तम. सुरेख आहे
कविता उत्तम.
सुरेख आहे लेण्या. बघायची इच्छा होतेय.
वा अतृप्त आत्म्या वा मस्त
वा अतृप्त आत्म्या वा
मस्त कामगीरी !!!
फोटो व कविता बेहद्द छान
हल्ली अश्याप्रकारे काव्य प्रसंगवर्णन एखादी घटना अशी तपशीलवार टिपणे नोंदवहीत नोंदवल्यासारखी अशी कविता फार लोक करत नाहीत ......तुम्हाला सहजासहजी जमते व तेही शेवटपर्यंत वाचकाना जराही बोर होवू न देता हे फार आवडते मला तुमच्या कवितेत नेहमीच
लिहीत रहा
शुभेच्छा
धन्यवाद
सुंदर कविता, फोटो आणि सादर
सुंदर कविता, फोटो
आणि सादर करण्याची कल्पनाही सुंदर....
वैभव >>> मनःपूर्वक धन्यवाद
वैभव >>> मनःपूर्वक धन्यवाद !
अशीच १ कविता याच लेणीच्या चैत्यगृहात बसल्यानंतर सुचलेली ती इथे http://www.maayboli.com/node/43281 मागे प्रकाशित झाली आहे.
जो_एस >>> आपणासही धन्यवाद!
फोटो आणि कविता दोन्ही छान
फोटो आणि कविता दोन्ही छान आहेत.
प्रचि आणि द्विपदींची सांगड
प्रचि आणि द्विपदींची सांगड फारच आवडली...
मस्तच अ.आ.
छान ! ! ! सौंदर्यावर
छान ! ! !
सौंदर्यावर सौंदर्याचे
सुरेख लेणे तुम्ही कोरा
फुगेल इतिहासाची छाती
कळेल 'माणूस'कीचा तोरा !
- राजीव मासरूळकर
सुंदर जागा आहे. बरीच वर्ष
सुंदर जागा आहे. बरीच वर्ष झाली जाउन.
वर पोचतो तिथे एक सोनचाफ्याचे झाड असल्याचे स्मरते. आहे का अजून.
सेनापति>>> झाड आहे, चांगल
सेनापति>>> झाड आहे, चांगल बहरलयही!
हल्ली तेथे 1 शासकिय सेवेकरी लेणी परिसराचि चांगली निगा राखुन आहे.
वाह!! प्रत्येक प्रचिला समर्पक
वाह!! प्रत्येक प्रचिला समर्पक ओळी! मस्त!
लेण्यांचा मस्तं काव्यात्मक
लेण्यांचा मस्तं काव्यात्मक परिचय.
आवडली ही कल्पना.
अन्जू | बागेश्री | राजीव
अन्जू | बागेश्री | राजीव मासरूळकर | सेनापती... | मी_आर्या | साती |के अंजली |
===================================================
....................सर्वांना धन्यवाद........................!
मस्त!
मस्त!