"गूढ" (बेडसे लेणी-एक गूढानुभव!)

Submitted by अत्रुप्त आत्मा on 30 July, 2013 - 08:38

डोंगरदरिच्या कपारितुनी, हत्ती घोडे कुठून आले?
मनी वाटते-चितारताना,अकल्पिता'ही "फुटून" गेले...!
https://lh5.googleusercontent.com/-tkEOgsr5S-M/UOmt3DVjXiI/AAAAAAAAV9U/7WHZmVxHVx8/w702-h468-no/IMG_3695.JPG
कुण्या देशीचे कोण प्रवासी नुसता हाती छिन्नी हतोडा
हातामधुनी कसा अवतरे? मत्त हाती अन निधडा घोडा!?
https://lh6.googleusercontent.com/-0GQsszprAq4/UOmuf-K1p2I/AAAAAAAAV_s/WtGNYtQz17M/w702-h468-no/IMG_3714.JPG
गूढ म्हणावे हरेकं शिल्पा... थांग मनासी लागत नाही
जुळता जुळता सर्व गणी ते...हिशेब मन का मागत नाही!?
https://lh4.googleusercontent.com/-m6PSkS0HP8s/UOmuXattpQI/AAAAAAAAV_M/qDzljr7bmEM/w702-h468-no/IMG_3710.JPG
वॄषभ तसाही खुशाल शिंगी,रोखुनी पाहि मला जणू तो
पुराणातल्या कथे सारिखा,कळे न नक्की काय सांगतो?
https://lh6.googleusercontent.com/-tuyJTOzVNEA/UOmuRLAkHpI/AAAAAAAAWKc/UVwxDHcMhOQ/w702-h468-no/IMG_3707.JPG
गूढ म्हणू की रम्य म्हणू मी?मनास द्यावा कसला परिचय?
हे ही म्हणता,ते ही म्हणता,ढळतो माझा हरेक निश्चय!!!
https://lh6.googleusercontent.com/-1XWU-EkGyUI/UOmuhkR-ecI/AAAAAAAAV_0/0xwj7PI2nEU/w702-h468-no/IMG_3715.JPG
कथा सूत्र ती ऐकुन झाली,तरी कल्पना ओढत नेते
पुन्हा गुढाचे वस्त्र लेवूनी,सुचता..कधि हुलकाऊन जाते.
https://lh3.googleusercontent.com/-62YPWqZPoI4/UOmusblIGwI/AAAAAAAAWAs/VctXhvk_AGI/w702-h468-no/IMG_3724.JPG
सांगिन मी ही गूढ तिच्यातिल,समीप येइल रूप लेऊनी
सुचेल पुन्हा..लिहिन तेंव्हा...आता पाने ठेवितो मिटुनी.
https://lh4.googleusercontent.com/-QEqFBjbsDBc/UOmvZNeurAI/AAAAAAAAWDc/RPW5b9A2IEU/w702-h468-no/IMG_3756.JPG
========================================================
डोंगरदरिच्या कपारितुनी, हत्ती घोडे कुठून आले?
मनी वाटते-चितारताना,अकल्पिता'ही "फुटून" गेले...!

कुण्या देशीचे कोण प्रवासी नसता हाती छिन्नी हतोडा
हातामधुनी कसा अवतरे? मत्त हाती अन निधडा घोडा!?

गूढ म्हणावे हरेकं शिल्पा... थांग मनासी लागत नाही
जुळता जुळता सर्व गणी ते...हिशेब मन का मागत नाही!?

वॄषभ तसाही खुशाल शिंगी,रोखुनी पाहि मला जणू तो
पुराणातल्या कथे सारिखा,कळे न नक्की काय सांगतो?

गूढ म्हणू की रम्य म्हणू मी?मनास द्यावा कसला परिचय?
हे ही म्हणता,ते ही म्हणता,ढळतो माझा हरेक निश्चय!!!

कथा सूत्र ती ऐकुन झाली,तरी कल्पना ओढत नेते
पुन्हा गुढाचे वस्त्र लेवूनी,सुचता..कधि हुलकाऊन जाते.

सांगिन मी ही गूढ तिच्यातिल,समीप येइल रूप लेऊनी
सुचेल पुन्हा..लिहिन तेंव्हा...आता पाने ठेवितो मिटुनी.
========================================================
सर्व छायाचित्रे-(आमचे मित्रवर्य-सागर...यांचे कडून..)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा अतृप्त आत्म्या वा

मस्त कामगीरी !!!

फोटो व कविता बेहद्द छान
हल्ली अश्याप्रकारे काव्य प्रसंगवर्णन एखादी घटना अशी तपशीलवार टिपणे नोंदवहीत नोंदवल्यासारखी अशी कविता फार लोक करत नाहीत ......तुम्हाला सहजासहजी जमते व तेही शेवटपर्यंत वाचकाना जराही बोर होवू न देता हे फार आवडते मला तुमच्या कवितेत नेहमीच

लिहीत रहा

शुभेच्छा
धन्यवाद

वैभव >>> मनःपूर्वक धन्यवाद !

अशीच १ कविता याच लेणीच्या चैत्यगृहात बसल्यानंतर सुचलेली ती इथे http://www.maayboli.com/node/43281 मागे प्रकाशित झाली आहे. Happy

जो_एस >>> आपणासही धन्यवाद!

छान ! ! !

सौंदर्यावर सौंदर्याचे
सुरेख लेणे तुम्ही कोरा
फुगेल इतिहासाची छाती
कळेल 'माणूस'कीचा तोरा !

- राजीव मासरूळकर

सुंदर जागा आहे. बरीच वर्ष झाली जाउन. Happy

वर पोचतो तिथे एक सोनचाफ्याचे झाड असल्याचे स्मरते. आहे का अजून. Happy

सेनापति>>> झाड आहे, चांगल बहरलयही! Happy
हल्ली तेथे 1 शासकिय सेवेकरी लेणी परिसराचि चांगली निगा राखुन आहे.

अन्जू | बागेश्री | राजीव मासरूळकर | सेनापती... | मी_आर्या | साती |के अंजली |
===================================================
....................सर्वांना धन्यवाद........................! http://mimarathi.net/modules/smileys/packs/Example/1.gif