मायबोली टी शर्ट देणगी

Submitted by टीशर्ट_समिती on 23 July, 2013 - 03:35

नमस्कार मायबोली परिवार,

"मायबोली टी शर्ट" या उपक्रमाचे काम पूर्ण झाले आहे. आपण सगळ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे रुपये ३३,०००/- ( रुपये तेहतीस हजार फक्त ) एव्हढी रक्कम देणगी म्हणून आपण सगळे मिळून देत आहोत.

आधीच ठरवल्याप्रमाणे "प्रगती प्रतिष्ठान" या संस्थेला ही देणगी देण्यात आली आहे.
तेथील मुलांना गणवेषाची आवश्यक्ता होती , आणि आपण दिलेल्या देणगीतुन ती पूर्ण होणार आहे. ते गणवेष त्यांना १५ ऑगस्ट च्या आधी मिळतील व त्यांच्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला त्यांना हे नवीन गणवेष घालता येतील.
MABO.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरे तर ६६०*१००=६६००० असे टारगेट ठेवा. कदाचीत त्याहीपेक्षा जास्त असले तरी चालेल. चांगल्या उपक्रमाकरता कच्चे गणित, चुकलेले गणित वगैरे काहीही असले तरी नफाच आहे जो पैशने मोजता येऊच शकत नाही. Happy

खरे तर ६६०*१००=६६००० असे टारगेट ठेवा. कदाचीत त्याहीपेक्षा जास्त असले तरी चालेल. चांगल्या उपक्रमाकरता कच्चे गणित, चुकलेले गणित वगैरे काहीही असले तरी नफाच आहे जो पैशने मोजता येऊच शकत नाही....>>>विचार खूपच चांगला आहे केपीकाका.. पण एवढे जर वाटतेय ना तर या उपक्रमासाठी निदान टी शर्टचे पैसे द्यायला आणि टी शर्ट घ्यायला यायचे थोडेफार कष्ट उचलावेत की माणसाने.. Happy संयोजकांनाही बरं वाटतं मग.. Happy

टी शर्टचे पैसे द्यायला आणि टी शर्ट घ्यायला यायचे थोडेफार कष्ट उचलावेत>>
अरेच्च्या. पैसे घरपोच दिले की. टी शर्ट पण घरुनच घेतोय की. वेळेत दुसर्‍याचे पैसे पण दिले खर तर. टीशर्ट घेणे महत्वाचे आहे का या उत्कृष्ठ उपक्रमाकरता खारीचा वाटा उचलणे?? Uhoh

टीशर्ट घेणे महत्वाचे आहे का या उत्कृष्ठ उपक्रमाकरता खारीचा वाटा उचलणे??...>>> दोन्ही.. :). कारण तिथे गाठीभेटी पण होतात त्यानिमित्ताने. Happy

टीशर्ट समिती चे अभिनंदन आणि आभार ............ Happy

टीशर्ट घेणे महत्वाचे आहे का >>>>>>>>>> नक्कीच आहे. निदान त्या बालगंधर्वच्या कँटीनवाल्याच्या वडापावचे आपण देणे लागतो याचे भान ठेऊन टीशर्ट कलेक्ट करायला जाणे कंपलसरी आहे ............. Lol

jokes apart, पण केप्या, कार्याध्यक्ष इज म्हणिंग राईट ............... Happy

Pages