मायबोली टी शर्ट देणगी

Submitted by टीशर्ट_समिती on 23 July, 2013 - 03:35

नमस्कार मायबोली परिवार,

"मायबोली टी शर्ट" या उपक्रमाचे काम पूर्ण झाले आहे. आपण सगळ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे रुपये ३३,०००/- ( रुपये तेहतीस हजार फक्त ) एव्हढी रक्कम देणगी म्हणून आपण सगळे मिळून देत आहोत.

आधीच ठरवल्याप्रमाणे "प्रगती प्रतिष्ठान" या संस्थेला ही देणगी देण्यात आली आहे.
तेथील मुलांना गणवेषाची आवश्यक्ता होती , आणि आपण दिलेल्या देणगीतुन ती पूर्ण होणार आहे. ते गणवेष त्यांना १५ ऑगस्ट च्या आधी मिळतील व त्यांच्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला त्यांना हे नवीन गणवेष घालता येतील.
MABO.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा वा वा! छानच! Happy

(स्वगत - प्रगति प्रतिष्ठानपर्यंत देणगीची रक्कमही पोहोचली आणि मी अजून टी-शर्ट, बॅग कलेक्ट नाही केलेले...)

टिशर्ट समिती च जोरदार अभिनंदन. मायबोलीच्या माध्यामातून यात सहभागी होता आल्याचा फार फार आनंद वाटला.

मस्त Happy
टी- शर्ट, बॅग खरेदी करुन देणगीला हातभार लावणार्‍या सर्व मायबोली करांचे, आणि देणगी नियोजन उत्तम रितीने पार पाडणार्‍या संयोजकांचे मनापासुन कौतुक, आणि हार्दिक अभिनंदन.>>>>+१

सर्व संयोजकांचे अभिनंदन....
आणि आता गेट सेट गो फॉर ववि२०१३... चलो विसावा....
सर्व वविकरांना विनंती टीशर्ट घालुन वविला यायचं हं....
ज्यानी टीशर्ट विकत किंवा घेतलेले नाहीत त्यांनी त्वरीत इतर माबोकरांकडुन न येणार्या भाड्याने घायची व्यवस्था करा....

टीशर्ट समितीचे आणि मायबोलीकरांच अभिनंदन! Happy
ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला त्यांना हे नवीन गणवेष घालता येतील>> ही फार भारी गोष्ट आहे.>>>+१

टी-शर्ट समिती, तुमच्या मेहेनतीचं, सगळे व्याप सांभाळून या कामाला वेळ देण्याचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशन्सचं मनापासून कौतुक!

पुढल्यावेळी मायबोलीवर शर्ट्-टोप्या-ब्यागांवरच्या डिझाइन्ससाठी स्पर्धा घेण्यात यावी आणि सर्वानुमते उत्कृष्ट डिझाईनला बक्षीस मिळावं, ते या सगळ्यांवर छापल्या जावं असं वाटतं.

मायबोली जिंदाबाद!!

सुपर्ब! ग्रेट!! अफलातुन!!! Happy

टी- शर्ट, बॅग खरेदी करुन देणगीला हातभार लावणार्‍या सर्व मायबोली करांचे, आणि देणगी नियोजन उत्तम रितीने पार पाडणार्‍या संयोजकांचे मनापासुन कौतुक, आणि हार्दिक अभिनंदन.>>>> १००

पुढल्यावेळी मायबोलीवर शर्ट्-टोप्या-ब्यागांवरच्या डिझाइन्ससाठी स्पर्धा घेण्यात यावी आणि सर्वानुमते उत्कृष्ट डिझाईनला बक्षीस मिळावं, ते या सगळ्यांवर छापल्या जावं असं वाटतं.>>>>अनुमोदन Happy

भन्नाट अभिमानास्पद काम केलय टीशर्ट समितीने Happy ज्जेब्बात है|
यशस्वी संयोजनाबद्दल अभिनंदन अन अशा उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल आभारही

Pages