मायबोली टी शर्ट देणगी

Submitted by टीशर्ट_समिती on 23 July, 2013 - 03:35

नमस्कार मायबोली परिवार,

"मायबोली टी शर्ट" या उपक्रमाचे काम पूर्ण झाले आहे. आपण सगळ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे रुपये ३३,०००/- ( रुपये तेहतीस हजार फक्त ) एव्हढी रक्कम देणगी म्हणून आपण सगळे मिळून देत आहोत.

आधीच ठरवल्याप्रमाणे "प्रगती प्रतिष्ठान" या संस्थेला ही देणगी देण्यात आली आहे.
तेथील मुलांना गणवेषाची आवश्यक्ता होती , आणि आपण दिलेल्या देणगीतुन ती पूर्ण होणार आहे. ते गणवेष त्यांना १५ ऑगस्ट च्या आधी मिळतील व त्यांच्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला त्यांना हे नवीन गणवेष घालता येतील.
MABO.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे!! क्या बात है.... मस्तच.
सर्व संयोजकांचे मनःपूर्वक कौतुक आहे.

ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला त्यांना हे नवीन गणवेष घालता येतील>> ही फार भारी गोष्ट आहे.

अरे वा! संयोजकांचे आभार Happy

ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला त्यांना हे नवीन गणवेष घालता येतील>> ही फार भारी गोष्ट आहे.>>> +१

तेहेत्तीस हजार .... क्या बात है |

खरच, एव्हढी छान रक्कम जमा करता आली ह्याच खूप बरं वाटलं.

ह्या ऊपक्रमात सहभागी होणार्‍या प्रत्येकाचे आणि खास करुन मायबोलीचे शतशः आभार

खुप भारी वाटतंय!
मायबोली परिवाराचा घटक असल्याचे अपार समाधान झाले.
टी- शर्ट, बॅग खरेदी करुन देणगीला हातभार लावणार्‍या सर्व मायबोली करांचे, आणि देणगी नियोजन उत्तम रितीने पार पाडणार्‍या संयोजकांचे मनापासुन कौतुक, आणि हार्दिक अभिनंदन.

रच्याकने, आपण आपण आपल्या वविचा आनंद मनापासुन घेण्याच्या आधीच, मुलांपर्यंत गणवेषासाठी देणगी पोहोचल्याने, त्यांच्या डोळ्यातील आनंद, आणि ओठावरील हसु, माझ्याच नाही तर आपल्या सर्वांच्याच वविचा आनंद द्विगुणित करणार हे नक्की!!!

आता चलो ववि! चलो मुरबाड!

आपण प्रगती प्रतिष्ठानवाल्यांना त्यांच्या गरजेची रक्कम विचारली तेव्हा गणवेषासाठी त्यांनी २५००० रु. लागतील असे आपल्याला सांगितले होते. ही रक्कम तशी मोठी होती त्यामुळे आपण जास्तीत जास्त रक्कम जमा करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन त्यांना दिले होते.
पण अनपेक्षितपणे मायबोलीकरांनी इतका भरघोस प्रतिसाद दिला टी-शर्टस आणि बॅग्जना की आपण ३३,०००/- चा आकडा गाठू शकलो. ही खरोखर सर्व मायबोलीकरांच्या आणि आम्हा संयोजकांच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि यासाठी सर्व संयोजकांतर्फे मायबोलीकरांचे हार्दीक आभार.... Happy

इतक्या चांगल्या कामासाठी हातभार लावण्याची संधी दिल्याबद्दल टीशर्ट समितीचे आभार... >>> +१०
निव्वळ आभारच नव्हे तर कौतुक आणि अभिनंदन देखील.

मायबोली असे समाजोपयोगी उपक्रम राबवते त्यामुळे मायबोलीकर असल्याचा अभिमान वाटतो.

रच्याकने, आपण आपण आपल्या वविचा आनंद मनापासुन घेण्याच्या आधीच, मुलांपर्यंत गणवेषासाठी देणगी पोहोचल्याने, त्यांच्या डोळ्यातील आनंद, आणि ओठावरील हसु, माझ्याच नाही तर आपल्या सर्वांच्याच वविचा आनंद द्विगुणित करणार हे नक्की!!!

>> +१.

उत्तम कामासाठी देणगी तीदेखील वेळेवर दिल्यामुळे टीशर्ट समितीचं प्रचंड कौतुक.... Happy

पण अनपेक्षितपणे मायबोलीकरांनी इतका भरघोस प्रतिसाद दिला टी-शर्टस आणि बॅग्जना की आपण ३३,०००/- चा आकडा गाठू शकलो.>>> जबरदस्त!!!

सर्वांचंच मनापासून अभिनंदन!! Happy
मायबोलीसाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.

क्या बात है!!! सह्हीच!!!! Happy

टी- शर्ट, बॅग खरेदी करुन देणगीला हातभार लावणार्‍या सर्व मायबोली करांचे, आणि देणगी नियोजन उत्तम रितीने पार पाडणार्‍या संयोजकांचे मनापासुन कौतुक, आणि हार्दिक अभिनंदन.>>>>+१ Happy

वा वा! देणगीचं काम झालं देखील!! ग्रेट. टीशर्ट समितीचं कौतुक करावं तितकं कमी आहे यंदा. पर्फेक्ट टीशर्ट्स, वेळेत भरघोस देणगी. मस्त मस्त, ठेवा ते वर.

अरे!! क्या बात है.... मस्तच.
सर्व संयोजकांचे मनःपूर्वक कौतुक आहे

अरे व्वा..... अभिनंदन!!!
या सत्कार्यात खारीचा वाटा उचलायची संधि मिळाल्याचा आनंद आहेच.

Pages