सुखियां / मुगाचे गोड वडे

Submitted by आरती on 21 July, 2013 - 01:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१/२ वाटी रवा
१ वाटी भिजवलेले मूग
१/२ वाटी खवलेले नारळ
१/२ वाटी चिरलेला गूळ
१/४ चमचा सुंठ पावडर
२ हिरवे वेलदोडे
४ चमचे साजूक तूप
तळण्यासाठी तेल.

क्रमवार पाककृती: 

रवा आणि २ चमचे तुप एकत्र करून घ्या. थोडे-थोडे पाणी घालत रवा सैलसर भिजवा [साधारण करंजीसारखा]. रवा १/२ तास भिजत ठेवायचा आहे.

मधल्या वेळात सारण करायला घ्या.
भिजवलेल्या मुगातले सगळे पाणी काढून टाकून कुकरमध्ये २ शिट्ट्या घ्या. भांड्यात २ चमचे तूप घ्या, थोडेसे गरम झाले की त्यात वाफवलेले मूग आणि गुळ घाला. गुळ वितळला की लगेच नारळ, सुंठ पावडर आणि वेलदोड्याचे दाणे घाला. डावाने हलवत रहा. हे मिश्रण मिळून आले की गॅस बंद करून गार करायला ठेवा. गार झाल्यावर त्याचे छोटे-छोटे लाडू वळा.

mb1.jpg

रवा अगदी बारिक नसेल तर भिजलेला रव्याचा गोळा फुडप्रोसेसर मध्ये थोडा फिरवून घ्या. छान मऊ होतो. त्याच्या छोट्या-छोट्या लाट्या करा. पुरी लाटून त्यावर मुगाचा लाडू ठेवा, सगळ्या बाजूने बंद करा. कढईत तेल तापवून मंद आचेवर तळा.

mb2.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ प्रत्येकी.
अधिक टिपा: 

१. मूग नुसते वाफवायाचे आहेत, शिजवायचे नाहीत. त्यामुळे २ च शिट्ट्या घ्या.
२. वडे खुसखुशीत हवे असतील तर मंद आचेवरच तळा.
३. वर दिलेल्या प्रमाणात ६ वडे होतात.
४. वेलदोड्याची पावडर पण चालेल, पण दाणे घातले की जास्त चांगला स्वाद उतरतो असा माझा अनुभव आहे.
५. मूळ पाककृतीत वेलदोड्याची पावडर वापरली आहे. रव्या ऐवजी मैदा वापरला आहे. भज्याच्या पिठासारखा मैदा भिजवून त्यात मुगाचे गोळे बुडवून तळले आहे. मला मैदा वापरायचा नव्हता म्हणून मी बदल केला. [एकदा अवन मध्ये बेक करून बघणार आहे. बेक करून, थोडे उकलून मधोमध तुपाची धार सोडून खायला जास्त मजा येईल असे खाताना जाणवले. Happy ]
६. या पदार्थाच्या नावाचा नक्की उच्चार काय आहे हे आठवत नाही / माहिती नाही. बऱ्याच वर्षांपूर्वी मैत्रीणीच्या डब्यात खाल्ले होते. आता करताना प्रमाण आंतरजालावरून घेतले.

माहितीचा स्रोत: 
आंतरजाल + काही बदल.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान दिसताहेत. वेगळीच पाकृ आहे. कोणी केलेले मी खाल्ले आणि मला आवडले तर मी करेन.

आरतीची ठाणेभेट कधी आहे? Wink

छान दिसताहेत. वेगळीच पाकृ आहे. कोणी केलेले मी खाल्ले आणि मला आवडले तर मी करेन......................ही आयडीया मस्तय!

अंजली, मंजूडी धन्यवाद.

मंजूडी, कोणी येणारे भेटले तर पाठवते २ तुला Happy

अगदी सुबक, गोल गुटगुटीत दिसतायत या सुखियां Happy

खल्लाय हा प्रकार मैत्रिणीकडे.
चांगला लागला पण करुन बघेन की नाही माहित नाही कारण घरी कुणाला आवडणार नाही याची गॅरेंटी आहे Lol

मुगडाळ कचोरीसारखे दिसतायत थोडे. >> अख्ख्या मुगाची कचोरी, हि.मी ऐवजी गुळ. Happy

मलाही आवडेल की नाही शंका आहे >> रवा, नारळ, गुळ असल्याने थोडे तळणीच्या मोदकांसारखे लागतात.