उपवासाच्या इडल्या

Submitted by smi rocks on 19 July, 2013 - 05:17

लागणारा वेळ : १५-२० मिनीटे

साहीत्य : १ वाटी वरी तांदूळ, २ वाटया पाणी, चवीनुसार मीठ, इडलीचे पात्र व तेल.

क्रमवार पाककृती : एका मध्यम आकाराच्या टोपात पाणी उकळत ठेवावे. वरीचे तांदूळ धुउन घ्यावेत. पाणी उकळल्यावर त्यात धुतलेले तांदूळ घालावेत व त्यात चवीनुसार मीठ घालावे. २-३ उकळी आल्यावर गॅस बंद करावा. तयार झालेले मिश्रण चमच्याने टाकण्याइतपत घटट झाले की इडलीपात्राला तेल लावून ते मिश्रण त्यात घालावे.
१० मिनीटे इडली वाफवून घ्यावीत व साधारण थंड झाल्यावर काढून घ्यावीत. चटणीबरोबर खायल्या द्यावेत.

टिप :
एका वाटीत १०-१२ इडल्या होतात.
एकावेळी एकाच वाटीचे मिश्रण तयार करावे. जास्त केल्यास ते मिश्रण घटट होते त्यामुळे ते इडलीपात्रात घालता येत नाही.

फोटो :

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे फोटो!

अरुंधतीने इकडे इडली रव्याचा उपमा करून मूदी पाडून त्या पुन्हा वाफवायच्या अश्या प्रकारची कृती टाकली होती, त्याची आठवण आली Happy

कश्या गोर्‍यापान शुभ्र दिसतायेत, आंबवलेलं प्रकरण नसल्याने पित्ताचा त्रास होणार्‍यांसाठी उत्तम, Happy

वरी मिळाली तर करून बघणार.

अरे वा, खुपच मस्त. आताच केली. एक घाणा दाण्याच्या आमटी बरोबर तर दुसरा मसाला
(मिर्ची ,कोथिंबीर व अले + खोबऱ्याचे छोटे काप)
तुमचे मनापसुन धन्यवाद!

माझी ताई साबुदाणा आणि भगर भिजवून इडली करायची … पण हा प्रकार अगदी सोपा वाटताय … करून बघायला हवेच एकदा

Pages