उपवासाच्या इडल्या

Submitted by smi rocks on 19 July, 2013 - 05:17

लागणारा वेळ : १५-२० मिनीटे

साहीत्य : १ वाटी वरी तांदूळ, २ वाटया पाणी, चवीनुसार मीठ, इडलीचे पात्र व तेल.

क्रमवार पाककृती : एका मध्यम आकाराच्या टोपात पाणी उकळत ठेवावे. वरीचे तांदूळ धुउन घ्यावेत. पाणी उकळल्यावर त्यात धुतलेले तांदूळ घालावेत व त्यात चवीनुसार मीठ घालावे. २-३ उकळी आल्यावर गॅस बंद करावा. तयार झालेले मिश्रण चमच्याने टाकण्याइतपत घटट झाले की इडलीपात्राला तेल लावून ते मिश्रण त्यात घालावे.
१० मिनीटे इडली वाफवून घ्यावीत व साधारण थंड झाल्यावर काढून घ्यावीत. चटणीबरोबर खायल्या द्यावेत.

टिप :
एका वाटीत १०-१२ इडल्या होतात.
एकावेळी एकाच वाटीचे मिश्रण तयार करावे. जास्त केल्यास ते मिश्रण घटट होते त्यामुळे ते इडलीपात्रात घालता येत नाही.

फोटो :

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केल्या गं इडल्या. मस्त झाल्या, धन्यवाद्.:स्मित: आता कोकणी पद्धतीच्या व्हेज पाककृती पण टाक बघु.:फिदी:

जल्ला त्या जागुला कधी वेळ मिळेल देव जाणे.:फिदी:

ह्या केल्यात पण थंड झाल्या की खावत नाहीत. तेव्हा यो रॉक्स म्हणतात त्याला +१. Happy नारळाचे दूधात गूळ घालून खातात आमच्याकडे.
मला वरीची खिचडीच मस्त लागते शेंगदाणे घालून...

झंपी.. ह्या केल्यात पण थंड झाल्या की खावत नाहीत..>>> कहि हरकत नाहि..केलेल मिश्रण / इडली जर थंड झाल्या तर...

क्रुती: मिश्रण / इडलीचा चुरा करुन घ्यावा अगदी प्रत्येक कण सुट्सुटीत करुन त्याला जिरे, कडिपत्ता घालुन फोडणी द्यावी.. व मिरची घालावी.. मग केलेल मिश्रण त्यात घालावे.. व एक वाफ देऊन देखील खाऊ शकतो..

Pages