पेपर मॅशीच्या कलाकृती.

Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 17 July, 2013 - 07:02

नमस्कार मित्रमैत्रिणींनो,आपल्यासमोर पुन्हा एकदा पेपर मॅशीच्या काही कलाकृती.
नक्की आवडतील तुम्हाला अशी माझी खात्री आहे.

कृती मी सांगितलीच आहे माझ्या ब्लॉगवर.पाहिलीच असेल.
box.jpgcamel.jpgcamel1.jpgganesh.jpgmor.jpg66407_1390065482462_8243772_n.jpg
कोणी कोणी करुन पाहिले??? जमले का???नक्की सांगाल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी!! Happy

तोंडाचा आ वासलेली बाहुली... जबडा जमिनीला टेकलेली!
माऊ, तुम्ही जबरी क्रिएटीव्ह आहात. एक टिकली लावताना धड लागत नाही (आपल्याच चेहर्‍यावर)... ह्यातले आम्ही (मी)... सवय नाही हे ही आहेच.... तरीही.

कस्लं भारी करता सगळं? तुमचा स्टुडियो वगैरे आहे का? गोष्टी विक्रीस आहेत का? (हा प्रश्नं अस्थानी असू नये... पण पूर्वी उत्तरलेला असल्यानं यडपट असेल ...)

मी केला प्रयत्न!पण फारच "हौशी" प्रयत्न झालाय.फोटो देतेय इथे.कारण समजून घ्यायचंय की चुका कशा सुधारता येतील :).
तुमच्या कलाकृतींमधले सगळ्या फुलांचे,पानांचे,ती जी वेटोळी आहेत त्यांचे आकार किती सुबक आणि एक सारखे आले आहेत!ते येण्यासाठी काही वेगळ्या युक्ती आहे का?की "करत रहाणे" ?!विशेषतः ती चकलीसारखी वेटोळी,बराच प्रयत्न केला,पण ती जमेनात(बाकिही फार सुबक आहे ,अश्यातला प्रकार नाहीये म्हणा :)..
कृपया अगदी मनापासून सूचना करा,अजिबात राग येणार नाही Happy
20130717_101057.jpg

आता परत बघतेय तेव्हा तर अगदीच फोटो टाकू की नको होतंय,पण चुका कळल्या पाहिजेत Happy

>>>>> तोंडाचा आ वासलेली बाहुली. Lol Lol अगदी अगदी.
इकडे मात्र प्रचंड "जळखाऊ हेव्यात बुडलेली" बाहुली Proud आपल्याला अस करता येत नाही, करता येत असल तरी वेळ वगैरे नाही, तेवढी जिद्द/धीर नाही, आपण नुस्तेच असे कारकुनी कामाचे अस बरेचसे काही वाटून घेणारी बाहूली!

माऊ फारच सुरेख आहे हे. मला करायला खरेच मनापासुन आवडेल
मी मायबोली वर नवीन आहे. क्रुपया तुमच्या ब्लॉगची लिन्क येथे द्याल का?

Pages