पेपर मॅशीच्या कलाकृती.

Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 17 July, 2013 - 07:02

नमस्कार मित्रमैत्रिणींनो,आपल्यासमोर पुन्हा एकदा पेपर मॅशीच्या काही कलाकृती.
नक्की आवडतील तुम्हाला अशी माझी खात्री आहे.

कृती मी सांगितलीच आहे माझ्या ब्लॉगवर.पाहिलीच असेल.
box.jpgcamel.jpgcamel1.jpgganesh.jpgmor.jpg66407_1390065482462_8243772_n.jpg
कोणी कोणी करुन पाहिले??? जमले का???नक्की सांगाल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वृषाली,तुझा प्रयत्न नक्कीच मला आनंद देउन गेला..प्रयत्नांती परमेश्वर ही मिळतो गं!!
आणि तो प्रयत्न तु केलास हे बघुन मला खरचं छान वाटले.
आता मुद्याकडे>>
तु म्हणालीस,चकलीसारखी जी वेटोळी कशी बनवायची..तर मी तुला सांगते..हातात छोटा मॅशीचा गोळा घेउन त्याला आपण कापसाच्या तेलाच्या वाती बनवतो नं अगदी तशाच बनवायच्या..थोडे सुकल्यासारखे वाटले तर पाण्याचा हात लावत रहावा.मॅशी कधीही सुकु देउ नये.चिरा पडता कामा नये.ओलसट रहावी.(फेशिअल करताना चेहर्‍यावर मसाजच्या वेळी जसा पाण्याचा हात लावत रहातात अगदी तसाच) मी जरा अतीच दिले न उदाहरण...असो..मुद्द्दा लक्षात आला असेल तुझ्या.
प्रयत्न नक्कीच चांगला आहे.करत रहावे.

माऊ, सगळ्या कलाकृती फारच सुंदर आहेत. उत्सुकतेपोटी तुमच्या ब्लॉगवर सुद्धा जाऊन आले पण कृती नेमकी कुठे आहे ते समजले नाही.. सांगाल का जरा.. मलाही खूप आवड आहे नवीन गोष्टी करून बघण्याची.. नक्की प्रयत्न करून बघेन.. Happy

wowwwwwwww ............ excellent . त्या ब्लोग ची लिंक द्या न . प्लीज प्लीज प्लीज

Pages