आमच्या मुलीला आम्ही पंचवीस तोळे सोनं चढवणार आहोत
सोबत जावईबापुंचा मानपान आहेच
वरमाईचा शब्दही खाली पडू देणार नाही आम्ही
आमची ऐपत आम्ही मुलगी झाल्यापासून खूप वाढवून ठेवली होती
याच दिवसाकरता....
तुम्ही लग्नाला नक्की यायचं हं
आपल्या लेकी दोघी एकत्रच वाढल्या
आमची लेकही तुम्हाला तुमच्या लेकीसारखीच
म्हणूनच नक्की यायचं लग्नाला.....
आमची मुलगी म्हणून तिचा तो शेवटचा दिवस असेल ना!
आता ती माहेरचं घराणं मागे टाकून नविन घराण्याचा उंबरठा ओलांडणार
मग ती बायको, सून, भावजय, जाऊ, वहिनी अशा विविधरंगी भुमिकांत रमून जाणार
आणि हो, आईसुद्धा!
निदान एका कुलदीपकाची आई होण्याचं भाग्य तिला लाभावं
असा आशीर्वाद आपण सगळ्यांनी मिळून तिला देऊयात. कसं?
आता माहेरपण कधीमधी चुटपुटतंच
बाकी दिल्या घरात दुधातल्या साखरेसारखं मिसळून जाणं
काही झालं तरी सासर-माहेरची प्रतिष्ठा जपणं आता तिच्याच हातात
भरल्या घरची लक्ष्मी होणार आमची लेक .....
आणि हो, लग्नाला तुमच्या नाठाळ मुलीलाही नक्की घेऊन या
पैलवान - नाही जमली ( नुसत
पैलवान - नाही जमली ( नुसत बळच यमक जोडण्यापलिकडे त्यात काहीही नाही)

मामीची कविता आहे की नाही यावर मोठी चर्चा चालू आहे,पण तुमची कविता म्हणवत नाही
( व्ययक्तिक मत)
संदीप खरेंच्या , किंवा
संदीप खरेंच्या , किंवा गुलजारांच्या कितीतरी कविता मुक्त मौक्तीक या स्वरूपातच आहेत. मग त्या काय कविता नाहीत ? की लिहिणा-यांना माहित नव्हतं आपण नेमकं काय लिहितोय ते?<<<
अहो नुसती मोठमोठी नांवे लिहून काय मिळते? तसे काय, दिलीपकुमारनेही एखादी सामान्य भूमिका केली असेल आणि तेंडुलकरही कधीतरी मनापासून खेळला नसेल इत्यादी.
अभिनयाचा आणि कवितेचा संबंध आहेही आणि नाहीही.
संबंध नाही = संबंध लावलेलाच नाही. फक्त त्यांचे काय आवडले नाही हे सांगताना जे आवडले ते सांगून आदरभाव आहे हे प्रकट केला.
संबंध आहे = एकाच कलाकाराची अभिव्यक्ती विविध कलाप्रकारात कशी वैविध्यपूर्ण प्रमाणात व वैविध्यपूर्ण दर्जाची असू शकते हे पाहणे रंजक ठरेल व तो या धाग्याचा विषय नाही.
अवांतर प्रतिसाद : सर्वप्रथम
अवांतर प्रतिसाद : सर्वप्रथम या बद्दल माफी मागतो ......
कविवर्य ग्रेसांना रोज ढिगाने उत्तरं देत बसावं लागलं असतं की.<<<<
कविवर्य ग्रेस व त्यांचे काव्य हा माझ्यासाठी अतीशय महत्त्वाचा असा एक विषय
त्याना मी माझा एक शेरही समर्पित केला होता पण तो वादग्रस्त असल्याने मी इथे देवू शकत नाही आहे किंवा गझलेतही समाविष्ट करणार नाही आहे ......क्षमस्व
पण त्या शेरात कविवर्य ग्रेस व त्यांचे काव्य ह्या बाबत माझे अतीशय स्पष्ट व ठाम मत मी गुंफले होते तो शेर आपल्याल हवा असल्या विपूतून देवू का माशाजी ??
बेफिकीर आणि वैवकु, माझी कविता
बेफिकीर आणि वैवकु,
माझी कविता म्हणजे ज्ञानेश्वरी नाही. अति-चिकीत्सकपणे त्या कवितेचा अभ्यास करण्याची गरज नाही. त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. वाचल्याक्षणी ती तुमच्यापर्यंत पोहोचेल किंवा पोहोचणार नाही. (हे बेफिकीरांना काल विपुतून सांगितलं होतं. तरीही इथे काथ्याकूट सुरूच आहे.)
यापुढे जी काही हाय-लेवलची चर्चा करायची आहे ती एकमेकांच्या विपुतून करा.
मामी, कविता आवडली.
मामी, कविता आवडली.
मान्य आहे मामी आपले मनःपूर्वक
मान्य आहे मामी
आपले मनःपूर्वक धन्यवाद
यापुढे मी या रचनेबद्दल काव्यविषयक चर्चा या धाग्यावर किंवा आपल्यासोबतही करणार नाही ईव्हन काव्य ह्या विशषयच आपल्याशी बोलताना अनुल्लेखित राखण्याचा प्रयत्न ठेवीन कारण मी असे करू शकत नाही हे व त्याच सोबत का नाही यामागचे कारणही आता मला व्यवस्थित उमगले आहे
आपण स्पष्ट शब्दात समजावलेत या करता आपला आभारी आहे मामी
माझाच एक शेर आठवला ...( मी असे शेर देणे न आवडल्यास दुर्लक्ष करावे ही विनंती)
जेही म्हणायचे ते बोलून मोकळी हो
मौनातल्या उन्हाची धग ही कुणी सहावी
पुनश्च आभार मामी
व क्षमस्वही
आपला कृपाभिलाषी
~वैवकु
यापुढे जी काही हाय-लेवलची
यापुढे जी काही हाय-लेवलची चर्चा करायची आहे ती एकमेकांच्या विपुतून करा.<<<
हे तुम्ही कोण सांगणार? कविता विपूतच डकवा की मग प्रतिसादकांच्या?
कविता मस्त आहे मामी.. एकदम
कविता मस्त आहे मामी.. एकदम भिडली..
(कीबोर्ड खराब झाल्यामुळे इतके
(कीबोर्ड खराब झाल्यामुळे इतके दिवस काही लिहिले नाही.)
प्रगल्भ सामाजिक जाणिवा असलेल्या आणि त्यामुळे कविता आवडलेल्या सगळ्यांचे आभार.
अहो, टेकू देणार्यांचे आभार
अहो, टेकू देणार्यांचे आभार नाही का मानणार?
स्वाती, टेकू देणार्या
स्वाती,
टेकू देणार्या स्वाती आणि अॅडमिनचे स्पेशल आभार. त्यांच्या टेकूशिवाय ही कविता उभीच राहू शकली नसती.
(संदर्भ : माझ्या विपुतील मौक्तिकं)
उंदीर पकडल्याचा पश्चात्ताप ही
उंदीर पकडल्याचा पश्चात्ताप ही सामाजिक आशय असलेली कविता शोधून वर काढली आज. मला वाटलं किमान तीन दिवस तरी चर्चा होईल.. पण एकही पोस्ट नाही त्यावर
स्टॅमिना खचला कि कै ?
Mami.. Aavadli. Ekdam thet
Mami.. Aavadli. Ekdam thet bhidali kavita..
आशय आवडला... मी हा धागा इतके
आशय आवडला...
मी हा धागा इतके दिवस मिस केल्याचं तीव्र दु:ख झालं...
मी हा धागा इतके दिवस मिस
मी हा धागा इतके दिवस मिस केल्याचं तीव्र दु:ख झालं...<<<<<<
या पूर्वी ह्याचा थोर्ला जुळा भाऊ होता त्याला त्याने जन्मल्याजन्मल्या काही तासातच शंम्भरी गाठली होती तो आता नाहीये ... तो याच्यापेक्षा कर्तुत्ववान होता .... तुम्हाला त्याला भेटून खूपच आनंद झाला असता डॉ .साहेब !!
मी इतके सांगतोय कारण तो माझ्याच अंगाखांद्यांवर लहानाचा मोठा झाला होता !!!! त्याला वाढवण्यात मी रक्ताचं पाणी केलेलं अक्षरशः
या पूर्वी ह्याचा थोर्ला जुळा
या पूर्वी ह्याचा थोर्ला जुळा भाऊ होता त्याला त्याने जन्मल्याजन्मल्या काही तासातच शंम्भरी गाठली होती तो आता नाहीये ... तो याच्यापेक्षा कर्तुत्ववान होता .... तुम्हाला त्याला भेटून खूपच आनंद झाला असता डॉ .साहेब !!
मी इतके सांगतोय कारण तो माझ्याच अंगाखांद्यांवर लहानाचा मोठा झाला होता !!!! त्याला वाढवण्यात मी रक्ताचं पाणी केलेलं अक्षरशः<<<
या धाग्यावर मंदार जोशी यांनी
या धाग्यावर मंदार जोशी यांनी गांधीलमाशी या नावाने एक स्क्रीन शॉट कॉपी पेस्ट केला होता. आणि अजय सावरकर या नावाने तो वर काढत बसले होते. बस इतकंच.
Pages