आमंत्रण - एक कविता

Submitted by मामी on 3 July, 2013 - 06:53

आमच्या मुलीला आम्ही पंचवीस तोळे सोनं चढवणार आहोत
सोबत जावईबापुंचा मानपान आहेच
वरमाईचा शब्दही खाली पडू देणार नाही आम्ही
आमची ऐपत आम्ही मुलगी झाल्यापासून खूप वाढवून ठेवली होती
याच दिवसाकरता....

तुम्ही लग्नाला नक्की यायचं हं
आपल्या लेकी दोघी एकत्रच वाढल्या
आमची लेकही तुम्हाला तुमच्या लेकीसारखीच
म्हणूनच नक्की यायचं लग्नाला.....
आमची मुलगी म्हणून तिचा तो शेवटचा दिवस असेल ना!

आता ती माहेरचं घराणं मागे टाकून नविन घराण्याचा उंबरठा ओलांडणार
मग ती बायको, सून, भावजय, जाऊ, वहिनी अशा विविधरंगी भुमिकांत रमून जाणार
आणि हो, आईसुद्धा!
निदान एका कुलदीपकाची आई होण्याचं भाग्य तिला लाभावं
असा आशीर्वाद आपण सगळ्यांनी मिळून तिला देऊयात. कसं?

आता माहेरपण कधीमधी चुटपुटतंच
बाकी दिल्या घरात दुधातल्या साखरेसारखं मिसळून जाणं
काही झालं तरी सासर-माहेरची प्रतिष्ठा जपणं आता तिच्याच हातात
भरल्या घरची लक्ष्मी होणार आमची लेक .....

आणि हो, लग्नाला तुमच्या नाठाळ मुलीलाही नक्की घेऊन या

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, कविता छान आहे Happy
आमची मुलगी म्हणून तिचा तो शेवटचा दिवस असेल ना!>>>>>>>>ती कायम तुमचीच मुलगी असणार आहे. (हीच ओळ, बहुधा दिनेशदा म्हणाले) Happy

विक्रांत प्रभाकर | 30 June, 2013 - 12:15
सारे बाण थेट आहेत.

बेफ़िकीर | 30 June, 2013 - 12:37
झोंबणारी विधाने असलेली रचना! अश्या रचना लिखित स्वरुपापेक्षा सादरीकरणात अधिक खुलतात असा एक अनुभव आहे. विशेषतः साभिनय सादरीकरण!

UlhasBhide | 30 June, 2013 - 13:31
झोंबणारी विधाने असलेली रचना! अश्या रचना लिखित स्वरुपापेक्षा सादरीकरणात अधिक खुलतात असा एक अनुभव आहे. विशेषतः साभिनय सादरीकरण! >>> बेफींच्या या मताशी सहमत.

vijaya kelkar | 1 July, 2013 - 15:29
छान,आमच्या मुलीस नाठाळ कां म्हणता?

सुप्रिया जाधव. | 1 July, 2013 - 21:19
कारण ती त्यांच्या मुलीची मैत्रिण आहे

भारती.. | 1 July, 2013 - 23:56
नाठाळ मुलीबद्द्लही कवितेने अधिक बोलावे असे वाटले..

वैभव वसंतराव कु... | 2 July, 2013 - 04:27
फालतू कविता !!!! एखादा लेख लिहावा वाटल्यास त्यात एक परिच्छेद म्हणून खपवू शकता एक्च्युअल्ली एखाद्या नाटकात संवाद म्हणून खपेल हे लेखन. याला कविता असे म्हणून जे लोक मनापासून काव्य ह्या विषयावर जिव्हाळा बाळगून आहेत त्यांचा अपमान करू नये अशी विनंती

मामी | 2 July, 2013 - 07:47
सगळ्यांना धन्यवाद.
बेफिकीर आणि उल्हास भिडे, ... सहमत.
नाठाळ मुलीबद्द्लही कवितेने अधिक बोलावे असे वाटले..
>>> भारती, परंपरेनुसार न चालणार्‍या सगळ्या मुली नाठाळ!

भाऊ नमसकर | 2 July, 2013 - 08:28
मला आवडली. डोक्यावरून घेतलेल्या परंपरेच्या पदराआड आपला 'नाठाळ'पणाचा चेहरा जपणार्‍या मुली मीं पाहिल्यात व त्यांचं खूप कौतुक वाटतं मला.

शिबा | 2 July, 2013 - 15:33
>>नाठाळ मुलीबद्द्लही कवितेने अधिक बोलावे असे वाटले..
>>>> भारती, परंपरेनुसार न चालणार्‍या सगळ्या मुली नाठाळ!
Sarcastic खूप बोलता येतं मामी पण प्रत्यक्षात नाठाळपणा ही दुसरी बाजू विपुल प्रमाणात आढळते.
ही कविता आहे?

रिया. | 2 July, 2013 - 16:12
मामी, खुप छान!
वैवकु तुम्हाला कविता कळली नसल्यास दुर्लक्ष केलत तरी चालेल की!
"याला कविता असे म्हणून जे लोक मनापासून काव्य ह्या विषयावर जिव्हाळा बाळगून आहेत त्यांचा अपमान करू नये अशी विनंती" या वाक्याची अजिबातच गरज नव्हती.
काव्य या प्रकाराबदल मला अत्यंत जिव्हाळा असुन या कवितेबद्दल तितकाच आदराही. तुमच्या प्रतिसादातील एकही वाक्य मला पटलं नाही आणि ते तस लिहायला नको होतं हे माझं ठाम मत आहे.

बेफ़िकीर | 2 July, 2013 - 18:46
>>>वैवकु तुम्हाला कविता कळली नसल्यास दुर्लक्ष केलत तरी चालेल की!
"याला कविता असे म्हणून जे लोक मनापासून काव्य ह्या विषयावर जिव्हाळा बाळगून आहेत त्यांचा अपमान करू नये अशी विनंती" या वाक्याची अजिबातच गरज नव्हती. काव्य या प्रकाराबदल मला अत्यंत जिव्हाळा असुन या कवितेबद्दल तितकाच आदराही. तुमच्या प्रतिसादातील एकही वाक्य मला पटलं नाही आणि ते तस लिहायला नको होतं हे माझं ठाम मत आहे.

रिया, तुझ्या आणि वैवकुंच्या या चर्चेत रस इतक्याचसाठी दाखवत आहे की याबाबत एक वाक्य मीही मूळ प्रतिसादात लिहिणार होतो पण ते टाळले. ते वाक्य असे: 'नेमकी कविता म्हणावे असे या रचनेचे स्ट्रक्चर किंवा गुण नव्हेत, पण मुक्तछंद सादरीकरणामध्ये अभिनयासह सादर केल्यास ही रचना एक कविता कशी ठरते हे नेमकेपणाने ठसवता येईल'. (म्हणजे, निव्वळ वाचायची झाली तर ही कविताच आहे असे जेवढे वाटेल त्यापेक्षा बर्‍याच अधिक प्रमाणात सादरीकरणातून ते ठसवता येईल).

रिया. | 2 July, 2013 - 21:20
(म्हणजे, निव्वळ वाचायची झाली तर ही कविताच आहे असे जेवढे वाटेल त्यापेक्षा बर्‍याच अधिक प्रमाणात सादरीकरणातून ते ठसवता येईल).
>>> असेल... पण एखाद्याने ही कविता सादर केली तर जशी करेल त्या शैलीतच मी वाचली त्यामुळे ती मला जास्त भावली.

दिनेशदा | 2 July, 2013 - 21:23
मामी, प्लीज ती एक ओळ काढून टाकणार का ?
मुलगी कितीही मोठी झाली आणि लग्न होऊन सासरी गेली, तरी ती कायम आपली मुलगीच राहते. रहावी.

मामी | 2 July, 2013 - 21:32
कविता आवडली नाही तर ठीकच आहे.
कवितेतला विचार आवडला नाही, हरकत नाही.
जे म्हणायचं आहे ते कवितेत नीट उतरलं नाही असं म्हणणं असेल तरी त्याचाही आदर आहे.
पण मुक्तछंद म्हणजे कविता नाही हे मला मान्य नाही. मुक्तछंद आणि निबंध यात फरक आहे. पटत नसेल तरी हरकत नाही पण हे माझं मत आहे.

मामी | 2 July, 2013 - 21:33
मुलगी कितीही मोठी झाली आणि लग्न होऊन सासरी गेली, तरी ती कायम आपली मुलगीच राहते. रहावी.
>>> दिनेशदा, मी कुठे नाही म्हणतेय?

वैभव वसंतराव कु... | 2 July, 2013 - 21:47
मी कवितेबद्दल (रचनेबद्दल्)म्हणतोय की याला काव्यात्मक दर्जाच नाही आपण कविता म्हटले तर कविता या नयायाने ही कविता असेलही पण मी माझ्या प्रतिसादात दिल्याप्रमाणे एक वाक्य नक्की !!
की........ एखादा लेख लिहावा वाटल्यास त्यात एक परिच्छेद म्हणून खपवू शकता एक्च्युअल्ली एखाद्या नाटकात संवाद म्हणून खपेल हे लेखन

आता बागेश्रीपण लिहिते मुक्त स्फूट पण त्यात संवेदना खयाल काव्यात्मक दर्जा असतो. इथे आहे तो एक संवाद आहे तोही व्यवस्थित सीरीयस होत असताना उगाच दुसर्‍याच्या पोरीला नाठाळ म्हणण्याचा विनोदात्मक संवाद आहे हा. याला सूज्ञ वाचकांनी जिज्ञासूंनी कविता म्हणू नयेच मामीनीही म्हणू नये असा माझा हट्ट नाही एक सल्ला आहे आपला. लिहिलेल्या ओळीना आशय विशय आहे तो मला समजलेला आहे व पटणे ह्या निकषावर मला हे "म्हणणे" पटलेही आहे. शेवटी आनंद घ्यायचाच झाला तर मी घेतलाच आहे पण कविता वाचून होणारा आनंद ह्या शब्दाच्या अर्थाच्या फील च्या तो जवळपासह्री नाही कुठे. पुन्हा एकदा सांगेन की, एखादा लेख लिहावा वाटल्यास त्यात एक परिच्छेद म्हणून खपवू शकता एक्च्युअल्ली एखाद्या नाटकात संवाद म्हणून खपेल हे लेखन

वैभव वसंतराव कु... | 2 July, 2013 - 22:02
एक शेर आहे माझा

नसूनही ...तुला हवे असेल तर तसे समज
कसा असेन कवडसा ..नसेन जर उन्हात मी !!!!

या मॅटर मध्ये मी चा अर्थ काव्यगुण असा घेतला व कवडसा चा अर्थ कविता व ऊन्ह म्हणजे आपली ह्या रचनेत उतरलेली लिहित्यायावेळी यथाशक्ती "उर्जित" अवस्थेत असलेली आपली लेखनक्षमता असा घेतलात तर शेराचा अर्थ लागेल दिवा घ्या

आपल्या छान छान कविता याआधी वाचल्या आहेत हास्यकविता अतीशय उत्त्तम लिहिता तुम्ही मामी !!

रिया. | 2 July, 2013 - 23:10
इथे आहे तो एक संवाद आहे तोही व्यवस्थित सीरीयस होत असताना उगाच दुसर्‍याच्या पोरीला नाठाळ म्हणण्याचा विनोदात्मक संवाद आहे हा
>>
मुळ्ळ्ळ्ळ्ळीच नाही!
अगदी ठाम पणे मी म्हणु शकते की तुम्हाला कविता कळाली नाहीये.
मला ही कविता अशी कळाली की पुर्वापार चालत आलेल्या प्रथा अंधळेपणाने आणि तोंड दाबुन सहन करत राहीलेली आमची मुलगी आता लग्न होऊन सासरी जातेय आणि तिच्यासाठी आम्ही भरमसाठ हुंडा पण देतोय.. मान अपमान सांभाळणं आहेच...

तरीही जेंव्हा ती "दुसर्‍याच्या घरी" जाईल ( म्हणजे इतकं करुनही ते घर तिचं स्वतःच नाहीच..) तेंव्हा ही ती जाऊ, बायको, सुन अशा भुमिका बजावेल... नंतर एका कुलदिपकाची आई म्हणून सुद्धा ओळखली जाईल ( थोडक्यात काय तर स्वतःची ओळख नसेल तिला)...

आणि आयुष्यभर ती दुसर्‍यांसाठी, सो कॉल्ड प्रतिष्ठा जपण्यासाठी पुन्हा सगळं सहन करत राहील....

पण तुमच्या मुलीने मात्र हे असलं सगळं केलं नाही म्हणून आमच्या नजरेत ती नाठाळ.....

थोडक्यात सुप्रिया ताईच्या भाषेत सांगायचं झालं तर

नाती-गोती, चाली-रीती, जाती-पाती
कोणाशीही घेणे देणे नाही माझे

इन शॉर्ट नाठाळ स्मित

मामी करेक्ट मी इफ आय एम राँग....

हेच असलंच सगळं आता अनुभवतेय म्हणून घुसली ही कविता.....आणि हो कविताच

शेवटी काव्य शब्दात नाही तर वाचणार्‍याच्या नजरेत असतं...
आजच बागेश्रीच्या थोपु पेज वर सुधीरजी -मोघेंचं एक वाक्य वाचलं ...
"शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते,
वाहतात जे ओझे, ते तुमचे आमचे असते!"

हेच काव्याबद्दलही

मामी | 2 July, 2013 - 22:04
रिया अगदी बरोब्बर. नाठाळ हा शब्द जर विनोदी वाटत असेल तर कठीण आहे.

वैभव वसंतराव कु... | 2 July, 2013 - 22:11
अगदी ठाम पणे मी म्हणु शकते की तुम्हाला कविता कळाली नाहीये.

जे वाक्य तू ठाम पणे कविता असल्याचे प्रूफ म्हणून देतेय्स ना तेच मुळात नाटकी आहे सादरीकरणात ऐकतेवेळी तू नाहीस खुद्कन हसलीस तर मग सांग !! अर्थात त्याला तसे साजेसे सादरीकरण करता यायला हवे मामीना !! हा जरासा खवचट प्रकारचा विनोद असतो दुसर्‍याच्या पोरीला जाताजाता नाठाळ म्हणायचे !

शिवाय दिलेला विशय समजणे मुद्दा पटणे व आनंद घेता येणे हे मी मान्यच केले आहे की मग मला कविता...(माफ करा मामी नी कविता आहे म्हटल्यावर बोलणेच खुंटले आम्ही पामर काय वदणार अरेरे

रिया. | 2 July, 2013 - 22:13
हा जरासा खवचट प्रकारचा विनोद असतो दुसर्‍याच्या पोरीला जाताजाता नाठाळ म्हणायचे !
>> यात कुठेच विनोद नाहीये वैवकु.... म्हणूनच मला वाटतय की तुम्हाला कविता कळाली नाहीये

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे | 2 July, 2013 - 22:19
कवितेच्या निमित्तानं छान चर्चा. -दिलीप बिरुटे

रचनेची ..लेखनाची अकाव्यक्षमता दिसून येते आहे (लेखनकर्तीची नव्हे Happy )

अशय विषय मांडणी सहज सोप्पी व कळ्ण्यासारखी आहे याबाबत दुमत नाही
व्यक्तिगत पातळीवर आवड्ली नाही कविता च काय स्फूट ही वाटले नाही संवादात्मक स्वगतात्मक भाग आहे असे भाघ नाट्तकात शोभतील त्यातही त्यास उत्तम सादरीकरण्न हवे

वरील मामीनी दिलेला मॅराथॉन प्रतिसादाची आवश्यकता नाही आहे !!!!!!

मामी कविता आवडली. शेवट जबरदस्त!

वरील मामीनी दिलेला मॅराथॉन प्रतिसादाची आवश्यकता नाही आहे !!!!!!>>> तेपण तुम्हीच सांगणार का?

मामे, आज पाह्यली ही कविता.
उपहास, चीड आणि शेवटच्या वाक्यात सेल्फ डेप्रिकेटिंग (मराठीत काय बरे?) टाइपचा विनोद हे सगळं मस्त.
मला तरी कविता म्हणून ही वाचताना त्रास झाला नाही.
अजून लिहीणे! Happy

रिया. | 2 July, 2013 - 22:26
ही कविताच आहे....
अशी लिहिली तर वाटेल का कविता?

आमच्या मुलीला आम्ही पंचवीस तोळे सोनं चढवणार आहोत...
सोबत जावईबापुंचा मानपान आहेच
वरमाईचा शब्दही खाली पडू देणार नाही आम्ही
आमची ऐपत आम्ही मुलगी झाल्यापासून खूप वाढवून ठेवली होती
याच दिवसाकरता....

तुम्ही लग्नाला नक्की यायचं हं!
आपल्या लेकी, दोघी एकत्रच वाढल्या
आमची लेकही तुम्हाला तुमच्या लेकीसारखीच
म्हणूनच नक्की यायचं लग्नाला.....
"आमची मुलगी" म्हणून तिचा तो शेवटचा दिवस असेल ना!

आता ती माहेरचं घराणं मागे टाकून नविन घराण्याचा उंबरठा ओलांडणार
मग ती बायको, सून, भावजय, जाऊ, वहिनी अशा विविधरंगी भुमिकांत रमून जाणार
आणि हो, आईसुद्धा!
निदान एका कुलदीपकाची आई होण्याचं भाग्य तिला लाभावं
असा आशिर्वाद आपण सगळ्यांनी मिळून तिला देऊ यात. कसं?

आता माहेरपण कधीमधी चुटपुटतंच
बाकी दिल्या घरात दुधातल्या साखरेसारखं मिसळून जाणं
काही झालं तरी सासर-माहेरची प्रतिष्ठा जपणं आता तिच्याच हातात
भरल्या घरची लक्ष्मी होणार आमची लेक .....
.
.
.
.
आणि हो, लग्नाला तुमच्या 'नाठाळ' मुलीलाही नक्की घेऊन या

रिया. | 2 July, 2013 - 22:32
मला माझा मुद्दा पटला नाहीये अस तुम्हाला का वाटतय?
तुमचा पटायला अजुन थोडी कारण लागतील.... सादरीकरण मुद्दा नंतर येतो... आधी कंटेण्ट आणि त्यातलं काव्य...
यात तुम्हाला काव्य कुठे मिसिंग वाटल ते मला ऐकायला आवडेल (मामींची हरकत नसेल तर...नाही तर ही चर्चा विपुत झाली तरी मला चालेल )

वैभव वसंतराव कु... | 2 July, 2013 - 22:32
आता फ्रेम्वर्क आलय जरा..स्फूट म्हणता येईल

काही यमके हवीत टप्प्याटप्प्यांवर

आणि भारतीताईंसारखी विदुषी म्हणतेय की नाठाळ मुलीबद्दलही काही सांन्गा तर तेही लक्षात घे
किंवा कवितेला धक्कादायक सामारोप हवा / चमत्कारिक कलाटणी हवी
विचार हदरवणारा हवा विचार्प्रवर्तक इतादी की काय ते

अर्थात ही तू अशी अशी वगैरे केलीस तर कविता होवू शकेल मामीनी केलीय ती कविता होणार नाही हे मात्र नक्की

रिया. | 2 July, 2013 - 22:38
पर्यायी कविता नाही.. मामींचीच कविता मी तुम्हाला हवी तशी लिहुन दाखवली...

आणि भारतीताईंसारखी विदुषी म्हणतेय की नाठाळ मुलीबद्दलही काही सांन्गा तर तेही लक्षात घे
>> होऊ शकतं, त्यांना नसेल आला लक्षात...मला आला आणि त्यात काव्य दिसलं... पुन्हा रिपिट करते काव्य हे वाचणार्‍याच्या नजरेत असतं

किंवा कवितेला धक्कादायक सामारोप हवा / चमत्कारिक कलाटणी हवी. विचार हदरवणारा हवा विचार्प्रवर्तक इतादी की काय ते
>>> आहेच की मग! राग आहे... चिड आहे... फटकारे आहेत.... म्हणूनच मला त्यात काव्य दिसलं.
मानसीच्या कविता अतिशय साध्या असतात.. त्यात नेहमीच कुठे असतो हदरवणारा विचार, चमत्कारिक कलाटणी, धक्कादायक समारोप? पण आवडतातच ना आपल्याला? कारण त्या पटतात, थेट काळजात घुसतात.... मामींची ही कविता अशीच मला पटली, काळजात घुसली म्हणून मी हिला कविताच म्हणणार...

राहिला प्रश्न थोडं तरी यमक हवंच याचा.... तर या नियमा नुसार संदिप खरे ची "नास्तिक" कविता काव्यप्रकारातुन तडीपारच होईल की

वैभव वसंतराव कु... | 2 July, 2013 - 22:40
विशय निवडणे कल्पकतेने मांडणे ...शब्द नेमके परिणामकारक असणे ...यमके ..ओळीना किमान भावनेच्या लयी असणे लांबीरुंदी योग्य त्या टप्प्यावर देणे व व्याकरणनुसारहीयोग्य शब्दरचना असणे ओळीला किमान्प्रवाहीपणा असणे .... शब्दाना नाद लय असणे प्रासादिकता असणे आणि इतके झाल्यावर मूळ खयाल प्रचितीपूर्ण असणे सत्यता दर्शवणारा भावना व्यवस्थित ओपन करणारा असावा असे हज्जारो पैलू असतात कवितेला ...

निव्वळ वर्णनात्मक संवादात्मक असीही नसावी सहसा कविता

वैभव वसंतराव कु... | 2 July, 2013 - 22:44
काव्य हे वाचणार्‍याच्या नजरेत असतं<<<< खरे आहे पण याचा अर्थ तुला म्हणायचय म्हणून ते काव्य असे नसते. नजरेतच काव्य असेल तर पेपरातल्या ओळीही कविता ठरतील "वास्तवदर्शी " ह्या गुणाने

रिया. | 2 July, 2013 - 22:49
विषय सुंदर निवडलाय... कल्पकतेने मांडलाही आहे...
नाठाळ हा शब्द, ज्यावर तुम्हाला आक्षेप आहे, तो शब्दही नेमका परिणामकारक आहेच!

मला अस वाटतय की का कोण जाणे पण प्रत्येक कवितेला गझलेच्या तालात तुम्ही वाचायचा प्रयत्न करत असाल... ही त्या तालात नाही बसली पण म्हणून ती कविताच नाही अस नाही ना म्हणता येणार? स्मित

ही घ्या काही मस्त उदाहरणे :
http://www.maayboli.com/node/36745
(एकही यमक नाही पण कविता अप्रतिम)

http://www.maayboli.com/node/33338
http://www.maayboli.com/node/26539

http://www.maayboli.com/node/40305
http://www.maayboli.com/node/39251

आणि अगदी ही देखील
http://www.maayboli.com/node/35468

बरीच मोठी लिस्ट देता येईल पण सध्या इतक्याच देते स्मित

रिया. | 2 July, 2013 - 22:52
वैवकु , खर तर ते माझं वयही नाही आणि आधिकारही नाही तरी सांगते तो सल्ला माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त लागू पडेल... तुम्हाला त्यात काव्य दिसलं नाही म्हणून ती फालतू, टुकार कविता किंवा मग अ-कविता हे चुकीच आहे...
हे माझं लिखाण नाही पण मला आवडलेलं लिखाण आहे म्हणून ही चर्चा करतेय.... आणि जर तुम्ही माबोवरचा माझा वावर पाहिलाच असेल तर लक्षात येईल की मी म्हणेन तेच सत्य हा माझा पिंड कधीच नाहीये आणि मी हे कधीच केलं नाहीये... चुका मी नेहमीच मान्य केल्यात...

नताशा | 2 July, 2013 - 23:01
मामी, कविता आवडली.

किरण कुमार | 2 July, 2013 - 23:07
मामी,
एकदम झाक लिव्हलय,
आवडली
स्मित

वै वकु- कविता नाहीये वगैरे म्हणणे योग्य नाही -
कविता म्हणजे - खोलपर्येंत जाणारी रचना -
,नुसत यमक गमक , प्रत्येक वेळी गझलेप्रमाणे शेरोशायरी असायलाच पाहिजे अस नाही,किंवा आपल ज्ञान लोकांना उगाच पटविण्याचा प्रयत्न करणे असेही नाही,
आपल्या गझल रचना मलाही आवडतात मात्र साहित्यातल वेगळेपणच साहित्याला पुढे नेऊ शकत, असो

प्रतिसाद फारएण्ड | 2 July, 2013 - 23:41
झोंबणारी विधाने असलेली रचना! अश्या रचना लिखित स्वरुपापेक्षा सादरीकरणात अधिक खुलतात असा एक अनुभव आहे. विशेषतः साभिनय सादरीकरण!>>> सहमत.

मामी, खतरनाक लिहीले आहे. जबरी.
"आमची मुलगी" म्हणून तिचा तो शेवटचा दिवस असेल ना!>>> याचा इम्पॅक्ट जबरी आहे.

ही कविता आहे की नाही माहीत नाही, पण जे काही लिहीले आहे ते आवडले (मामी, मात्र कविता कॅटेगरीत टाकल्याने तुमचे बाकीचे दोन लेख वाचूनसुद्धा ही खरोखरच कविता असेल अशा शंकेने आधी वाचली नव्हती स्मित )

मामी | 2 July, 2013 - 23:49
फारेण्ड ... स्मित

वैभव वसंतराव कु... | 3 July, 2013 - 00:06
गझलेची लय सवय याचा इथे काहीच संबंध नाही आहे
- गद्य !!

इथं संबंधच नाहीये ...गझलेच्या लयी-सवयीचा !!
-मुक्तछंदात्मक तरीही काव्यात्मक

गझलेची लय वा सवय मुळी संबंध नाही इथे
- पद्य !! छंदात्मक!!

या कवितेला काहीही म्हणा हवेतर गझल म्हणा. कविता अशी नसती तर तिला कविता हा स्वतंत्र प्रकार काय वेळ जात नाही म्हणून काढून दिलाय का लोकांनी. अधिकाधिक गद्यात्मकता ही आजच्या काळाला आधुनिक वाटू शकते .आवडू शकते यात माझी हरकत जराही नाही. .तुम्हा लोकाना वेळ नाही खर्‍या काव्यात्मक ओळी वाचायला खरी काव्यात्मकता फील करायला. सहज सोप्पं कॅज्युअल वाचलं समजंलं आवडलं भावुक होता आलं की तुम्हाला कविता वाटते. मग ललित लेख वाचा कादंबर्‍या वाचा कथा वाचा मासिके वाचा कवितेच्या का मागे लागता त्यात काव्यात्मकता शोधा भावुक व्हा आनंदी व्हा ......त्याना कविता म्हणा !!! काव्य हा विशय आहे शास्त्र आहे कुठेही काव्य पाहता येते पण याचा अर्थ आपण पाहतोय ती कविता असा होत नाही. काव्यमयता ही जाणीव आहे संवेदना आहे. "कविता असणे" = भाषेच्या वापराचे मांडणीचे एक शिस्तबद्ध शास्त्र त्यात वापरले गेलेले असणे ज्याला कविता असे पूर्वासुरीनी डिफाईन केलेले आहे. मुक्तछंद ही कल्पना तुम्हाला वाट्ते तितकी मुक्त नाही. यमकविरहित कविता हा कवितेचा एक शास्त्रशुद्ध फॉर्मॅट आहे . वर रियाने दिलेली उदाहरणे यमकविरहित काव्याची नसून ते निव्वळ स्फूट्लेखन आहे त्याला आता कविता या प्रकारात समाविष्ट करण्याकडे लोकांचा कल आहे इतकेच जरी असे झाले तरी ती कविता नसते !!!!!!!!!!!!

रिया. | 3 July, 2013 - 00:00
इनशॉर्ट वैवकु तुम्ही हे म्हणताय की संदिपची नास्तिक, बागेश्री/निंबुडाच्या वरती उल्लेखलेल्या अशा अनेक कविता कविताच नाहीत? मग तुमच्याच चालीत विचारते मुक्तछंद प्रकार काय मुर्ख म्हणून काढलाय का लोकांनी? पुन्हा तेच म्हणते तुम्हाला नसेल पटत तर इग्नोर करा... जिथे तिथे मत द्यायची गरज नाहीच आहे की.

वैभव वसंतराव कु... | 3 July, 2013 - 00:16
मुक्तछंद हा प्रकार तुला वाटतो तसा मुक्त नसतो..... संदीप्ची ती कविता मी वाचलेली नाही.

लोक संशोधन करतात मग त्याचा वापर करतात तो लोकाना आवडतो प्रचार प्रसार होतो ....
त्यात काव्यात्मकता असतेही पण ती कविताच आहे असे म्हणायचे का नाही हा शेवटी माझा स्वतंत्र विषय आहे तुझा स्वतंत्र !!!!!!!!!!!!!!!!!!!!! तू म्हणातेय्सस म्हणून तुझ्या समाधानासाठी मीही त्याला कविता म्हणेन मी माझ्या काव्यसाधनेसाठी /पुरता त्याला कविता म्हणणार नाही. बाकी लोकाना दोष का द्यायचा नावे का ठेवायची हे ही बरोबरचय !!!!! माझी कविता माझ्यापाशी ..... तुला जशी कविता करायची तशी कर... मनापासून कर. शेवटी आपपला आपण यांछिलेलेला विठ्ठल आपापल्याला मिळाल्याशी मतलब स्मित

स्वाती_आंबोळे | 3 July, 2013 - 00:18
>> पण ती कविताच आहे असे म्हणायचे का नाही हा शेवटी माझा स्वतंत्र विषय आहे तुझा स्वतंत्र
याला +१००

रिया. | 3 July, 2013 - 00:23
त्यात काव्यात्मकता असतेही पण ती कविताच आहे असे म्हणायचे का नाही हा शेवटी माझा स्वतंत्र विषय आहे तुझा स्वतंत्र !!!!!!!!!!!!!!!!!!!!! तू म्हणातेय्सस म्हणून तुझ्या समाधानासाठी मीही त्याला कविता म्हणेन मी माझ्या काव्यसाधनेसाठी /पुरता त्याला कविता म्हणणार नाही
>>>
अब ठिक है!
इतक्या वेळ मी तेच म्हणत होते
जायच्या आधी तुमच्या विपुतली "नास्तिक" वाचुन जावा

स्वाती_आंबोळे | 3 July, 2013 - 00:28
आमच्या कवितेत आम्ही यमकं जुळवणार आहोत
सोबत जाणिवा, संवेदना वगैरे आहेतच!
वृत्तातली एक मात्रा चुकू देणार नाही आम्ही!
आमचा ईगो आम्ही कवी झाल्यासारखं वाटल्यापासून वाढवून ठेवला होता
अशाच वादांकरिता!

तुम्ही वाचायला नक्की यायचं हं.
आणि हो, तुमच्या नाठाळ स्फुटालाही आणा नक्की!

नताशा | 3 July, 2013 - 00:32
शेवटी आपपला आपण यांछिलेलेला विठ्ठल आपापल्याला मिळाल्याशी मतलब >>
आपपला? यांछिलेलेला?
हे काय आहे? हे शब्दच मराठीत नाहीत. त्यामुळे वरचं वाक्य हे वाक्यच नाही

वैभव वसंतराव कु... | 3 July, 2013 - 00:52
नाठाळ स्फुटालाही <<<< आक्षेप !!!! "नाठाळ गझलेलाही" असे करा. आपपला? यांछिलेलेला?<<<< टायपो असतो कधीकधी ......समजून घ्यायचं असतं

वैभव वसंतराव कु... | 3 July, 2013 - 01:23
आमच्या कवितेत आम्ही यमकं जुळवणार आहोत
सोबत जाणिवा, संवेदना वगैरे आहेतच!
वृत्तातली एक मात्रा चुकू देणार नाही आम्ही!
आमचा ईगो आम्ही कवी झाल्यासारखं वाटल्यापासून वाढवून ठेवला होता
अशाच वादांकरिता!

तुम्ही वाचायला नक्की यायचं हं.
आपापल्या कविता दोघी एकत्रच वाढल्या
आमची कविताही तुम्हाला तुमच्या कवितेसारखीच
म्हणूनच नक्की यायचं लग्नाला.....
आमची कविता म्हणून तिचा तो शेवटचा दिवस असेल ना!

आता ती माहेरचं घराणं मागे टाकून नविन घराण्याचा उंबरठा ओलांडणार
मग ती हाय्कू, धून, भावगीत, ओवी, त्रिवेणी अशा विविधरंगी भुमिकांत रमून जाणार
आणि हो, रूबाईसुद्धा!

निदान एका आयुष्याची गहराई होण्याचं भाग्य तिला लाभावं
असा आशिर्वाद आपण सगळ्यांनी मिळून तिला देऊ यात. कसं?

आता कविपण कधीमधी चुटपुटतंच
बाकी दिल्या घरात दुधातल्या साखरेसारखं मिसळून जाणं
काही झालं तरी कवित्व-रसिकत्वाची प्रतिष्ठा जपणं आता तिच्याच हातात
भरल्या घरची सरस्वती होणार आमची कविता .....

आणि हो, तुमच्या नाठाळ गझलेलाही आणा नक्की!
___________________________________
सहकारीतत्त्वावर दिलेला झब्बू !!!!!!!!

किरण कुमार | 3 July, 2013 - 01:31
कविता ही प्रेमासारखी असते
ती दिसत नाही, ती असते
आणि
कविता ही मृगजळासारखी असते
ती असत नाही ,ती भासते

झकासराव | 3 July, 2013 - 08:43
ही कविता आहे की नाही माहीत नाही, पण जे काही लिहीले आहे ते आवडले (मामी, मात्र कविता कॅटेगरीत टाकल्याने तुमचे बाकीचे दोन लेख वाचूनसुद्धा ही खरोखरच कविता असेल अशा शंकेने आधी वाचली नव्हती स्मित ) >>> +१ स्मित

भाऊ नमसकर | 3 July, 2013 - 09:23

विजय दिनकर पाटील | 3 July, 2013 - 09:45

विषय संवेदनशील, मांडणीतील चीड प्रतित होत आहे, 'नाठाळ' म्हणजे बिनकामाची असा अर्थ घेतला मी!
फॉर्मबद्दल वैभवशी सहमत, पण शेवटी ज्याला जे म्हणायचे असते तेच तो म्हणतो. शिवाय त्याने उर्वरीत विश्वाला काही फरक पडतो असेही नाही.

नंदिनी | 3 July, 2013 - 09:48
मामी, जबरदस्त कविता. आशयाच्या दृष्टीने आणि इम्पॅक्टच्या दृष्टीनेदेखील.
शेवटची ओळ तर खासमखास आहे. जियो मेरे यार!!!!!!

भाऊ नमसकर | 3 July, 2013 - 09:59
<< 'नाठाळ' म्हणजे बिनकामाची असा अर्थ घेतला मी! >> 'नाठाळ' म्हणजे 'परंपरा' म्हणून पूर्वीच्या सगळ्याच चालीरितीना आंधळेपणाने चिकटून न रहाणारी, असा अर्थ घेतला मीं व तो मला भावलाही !

भारती.. | 3 July, 2013 - 10:19
अरे बापरे ! माझ्या अनुपस्थितीत (जवळच्या नात्यात एक 'आमंत्रण' होते !)बरेच काही घडलेय इथे !
आता काही लिहावे की न लिहावे? पण कविता हा विषय पणाला लागलाय आणि युद्ध स्वकीयांमध्येच, तर व्यक्त व्हावेच लागेल.

वैवकुच्या वयात कवितेबद्दल मीही फार आग्रही होते.कविता नसलेल्या प्रकाराला कविता म्हणणे धर्मांतराइतके अपवित्र वाटत होते. ''अता जरा निवळली वादळे !''

काय आहे की कविता प्रत्येकासाठी वेगळी असते. ट्रक ड्रायव्हरची कविता, कॉलेजियन्सच्या चारोळ्या/ ''तू ..मी.. '' टाइप प्रेमविव्हळ कविता ,एसेमेसमधून फिरणार्‍या फेबु शृंगारणार्‍या चटपटीत ओळी,मंगळागौरी उखाणे बारशी यांसाठी कामाला लावलेली प्रतिभा , चळवळीतली सामाजिक भान असलेली कविता , हस्तिदंती मनोर्‍यातल्या अतिविद्वानांचीही कविता, अनाकलनीय संज्ञाप्रवाही कविता, लोककविता वगैरे वगैरे वगैरे.

या सार्‍या पसार्‍यात 'काव्यतत्त्व' नावाचे एक प्राणतत्त्व निष्ठावंतांना कधी सापडते, कधी हरवते, कधी पुसटसे दिसते..

वैभव, या सार्‍याचे भान ठेवा, आग्रह असावाच, दुराग्रह नको.तुम्ही स्पष्टपणे लिहिता पण उगीच दुखावणे टाळले पाहिजे.आपण विशुद्ध आणि महान कविता लिहितोय असा मामींचाही भ्रम नाही. त्यांनी मनापासून त्यांची कविता लिहिली, ती एका अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर लिहिली. ते कवितेचा बाज असलेले एक अव्यक्त स्वगत होतं,मामींच्या जाणिवेतून आल्याने ते वाचनीय होतं, कवितेतून स्वगत लिहिणे अनेकांनी अंगिकारलेय, तेव्हा ते नवीन नाही. माबोसारख्या विशाल फलकावर बरेच काही लिहिले जाते, प्रत्येकाने आपापली ''टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची !''

मामी | 3 July, 2013 - 10:32
भारती, फारच छान लिहिलंयस.

बर्‍याच अस्वस्थ करणार्‍या गोष्टी वाचून अचानक पहिली ओळ (किंवा वाक्य म्हणा पाहिजे तर स्मित ) सुचली. आणि ती टाईप करत असतानाच पुढच्या ओळी येतच गेल्या. एकदाही काहीही एडिट केलं नाही. मनातून डायरेक्ट इथे आलं. ते कोणत्या फॉर्ममध्ये आलं हे गौणच. आणि आता विचार करता अशा विषयाकरता यमकं जुळणारी कविता कितपत परिणामकारक ठरेल याची शंका वाटते.

बंडोपंत | 3 July, 2013 - 10:43
एकपात्री संवाद छान निभावता येईल !

रिया. | 3 July, 2013 - 12:19
भारतीताई, खुपच मस्त!
भाऊ, तुम्ही घेतलाय तोच अर्थ बरोबर आहे...
पुन्हा एकदा , ही कविताच होती, कविताच आहे , कविताच राहील....................

बेफ़िकीर | 3 July, 2013 - 12:34
मामींनी एक रचना कविता म्हणून प्रकाशित केली त्यावर इतका गहजब उडण्याचे काही कारणच नव्हते खरे तर, पण आता उडलाच आहे धुरळा तर तो मुद्देसूद चर्चेद्वारे खाली बसवूयात का?

मामी कशाला हे प्रतिसाद

तुझी रचनाच बोलतेय सगळ कही ज्यांना ते कळत नसेल तर तो त्यांच्या प्रश्न

इथे तरी वाद नकोत

UlhasBhide | 3 July, 2013 - 12:46
"मामींनी एक रचना कविता म्हणून प्रकाशित केली त्यावर इतका गहजब उडण्याचे काही कारणच नव्हते खरे तर, पण आता उडलाच आहे धुरळा तर तो मुद्देसूद चर्चेद्वारे खाली बसवूयात का? " >>> इथे चर्चा करून "कारवाँ गुजर गया गुबार देखते रहे" ही अवस्था होण्याऐवजी कविता या विषयावर काही सकारात्मक चर्चा (जनरल) व्हावी असे वाटत असल्यास ती वेगळ्या धाग्यात करणे इष्ट ठरेल असे वाटते.

विजय दिनकर पाटील | 3 July, 2013 - 12:55
मायबोलीवर अशा अनेक चर्चा झाल्या/होताहेत्/होत रहातील पण अशा चर्चांतून कुणाचेच मत परीवर्तन आंतरजालावर झाल्याचे माझ्या गेल्या तीन वर्षे आणि चार आठवड्यांच्या कारकीर्दीत पाहण्यात नाही. सर्वांची मते त्यांच्या स्वतःकरीता योग्य आहेत असे मानून पुढे चालावे

रिया. | 3 July, 2013 - 12:58
विदिपा, संपुर्ण पोस्ट +१
प्रत्येकाने आपले आपले मत स्वतः जवळ ठेवून ते दुसर्‍यावर न थोपवण्याचा प्रयत्न करावा...
दुसर्‍याच्या लेखनाचा आदर करावा...

बागेश्री | 3 July, 2013 - 13:00
सर्वांना सविनय सांगू इच्छिते,
मी जे काही (स्फूट, काव्य, काव्येतर) लिहीते ते आधी चक्क "काकाक" मध्येच टाकत असे.
नंतर हिंमत बळावली आणि काव्य विभागात आले
मी मुक्तछंद चांगला हाताळते, असे अनेक (जाणकार) सांगून गेले, तेव्हा खरोखर त्यावर विचार केला, मग ल़क्षात दोन गोष्टी आल्या.
१) मी माझ्या डायरीत हे असलं सगळं लिहीत आले आहे, त्या संकल्पना काव्यमय आहेत, म्हणून मांडताना तो मुक्तछंद वाटतो
२) शास्त्रीय दृष्ट्या मुक्तछंद अभ्यासायचाच झाला तर मला चिक्कार "स्कोप ऑफ इम्प्रोव्हमेंट" आहे.

वैवकू,
मी इथे पोस्ट केलेल्या अनेक कविता, स्फूट टाईप्स असल्या तरी, सादरीकरणात त्या चक्क कवितेसारख्याच भासतात, हा नुकताच घेतलेला "अ़क्षर मेळाव्यातला" अनुभव आहे. त्यामुळे, बेफींच्या, एखादं लिखाण सादरीकरणात "योग्य रंग" दाखवू शकतं ह्या आशयाच्या वाक्याला अगदी मनापासून अनुमोदन देते.

बाकी, मामे
तू केलेल्या ह्या रचनेतला बोचरेपणा सुस्पष्ट पोहोचतोय, साभिनय सादरीकरण करच एकदा

बेफ़िकीर | 3 July, 2013 - 13:19
विजय दिनकर पाटील | 3 July, 2013 - 12:55
मायबोलीवर अशा अनेक चर्चा झाल्या/होताहेत्/होत रहातील पण अशा चर्चांतून कुणाचेच मत परीवर्तन आंतरजालावर झाल्याचे माझ्या गेल्या तीन वर्षे आणि चार आठवड्यांच्या कारकीर्दीत पाहण्यात नाही. सर्वांची मते त्यांच्या स्वतःकरीता योग्य आहेत असे मानून पुढे चालावे<<< + १

बेफ़िकीर | 3 July, 2013 - 13:20
या विषयावर काही सकारात्मक चर्चा (जनरल) व्हावी असे वाटत असल्यास ती वेगळ्या धाग्यात करणे इष्ट ठरेल असे वाटते.<<< +१

Kiranyake | 3 July, 2013 - 13:48
मामी छंदमुक्त कविता असं नामकरण करून वाद संपवूयात. सौमित्रच्या असतात अशा कविता.
कवितेतून जे मांडायचं आहे तो आशय प्रभावीपणे पोहोचला.

वैभव वसंतराव कु... | 3 July, 2013 - 14:29
-मी वेगवेगळी मते मांडतो पण त्यात्या वेळी माझ्या मताशी प्रामाण्निक राहून असे म्हट्तले आहे
-इथल्या प्रतिसादातही मी बागेश्रीच्या स्फूटाला चांगले काव्य असेच म्हटलेय
-दुसरा मुद्दा कवितेच्या सादरीकरणाचा जो मामीच्या ह्या रचनेसही लागू होतोच की व वरती चघळूनही झाला आहेच की ( सादरीकरणात हे लेखन निव्वळ विनोदी उपहासात्मक आहे हे सिद्ध होईल कारण्न कुण्नी काही म्हणा मामीनी हे हसर्‍या मनाने लिहिलेच आहे मुळी सो कॉल्ड गांम्भीर्य इत्यादी या रचनेतील एकाही ओळीत लिहितेवेळी मामीच्या मनातही नसण्नार हे नक्की )

रचनेत कच्चे दुवे : जे रिया तू पाहिले नाहीयेस
१) कॅरेक्टेर : ती गूड गर्ल ची आई बघ लेकीचं असं कौतुक करतेय की अशी पोरगी जगात फक्त हिलाच अहे
२) दुसर्‍या कड्व्यात आमची मुलगी तुम्हाला तुमच्या मुलीसारखी (मग कय गं ए ट्वळे आमची तुला सवतेच्या मुलीसारखीये काय गं ? जाताजाता तिला नाठाळ म्हणतेय्स !!)
३)( तुझ्या लेकीला इतके संस्कार आहेत तर तिच्याकडून घे थोडे लोकाच्या लेकीला असे तोंडावर नाठाळ् न म्हण्नायचे संसकार आधी तू शिकून घे मग तुझ्या त्या साळसूद पोरीचे गोड्वे गा !!!!)

आता तुला लक्षात येईल की ती त्या गुड गर्ल ची आई स्वयंघोषित गूड मॉम आहे तिची पोरगीतरी गूड् गर्ल कशावरून ही शंम्का शेवटची ओळ् वाचल्यावाचल्या मनात येते !!!(आण्नि माझ्या प्रथम प्रतिसादा आधीचे वन लायनर प्रतिसाद त्याच्यामागचा या लेखनाकडे पाहण्न्याचा नजरिया नीट्त तपास... नंतरही अशा किती लोकानी ही कविता आहे या नजरेतून कमेंट तीही सीरीयसली मनापासून??)

मुळात ह्या पात्रालाच कणा नाही भूमिका नाही असेल ती नाटकी आहे आणि फसवी आहे त्यानुषंगाने ती गुड्गर्लही फसवीच मग ती सो कॉल्द नाठाळ् पोरगीच खरी हीरोइन ठरते...कारण तिच्या नाठाळ्ल पण्नावर ही कविता बेतलेली आहे

मामी गंभीर लेखन हाताळू शकत असल्या तरी ही कविता गमतीदार मूड मागचे गांभीर्य ह्या भावनेतून आलीये ज्यात सरतेशेवटी सीरीयस्नेसच हरवला आहे
_______________________________________

संदीपची तू पाठवलेली कविता बांधणीच्या एका नियमात बसते तो यमकविरहीत प्रकार आहे पण् दॅट मच मुक्त नाहीये ......
लयबद्धच आहे गुण्गुण्ता येण्या इतपत... आणि अनेक ओळीच्या मात्राची संख्या समान येतेय
त्यात जवळ जवळ् प्रत्येकच कडवे ४ ओळ्लीचेच ही बद्धताही त्यास आहे

ह विषय तुला नंतर समजावून सांगतो ...बाय !!

तूर्तास एक बेफीजींचा शेर ऐक अनेकार्थाने खरा व्यापक शेर आहे आयुष्यात कुठेही वापरता येतो ह्या मुक्तछंदावरच्या चर्चेतही

वेगळे असणे मुळीचच वेगळे नसते
बद्धतेपासून काही मोकळे नसते

विजय दिनकर पाटील | 3 July, 2013 - 14:20
उगाच संदीप खरेला कशाला मधे घेताय!

बेफ़िकीर | 3 July, 2013 - 15:09
उल्हासरावांच्या म्हणण्यात तथ्य आहे. या विषयावर स्वतंत्र धागा असावा. मला वाटते भारती, अशोक, मयेकर यांनी एक स्वतंत्र चर्चा करावी त्या धाग्यावर.

प्रतिसाद नंदिनी | 3 July, 2013 - 15:09
कविता चांगली आहे, कवितेमधे काहीही आक्षेपार्ह लिहिलेले नाही, कुणावर टीका केलेली नाही, काहीही अश्लील लिहिलेले नाही. तुम्हाला कविता समजत नसेल तर तो तुमचा प्रॉब्लेम. कविता लिहिणारीचा नव्हे.

प्रतिसाद बेफ़िकीर | 3 July, 2013 - 15:15
कविता चांगली आहे,<<< सापेक्ष
कवितेमधे काहीही आक्षेपार्ह लिहिलेले नाही,<<< नीट सादरीकरण केले नाही तर पहिलेच वाक्य 'बेकायदेशीर' ठरू शकते.
कुणावर टीका केलेली नाही,<<<
एका (भारती जिच्याबद्दल म्हणाल्या की तिचे वर्णन जरा अधिक लिहा, त्या) मुलीला नाठाळ म्हंटलेले आहे कारण बहुधा तिचे लग्न ठरत नसावे व त्याची कारणे बहुधा हुंडा, मानपान यात असावीत असे कवितेत (मान्य आहे उपरोधिकपणे) म्हंटले गेले आहे पण ते उपरोधिक आहे हे समजण्यासाठी सादरीकरण आवश्यक. ऑन इट्स ओन, अवघड आहे ती क्लॅरिटी!
काहीही अश्लील लिहिलेले नाही<<< अश्लील लिहिले की कविता ठरत नाही का?

नीधप | 3 July, 2013 - 15:44
मामे, आज पाह्यली ही कविता.
उपहास, चीड आणि शेवटच्या वाक्यात सेल्फ डेप्रिकेटिंग (मराठीत काय बरे?) टाइपचा विनोद हे सगळं मस्त.
मला तरी कविता म्हणून ही वाचताना त्रास झाला नाही.
अजून लिहीणे!

वैभव वसंतराव कु... | 3 July, 2013 - 16:17
कविता समजणे हा मुद्दा नाही आहे मला समजलीये पटलीये आवडलीही आहे थोड्दी मंद्सा गालातल्यागालात हसलो होतो मीही वाचल्यावाचल्या

वरदा | 3 July, 2013 - 16:05
मामे, कविता छानच आहे
त्या कवितपासून सुरू झालेली खालची चर्चा मात्र अफाट विनोदी झालीये. सही स्ट्रेसबस्टर आहे. तुझे धागे हिट्ट जातातच पण हा सुपरहिट्ट (दोन्ही ठिकाणी ट पूर्ण) पदाला पोचलेला आहे.
मैत्रीदाक्षिण्य दाखवण्यासाठी आवर्जून इथे पोस्ट लिहिली

श्रुती | 3 July, 2013 - 16:10
मामी कविता आवडली. शेवट जबरी आवडला.

वैभव वसंतराव कु... | 3 July, 2013 - 16:14
मामी आपली रचना अतिसाधारण आहे..."फालतू" की कविताही म्हण्वत नाही ..इतराना आवड्दणे मलाही वाचायला मज्जा आली असण्ने कुण्नालातरी भावना दिसल्या असणे हे मुद्दे खिजगण्नतीतहे नाहीय येत हे आस्धी लक्ष्क्षात घ्या

मंजूडी | 3 July, 2013 - 16:24
मामी, कविता छान आहे. आवडली.
आशिर्वाद >> आशीर्वाद
तिला देऊ यात.>> तिला देऊयात.
एवढं फक्त सुधार.

दीप्स | 3 July, 2013 - 17:15
मामी, कविता आवडली.

पौ, एडिट करून फक्त चर्चेचा भाग ठेवत आहे. कारण जे मुद्दे मांडले आहेत त्यांचा आदर आहे. हीन भाषा, पर्सनल कमेंट, असंबंध्द पोस्टी गाळणार आहे.

हे काय? या धाग्याचा उद्देश खरंच नाही समजला. कारण यात सगळे प्रतिसाद पुन्हा आलेले दिसतच आहेत की?

Uhoh

मामी, मग नवीन पानावर कशाला डकवलीस कविता?? तसेही हे सगळे प्रतिसाद तिथे होतेच की.

कविता आवडली मला. पण ते वरचं सगळं नसतं टाकलंस तर बरं झालं असतं.

कविता आवडली.
आणखी काही वर्षांनी आमच्या नाठाळ मुलीबद्दल कुणीतरी असे म्हणताना ऐकायला मिळेलच.
Wink

कविता ज्यांच्यापर्यंत पोहोचली त्यांच्याकरता खरंतर नव्हतीच. ज्यांच्यापर्यंत पोहोचली नाही, त्यांच्यापर्यंत ती कधी पोहोचेल हाच प्रश्न आहे.

नाठाळ शब्दाला काहीजण अडखळलेले दिसले आणि त्या शब्दाचं प्रत्येकानं आपापल्या समजुतीनुसार केलेलं स्पष्टीकरण पाहता ही कविता तिथपर्यंत का पोहोचली नाही हे काहीप्रमाणात लक्षात येतंय.

नाठाळ मुलीबद्दल काही लिहायला पाहिजे असा एक सुर दिसला. नाठळ मुलीबद्दल काही लिहित गेलं तर खंडकाव्य तयार होईल नाहीतर भलामोठ्ठा निबंधच लिहावा लागेल. प्रत्येकानं आपापल्या क्षितिजाप्रमाणे कविता मनातल्या मनात पुरी करावी अशी अपेक्षा.

पारिजाता | 3 July, 2013 - 18:47 नवीन
मामी कविता मस्त.

प्रतिसाद भन्नाट. उगच गंमत म्हणून बोलत नाही. खरंच फक्त बायकाच वा म्हणतायत या प्रश्नाचं उत्तर आपल्याच संवेदनांमधे आहे. त्या कवितेतल्या वाक्यावाक्यात व्यक्त झालेला पीळ हा बायकांना समजणार.
बाकी उगच इतकं सटकणार्‍या लोकांनी पंचवीस तोळे सोनं हुंडा म्हणून मागितलं अस्णार,कुलदीपकाचा हट्ट धरला असणार. आणि इतर बरंच काही. म्हणून त्यांना लागणार तोंडि लावायला यमक आणि लय. त्यापलिकडची ठसठसणारी कविता सोसलेल्यांनाच कळेल.
असो.

मामी त्या दुसर्‍याच्या लेकीला नाठाळ का म्हणालात या मागची भूमिका काय आहे हो तुमची
म्हणजे असे म्हणून समारोप करावा असे वाटताना मनात नेमके काय काय होते त्याचा संक्षिप्त आढावा द्याल का

आणि मग आमची लेक तुम्हाला तुमच्या लेकी सारखी असे ठसवून म्हणताना त्यांची लेक तुम्हाला तुमच्या लेकी सारखी नाही असे काही आहे का? नसेल तर त्याआ घरच्या लेकीला नाठाळ का म्हटले गेले आहे

आमची लेक गुणी असे वर्णन केले तेही उपहासात्मकच् का मग ? नाही आमची ठमी तशी पण आम्ही ठासून सांगत आहोत ... पण तुमची लेक ढमीच...("ढ" "ढ" ढमीचा ) असे काही होते का मनात कवितेचे ड्राफ्टिंग मनात तयार होत असताना

वर पारिजाता म्हणाली त्यातही तथ्य असेल का ही कविता आवडली म्हणणार्‍या मोस्टली बायकाच का आहेत

मामी
मला कविता फारशी कळली नाही. म्हणजे उपहासात्मक आहे की आत्मप्रौढी? म्हणजे आम्ही एवढे मोठे लग्न करणार आहोत वगैरे? आणि दुसर्‍यांची मुलगी नाठाळ का? म्हणजे हे चूक किंवा वाईट असे म्हणायचे नाहीये पण कवितेमधून काही स्पष्ट होत नाहीये. मी माझा काहीही समज करून घेऊ शकते की त्या मुलीला नाठाळ का म्हटले आहे.
एनीवे, असे बरेच साहित्य(गद्य्/पद्य) असते ज्यामधे 'it is left to readers'. म्हणून नाठाळ का म्हटले ते सांगायलाच पाहिजे असे काही नाही. पण तुमचे त्यामागचे विचार जाणून घ्यायला आवडतील.

बाकी वरचा पारिजाताचा प्रतिसाद वाचून-

खरंच फक्त बायकाच वा म्हणतायत या प्रश्नाचं उत्तर आपल्याच संवेदनांमधे आहे. त्या कवितेतल्या वाक्यावाक्यात व्यक्त झालेला पीळ हा बायकांना समजणार.
त्यापलिकडची ठसठसणारी कविता सोसलेल्यांनाच कळेल.

मला 'बापरे' असे झाले! Sad

Pages