झटपट टोमॅटो चटणी

Submitted by के अंजली on 1 July, 2013 - 13:21

साहित्यः मस्त पिकलेले लालबुंद टोमॅटो- पाच ते सहा,
एक लहानसा कांदा,
मुठभर भाजलेले दाणे,
सहा सात लसूण पाकळ्या मध्यम आकाराच्या
मुठभर हिरवीगार कोथिंबीर,
तीन ते चार मिरच्या,
दोन चमचे साखर; एक चमचा मीठ,
फोडणीकरता: तेल,हळद,मोहरी,जीरे आणि हिंग.

कृती: वरील सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात अर्धवट बारीक करुन घेणे. मग कढीईत तेलाची हिंग जिर्‍याची फोडणी करुन त्यात हे साहित्य चांगलं परतून घ्यावं. पाणी निघून गेलं की गॅस बंद करुन गार झाली की..
कशासोबतही खाण्यास झटपट टोंमॅटो चटणी तयार! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो नाही दिसत आहे अंजली..
सोप्पी आहे कृती, करून पाहेन,जरा वेगळ्या क्रमाने आमच्याकडे केली जाणारी हिरव्या टॉमेटोची चटणी आठवली..

शैलजा केलाय फोटो अपलोड.. माहित नाही का दिसत नाहिये,,पहाते पुन्हा.

भारतीताई..कच्च्या टोमॅटोची चटणी करताना टोमॅटो उकडून घेतात ना? ती पण मस्त होते.

धन्यवाद च्रप्स, आणि दिनेशदा.
रेसिपी एडीट करुन टाकले होते फोटो. पण नाही दिसले. म्ह्णून प्रतिसादात टाकलेत. Happy