गळा दाटला अभंग घोष विठु रखुमाई
अनवाणी पाउलांना कष्ट जाणवे न काही
चंद्रभागेच्या तीराची ओढ लागली मनाला
दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला...
शतकामागुन शतकं उलटली. पिढ्यांमागुन पिढ्या बदलल्या. बदलांचा हा रेटा गावांचे, माणसांचे चेहरे बदलतो. नवीन काही जन्माला येत, जुन काही लयाला जातं. या सार्यामध्ये परंपरेची नाळ मात्र शाबूत असते. ती शतकांमागून शतकांना जोडत असते अन् पिढ्यांमागुन पिढ्यांना साधत असते. ही परंपराच मग एक सांस्कृतिक ठेवा बनते आणि जिवाभावाने जपली जाते. आपल्या महाराष्ट्रालाही असाच एक भव्य आणि उदात्त सांस्कृतिक ठेवा लाभला आहे. ज्ञानियाच्या ओव्यांचा, तुकोबा/नामदेवांच्या अभंगाचा आणि या गजरात न थकता चालणार्या "पंढरीच्या वारीचा".
आषाढवारीचा हा सोहळा याची देही, याची डोळा अनुभवण्याची बहुतेकांची इच्छा असते. ज्यांना प्रत्यक्ष या वारीचा आनंद घेता येत नाही, खास त्यांच्याकरीता "आनंदवारी"चा लघुपट "रानवाटा" संस्थेने यु ट्युबवर HD स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे. संपूर्ण लघुपटाची संकल्पना आणि निर्मिती स्वतः श्री स्वप्निल पवार यांची असुन संकलन राधेश तोरणेकर, पूजा साखरे, निलेश खलाणे यांनी केले आहे. निवेदन नयन जाधव यांचे आहे तर संगीत ओंकार घैसास यांनी दिले आहे.
२४ मिनिटांचा "आनंदवारी" हा लघुपट नक्कीच तुम्हालाही वारीचाच एक भाग असल्याचा आनंद देईल.
युट्युबची हि लिंक खास मायबोलीकरांसाठी:
http://www.youtube.com/watch?v=3RB948sqhqs
आले सुखाला भरते चंद्र मोहरे भक्तीचा
दुजी भावना सरली बोध जाहला ज्ञानाचा
भाव समतेचा थोर असा वाटेत पेरला
दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला...
मस्त
मस्त
व्वा! इथे हे शेअर केल्याबद्दल
व्वा!
इथे हे शेअर केल्याबद्दल धन्यवाद जिप्सी!
छान. धन्यवाद
छान.
धन्यवाद
जबरी!!!
जबरी!!!
इथली छायाचित्र जितकी स्पष्ट
इथली छायाचित्र जितकी स्पष्ट दिसताहेत तितके चित्रिकरण स्पष्ट दिसत नाहीये..असं का बरं?
देवकाका, दोन्हीही अगदी
देवकाका, दोन्हीही अगदी व्यवस्थित दिसत आहे.
अरे वा! सुंदर!
अरे वा! सुंदर!
मी पान बंद करून पुन्हा
मी पान बंद करून पुन्हा नव्याने उघडलं...आणि आता मस्त दिसायला लागलंय..धन्यवाद जिप्सी.
छान
छान
मस्त आहे हा लघुपट. इथे लिंक
मस्त आहे हा लघुपट. इथे लिंक दिल्याबद्दल धन्यवाद.
मस्तच!
मस्तच!
जिप्स्या, तुझ्या फोटोंच्या
जिप्स्या, तुझ्या फोटोंच्या प्रदर्शनाच्या वेळी पाहिला होता हा लघुपट. खूप छान आहे
निव्वळ अप्रतिम! सुंदर व्हिडिओ
निव्वळ अप्रतिम! सुंदर व्हिडिओ आहे! पार्श्वसंगीत आवडलं.
आजींनी सुरवातीला किती गोड सांगितलंय वारीचं, पालखीचं सूख!
सुरेख विडीओ! धन्यवाद!
सुरेख विडीओ! धन्यवाद!
मस्त....
मस्त....
इथे हे शेअर केल्याबद्दल
इथे हे शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद जिप्सी! >>> +१०००...
अतिशय सुंदर आहे रे ....
टिळा वैष्णव हे ल्याले गळा हार
टिळा वैष्णव हे ल्याले गळा हार तुळशीमाळा
एकतारी देते साथ टाळ-मृदुंगाच्या ताला
भागवताची पताका आलिंगीते गगनाला
दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला...
अनेक धन्यवाद !!!
अनेक धन्यवाद !!!
जिप्स्या.... धन्यवाद .. ही
जिप्स्या.... धन्यवाद .. ही लिन्क दिल्याबद्दल... वेळ बघ चक्क मध्य रात्र......
आता खरच वाटायल लागल्यं बहुत्क पुढ्च्या वर्षी किमान दिवेघाटात तरी वारी करणार..
जय जय पांडुरंग हरी.......
घारूअण्णा मी उद्या जातोय
घारूअण्णा
मी उद्या जातोय हडपसरला खास वारीसाठी.
वाह वा!
वाह वा!
मला कोणी सांगु शकेल का, की,
मला कोणी सांगु शकेल का, की, भिमा नदीला पंढरपुरला चंद्रभागा का म्हणतात?
लहानपणी असं ऐकलं होतं की, तिचा आकार चंद्रक्रुती आहे म्हणुन, पण आता नकाशा बघितल्यावर तसं काही दिसतं तरी नाही.
धन्यवाद योगेश.
धन्यवाद योगेश.
आषाढी वारीनिमित्त पुन्हा एकदा
आषाढी वारीनिमित्त पुन्हा एकदा हा धागा वर काढ्ण्यासाठी प्रतिसाद.
जिप्स्या तुझ्या फोटोचे काय
जिप्स्या तुझ्या फोटोचे काय झालं ... जाउन आलास ना दोन दिवस वारीला..... आम्हाला कधी कधी दिसणार दिवे घाट..... विठ्ठल विठ्ठल!!!!!!
घारूअण्णा, लवकरच.....
घारूअण्णा, लवकरच.....
जिपश्या.. गेला होतास का रे ..
जिपश्या.. गेला होतास का रे .. हडपसर ला.. मागच्या वर्षी सार्खीच मजा आलि असेल ना रे.. जीवेश आनी नरेश पन होता का?
आमच्या नशीबात नाही रे.. ते भाग्य.. फोटो तरी दाखव
जिपश्या.. गेला होतास का रे ..
जिपश्या.. गेला होतास का रे .. >>>>हो कोकण्या. रविवारी आणि सोमवारी जाऊन आलो, पण यावर्षी सासवडहुन दिवे घाट आणि पालखीसोबत पुन्हा सासवड अशी वारी केली.
खूपवेळा तुझी आठवण काढली यावर्षी :(. (जिवेश/नरेश नव्हते आले. मी दुसर्या एका मित्राबरोबर जाऊन आलो.)
फोटो तरी दाखव>>>>>नक्कीच. २-३ दिवसांत फोटो प्रदर्शित करतो रे.
जिप्सी, वारीचे फोटो बघायला
जिप्सी, वारीचे फोटो बघायला उत्सुक आहे
छान.
छान.