"आनंदवारी" || बोलावा विठ्ठल | | पहावा विठ्ठल ||

Submitted by जिप्सी on 30 June, 2013 - 05:48

गळा दाटला अभंग घोष विठु रखुमाई
अनवाणी पाउलांना कष्ट जाणवे न काही
चंद्रभागेच्या तीराची ओढ लागली मनाला
दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा भक्‍त नामात रंगला...

शतकामागुन शतकं उलटली. पिढ्यांमागुन पिढ्या बदलल्या. बदलांचा हा रेटा गावांचे, माणसांचे चेहरे बदलतो. नवीन काही जन्माला येत, जुन काही लयाला जातं. या सार्‍यामध्ये परंपरेची नाळ मात्र शाबूत असते. ती शतकांमागून शतकांना जोडत असते अन् पिढ्यांमागुन पिढ्यांना साधत असते. ही परंपराच मग एक सांस्कृतिक ठेवा बनते आणि जिवाभावाने जपली जाते. आपल्या महाराष्ट्रालाही असाच एक भव्य आणि उदात्त सांस्कृतिक ठेवा लाभला आहे. ज्ञानियाच्या ओव्यांचा, तुकोबा/नामदेवांच्या अभंगाचा आणि या गजरात न थकता चालणार्‍या "पंढरीच्या वारीचा".

आषाढवारीचा हा सोहळा याची देही, याची डोळा अनुभवण्याची बहुतेकांची इच्छा असते. ज्यांना प्रत्यक्ष या वारीचा आनंद घेता येत नाही, खास त्यांच्याकरीता "आनंदवारी"चा लघुपट "रानवाटा" संस्थेने यु ट्युबवर HD स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे. संपूर्ण लघुपटाची संकल्पना आणि निर्मिती स्वतः श्री स्वप्निल पवार यांची असुन संकलन राधेश तोरणेकर, पूजा साखरे, निलेश खलाणे यांनी केले आहे. निवेदन नयन जाधव यांचे आहे तर संगीत ओंकार घैसास यांनी दिले आहे.

२४ मिनिटांचा "आनंदवारी" हा लघुपट नक्कीच तुम्हालाही वारीचाच एक भाग असल्याचा आनंद देईल.

युट्युबची हि लिंक खास मायबोलीकरांसाठी:
http://www.youtube.com/watch?v=3RB948sqhqs

आले सुखाला भरते चंद्र मोहरे भक्तीचा
दुजी भावना सरली बोध जाहला ज्ञानाचा
भाव समतेचा थोर असा वाटेत पेरला
दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पान बंद करून पुन्हा नव्याने उघडलं...आणि आता मस्त दिसायला लागलंय..धन्यवाद जिप्सी.

निव्वळ अप्रतिम! सुंदर व्हिडिओ आहे! पार्श्वसंगीत आवडलं.

आजींनी सुरवातीला किती गोड सांगितलंय वारीचं, पालखीचं सूख!

टिळा वैष्णव हे ल्याले गळा हार तुळशीमाळा
एकतारी देते साथ टाळ-मृदुंगाच्या ताला
भागवताची पताका आलिंगीते गगनाला
दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा भक्‍त नामात रंगला...

जिप्स्या.... धन्यवाद .. ही लिन्क दिल्याबद्दल... वेळ बघ चक्क मध्य रात्र......
आता खरच वाटायल लागल्यं बहुत्क पुढ्च्या वर्षी किमान दिवेघाटात तरी वारी करणार..
जय जय पांडुरंग हरी.......

मला कोणी सांगु शकेल का, की, भिमा नदीला पंढरपुरला चंद्रभागा का म्हणतात?
लहानपणी असं ऐकलं होतं की, तिचा आकार चंद्रक्रुती आहे म्हणुन, पण आता नकाशा बघितल्यावर तसं काही दिसतं तरी नाही.

जिप्स्या तुझ्या फोटोचे काय झालं ... जाउन आलास ना दोन दिवस वारीला..... आम्हाला कधी कधी दिसणार दिवे घाट..... विठ्ठल विठ्ठल!!!!!!

जिपश्या.. गेला होतास का रे .. हडपसर ला..sad.gif मागच्या वर्षी सार्खीच मजा आलि असेल ना रे.. जीवेश आनी नरेश पन होता का?

आमच्या नशीबात नाही रे.. ते भाग्य.. फोटो तरी दाखव

जिपश्या.. गेला होतास का रे .. >>>>हो कोकण्या. रविवारी आणि सोमवारी जाऊन आलो, पण यावर्षी सासवडहुन दिवे घाट आणि पालखीसोबत पुन्हा सासवड अशी वारी केली.
खूपवेळा तुझी आठवण काढली यावर्षी :(. (जिवेश/नरेश नव्हते आले. मी दुसर्‍या एका मित्राबरोबर जाऊन आलो.)

फोटो तरी दाखव>>>>>नक्कीच. २-३ दिवसांत फोटो प्रदर्शित करतो रे. Happy