निसर्गाच्या गप्पा (भाग - १५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 June, 2013 - 03:52

निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.

आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.>>>

जागू अगदी खर आहे. याची खूपच गरज आहे. नाहीतर रोअजच झाडं तोअडलेली किंवा पडलेली पहातो. मध्यंतरी तर इतकी झाड कमी झालेली पाहीली म्हणूनच "आहेत तोवर पाहून घ्या" कविता सुचली.

http://www.maayboli.com/node/43744
हे पाहीलं का?

नमस्कार मंडळी Happy

नविन भागाबद्दल अभिनंदन Happy

अत्तापर्यंत अधुन मधुन इथे चक्कर मारायचे पण आता नव्या धाग्यावर नेहमी येणार Happy

Picture 2 155.jpg

एक शंका होती. इथे विचारू का?

सध्या जास्वंदीचा सिझन नाहीये का? झाडाला अनेक दिवसात एकही फूल आलेले नाही. का झाडाचाच काही प्रॉब्लेम असेल? बघायला तर असे काही वाटत नाहीये.

मी मेन पेज वर लिहीलेल मनोगत खास नाही का? कोणीच बोलत नाही त्याबद्दल ??>>> जागू, कालच मी व अंजू (शांकली) हा भाग पहाता पहाता बोलत होतो की या पंधराव्या भागाची प्रस्तावना जागूने खूपच छान केलीये - तुला कन्व्हे करणारच होतो हे .....

खरंचंच खूप सुरेख लिहिले आहेस तू हे ....

सध्या जास्वंदीचा सिझन नाहीये का?
>>
जास्वंद बाराही महिने फुलते. इतर फुलांप्रमाणे (उदा. झेंडू, मोगरा) जास्वंदाचा सिझन नसतो.

नविन भागाचे स्वागत. मी कोणाला नाही ओळखत येथे.पण बरीच पाने फुले ओळखिची आहेत. त्या मुळे येथे येणे फार आनंदाचे आहे. या भागाची सुरवात..प्रस्तावना फार छान झाली आहे.अनेक शुभेछा!!!

जागू, मनोगताबद्दल मुद्दाम सांगायचे होते. निसर्गात उगवून आलेल्या झाडांची टिकण्याची क्षमता १ टक्क्यापेक्षाही कमी असते. तरीही जगात एवढी अफाट वनसंपत्ती होती.. आपण जे नुकसान केलेय ते भरून काढणे महत्वाचे.

आम्ही १९७४ साली चेंबूरला आलो. त्यावेळी चेंबूरमधे फार प्रदूषण असे. त्यावेळी आम्ही ( हो मीसुद्धा ) जी झाडे लावलीत त्यामूळे आमची कॉलनी सदा हिरवीगार दिसते. अगदी गूगल अर्थवर देखील. हाच संदेश आता लहान मूलांना द्यायला हवा.

मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया.

>>

हा उपक्रम छान आहे. अनेक ट्रेकवृतांतात एकदम उघडे बोडके डोंगर दिसतात. अश्या ठिकाणी फिरायला जाताना बिया टाकल्या तर ते डोंगर थोडे तरी हिरवे होतील.
फळांच्या बिया टाकल्या तर उत्तमच! वानर, खार, पोपट अश्या पशुपक्षांना खाऊची सोय होईल.

शशांकजी धन्स.
प्रज्ञा ओळख हळू हळू होईलच. पण तुझी पानाफुलांची ओळख ही अधिक ओळख आहे. स्वागत आहे तुझे.

नताशा काही दिवसांसाठी बहर नसतो जास्वंदीला. माझ्याकडे होते असे.

दिनेशदा खरच हा नुसता मेसेज नाही त्याचे महत्व आणि ते करण्यास शाळेतुन, ऑफिसमधुनही जसे आधारकार्डची सक्ती आहे तशी सक्ती करायला हवी.
होय दिनेशदा ती राय आवळ्याची फुले आहेत.

या पंधराव्या भागाची प्रस्तावना जागूने खूपच छान केलीये > +१. माझ्याकडे (खोट्या !) ब्रम्हकमळाला कळी आली आहे !

पश्चिम महाराष्ट्र सोडला तर पावसाचे प्रमाण हे इतर भागात कमी कमीच होत जाते. त्यामुळे सर्वत्र दाट जंगले तयार व्हावीत ही अपेक्षा ठेवणे तेवढे योग्य होणार नाही -

दुसरे असे की आपण रहाणार शहरात -जिथे गॅससारखी इंधने आपल्या हाताशीच असतात, पण खेड्यापाड्यात अजूनही सरपणच सर्रास वापरले - चुलीसाठी - याला लाकडे कुठून येणार - तर झाडे-झुडपे तोडूनच - आपण इथे शहरात राहून खूप आरडा-ओरडा केला - झाडे तोडू नका म्हणून तर ती मंडळी म्हणतील -तुम्ही इथे रहा व मग सांगा आम्हाला स्वयंपाक कसा करायचा ते ...

अजून एक मुद्दा -जशी दाट जंगले आवश्यक आहेत तशीच माळरानेही आवश्यक असतात - पर्यावरणाचा तो ही एक भागच आहे -तिथे मोठी झाडे असणार नाहीत तर गवत्-झुडपे एवढेच असणार...

- अशा अनेक बाजू आहेत - आपल्या हातात काय आहे व त्याचा आपण कसा वापर करतो ते खूप महत्वाचे -
१] आपल्या घराच्या- अपार्टमेंटच्या आसपास झाडे लावणे. कुंड्यातून रोपे लावणे.
२] घरात लाकडी फर्निचरपेक्षा लोखंडी फर्निचर वापरणे, कागदाचा अनावश्यक वापर टाळणे.
२] प्लॅस्टिक पिशव्या टाळणे.
३] स्वयंचलित गाड्यांचा नियंत्रित वापर - कारण गाड्यातून निर्माण होणारा धूर हवा प्रदूषण वाढवतो..
- अशी बरीच मोठी यादी करता येईल - पण त्या गोष्टी आचरणात आणणे महत्वाचे आहे.
(वाचक मंडळी म्हणतील - इथेही प्रवचनकार दिसताहेत की ... Wink Happy )

मनोगत चांगलं लिहिलयस जागूले. एक सुचना कराविशी वाटते. प्रत्येक भागात माबोकरांची आणि पुस्तकाची नावं देण्याची गरज नाही असं मला वाटतं. पुस्तकाची नावं फक्त पहिल्या भागात देऊन बाकीच्या भागात 'पुस्तकांची नावं इथे नमूद केली आहेत' असं काहीसं लिहून लिंक देता येईल. माबोकरांची नावं पारच वगळायला हरकत नाही.

सध्या जास्वंदीचा सिझन नाहीये का? झाडाला अनेक दिवसात एकही फूल आलेले नाही. का झाडाचाच काही प्रॉब्लेम असेल? बघायला तर असे काही वाटत नाहीये.
>>> चिक्कार येताहेत फुलं. माझ्याकडे पाच्-सहा प्रकारच्या आहेत. रोज निदान एकीवर तरी एकतरी फुल असतंच. लै गुणाच्या हैत माझ्या जास्वंदी! Happy

मला मुंबईत आणि पुण्यात गटग साठी संयोजक हवेत. पुढचा आठवडा कदाचित मी धावपळीत असेन.
या लोकांनी इतरांशी संपर्क साधायचा आहे. साधारण १४/१५ जूलै चा विकेंड माझ्यासाठी राखून ठेवा.

गेल्याच आठवड्यात महाबळेश्वर ला गेलो होतो . तिथे हॉटेल च्या आवारात छान जास्वंद फुलले होते. निग साठी फोटो काढलेच. मी पहिल्यांदाच पिवळ्या रंगाचे जास्वंदीचे फूल पाहिले.

DSC09621.jpgDSC09698.jpgDSC09626.jpgDSC09686.jpgDSC09608.jpgDSC09697.jpgDSC09620.jpg

मला मुंबईत आणि पुण्यात गटग साठी संयोजक हवेत. पुढचा आठवडा कदाचित मी धावपळीत असेन.
या लोकांनी इतरांशी संपर्क साधायचा आहे. साधारण १४/१५ जूलै चा विकेंड माझ्यासाठी राखून ठेवा.
>> दिनेशदा मला यावेळेचे गटग मिस नाही करायचे आहे. Happy

दिनेशदा, मलासुद्धा गटगला यायला आवडेल. नक्की सांगा.

घरच्या नेट कनेक्शनचा प्रॉब्लेम झाला आहे. एकही चित्र दिसत नाही.......

शशांक, <<<<- अशा अनेक बाजू आहेत - आपल्या हातात काय आहे व त्याचा आपण कसा वापर करतो ते खूप महत्वाचे ->>>> अगदी नेमके आहे. घरात वीजेचे बिल येते म्हणून काळजी घेणारे ऑफिसमधे कधीच गरज नसताना दिवे,पंखे बंद करत नाहीत. उजेडासाठी काचेच्या बंद खिडक्या वापरत नाहीत. कॉमन नेट प्रिंटर वापरताना कागद दोन्ही बाजूने वापरणे, सिलेक्शन करून प्रिंट काढणे ... असे करत नाहीत...... या सगळ्याचा राग येतो. वादावादी झालीच, तर तुझे पैसे जातात का? असे विचारले जाते.... तेव्हा तर या लोकांची कीव येते.

आपण पुढल्या पिढीसाठी काय मागे ठेवणार आहोत? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.

ह्या पानावर काय आहे हे कोणाला माहिति आहे का? किड नक्किच नव्हति. पानाचाच भाग वाटत होता. आणि फक्त थोड्या पानांवरच होते हे. >>>> आज जावुन बॉटनी च्या प्रॉफ ला विचारले कि काय आहे ते. तर तो gall mite म्हटला. कोणाला अजुन माहिति असेल तर नक्कि टाका.

सुप्रभात!

DSCN0359.JPG

सामी, छान आहेत जास्वंदाचे फोटो. लाजो,सुंदर फुल आहे हा.
जागु,तू मला माझ्या रम्य बालपणात घेऊन गेलीस रायआवळ्याच्या फुलाचा फोटो टाकून. धन्स!!!!
माझ्या अंगणात दोन दोन रायआवळ्याची झाड होती.
जिप्सी काय आता कोणाशीच बोलणार नाहिये की काय?? बोहल्यावर चढला नाहिये तो हे वागणे, नंतर चित्र नक्की कस असेल त्याचा विचार करा Wink

जागू, मनोगत छानच लिहीलय. आता ट्रेकर्सना सांगायला हवं, जाताना विविध वनस्पतींच्या बिया घेऊन ट्रेकला जायला. Happy
जिप्सी काय आता कोणाशीच बोलणार नाहिये की काय?? बोहल्यावर चढला नाहिये तो हे वागणे, नंतर चित्र नक्की कस असेल त्याचा विचार करा डोळा मारा>>>>>>>>>>>बघा आता सर्वांनी. Happy

लाकडाची थोडीफार ( बेसुमार नव्हे ) होणेही गरजेचे आहे. खास करुन बांधकामात / फर्निचरसाठी ते वापरले जावे. ( म्हणजे त्यात बद्ध झालेला कार्बन बंदीस्त राहतो, असा काहीसा उल्लेख आसमंत मधे वाचला होता.)

जंगलाच्या नजीक राहणार्‍या लोकांना कुठले लाकूड तोडावे याचे नेमके ज्ञान असते. पण त्यांचा मागे कंत्राटदार लागला कि मात्र बेसुमार तोड होते आणि त्याची भरपाई होत नाही.

जिप्सी | 28 June, 2013 - 14:28
दिनेशदा, तुम्ही फोन करत होता का आज? >>>>
.
.
.
.
आणि अखेर जिप्सीचे मौन भंगले ......

Pages