फ्रेम ऑफ रेफरन्स

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

The Hitchhiker's Guide to the Galaxy has, in what we laughingly call the past,
had a great deal to say on the subject of parallel universes. Very little of
this, however, is at all comprehensible to anyone below the level of Advanced
God and, since it is now well established that all known gods came into
existence a good three millionths of a second after the universe began rather
than, as they usually claimed, the previous week, they already have a great
deal of explaining to do as it is. They are, therefore, not available for
comment at this time.
- Douglas Adams, in 'Mostly Harmless'

'हिचहायकर्स गाईड टु द गॅलॅक्सी' (हिगाटुदगॅ) हे साय-फाय प्रेमींचे वेदच. ही ट्रायॉलॉजी पण वेदांप्रमाणेच चार भागात आहे, वेदांप्रमाणेच त्यात काहीही आणि त्यामुळेच सर्वकाही सापडू शकतं. वेदांनंतर आलेल्या 'साहित्यात' वेदांची मजा नाही (उदा. पुराणं) त्याचप्रमाणे हिगाटुदगॅ चा पाचवा भाग 'मोस्टली हार्नलेस' तसा 'हिन'वला जातो. पण इतक्यातच मी तो वाचायला घेतला. पहिल्या काही पानांनतरच वरील वाक्य सापडतं. पॅरॅलल युनिव्हर्स बद्दलचा भाग सोडून द्या, सर्व ज्ञात गोष्टी बिग बॅंगच्या नंतर अस्तित्वात आल्या हे ही विसरा. बायबलनुसार जग सहा दिवसात बनवले गेले आणि मानव सातव्या. पण त्या सात दिवसांना आठवडा म्हणणे, आणि ज्या प्रकारे डग्लस अॅडम्सनी त्या पहिल्या क्षणाच्या अगदी छोट्या भागाची तुलना बिग बॅंगच्या 'आधिच्या' आठवड्याशी केली आहे त्या मुळे मुड एकदम बदलतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला हव्या त्या 'फ्रेम अॉफ रेफरन्स' मध्ये कशी बसवायची याचे हे उत्तम उदाहरण आहे. कुणाचा आठवडा, पृथ्वीचे परिभ्रमण सुरु होण्याआधी दिवस म्हणजे नेमके काय असणार वगैरे सारखे प्रश्न विचारलेच जात नाहीत.

याचप्रकारचे उदाहरण पुरातन भारतीय ग्रंथांमध्ये आढळते. वेगवेगळे ग्रंथ वेळेची गणना थेट प्रकाशाला अणुचा व्यास क्रांत करायला जितका नगण्य वेळ लागेल तिथपासून ते एकापेक्षा अधीक ब्रह्मांडांच्या कालावधीं पर्यंत करतात. वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये फरक असले जरी तरी ते एककांबद्दल आणि विभाजनांबद्दल आहेत (उदा. सूर्यसिद्धांत, विष्णुपुराण इ. पहा: http://en.wikipedia.org/wiki/Hindu_units_of_time). पण ती तात्वीक पद्धत विज्ञाननिष्ट असे. मात्र जेंव्हा मानवाची (म्हणजे पृथ्वीची) वर्षे आणि ब्रह्माची वर्षे यांची तुलना सुरु झाली तेंव्हा मात्र ही पद्धत भलतीकडे घसरली. येथे दिवस किंवा वर्ष या संज्ञा नुसत्या 'overload' केल्या जाताहेत का (केवळ त्या संज्ञा वापरणाऱ्या मानवांना कळावे म्हणून)? ते शक्य वाटत नाही कारण आत्मा, पुनर्जन्म वगैरे सारख्या आपल्याला न कळणाऱ्या अनेक संज्ञा सगळीकडे पेरलेल्या दिसतात. की ते वर्ष म्हणजे ब्रह्मा ज्या ग्रहावर आहे त्या ग्रहाचा परिभ्रमणाचा कालावधी? (आणि ब्रह्माचे वर्ष जर पृथ्वीच्या वर्षाच्या बरोब्बर कोणतातरी पुर्णांकपट मोठे असेल तर निरिक्षणेही तपासायला हवीत).

एकूण काय तर इकडच्या संज्ञा तिकडे लावून ज्ञानाचा आव आणणे सोपे असते, काही कळले नाही, कळवले नाही तरी. बाऊन्ड्री कंडिशन्स अतिशय महत्वाच्या असतात आणि त्याच नेमक्या अशा बाबतीत दुर्लक्षिल्या जातात.

विषय: 
प्रकार: 

The above quote is so nice. my daughter is a sci-fi lover and a budding atheist. It seems we are buying the guide to galaxies. ?
what you are insisting on is also so right. how many people take the trouble
?

- बाऊन्ड्री कंडिशन्स आणि तुमचा मुद्दा ह्यातील संबध कळला नाही.
महत्वाचे म्हणजे - विवरण पटत नाही, लेखाची संकल्पना, आधार, पुरावे उथळ आहेत. निष्कर्ष आधी लिहून मग लेख लिहिला आहे असे वाटते.
अधिक चांगल्या लेखाच्या प्रतीक्षेत..

चु.भू.दे.घे.

Srd, तशी काही निरिक्षणे सापडली नाहीत.

सुसुकु, लेख म्हणवण्याइत्के वरचे लिखाण विस्त्रुत नाहीच.
बाऊंड्री कंडीशन्स चा मुद्दा misplaced analogies शी संबंधीत आहे. कोठलाही रेफरन्स कुठेही जोडण्याबद्दल आहे. माझे नहमीचे म्हणणे असते की अ‍ॅनॉलॉजीज वापरायला नको - त्यांच्यामुळे ओव्हरसिम्प्लिफिकेशन होतं आणि लोक त्यालाच धरुन बसतात.