हॅरी पॉटर ट्रिविया क्विज

Submitted by वैद्यबुवा on 1 February, 2013 - 11:31

हॅरी पॉटर नीलम-गेम खेळत असताना ही कल्पना सुचली. नीलम गेम मध्ये पुढचं कनेक्शन जोडताना पुष्कळ स्वातंत्र्य आहे त्यामुळे गेम आविरत सुरु राहतो खरं पण मला वाटतं हॅरी पॉटर ट्रिवियाची खरी मजा पुस्तकातल्या बारिक बारिक डिटेल्सची उजळणी करण्यात आहे.

खेळ तसा साधा आहे, पुस्तकामधल्या आपल्याला माहित असलेला एखादा बारकावा, घटना, व्यक्ती ह्या बद्दल प्रश्न विचारायचा आणि बाकी लोकांनी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. प्रश्नाचे बरोबर उत्तर मिळाल्याशिवाय दुसरा प्रश्न विचारायचा नाही. प्रश्न आणि उत्तर दोन्हीही vague नसतील ह्याची काळजी घेतली पाहिजे. सहसा अगदी खुपच सोपे प्रश्न विचारायचे टाळले पाहिजे नाही तर इतकी मजा येणार नाही. खेळ नक्की कसा पुढे सरकतो हे बघून हवं तर आपण नवीन नियम बनवू शकतो.

ह्या खेळाकरता गप्पांचे पान न उघडता धागा उघडलाय कारण एक तर प्रश्न वाहून जायला नको आणि दुसरं म्हणजे लगे हाथों हा धागाच एक हॅरी पॉटर ट्रिविया लायब्ररी होऊन जाईल. Happy

तर मग करायची सुरवात?... Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'पॉटरवॉच'वर रॉनचे दोघेही भाऊ नसतात. फक्त फ्रेड असतो. त्याचे टोपणनाव Rodent / Rapier (त्याला रोडन्ट नको असतं म्हणून!) बाकीचे लोक-
ली जॉर्डन - रिव्हर
किंग्सली - रॉयल
ल्युपिन - रोम्युलस

बेलाट्रिक्सच्या नवर्‍याचं नाव रोडॉल्फस लेस्ट्रेंज.

बेलाट्रिक्सच्या नवर्‍याचं नाव रोडॉल्फस लेस्ट्रेंज.
<< श्र, ते कधीचंच विचारलं होतं मी. तूच उत्तर दिले होतेस. Happy

वीझली कुटुंब ख्रिसमसच्या दिवशी रेडीओवर कुणाचं गाणं ऐकत असतात. गाण्याचे शब्द आठवले तर ग्रेटच!!

<<<श्रध्दा छानच उत्तर दिलेस. माझाही गैरसमज दुर झाला.
पुढचा प्रश्नः हॅरीने रॉनच्या भावाच्या लग्नात ज्या विझली भावाचे रुप घेतले होते किंवा जे नाव वापरले होते ते कोणते?

ऑरलँडोच्या युनिवर्सलमधली हॅरी पॉटर राईड करून आलो (दोनदा केली Happy )
राईड ठीकठाकच आहे पण हॉगवर्टस आणि डायगन अ‍ॅलीत फेरफटका मारतांना फार मस्तं वाटलं.

जळवा आम्हाला.. Happy

माझा प्रश्न-संपूर्ण सिरीजमधे हॅरीचं कोणतं स्वप्न पहिल्यांदा उल्लेखलं गेलं आहे?

>>जळवा आम्हाला..
अजीबात जळू नका.

हॅरी पॉटर अट्रॅक्शन ठीकच ठीक आहे. गर्दी, रांगा, राइड्समधे बिघाड या आणि अशा सगळ्या वैतागातून बाहेर पडून झाल्यावर होणारं हॉगवर्ट्स, ऑलिवँडरचं दुकान, वीजलीट्विन्सचं दुकान या सगळ्यांचं दर्शन निराश करतं. बटरबिअरनं पोटात ढवळतं आणि कधी एकदा पार्काच्या डॉक्टर सूस भागात जाऊन निवांत बसतो असं होतं. Proud

माझा प्रश्न-संपूर्ण सिरीजमधे हॅरीचं कोणतं स्वप्न पहिल्यांदा उल्लेखलं गेलं आहे?<<<<<
उडणार्‍या मोटरसायकलचं? त्याचा अंकल व्हर्नॉनबरोबरचा संवाद आहे.

हॅरी पॉटर सिरिज इंग्रजीत खूप आधी वाचलीय, पण मराठीत जास्त वेळा वाचलीय त्यामुळे स्पेल्स, नावं मराठीत आठवतायत Sad

गॉड्रिक्स हॉलोच्या झटापटीत हॅरीची वाँड तुटते त्यानंतर -
१. हर्मायनीची वाँड - जनरल कामांना
२. रॉनने एका स्नॅचराची हिसकावून आणलेली वाँड
३. मालफॉयची हॉथॉर्न वाँड आणि स्नॅचराची वाँड - माल्फॉय मॅनॉरमध्ये ग्रेबॅकला रोखायला
४. यापैकीच एक - हिअर लाईज डॉबी, अ फ्री एल्फ लिहायला
५. अखेरच्या झटापटीत इतरांचं शील्ड चार्मने रक्षण करायला
६. माल्फॉयची हॉथॉर्न वाँड आणि एल्डर वाँड (ही त्यावेळी खरं फक्त त्याच्याकडे येते) - वोल्डेमॉर्टला संपवायला
७. एल्डर वाँड - फीनिक्स फीदर वाँड दुरुस्त करायला

श्रध्दा
मला वाटते की नक्किच तु हॅरी पॉटरची ग्रेट फॅन आहेस. अगदी बरोबर उत्तर आहे.

नवीन प्रश्नः रॉनचा जीव हॅरीने कोणत्या औषधाने वाचवीले? आणि ज्या पेयामुळे विषबाधा झाली त्याचे नाव काय?

रॉनचा जीव हॅरीने कोणत्या औषधाने वाचवीले? आणि ज्या पेयामुळे विषबाधा झाली त्याचे नाव काय? <<<< बेझॉर आणि मीड ( उच्चार बरोबर आहेत का ?)

बेझॉर आणि मीड ( उच्चार बरोबर आहेत का ?)<<<< बेझोर्/बिझोर आणि ओकच्या झाडापासुन बनलेले मीड्/मेड-----
-उत्तर बरोबर आहे.

नवीन प्रश्नः ड्रॅकोने जिच्यावर मोहिनी मंत्राचा उपयोग केला आणि डंबल्डोर विरूद्ध कारवाई करण्याचा प्रयत्न केला, त्या मुलीचे आणि तिच्या मैत्रिणीचे नाव काय?

रॉनने डंबल्डोर विरूद्ध कारवाई करण्याचा प्रयत्न केला ? अस काही अजिबातच आठवत नाहीये Sad
क्लू द्याल का ? की तिथे ड्रॅको पाहिजे ?

धन्स केदार, माझी चुक झाली ते दाखवुन दिलेत.
मला 'ड्रॅको' असेच म्हणायचे होते. माझे डोके त्यावेळी कुठे गहाण ठेवले होते काय माहीत. आता प्रश्न दुरुस्त केला आहे. Light 1

बरोबर.
केटी बेल आणि तिची मैत्रीण लिआनी/लिनी(leanne)----तीने नाही का ब्राऊन पाकीटाला हात लावल्याने केटीची हि अवस्था झाली हे रडत सांगीतले. अर्थात तिचा उल्लेख ह्याच पुस्तकात दिसुन येतो.

बॅथिल्डा बॅगशॉटचा उल्लेख कुठे कुठे आला आहे?>>>>>

१. पहिल्या पुस्तकात तिचा उल्लेख हॅरीच्या शाळेतील अभ्यासक्रमामधील पुस्तकाची लेखिका म्हणुन. तिच्या पुस्तकाचे नाव '|हिस्ट्री ऑफ मॅजीक'
२. नंतर तिसर्‍या पुस्तकात त्याच पुस्तकाचा 'हिस्ट्री ऑफ मॅजीक' उल्लेख हर्मायनीने केला होता. आणि हॅरि आणि रॉनला ती पुस्तकाचा नीट अभ्यास करण्यावरुन बोलली होती. त्यावेळी बॅथिल्डाचा उल्लेख पुस्तकाची लेखिका म्हणुन आला होता.
३.सातव्या पुस्तकात रिटा स्किटर ने डंबलदोर वरती पुस्तक लिहिले होते तेव्हा त्याची माहिती बॅथिल्डा बॅगशॉट कडुन मिळाली होती हे हॅरीला कळले होते. तसेच नंतर ती हॅरीच्या जन्मगावीच ती रहात होती हे त्याला कळले.

सातव्या पुस्तकात रिटा स्किटर ने डंबलदोर वरती पुस्तक लिहिले होते तेव्हा त्याची माहिती बॅथिल्डा बॅगशॉट कडुन मिळाली होती हे हॅरीला कळले होते. तसेच नंतर ती हॅरीच्या जन्मगावीच ती रहात होती हे त्याला कळले.>> सातव्या पुस्तकात बॅथिल्डाचा उल्लेख लिलीच्या सिरीयसला लिहीलेल्या पत्रातही आहे.

Pages