Submitted by मुग्धमानसी on 3 June, 2013 - 01:34
भुलथापांना माझ्या
मन फसेलंसं वाटतंय
आता मला जगणं
जरा जमेलंसं वाटतंय...
थेंबभर पाऊस, मुठभर वारा
चोचभर थोडा चिमणचारा
आभाळभर माझी तहान
आता भागेलंसं वाटतंय...
एक रस्ता अनवाणी
पाऊलभर हिरवळ गार
सोबत माझी मलाच
आता लाभेलंसं वाटतंय...
उन उन भातासारखं
उन्ह दाटल्या वरणासारखं
लिंबू पिळून आयुष्य
मला चघळेलंसं वाटतंय...
जाता जाता एक कर
पेटते दिवे हातात धर
तुझ्यामागे रेंगाळत रस्ता
वाट चुकेलंसं वाटतंय...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ग्रेट !! चारोळ्या एकापेक्षा
ग्रेट !!
चारोळ्या एकापेक्षा एक आहेत कोण्ती एक जास्त आवड्ली हे खरोखर सांगता येत नाही
तरी वरणभात ...आहाहा तों.पा.सु. अगदी !!!
झकास जमली आहे.
झकास जमली आहे.
धन्यवाद!
धन्यवाद!
चारोळ्या एकापेक्षा एक
चारोळ्या एकापेक्षा एक आहेत>>++११
शिपै, कोण आहे रे तिकडे? पाच
शिपै, कोण आहे रे तिकडे? पाच गावं इनाम द्या ह्या बाईंना...
अबे भेट तु एकदा. पहिल्याच चार ओळीत घेतलंस..
वा ! सही !
वा ! सही !
मस्तच फक्त "चघळेलंसं" ऐवजी
मस्तच
फक्त "चघळेलंसं" ऐवजी दुसर काही वापरता येईल का?.... रेंगाळेलसं किंवा दरवळेलसं वगैरे काहीतरी?
क्या बात है.
क्या बात है.
धन्यवाद! पल्ली>>> मायबोलीची
धन्यवाद! पल्ली>>> मायबोलीची प्रजा असल्यावर पाच गावांचा राजा असण्यात काय राहिली मजा?
व्वा! मस्तच ग
व्वा! मस्तच ग
एकदम सही! शेवटची तर अप्रतिम!
एकदम सही!
शेवटची तर अप्रतिम!:)
अतिसुंदर !
अतिसुंदर !
धन्यवाद! आज बर्याच दिवसांनी
धन्यवाद!
आज बर्याच दिवसांनी पुन्हा असंच काहिसं वाटतंय.
लैच झकास....
लैच झकास....
छान!
छान!
वाह, सुरेखच ....
वाह, सुरेखच ....
सुंदर आहे कविता .. शेवटचे
सुंदर आहे कविता .. शेवटचे कड़वे ग्रेट..आधीची चार कड़वी म्हणजे शेवटच्या कडव्यातून निघणाऱ्या निष्कर्षाची अंमलबजावणी असावी..
धन्यवाद!
धन्यवाद!
मस्तच ! आवडली कविता ..
मस्तच !
आवडली कविता ..
लेखन-वाचनाकडे दुर्लक्ष
लेखन-वाचनाकडे दुर्लक्ष झाल्याची जाणीव झाल्याने मायबोलीची कास धरली आहे.. हेतू साध्य होतोय असं वाटत आहे...
फार छान कविता..!
फारच आवडली कविता ..
फारच आवडली कविता ..
धन्यवाद!
धन्यवाद!