तुझ्यापासून दूर नेणारा राजमार्ग नको होता
तुझ्याविना सख्या मला चंद्रसुद्धा नको होता
सूर सारे, ताल सारे, शब्द सारे सांडले
ओतताना जीव माझा गीत वेडे माखले
ऐकता करवादले ते - हा उसासा नको होता...
तुझ्याविना सख्या मला चंद्रसुद्धा नको होता!
वाट अश्रुंची कुणी अडवायला आलेच नाही
अन् मलाही का कधी बोलावता आलेच नाही
कोरड्या भेटीस अपुल्या शाप ओला नको होता
तुझ्याविना सख्या मला चंद्रसुद्धा नको होता!
तू उन्हाशी खेळताना आग सारी झेलली
मी तुझ्या पायांत चांदणरात माझी ओतली
पण तू आगीचा खुळा तुज गारवा तो नको होता
तुझ्याविना सख्या मला चंद्रसुद्धा नको होता!
तुच अंथरलीस ही सुमने अशी रस्त्यात माझ्या
डकवल्या या चांदण्या अन् दीप उंबरठ्यात माझ्या
पण तुझ्या आठवात झुरता उंबरा मज नको होता
तुझ्याविना सख्या मला चंद्रसुद्धा नको होता!
छान!
छान!
छान आहे डकवल्या या चांदण्या
छान आहे
डकवल्या या चांदण्या अन् दीप उंबरठ्यात माझ्या>>> डकवल्या ऐवकी पेरिल्या किंवा अजुन काही छानसा शब्द वापरलास तर अधिक उठाव येईल हे मा.वै.मत
शेवटचे कडवे फार आवडले चेपुवर
शेवटचे कडवे फार आवडले चेपुवर शेअर केली तर चालेल का
छान गीत आहे
छान गीत आहे हे
आवड्ले
_______________________--
अरे रिया तू पण इथेच आलीस बेफीजींनी त्यांच्या धाग्यावरून आपल्याला हुसकावल्यावर
काय योगातोग आहे नै !!!
व्वा !! व्वा !! किती मस्त
व्वा !! व्वा !! किती मस्त शब्दरचना. मजा आली वाचायला आणि गुणगुणायला.
छान!
छान!
आवडली
आवडली
सुरेख
सुरेख
सुंदर ......
सुंदर ......
धन्यवाद. जाई>> चेपु म्हणजे
धन्यवाद.
जाई>> चेपु म्हणजे काय?
मस्तच!
मस्तच!
आवडली
आवडली
फेसबुक
फेसबुक
खुप छान !!!!!
खुप छान !!!!!
फेसबुक... चेहरा पुस्तक!!!...
फेसबुक... चेहरा पुस्तक!!!... चेपु.... भन्नाट! ज्ञानात भर टाकल्याबद्दल धन्यवाद!
चेपुवर शेअर केली तर चालेल.
आवडली
आवडली
धन्यवाद!
धन्यवाद!
पहिलं आणि शेवटचं कडवं सर्वात
पहिलं आणि शेवटचं कडवं सर्वात आवडलं.
तू उन्हाशी खेळताना आग सारी
तू उन्हाशी खेळताना आग सारी झेलली
मी तुझ्या पायांत चांदणरात माझी ओतली
पण तू आगीचा खुळा तुज गारवा तो नको होता
तुझ्याविना सख्या मला चंद्रसुद्धा नको होता!
हे खूप आवडलं..
धन्यवाद उल्हास, भारती...
धन्यवाद उल्हास, भारती...
वा वा सुरेखच! याला छान चाल
वा वा सुरेखच! याला छान चाल लावता येईल. खूप सुरेख, सुरेल गाणे होईल याचे . वा !
>>>डकवल्या या चांदण्या... >>> सजवल्या या चांदण्या... असे केले तर?
आवडली
आवडली
कोरड्या भेटीस अपुल्या शाप ओला
कोरड्या भेटीस अपुल्या शाप
ओला नको होता>>> या आणि इतर खूप ओळी आवडल्या!!
धन्यवाद! अवल>> तसंही चालेल.
धन्यवाद!
अवल>> तसंही चालेल.
खूप सुंदर
खूप सुंदर
सुरेख रचना... एकूण कवितेतील
सुरेख रचना...
एकूण कवितेतील गेयता आणि तिसरे कडवे...तार झंकारल्यागत जाणवते!
>>>उंबरा झुरताच ठेवायचा होता...तर येण्याच्या स्वप्नाचे चांदणे 'डकवले' म्हणणेच योग्य वाटले!
अभिनंदन...शुभेच्छा!