मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.

तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी काल सॅमसंग गॅलेक्सी एस डुओस घेतला. आता वापरायला शिकतेय Proud

१२०००ला पडला, आठ जीबी कार्ड फ्री आणि एक चांदीची लक्ष्मी असलेले कॉइन फ्री. Happy

आशुचँप मी नोट टू वर कॅस्परस्काय टाकलंय. स्पीडचा काहीच प्रॉब्लेम नाही आला. व्यवस्थित पळतंय सगळं.

मी आता क्विकहील टाकलेय...ट्रायल वर्जन आहे...पण छान आहे..आणि स्पीड कमी झाला नाहीये...
त्यांचेच ३५०रु ना मोबाईल अँटीव्हायरस म्हणून सॉफ्टवेअर मिळते. ते घ्यावा असा विचार आहे.

आशू... क्विकहील ठेव... तो ट्रोजोन लवकर पकडतो.. मोबाईल ला त्याचाच जास्त प्रोब्लेम..तो पासवर्ड चोरी करणारा आहे...

प्ले स्टोअरवरून एस बी आय चे डेबित कम एटीएम कार्ड वापरून अ‍ॅप्स घेता येत नाहीत. पूर्वी यायचे. काय उपाय?

इन्तर्नल मेमरी (फोन मेमरी)जास्त पाहिजे असेल तर प्रोसेसर फास्ट पाहिजे. त्या अनुषंगाने किमती वाढत जातात. गॅलक्सी ३ ला १६ जीबी फोन मेमरी आहे पण किम्मत? तेवढ्यात एक कॉम्प्युटर , लपटॉप येतो....

मीत
तुमच्या y duos ल वर्ष झाले नहीं म्हटलात. ग्यालारित नून एंटीवायरस चेक करून घ्या, कदाचित फायदा होइल.

Samsung Star 3 Duos S5222 -- कसा आहे , कोणी वापरला आहे का? ३००० - ४५०० च्या range मध्ये samsung चा फोन घ्यायचा आहे चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ?

सचीन,
थोऽडं ताणा बजेट. साडेपाच पर्यंत सॅमसंगचाच एक स्मार्टफोन आहे.
स्टार ड्यूओस स्मार्टफोन नाही.

कुठुन घेतला...<<< इकडे पूर्विका मोबाईल म्हणून एक मोबाईल शॉप्सची चेन आहे त्यांच्याकडून. नाणं काही फार ग्रेट नाही. उगा आपलं फ्री मिळालं म्हणून दिवाळीच्या लक्ष्मीपूजनात ठेवायचं. Proud

मी अजून तरी अँटी व्हायरस टाकला नाहीये. माझे नेट अजून चालू व्हायचंय मोबाईलवरचं. ते अ‍ॅक्टीव्हेट झालं की मग बघेन.

मी आजच माझा एक्स्पीरीया एस जेलीबीन वर अपग्रेड केलाय, जेलीबीन चे फायदे काय काय आहेत ते सांगू शकाल का? मी स्वतः पण एक्स्प्लोअर करतोच आहे.

फक्त मोबाईलवरून मायबोलीचे लेख( मोठे) अधिक फोटो टाकता येईल असा अॅंडरॉईड कोणता ? सध्या नोकिआ X2 00 वरून दहा ओळिँचे लेख/ प्रतिक्रिया टायपतो पण फोटो येत नाहित फक्त लिंक देतो .सोनी एक्सपिरिआ ई अथवा एल मध्ये होईल का ?

XOLO A500 कोणी वापरला आहे का?
६,५००/- च्या रेंज मधे Micromax Canvas 2 A110 आणि Micromax Ninja A89 हे दोन Android येत आहे... कोणता घ्यावा?

६,५००/- च्या रेंज मधे Micromax Canvas 2 A110 ?????????

कुठे मिळतोय इंद्रा? खात्रीचा दुकानदार आहे का? माझ्या माहितीप्रमाणे अजूनतरी तो १०,००० च्या रेंजमध्येच आहे.

पण फोन चांगलाच आहे तो.

माधव, भ्रमा, डॉ.... चुकून Micromax Ninja A89 ऐवजी Micromax Canvas 2 A110 टाकला.

हिम्या.. XOLOची Internal Memory सगळ्यात जास्त 4 GB आहे... बाकी 512 MB RAM वरिल तीनही Android मधे आहे. RAM जरी 512 MB असली तरी Performance मात्र 350 MB पर्यंतच असतो सगळ्यांचा तो भाग वेगळा.

XOLO Processor 1 GHz Qualcomm Snapdragon, Dual Core सोबत A-GPS च Navigation Tech. देत आहे. नेट वर रिव्ह्युज वाचले.. बॅटरी लवकर संपते असे सगळेच म्हणत आहेत. पण माझा वापरही जेम तेम दिवसाला २ तास इतकाच असेल. तर काय करावे?

इंद्रा, ओफिसातल्या ३-४ जणांकडे आहेत xolo चे फोन्स. काही तक्रार ऐकलेली नाहीये. फक्त दोघा जणांना त्या फोन करता नवीन सिम घ्यावे लागले होते (आहे तोच कॅरीअर, आहे तोच नंबर फक्त सिम नविन). जुन्या सिमने फोन हँग व्हायचा. पण ४ जिबी असेल तर तोच घे.

बहुतेक अँड्रॉईड फोन्सना एक दोन दिवसा-आड चार्ज करावेच लागते (कमी वापर असला तरी). त्यामुळे ते चालून जाईल.

बहुतेक अँड्रॉईड फोन्सना एक दोन दिवसा-आड चार्ज करावेच लागते >> चलेगा. सीम बदलायच झाल तर ते करु शकेन.
XOLOचे सर्विस सेंटर मुंबईत नाहीत. ऑनलाईन कंप्लेन्ट नोंदवली की कंपनीचे कुरिअरवाले फोन pikup आणि delivery करायला येतात अस डिलरने सांगितलयं.

सस्मित... कोणत्या डिलर कडून घेतला?

Micromax Canvas 4 घ्यायचा विचार चाललायं. १-२ मित्रांनी चांगला आहे अस सांगितलय पण अजुन फिक्स केलेलं नाही. Micromax बद्दल खुप तक्रारी ऐकल्या आहेत म्हणुन जरा चलबिचल आहे.

आबासाहेब,
मायक्रोमॅक्स सुंदर आहे.
मी कॅनव्हास २ वापरतो आहे. काडीचाही प्रॉब्लेम नाही. सर्विस देखिल उत्तम. आइस्क्रीम सँडविच वरून जेलीबीन अपग्रेड कंपनीने करून दिले. (मित्रांच्या फोन ला. माझा रूटेड आहे, त्यामुळे अपग्रेडचे कवतिक नाही.)

कार्बन देखिल चांगला ऑप्शन आहे. सुमारे ६ हजाराचा एक सुंदर पीस पाहिला परवा. एका स्टाफ मेंबरने घेतला आहे.

या भारतीय लो बजेट फोन्सचा एकमेव प्रॉब्लेम म्हणजे लो इन्टर्नल स्टोरेज. अ‍ॅप्स ठेवण्यासाठी १ ते सव्वा जीबी पेक्षा जास्त जागा हवी असेल तर रूट करावा लागतो. बाकी व्हॅल्यू फॉर मनीसाठी यांना तोड नाही.

इब्लिस यांच्याशी सहमत, ग्रँड घेऊन उगिच इतके पैसे वाया घालवले असं वाटतंय.
मायक्रोमॅक्स खरंच चांगला फोन आहे.

ग्रँड घेऊन उगिच इतके पैसे वाया घालवले असं वाटतंय.>> "ग्रास इज ग्रीनर ऑन आदर साइड" हे नॅचरल फीलिन्ग आहे. Happy

झकासराव,
एकदाच २० हजाराचा एकच फोन घेऊन माझा फोन अमुक ब्र्यांडचा असे ४ वर्षं म्हणण्यापेक्षा १०-१० हजार वाले २ फोन २ वर्षांत बदलले तर जास्त भारी, अशी माझीतरी आयडिया आहे. Wink अशी पण टेक्नॉलॉजी लै फास्ट बदलते बघा. जानेवारीत कॅनव्हास २ घेतला. लगेच एच्डी आला, आता कॅनव्हास ४ आलाय Sad फक्त सहा महिने झालेत..

मी देखील कॅनव्हास ४ चा विचार करतोय.
बहुतेक किमंत जास्त असेल पण.
>>>>>>>>>>>>> १५-१६ हजारापर्यंत असेल असा अंदाज आहे. बुकिंग कराव लागतय त्यासाठी अगोदर.

ए.भा.प्र. एवढे अ‍ॅडव्हान्स्ड फोन्स खरंच लागतात का सगळ्यांना, नविन प्रकारचा आला की बदलावा लागण्याजोगे?

हौमोन

नविन प्रकारचा आला की बदलावा लागण्याजोगे????>>> इट्स पार्ट ऑफ पॅशन.
म्हणजे एखाद्याला (जसे की इब्लिसराव) अद्ययावत टॅक्नोलॉजी आली की लगेच ती हवी असते असे लोकं.
ह्याना टेकसॅव्ही का म्हणेनास. Happy

झकोबा, तू म्हणतोयस ते बरोबरे पण थोडं वेगळं आहे. अश्या प्रकारच्या लोकाना एक्सप्लोरर म्हणतात नवीन गोष्ट ट्राय करायची सवय असते, पण गंमत म्हणजे नवीन मोबाईल ट्राय करुन बघायची आवड असलेला नवीन बाईक ट्राय करुन बघेलच असं नाही. हे लोक ओपिनियन लीडर असतात. म्हणजे त्यांना ओळखणारे त्यांच मत फॉलो करतात या वस्तूंबाबत.

केश्वीचा प्रश्न आहे गरज असते का याबद्दल, त्याविषयी असं म्हणता येईल, की आपण सगळेच आपापल्या गरजा सतत वाढवत नेत असतो. त्यामुळे नवीन मॉडेल बघितल की हवहवस वाटतं, त्यात जाहिरातींचा मारा, शिवाय फोन हे एक स्टाईल स्टेटमेन्टही आहेच, ईझी ईन्स्टॉलमेन्टस्, क्रेडीट कार्ड अश्या अनेक वाटा; त्यामुळे होतं काय कि नवीन फोन हातात बसल्यावर त्यातले ड्रॉबॅक्स किंवा लिमिटेशन्स कळू लागतात. तोपर्यंत नवीन मॉडेल आलेलं असतच.....

बादवे तुझा फोन जुना झाला आता, अ‍ॅन्ड्रॉईड बेस्ट आहे केश्वे. Wink

Nokia Lumia 620 घेतला, battery १ दिवस दम धरते. फोनवरुन लिहायला फार गडबड होते.

बादवे तुझा फोन जुना झाला आता, अ‍ॅन्ड्रॉईड बेस्ट आहे केश्वे. >> अम्या, जुलैतच १ वर्ष होतंय की रे! ह्या फोनचे बारा वाजले की घेईन अ‍ॅन्ड्रॉईड नक्की Happy

Pages