मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.

तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

याचे आणि गॅलेक्सी नोट २ चे काही फिचर्स मिळते जुळते आहेत. कॅमेरे सुद्धा दोन्हीत ८ मेपि चे आहेत.>>> Lol
दक्षे दोन्हीत काढलेले फोटो कम्पेअर करुन पाहिले तर फरक कळेल बहुद्धा.
मायक्रोमॅक्स फिचर्स दे दणादण देतय. प्रत्येक फिचर्सची क्वालिटी वापरतानाच कळेल.

असो.
एचटीसी मध्येदेखील १५ के पर्यंतचे ऑप्शन्स बघ.

प्री फिकर नॉट, तसेही म्हणेल कुणीतरी लवकरच Wink आणि एचडी मला पण आवडला..पण बजेट वाढवू शकत नाही, तेव्हा कॅनव्हास टू ला प्रेफरन्स!
इब्लिस तुम्ही मामॅ कॅनव्हास टू वापरताय ना? कसा आहे फोन? मी अजून पाहिला नाही. रविवारी जाऊन बघणार आणि घेणार आवडला तर. पण तुम्ही वापरताय तर त्याचे + - पॉईंट्स असतीलच, ते सांगाल काय जरा?

हो उदयन. यूकेत पण झालाय. बहुधा भारतात २२-२५ के पर्यन्त असेल. किंवा मामॅ कॅनव्हास आहेच...

मलातरी या मामॅ, लावा वगैरे कंपन्यांच्या आफ्टर सेल्स सर्वीस + सपोर्ट + पार्टस अवेलेबिलिटी बद्द्ल जरा शंकाच आहे...! कोणाला काही अनुभव आहेत का?

म्हणजे १५/१८ के देवून डोकेदुखी तर नाही ना होणार जर काही इश्य्यूज आलेत तर?

कोणी सोनी एक्सिपीरिया जे वापरतय का
काय अनुभव आहे

समसंग ग्रँड पेक्षा स्वस्त वाटल्याने घ्यायचा विचार आहे

मलातरी या मामॅ, लावा वगैरे कंपन्यांच्या आफ्टर सेल्स सर्वीस + सपोर्ट + पार्टस अवेलेबिलिटी बद्द्ल जरा शंकाच आहे...!>>> +१. म्हणूनच आधी ज्यांनी वापरला आहे, त्यांनी प्लीज अनुभव शेअर करा. शिवाय मायक्रोमॅक्स वगैरेचे सर्विस सेंटर कुठे ईझिली आढळत नाहीत.

जाई नक्कीच जास्त चांगला आहे... माझ्या एका कलीग कडे आहे. छान दिसतो तो फोन. आणि स्क्रीन ची क्वालीटी पण मला चांगली वाटली...

धन्यवाद योगेश
माझ्या कलिगने सँमसंग आणि सोनी सुचवले
पण सँमसंग थोडा महाग वाटतोय
त्यामुळे सोनीचा विचार केलाय

कार्बन मायक्रोमँक्स याची गँरटी वाटत नाही

मलातरी या मामॅ, लावा वगैरे कंपन्यांच्या आफ्टर सेल्स सर्वीस + सपोर्ट + पार्टस अवेलेबिलिटी बद्द्ल जरा शंकाच आहे >> मला तर अगदी आयफोन सकट सगळ्या फोन्सच्या सपोर्ट + पार्टस अवेलेबिलिटी बद्द्ल शंका आहे. मित्राचा आयफोन खराब झाला होता तर रिपेअरला त्याला अमेरिकेतच पाठवावा लागला होता. अर्थात ही २ वर्षांपूर्विची गोष्ट आहे.

सॅमसंग वगैरे फोन दुरुस्त होतात पण त्या दुरुस्तीचा खर्च बराच जास्त असतो. ऑथोराइज्ड सर्विस सेंटर असेल तर तो आणखीनच वाढतो. खरे तर त्याचे स्पेअर पार्ट्स काही खूप महाग नसतात पण आपल्याला काहीच कळत नाही मग समोरच्याला तो मागेल ते दाम द्यावेच लागतात. आणि दुरुस्तीनंतर तो फोन सुरळीत चालेल अशी शाश्वती नसते.

त्यामुळे नीरजासारख्या स्पेसिफिक फिचर्सची गरज नसेल तर कमी / मध्यम बजेट मधला फोन घेऊन तो २ वर्ष वापरावा मग तो बदलून दुसरा फोन घ्यावा असे माझे मत आहे. परत धावपळीत तो आपल्या हातून कधीतरी पडतोच, मुलांच्या पादडण्यात त्या फोनचे हाल होतात. अशा वेळेस कमी बजेटचा फोन असेल तर मनाला यातना होत नाहीत आणि झाल्याच तर कमी होतात. Wink

अर्थात मायक्रोमॅक्सचा मला पण पुर्वानुभव नाहीये पण 'वापरून बघुयात' म्हणून घेतलाय. आणि मी खूष आहे.

मध्यम बजेट मधला फोन घेऊन तो २ वर्ष वापरावा मग तो बदलून दुसरा फोन घ्यावा असे माझे मत आहे>>>>>> माझेही Happy

अशा वेळेस कमी बजेटचा फोन असेल तर मनाला यातना होत नाहीत आणि झाल्याच तर कमी होतात. डोळा मारा>>>>>>>> अगदी अगदी...माझा नोकिया सी-५-०३ असाच हरवला घरातून..केवढ्या त्या यातना बितना झाल्या होत्या मला Sad
तेव्हापासून सोनी एक्सपिरीया मिनी वापरतेय आजतागायत. आता कॅनव्हास टू घेते, २-४ वर्षांनी आणखी मॉडेल्स येतील. पुन्हा चेंज करू.

मायक्रोमॅक्स, सोनी, सॅमसंग, नोकिया ह्यांचे सर्व्हीस सेन्टर्स पिंचि / पुणे परिसरात आहेत.
कार्बन, लाव्हा माहिती नाही.
एचटिसीचे पिंची मध्ये मला सापडले नाही. पुण्यात आहे.
अ‍ॅपलवाले मित्र तर म्हणतात आम्हाला फोनच रिप्लेस मिळतो वॉरन्टीत असेल तर.
नसेल तर दुरुस्त करुन देत नाहीत म्हणे... (एका मित्राचा टॅब असाच पडुन आहे)

बाय द वे, कुठल्याही सर्व्हीस सेन्टर मध्ये तुफानी गर्दी असते असा अनुभव आहे.
सॅमसन्ग , माय्क्रोमॅक्स आणि सोनी तिन्हीचे अनुभव असेच आहेत.

अ‍ॅपलवाले मित्र तर म्हणतात आम्हाला फोनच रिप्लेस मिळतो वॉरन्टीत असेल तर > बरोब्बर
नसेल तर दुरुस्त करुन देत नाहीत म्हणे... > भारतात विकत घेतलेल्या (त्यातही अ‍ॅपल ऑथोराईस्ड रीसेलर वा अ‍ॅपल प्रीमिअम रीसेलर कडून विकत घेतलेल्या) आयडिवाईसलाच दुरुस्त करून मिळतं.

माहिती असेल तर मला प्लीज लवकर मदत करा.
भारतात घेतलेल्या ब्लॅकबेरी 9790 मधे...
-अमेरिकेत आणल्यावर (AT & T चं) SIM कार्ड घालता येतं का?
- भारतातल्या SIM कार्डावर, अमेरिकेत येऊन वॉइस आणि डेटा अ‍ॅक्सेस करता येऊ शकतो का?

भारतात घेतलेल्या ब्लॅकबेरी 9790 मधे...
-अमेरिकेत आणल्यावर (AT & T चं) SIM कार्ड घालता येतं का?>> हो.
दुसरा पर्याय बर्यापैकी महागात जाईल...

HTC One+ ईथे अमेरिकेत घेऊन अनलॉक करुन भारतात वापरणार असु तर वॉरंटी मधे बसते का?
ईथून भारतात पाठवलेला फोन वापरण्यासाठी बाकी फोन अनलॉक खेरीज अजून काय गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील?
का तिथे विकत घेऊन वापरणेच जास्त बरं पडेल?
भारतात साधारण ४३के किंमत आहे, ईथे त्या मनाने स्वस्त पडेल.

(त्यातही अ‍ॅपल ऑथोराईस्ड रीसेलर वा अ‍ॅपल प्रीमिअम रीसेलर कडून विकत घेतलेल्या) >>> ऑनलाइन विकत घेतला असल्यास???

मला एक अँड्रॉईड बेस्ड फोन घ्यायचा आहे....बजेट १० ते १२
माझा वापर मुख्यत्वे करून जीमेल, वॉट्सअप आणि फेबु आहे...
गेम्स फारसे खेळत नाही..कॅमेराचीही फारशी आवश्यकता नाही..
ड्युएल सीमपणचे तसेच..
फक्त प्रोसेसर एकदम फास्ट हवा, बॅटरी लाईफ चांगली हवी (इथे वरती वैद्य बुवांनी दिलेल्या टिप्स वाचल्या...बेस्ट आहेत...तरी त्यातल्या त्यात चांगला बॅटरी लाईफ असलेला) आणि आटोपशीर...कॅनव्हास, ग्रँडसारखे अगडबंब फोन नकोत...
माझ्या मनात
सॅमसंगचा गॅलॅक्सी एस, मायक्रोमॅक्सचा निंजा ए८९ आणि एचटीसीचा वाईल्डफायर असे आहेत...
या व्यतिरिक्त अजून एखादे चांगले मॉडेल आहे का...
बजेट १२,००० हे अगदी ओढून ताणून...या पलिकडे जाणे अवघड आहे....

(त्यातही अ‍ॅपल ऑथोराईस्ड रीसेलर वा अ‍ॅपल प्रीमिअम रीसेलर कडून विकत घेतलेल्या) >>> ऑनलाइन विकत घेतला असल्यास??? >>>
भारतातील अ‍ॅपल स्टोअरवाल्यांना फोन करून आयएमईआय नंबर चेक करवावा.

मला पण सांगा रे.. माझेही आशुचँप सारखेच बजेट आहे... नेट वर टॉप टेन मध्ये सोनी, xolo, एच टी सी असे काही पर्याय आहेत..

घरात एक मायक्रोमॅक्स आहे पण त्याच्या स्क्रीन मध्ये काहीतरी गडबड झाल्याने तो रिपेरिंगला टाकलाय.. एक महिना लागेल असे सांगितले आहे.. तेव्हा तरी मिळेल काही नाही ते माहिती नाही... त्यामुळे दुसरा त्याच कंपनीचा घ्यावा का???

मी सॅमसंगचा गॅलॅक्सी एस डुओस हा फोन बुक केला...
स्नॅपडीलवर ११,७५० ला पडला आणि वर ८जीबी कार्ड मोफत
http://www.snapdeal.com/product/samsung-galaxy-s-duos-s7562/430796?

मला हवे असलेले सगळे यात मिळाले...चांगला बॅटरी बॅकअप, अँड्राईड ४.० आईस्क्रीम सँडविच, १ गेगाहर्टझ प्रोसेसर, आटोपशीर,
अर्थात ड्युएल सीम नसता तरी चालला असता पण विनाड्युएलसीम काही दिसला नाही आणि अन्य सिंगल सीम पर्यांयापेक्षा हाच उत्तम वाटला...काही हरकत नाही..पुढे मागे गरज पडल्यास वापरता येईल. आमच्या ऑफीसमध्ये पण दोघांकडे आहे..तो हाताळून पाहीला...छान आहे...आता कधी एकदा घरी येतोय याचे वेध लागले आहेत.

अँड्रॉईड फोनला अँटी व्हायरसची गरज असते का...मी एका मित्राचे ऐकून एव्हीजीचा अँटीव्हायरस टाकला पण त्यानंतर फोन इतका स्लो झाला आहे की बस...
दुसरा एक जण म्हणाला अँड्रॉईड ओएसला अँटीव्हायरस लागत नाही...
नक्की काय
आणि कुठला अँटीव्हायरस टाकला तर फोन स्लो होणार नाही.

चँपा,
कोणता अँटीव्हायरस टाकलात?
अव्हास्ट हा चांगला आहे असे लोक म्हणतात. मी एव्हीजी वापरतो. एव्हीजी फ्री.
रच्याकने : माझे सर्व फोन रूटेड आहेत, पण एव्हीजी साठी रूटची गरज नाही. अन त्याणे फोन स्लो देखिल होत नाही.

मी १ मे ला सॅमसंग गॅलेक्सी ग्रँड घेतला... छान आहे मोबाईल. अजून शिकतेच आहे कसा वापरायचा ते. खूप फिचर्स आहेत. पण रोज नित्यनियमाने चार्जिंग करावे लागते.

मी केव्हाची वाट बघतच होते, त्यामुळे लाँच झाल्याझाल्या सॅमसंग गॅलॅक्सी S-4 घेतला. अप्रतिम आहे. विशेषतः ब्लॅकबेरीनंतर हा वापरायला मस्तच वाटतंय. फीचर्स सगळे भारी आहेत.

ब्लॅकबेरीतून एका सेकंदात इथे सगळे कॉन्टॅक्ट्स ट्रान्स्फर करायला मजा आली. Proud

मी १ मे ला सॅमसंग गॅलेक्सी ग्रँड घेतला... छान आहे मोबाईल. >>>

माझ्या एक कलिगने आता हा ४-५ महिने वापरला फोन. आता तो सोडून मायक्रोमॅक्स एच डी ११६ घेतलाय. म्हणतो मला ग्रॅण्ड पेक्षा आवडला... Uhoh

Pages