नावात काय आहे ? ( पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे )

Submitted by मेधा on 28 April, 2011 - 13:19

जवस= अळशी का याबद्दल वर्षानुवर्षे प्रश्न येत आहेत. त्याच अनुशंगाने ढेमशे म्हणजे काय ? वाळकी भोकरं हा प्रकार शाकाहारी की मांसाहारी ? तिसर्‍या म्हणजे क्लॅम्स की स्कॅलप्स ? भारतात चक्क्याला कॉटेज चीझ म्हणतात तर अमेरिकेत मिळणारे कॉटेज चीझ वापरून श्रीखंड करता येईल का ?
चिलगोझा म्हणजे काय ? इत्यादी प्रश्न सतत येत असतात. पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे. कधी कधी एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक
या संबंधी माहिती देण्याघेण्यासाठी हा धागा .

जवस = अळशी = फ्लॅक्स सीड्स याबद्दल धागा http://www.maayboli.com/node/9103

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किन्वा एक तृणधान्य आहे. (चु भु दे घे)
माबो वरच प्रथम वाचलय ह्या विषयी.
ह्याची खिचडी साबुदाणा खिचडी सारखीच दिसते.
चव माहिती नाही.
पण माबोवर एका सुगरणीने ह्याची रेसिपी टाकली होती.
खालील लिन्क वर आहे.

http://www.maayboli.com/taxonomy/term/4845

सीमेबदनीकाई >> याला मी मुंबईत वेलवांगे म्हटलेलं पाहिलं आहे .
सांबारात, किंवा मुगा मोळो सारखे वाटण घालून पातळ भाजी छान लागते.
हिंग हळद तिखट मीठ लावून रव्यात घोळवून काप पण करतात.

quinoa हे दक्षिण अमेरिकेतल्या अ‍ॅण्डेज भागातल्या लोकांचे धान्य आहे . गहू, तांदूळ, नाचणी , असे ग्रेन्स हे एकदलीय असतात ( तृणधान्ये) किन्वा द्विदलीय असल्याने त्याला इथे स्यूडो ग्रेन म्हणतात. बहुतेक राजगिर्‍याच्या जातकुळीतला असावा .

इतर तृणधान्यांच्या मानाने फायबर व प्रोटीन कंटेंट जास्त असल्याने हेल्थी ग्रेन म्हणून जाहिरात होते.

खिचडी, उपमा असे देशी प्रकार करता येतात. शिजवलेले दाणे couscous सारखे इटालियन / ग्रीक पदार्थात वापरता येतात. सॅलडस मधे पण वापरता येता.

नंदिनी,
सीमेबदनेकाय इथे Chayote नावाने मिळतात.
ढेमसे इथे देशी दुकानात टिंडा म्हणून विकतात.

Chayote अन टिंडा / ढेमसे असं गूगल केल्यास फोटो सापडतील सहज.

खवा आणि मावा हे वेगेळे पदार्थ आहेत का? की मावा हे खव्याचे गुजराती / हिंदी नाव आहे?

जवळच्या मिठाईच्या दुकानात "हा खवा कसा दिला?" असे (शुद्ध मराठीत) विचारल्यावर कांऊटरवरील गुजराती नोकराने "ये खवा नही मावा है"
असे उत्तर दिले.

गुगलले असत दोन्ही नावे ईंटरचेंजिबली एकाच रेसिपित वापरलेली दिसत आहेत.

स्पॉक , लाख मोलाचा प्रश्न विचरलात Happy
मलाही हा प्रश्न नेहमी पडतो
खवा आणि मावा हे वेगेळे पदार्थ आहेत का? आणि त्यात नक्की फरक्क काय ?

Kodo Millet
<<
कोदो, कुटकी ही क्षूद्र धान्ये कमी पावसाच्या डोंगरउतारावरील जमीनीवर होतात. आदीवासींची पिके आहेत असं कुठेतरी वाचल्याचं आठवतं.

Barnyard millet आहे. Bamyard नाही. हे देखिल दिसायला भगरीसारखेच दिसते आहे. (वरीचे तांदूळ)

धन्यवाद.

Barnyard millet आहे. Bamyard नाही>>> माझ्याकडच्या लीफलेटमध्ये मे वाचताना चुकून rn ऐवजी m वाचले.

कोदो, कुटकी ही क्षूद्र धान्ये कमी पावसाच्या डोंगरउतारावरील जमीनीवर होतात<<< त्यांना क्षुद्र का म्हटले आहे?

आमच्याकडे तांदूळ आनि डाळीचा जेवणात होणारा अतिरीक्त वापर टाळण्यासाठी मिलेट्स वापरा असा धोषा लावला जात आहे. दुकानांमधून ही मिलेट्स मुद्दाम उपलब्ध करून दिली जात आहेत. पैकी आमच्य आअहारात बाज्रा, ज्वारी, रागी आणि वरई असतेच. इतर धान्यं मात्र फारशी वापरली नाहीत. ही आहातात वापरू नयेत असे काही आहे का?

इथल्या इंग्रो मधे बरेचदा सामो म्हणून वरईच्या दाण्यासारखे दिसणारे धान्य असते. त्यावर कधी कधी बार्न यार्ड मिलेट असेही लिहिलेले असते.

>> त्यांना क्षुद्र का म्हटले आहे?>> मोठ्या प्रमाणात लागवड केली जात नाही म्हणून.

>>आमच्याकडे तांदूळ आनि डाळीचा जेवणात होणारा अतिरीक्त वापर टाळण्यासाठी मिलेट्स वापरा असा धोषा लावला जात आहे. दुकानांमधून ही मिलेट्स मुद्दाम उपलब्ध करून दिली जात आहेत.>>

कमी पाण्यावर होणारी आणि जास्त तापमान सहन करु शकणारी मिलेट्स ही आरोग्यास चांगली असूनही त्याचा वापर हळू हळू अन्नापेक्षा गुरांचे खाणे आणि मद्य निर्मितीसाठी जास्त होवू लागला. आता सगळीकडे पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने पुन्हा एकदा मिलेट्सच्या उत्पादनाला महत्व येत आहे.

>> त्यांना क्षुद्र का म्हटले आहे?>> मोठ्या प्रमाणात लागवड केली जात नाही म्हणून.

<<

तेच. मायनरचे शब्दशः भाषांतर असावे. भूगोलाच्या पुस्तकातलं ते वाक्य कदाचित त्या शब्दामुळेच लक्षात आहे समहाऊ.

*

मिलेट्स सहसा ऑर्गॅनिकली व 'गावराणी' जातींत उगवली जातात. कारणे दोन. अशीही 'हार्डी ब्रीड्स' असल्याने त्यांना कीड लागणे वगैरे नसते. प्लस फार लोक पेरत नसल्याने बियाणेवाले त्यात घुसलेले नाहीत. गेल्या सालच्या पिकातून किलोभर बाजूला काढले की पुरे. पण एकदा का लोकांत त्यांचं कौतुक सुरू झालं, उदा. नाचणी उर्फ नागली सारखं, तर त्याच्याही किमती वाढतील.

यासंदर्भातली गम्मत म्हणजे एक पाम ऑईल 'पामोलिन' मिळत होतं १२-१५ वर्षांपूर्वी. बहुतेक मलेशियातून इंपोर्टेड केलेले असे, अन खूप स्वस्त. गोडेतेलाऐवजी रेशनवर मिळे. हे कुणी खायला सहसा वापरीत नसे. वास विचित्र. घरी आणले तरी दिवाळीपुरते पणत्या पेटवायला वापरले जाई असे आठवते.

दरम्यानच्या काळात हे ऑईल व्हिटॅमिन ई चा सर्वोत्तम सोर्स असल्याचं संशोधन झालं. ई व्हिटॅमीनचं हार्टसंदर्भातलं संशोधन झालं. अल्टिमेटली पामोलिन बाजारातून डायरेक्ट गायब. ऑऑ सारखं ओव्हरहाईप होऊन २५-५० मिलीच्या बाटल्यांत मिळत असणार.

अल्टिमेटली पामोलिन बाजारातून डायरेक्ट गायब. ऑऑ सारखं ओव्हरहाईप होऊन २५-५० मिलीच्या बाटल्यांत मिळत असणार.>> पामोलिन आमच्याकडे तरी मिळतंय. इतरपण पाम ऑईलचे बरेच ब्रॅण्ड दिसतात. इकडे खाण्यासाठी कोकोनट आणि तिळाचं ऑइल जास्त वापरतात. शेंगदाणातेल जिकीरीनं मिळतं.

त्यांना क्षुद्र का म्हटले आहे?>> मोठ्या प्रमाणात लागवड केली जात नाही म्हणून.>>> ओके मला वाटलं की आरोग्याला चांगले नसतात म्हणून की काय. कारण, गूगलवर बरीच चांगली माहिती आहे.

मी आज बार्नयार्ड मिलेट वापरून डोसे केले आहेत. चवीला चांगले झाले आहेत. पाकिटाव्र बरीच पोषकतत्वं लिहिली आहे त्यापैकी किती मिळतील देव जाणे.

मिळत असेल तर नक्कीच रोजच्या खाण्याच्या तेलांत किमान एक चहाचा चमचा मिक्स करा. तितके पुरेल बहुतेक. खरोखरच तब्येतीस लै चांगलं असं आजचं तरी संशोधन आहे.

देगी / डेगी मिरची पावडर असे उल्लेख काही रेसिपी रील्स मधे दिसलेत. ही मिरचीची जात आहे का - ब्याडगी किंवा रेशमपट्टी या सारखी ? की सुक्या मिरच्या भाजून केलेली पूड असे काही आहे ?

ब्लेंड आहे म्हणताहेत. https://www.spicebox.co.uk/blog/what-is-deggi-mirch.html
देसी पेपरिका Wink
कसुरी मेथी हो या देगी मिरच. असली मसाले सच सच. एमडीएच एमडीएच. अशी जाहितात असायची.

डेगी/देगी, काश्मिरी आणि ब्याडगी या माझ्यामते तरी कमी ते नो तिखट अश्या मिरच्यांच्या जाती आहेत. तिघींचा खमंगपणा (स्मोकी नाही) निरनिराळा आहे. रंगातही जरा फरक आहेच.

Pages