पित्त - Acidity

Submitted by admin on 28 May, 2008 - 23:15


पित्तावरचे आयुर्वेदिक उपायः

१. रोज सकाळी उठल्यावर मोरावळा खाणे. मोरावळा नसल्यास, आवळ्याच्या रसात (सरबतात), जिर्‍याची पूड व खडीसाखर घालून घेणे.
२. उलटी थांबण्यासाठी १ ग्रम आल्याचा रस, ५ ग्रॅम खडीसाखर घालून घेणे.
३. भूक लागण्यासाठी जेवायला बसण्यापूर्वी थोडे आले मीठ लावून खाणे.

पित्तासाठी calciprite गोळ्यांचा खूप सुंदर उपयोग होतो. नाव जरी इंग्रजी असले तरी गोळ्या आयुर्वेदिक आहेत. दोन गोळ्या चावून खायच्या आणि त्यावर लगेच पाणी प्यायचे.
असे दिवसातून २ वेळा घ्यावे.

बाकी, प्रवाळ, कामदुधा, खूप त्रास होत असेल तर चंद्रकला रस हे तीक्ष्ण गुणाने पित्त वाढले तर घ्यावे.

अम्ल गुणाने पित्त वाढले तर सूतशेखर, प्रवाळ पंचामृत, शंख भस्म, शौक्तिक भस्म इ. चा उपयोग होतो.

अर्थात पथ्य पाळणे हे दोन्ही बाबतीत महत्वाचे आहे.

आयुर्वेदामध्ये सांगितलेले "पंचकर्म" हे असे दोष काढुन टाकण्यासाठी अतिशय उपयोगी आहे.

जुन्या मायबोलीवरचे पित्त (acidity) या विषयावरचे मायबोलीकरांचे हितगुज इथे पहा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

mazya bahinila migrane cha tras ahe.tich prachand dok dukhat ani ulati zalyashivay tila bar vatat nahi.shaj jar ulati zali nahi tar ti muddamun ghashat bot ghalun oknyacha prayatn karte.ase karne kitpat yogya ahe?

एकदा उरुळी कांचन च्या आउएर्वेदिच आश्रमा ला जरूर भेट द्या . खूप चांगले उपचार केले जातात सर्व रोगांवर. मला पित्तामुळे अंगाला खूप खाज यायची , पण ७ दिवसांच्या एका शिबिरातच खूप फरक पडला.

पित्त वाढल्यामुळे छातीत होऊन ते वरती येऊ पाहात असेल (आंब्याच्या मोसमात तर हा त्रास हमखास होतो, हापूस आंब्यामुळे तर होतोच होतो) तर योगायोगाने मला एक जालीम उपाय सापडला आहे. अशाप्रकारे पित्त वाढल्यावर अर्धी वाटी राजगिर्याच्या लाह्या खाव्यात. "इनो"पेक्षा फास्ट रिलीफ मिळतो. प्रयोग करून आपला अनुभव येथे जरूर लिहावा.

पियापेटी,
माझे पुर्वीचे लिखाण इथे पोस्टून, तूम्ही इथल्या अनेक सभासदांचे पित्त खवळायला कारणीभूत ठरल्या आहात.
असल्या पित्ताचे "विरेचन" करण्यासाठी, मायबोली प्रशासनानेच एक "खास जागा" उपलब्ध करुन दिलेली आहेच.

उलट्या, मळमळ... असं बरंच काही बाहेर पडतेय तिथे.. पडू दे, मोकळं तरी वाटेल.

अविनाश्,सागर तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यावाद.मी नक्कीच प्रयोग करुन सान्गेन.

मला आजकाल वरचेवर पित्त होते आणि त्याचे मुख्य लक्षण म्हणजे घश्यात जळजळायला लागते.

रात्री थोडेजरी जागरण केले की दुसर्‍या दिवशी सकाळी घश्यात जळजळ सुरु.
(याची नेक्स्ट स्टेप म्ह्णजे अती जळजळ आणि पित्ताच्या उलटीचे उमाळे येणे).

कधी कधी भुक लागली की अगदी तत्क्षणी काहीतरी खाऊन घ्यावे लागते. पण प्रत्येक वेळेस काही उपलब्ध असेलच असे नाही. भूक लागलेली असतांना फरसाण/ चिवडा इ. खायला पण नको वाटते. न जाणो पुन्हा जळजळेल. पण लगेच काही नाही खाल्ले की जळजळ Sad

पित्त कमी करण्यासाठी दही-दुध-भात खाऊन खाऊन कंटाळा आला आहे.
भूक लागताक्षणी भीती वाटायला लागते. खायला जरा उशीर झाला तर जळजळेल याची.
रात्री प्रत्येक वेळी ११ च्या ठोक्याला झोपायला मिळेल असे नाही.
कामही पूर्ण बैठे आहे.

रात्री उशीरा झोपले की मी सकाळी उशीरा उठते.. झोप अपूर्ण होऊन पित्त होउ नये म्हणुन. तरी रात्री उशीरा झोपल्याचा त्रास होतोच.

१. नियमीत वमन धौती करुन काही फरक पडेल का? आयुष्यभर सुतशेखर घ्यावी लागेल का? (सुतशेखरने देखील आता फरक पडणे बंद झाले आहे).

२. मी मध्यंतरी शतावरी कल्प घेत होते रोज २ वेळा. तेव्हापासुन हा त्रास झाला. त्याचा आणि पित्ताचा काही संबंध आहे का?

३. पित्त प्रकृती असणार्‍यांनी भुकेच्या वेळी काय खाणे चांगले?

४. कधीकधी मिटींगमुळे हॉटेलमध्ये जेवावे लागते. तर पित्त होणार नाही आणि पोटही भरेल असे पदार्थ कोणते? (सँडवीच किंवा पंजाबी खावे लागते जनरली. पण दोन्ही पित्तकारकच ना?)

जळजळ थांबतच नाहीये...>> आत्ता सध्या जवळ काही अ‍ॅन्टॅसिड आहे का? जेल्युसिल वगैरे? तर घेऊन टाक. थंड दूध मिळण्यासारखं असेल तर घे. आणि इतका जास्त त्रास होत असेल तर त्वरीत डॉक्टर गाठणे हा उत्तम उपाय आहे.

कायमची जळजळ थांबण्यासाठी माहीत नाही पण काही वेळासाठी ( त्यावेळेसाठी) एक उपाय आहे आणी हा मी सुध्हा करतो. तळहाताच्या मनगटाजवळ ( मनगटावर ) दुसर्या हाताची तीन बोटे ठेवावी जीथे तीसरे बोट येईल तेथे हाताच्या अंगठ्याने काहीवेळ सोसेल ईतक्या जोरात दाब द्या २ मीनीटात जळजळ थांबते.

पियु परी | 24 June, 2013 - 16:49
प्लीज कोणीतरी मदत करा ना.. जळजळ थांबतच नाहीये...>>>>>>
अर्धी वाटी राजगिर्याच्या लाह्या खाउन पाहा ना एकदा...! (माझा अनुभव अविनाश१ | 2 May, 2013 - 19:05)

गार दुध चांगलेच पण आईस्क्रिम खाल्यानेही जळजळ थांबते. पण (चॉकलेट आईस्क्रिम ने किंवा चॉकलेट्स ने जळजळ खूप वाढते)

जिरे पाण्यात ऊकळुन पाणी गार झाल्यावर प्यावे. असे १-२ लिटर पाणि रोज प्या म्हणजे १-२ दिवसातच बरं वाटेल. {संदर्भ - सौ.चे प्रयोग}

शक्य असेल तर दुर्वा खा किंवा मोठ्याने अथर्वशीर्ष म्हणा {शक्य तितक्या वेळा}. कारण माहीती नाही पण अथर्वशीर्ष म्हटल्याने मला बराच फायदा झाला आम्लपित्ताचा त्रास कमी होण्यासाठी.

राजगिर्‍याच्या लाह्या तसंच व्हॅनिला आईसक्रीम खाल्ल्यानेही जळजळ कमी होते हे ऐकलय.
पित्ताची कारणं ३. Hurry, Worry आणि Curry.

पियु परी...शक्यतो लवकर जेवुन घेत जा झोपायच्या आधि. कमित कमि ३-४ तास आधि तरि जेवत जा झोपायच्या आधि. आणि रात्रि च्या वेळि स्पाईसि जेवण टाळा. जर तरिहि झोपायच्या आधि पोट रिकामे आहे असे वाटत असेल तर थंड दुध घेवुन बघा. काहि फायदा होत असेत तर कंटिन्यु करा नाहितर बर्‍याचदा दुधाने सुद्धा पित्त होऊ शकते त्यामुळे फायदा होत नसेल तर नका घेवु.जेवल्यावर लगेच बसु नका. थोडी शतपावलि करा किंवा वॉक ला जा.
थोडे दिवस बघा कुठले पदार्थ खाल्ल्याने पित्त/जळ्जळ होते ते. ते पदार्थ टाळा. आणि थोडा व्यायाम करा नक्कि फायदा होईल. पित्ताच्या वेळि फक्त पोळि थोडे तुप लावुन गरम करुन खाता येते का ते बघा. कारण बर्‍याचदा कुठलिहि भाजि खाल्लि तरि जळ्जळ होऊ शकते.

मलाही पित्ताचा त्रास अगदी लहानपणापासून आहे....
सुरुवातीला खूप घाबरून असायचो आणि बरेच पथ्यपाणी करायचो पण त्यामुळे त्रास फार काय कमी झाला नाही...
पित्ताने डोके चढले की मग काही सुचायचे नाही, उलट्या, दोन तीन वेळेला उलटी झाली की अगदी गरगरून जायचे...घरी पण जाऊ शकू का नाही अशी परिस्थीती व्हायची...
पण आता खूपच सुधारणा झाली आहे. आता पथ्यपाणी फारसे करत नाही, कामानिमित्त रात्रीची जागरणे, वेळी अवेळी खाणे, कॉम्प्युटरशी डोकेफोड सगळे काही...खाण्यात मसालेदार पदार्थ, पिझ्झा, दही, आंबवलेले पदार्थ, नॉन व्हेज, काही म्हणजे काही व्यर्ज नाही...तरीसुद्धा

एकच सोपा उपाय...सकाळी व्यवस्थित नाष्टा...भरपूर पाणी (जवळपास ३ लीटर दिवसाला)...माझ्या डेस्कशेजारीच दिड लीटरची बाटली भरून ठेवलेली असते..थोड्या थोडया वेळाने घोट घोट पाणी पित राहायचे...

त्यातूही पित्त झालेच तर औषध घेण्यापेक्षा एक उपाय करतो...घरी कोकम आगळ आहे...ते बरेच कॉन्सट्रेटेड असते..त्यात अगदी थोडे पाणी आणि चिमूटभर मीठ टाकून पितो...एकदम शॉट लागतो..पण थोड्याच वेळात पित्त जिरते

मला सुद्धा पित्ताचा खुप त्रास होता. वमन केल्यावरच बरे वाटायचे. पण डोके खुपच ठणकायचे. एका डोकेदुखीच्या गोळीने काही विशेष फरक पडायचा नाही, दोन कमीत कमी घ्यावा लागत. कधी कधी जास्त उलट्या होउन डि-हायड्रेशन व्हायचे आणि सलाईन घ्यावे लागायचे.
अविपित्तकारी चूर्णाने विशेष फायदा झाला नाही.
खाण्याची सगळी पथ्ये पाळत होतो. तेलकट पूर्ण बंद केलेले.

मग मी शतावरी कल्प आणि ज्येष्ठमध चूर्ण घेणे सुरु केले.
सकाळी नाश्ता झाल्यावर आणि रात्रीच्या जेवणानंतर एक पेला पाण्यामध्ये एक टी स्पून ढीग भरुन शतावरी कल्प आणि पाव चमचा ज्येष्ठमध पावडर घ्यायचो. साधारण तीन आठवड्यात खुपच फरक जाणवला. कधी पित्त झालेलं असायचं पण डोके हलकेसे दुखायचे. डोकेदुखीच्या गोळी ऐवजी आलेपाक घेतला तरी आता डोके दुखण्यावर खुप आराम मिळायचा. असेच दोन तीन महिने निघुन गेल्यावर लक्षात आलं की पित्त एकदाही झालं नाही.
साधारण सहा महिने मी शतावरी कल्प आणि ज्येष्ठमध घेत होतो. पित्ताचा त्रास बंदच झाला.
त्याला आता ५-६ वर्ष झालीय. क्वचित कधी पित्त होते, पण कसलंही औषघ घेण्याची गरज पडत नाही. आणि डोके अजिबात दुखत नाही. खाण्यामध्ये pH वाढवणारे पदार्थ खाल्ले की बस, लगेच आराम मिळतो.

मी सांगितल्यावर बर्‍याच जणांनी हा प्रयोग केला. काहींना माझ्यासारखाच पूर्ण आराम मिळाला तर काहींना एवढा फायदा झाला नाही, पण त्यांना पित्त झाले असताना याचा फायदा होतो.
मला दूध पचत नसल्याने मी पाण्यातून घेतले, हाच प्रयोग पाण्याऐवजी गाईचे दूध वापरुन करता येइल.

सूवर्णसूत शेखर जास्ती खाल्ले गेले - ३ ते ४ महीने घेतले गेले. त्या मूळे अंगावर फोड यायला लागले. आता थांबवले पण कोणाला उपाय माहीत आहे त्यावर.

सूवर्णसूत शेखर जास्ती खाल्ले गेले - ३ ते ४ महीने घेतले गेले. त्या मूळे अंगावर फोड यायला लागले.

>> बापरे.. खरंच असं पण होतं का? मी साधी सुतशेखर घेते.

शतावरी कल्प फक्त गरोदर बायका घेतात असच मला वाटायचं . शतावरी कल्प ऐवजी शतावरी पावडर चालेल का? माझ्याकडे बरीच आहे.

H Pylori (bacterial infection of stomach) बद्दल कोणी अधिक माहीती देईल का प्लीज. डाॅक च्या सल्ल्याप्रमाणे अँटीबायोटीक सुरु आहेच. पण अजुन काय काळजी घेता येईल?

आम्बट पदार्थ, आम्बवलेले पदार्थ ( ब्रेड, इदली, दोसा वगैरे) सध्या बन्द करा नाहीतर कमीच करा. मधून मधून थन्ड्गार दूध अर्धा कप तरी घ्या. उपास करु नका आणी उठल्यानन्तर नाश्ता लवकर करा. मला तरी डॉक्टरनी हीच पथ्ये सान्गीतली होती. कोल्ड्रिन्क्स ( घेत असाल तर ) बन्द करा. चहा-कॉफी पण कमी घ्या.

@अर्चना:
शतावरी पुरुष सुद्धा घेऊ शकतात. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये जे स्त्री / पुरुष दोघांना देतात त्यात शतावरी असते.
ते फक्त गरोदर स्त्रीयांनी घ्यावे असे अजिबात नाही.
शतावरी पावडर नक्कीच चालेल. शतावरी कल्पामध्ये साखर असते, जिची या फायद्यासाठी काही गरज नाही.

पियु, मलाही असाच सेम पित्ताचा त्रास व्हायचा... बराचसा कमी झालाय. आशु म्हणतो तसा सकाळचा नाश्ता मस्ट आहे. आणि अजुन एक प्रभावी उपाय (इथल्याच एका माबोकरणीने सांगितलाय) वैद्य पाटणकरांचा "आम्लपित्तनाशक काढा" आण आणि दररोज पित्तानुसार एकदा किंवा दोनदा घे, अतिशय गुणकारी आहे!!! स्वानुभव! Happy

१०-१२ काळ्या मनुका रात्री भिजत घालून दुसर्‍या दिवशी अनशापोटी भिजवलेल्या पाण्यासकट चावून खाव्यात.

पथ्यादी काढाही आहे.पण सुरवातीला तरी योग्य सल्ल्याने वापर करावा.

Pages