नमस्कार,
दरमहिन्या प्रमाणे "एप्रिल" महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.
या महिन्याचा विषय आहे " चाहुल उन्हाळ्याची "
या वर्षीचा उन्हाळा जरा जास्तच कडक आहे.. त्यात भर दुष्काळाची..:( .. उन्हाळ्याची चाहुल लागल्यावर निसर्गात बरेच बदल होत असतात.. माणसांच्या कार्यांमधे ही बदल होतात ...या वरच या महिन्याची थीम आधारीत आहे..
जिप्सी आणि शापित गंधर्व ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
निकाल :-
प्रथम क्रमांक : Dev_ - कैरी
हिरव्यागार आंबट-गोड कैर्या खरच उन्हाळा जवळ आल्याची चाहुल देतात. टेक्निकली करेक्ट फोटो.
द्वितीय क्रमांक :- विभागुन
१. प्रसन्न अ - ग्रीष्माची चाहूल (थीमसाठी परफेक्ट फोटो)
२.गिरिश सावंत - ऊन ऊन (विषयाशी संबंधित पण थोडासा हटके असा फोटो. उन्हाच्या झळा फोटोतुनही जाणवत आहे.
तृतिय क्रमांक :- विभागुन
१. रोहित ..एक मावळा - पाण्यासाठी वणवण (कंपोझिशन आवडले)
२. ferfatka - लगबग वाळवणाची
विशेष उल्लेखनिय: जागु - रानमेवा
नियमः-
१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......
"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..
चला तर करुया सुरुवात
मागील महिन्यांमधले स्पर्धा धागे :
१) फोटोग्राफी स्पर्धा.. जानेवारी.."थंडी
ऊन्हाळा आला की गोळा खाने
ऊन्हाळा आला की गोळा खाने आलेच...ते पन बच्चे कंपनी बरोबर..

उन्हाळा आला कि डोक्यावर टोपी पाहिजे..ना...मुलाला पन आणि आजीला पण..

मी टाकत असलेले दोन फोटोज..
मी टाकत असलेले दोन फोटोज..
एप्रिल म्हणजे अजुन आंबे कै-याचा हंगाम.. आंबे कितीही आवडत असले तरी ते पाहून तोंडाला पाणी वगैरे सुटत नाही मात्र कैरी पाहिली की...... तोंडात पाण्याची धार लागते.. त्यासाठी हा पहिला फोटो.. खास कोकणातला...

उन्हाळा म्हणजे नुसती खाऊन पिऊन धमाल नव्हे. नाण्याची दुसरी बाजू खरच खुप क्लेषदायक आहे.

दुसरा फोटो घाटावरचा..
ह्या एप्रिल मध्ये अक्कलकोट सोलापूरला जाणे झाले. सोलापूर रस्त्यावर ऊसाच्या रसाच्या ब-याच टपरी दिसतात. ४२ टेंप्रेचर मध्ये गाडीतून उतरायची हिम्मत होत नव्हती, तरी एके ठिकाणी थांबलो. रस विक्रेत्याकडून कळालं की तिथं मागील ३ वर्षं पाऊस नाही पडला. तरी येणा-या जाणा-यांसाठी विक्रेत्याने पाण्याचे माठ ठेवले होते. त्याला दिलसे सलाम!! त्या गरम्यात नुसत्या माठाकडे पाहिले तरी थोडा थंडावा मिळाला.
देव, मस्त फोटो. कैरी पुन्हा
देव, मस्त फोटो. कैरी
पुन्हा एकदा मस्त थीम आणि फोटो पण मस्तच सगळे.
सुरेखच झाले सगळे!!! मज्जा
सुरेखच झाले सगळे!!!
मज्जा आली अगदी.
ह्या माठाना लाल कापड का लावतात माहिती आहे का?
1. उन उन उन... नाक्यावरचे
1. उन उन उन...
नाक्यावरचे गजाली म्हणजे आमचो जिव की प्राण .... अशाच गजालीत आपसुकच हात डोक्यावर जाता
आणि लक्षात येता वर तापता हा रे.. घराक जावक व्हया लवकर ...
2. कुल कुल कुल ...
तापत आसताना कलीँगडाची भेस म्हनजे...
असावा सुन्दर कलीँगडाचा बंगला
गिरीश, दोन्ही फोटो
गिरीश, दोन्ही फोटो मस्त!
पहिल्या B&W फोटोनन्तर लावलेला रन्गित फोटो हे कॉम्बिनेशन देखिल झकास!
लिँबु.. आभार,,,
लिँबु.. आभार,,,
देव आणि गिरिश मस्तच...
देव आणि गिरिश मस्तच... रंगासेठ तुमचे प्रचि कुठे आहेत?
हितु ... मस्त फोटो
हितु ... मस्त फोटो
(No subject)
उन्हाळा सुरु झाल्यानंतरच
उन्हाळा सुरु झाल्यानंतरच कॅमेरा हातात घेतला
त्यामुळे चाहूलीचे काही फोटूच नाहीत. त्यातल्या त्यात हे दोन विषयाच्या जवळ जातात.
फुलांचा सडा, मार्च महिन्यातील

निष्पर्ण वृक्ष
उन्हाळा जवळ आला म्हणजे
उन्हाळा जवळ आला म्हणजे गुरांसाठी ओला चारा संपुष्टात आलेला असतो. मग उन्हाच्या दिवसात गुरांच्या चार्याची साठवण करावी लागते. आपण जसे पापड मसाले करतो त्याप्रमाणे
शेतकरी आपली भाताची शेते हिवाळ्यात दिवाळीच्या सुमारास कापतात आणि भाताची झोडणी करून उरलेल्या पेंड्याचे भारे करून ठेवतात. हे भारे गुरे सांभाळणारे म्हणजे बईल, गायी, म्हशी या शेतकर्यांकडून विकत घेउन आपल्या घ्ररी अशाप्रकारे रचतात की पावसातही ते भिजले नाही पाहीजे व मोकाट जनावरांनीही त्याची नासधुस नाही केली पाहीजे.
तर हे आहे गुरांच वाळवण आणि साठवण.
उन्हाळयाची चाहूल लागते ती रानमेव्याने. राना-जंगलातील झाडे रानमेव्याने भरून पशु-पक्षी, माणसांचे खाद्योत्सव भरतात.
जागु, ती छोटी पिवळी फळे
जागु,
ती छोटी पिवळी फळे कोणती? बाजारात पाहिलीत मी अनेकदा पण कधी चाखली नाहीत.
गमभन ती रांजणे आहेत. गोड
गमभन ती रांजणे आहेत. गोड असतात पण त्यात थोडे चिकही असते.
रानमेवा मस्त आहे. रांजणे कधीच
रानमेवा मस्त आहे. रांजणे कधीच खाल्ली नाहीत. आत्ता उपलब्ध असतील की सीझन संपला.
आता आहेत.
आता आहेत.
ताडगोळे...
ताडगोळे...
उन्हाळ्याची चाहूल कशी दाखवावी
उन्हाळ्याची चाहूल कशी दाखवावी या विचारात पडलो असलानाच हा फोटो मिळाला...
ग्रीष्माचा उतारा वाढू लागलाय, वातावरणात सगळा शुष्कपणा, रखरखाट भरून राहीलाय, झाडेही अशी निष्पर्ण होऊ लागलीयेत आणि डोळ्याना सुखवणारी हिरवाई हळू हळू माघार घेऊ लागली आहे.... आणि उन्हाळ्याची ही चाहूल अनुभवणारा एकांडा मॅगपाय रॉबीन..
गुंजवणेवरून राजगडाकडे जाताना टिपलेले छायाचित्र
हा फोटो मिळाला मित्राच्या बागेत...उन्हाळा आला की फेसबुकवर पक्ष्यांना वाचवा, त्यांच्यासाठी पाणी ठेवा अशा पोस्टी पडायला सुरुवात होते..मी आणि माझ्या मित्राने पोस्टी टाकण्याऐवजी पाणी ठेवले आणि खरोखर त्याचा परिणाम अनुभवता आला..उन्हाळ्याच्या तलखीने त्रासलेले हे चिमणे जीव पाणी मिळाल्यावर जे काही सुखावतात त्याला तोड नाही. अशाच एका दुपारच्या वेळी कॅमेरा लाऊन बसलेलो असताना बुलबुल महाशयांनी पाण्यात खेळायला सुरवात झाली. त्याचवेळी एक चष्मेवाला (व्हाईट आय) तिथे आला...तुझे होऊ दे मग मी उतरतो पाण्यात असा त्याचा आविर्भाव होता....
चॅंप... दुसरा प्रचि लाजवाब
चॅंप... दुसरा प्रचि लाजवाब
उन्हाळा म्हणजे 'आंबे'....
उन्हाळा म्हणजे 'आंबे'.... अजून काय!!!
फोटो टाकण्याचा आजचा शेवटचा
फोटो टाकण्याचा आजचा शेवटचा दिवस.......
.
या वेळी जरा विचार करायला लावला मायबोली करांना बहुदा त्या करिता संख्या कमी आहे हरकत नाही
दरवेळी प्रमाणे या ही वेळी अत्यंत दर्जेदार आणि विचारपुर्वक छायाचित्रे आलेली आहे
उद्या पासुन नविन विषय.........हा देखील वेगळा, विचार करायला लावणारा आणि अभ्यासपुर्वक असेल याची आशा आहे ...
.
.सर्व मायबोलीकरांचे मनापासुन आभार
मी टाकू का अजुन एखाद दोन
मी टाकू का अजुन एखाद दोन फोटो?
दोन पेक्षा जास्त टाकलेल्या
दोन पेक्षा जास्त टाकलेल्या चित्रांचा विचार करण्यात येणार नाही.... हे जजेस ने आधीच स्पष्ट केले आहे ..
.
हवे तर आपण आधी टाकलेल्या चित्रांना बदलु शकतात
>>>> हवे तर आपण आधी टाकलेल्या
>>>> हवे तर आपण आधी टाकलेल्या चित्रांना बदलु शकतात <<<
धन्यवाद, सूचना चांगली आहे. दुरुस्तीला वाव मिळेल.
पण मी नाही बदलणार ह्यावेळी तरी!
तसेही मी माझ्याकडून आधीच पहिलादुसरातिसरा नम्बर काढला आहे, (त्यात माझे फोटु नाहीत अर्थातच
)
आता उत्सुकता आहे ती ही की मी लावलेले क्रमच जजेस पण काढतात का हे पहायची!
बाकी बाहेरील लिन्क्स जिथे पान्ढरा चौकोन दिस्तो, जमेत धरले नाहीयेत. मायबोलीवरील सुविधा वापरुन फोटो न टाकणार्यान्चा सोल्लीड निषेध! (स्पर्धेकरता बाहेरिल लिन्क दिली तरी लहान साईझचा फोटु मायबोलीवरुन टाकायला काय हरकत आहे? ) असो.
का हो उदयरावा एप्रिल गेला तरी
का हो उदयरावा एप्रिल गेला तरी त्या कवितेचा फटुग्राफिचा निका कई लावणार हात
शाम आजारी आहेत त्यामुळे उशीर
शाम आजारी आहेत त्यामुळे उशीर होत आहे...
त्यांनी तसे विपु करुन कळवले आहे
उन्हाळ्याची चाहूल लागायची
उन्हाळ्याची चाहूल लागायची खोटी की पळा पोहायला!
हे गार पाणी आणि बरोबर खट्याळ दोस्तकंपनी! सुख आहे सुख!

चँप - सही फोटो.
चँप - सही फोटो.
टोकुरिका, पहिला फोटो तू काढला
टोकुरिका, पहिला फोटो तू काढला आहेस?
ठंडा ठंडा कुल कुल
ठंडा ठंडा कुल कुल
Pages