फोटोग्राफी स्पर्धा.. एप्रिल.."चाहुल उन्हाळ्याची" ..निकाल

Submitted by उदयन.. on 1 April, 2013 - 06:29

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे "एप्रिल" महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

या महिन्याचा विषय आहे " चाहुल उन्हाळ्याची "

या वर्षीचा उन्हाळा जरा जास्तच कडक आहे.. त्यात भर दुष्काळाची..:( .. उन्हाळ्याची चाहुल लागल्यावर निसर्गात बरेच बदल होत असतात.. माणसांच्या कार्यांमधे ही बदल होतात ...या वरच या महिन्याची थीम आधारीत आहे..

जिप्सी आणि शापित गंधर्व ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...

निकाल :-
प्रथम क्रमांक : Dev_ - कैरी
हिरव्यागार आंबट-गोड कैर्‍या खरच उन्हाळा जवळ आल्याची चाहुल देतात. टेक्निकली करेक्ट फोटो.

dev 1st.jpgद्वितीय क्रमांक :- विभागुन
१. प्रसन्न अ - ग्रीष्माची चाहूल (थीमसाठी परफेक्ट फोटो)

prasanna 2nd.jpg२.गिरिश सावंत - ऊन ऊन (विषयाशी संबंधित पण थोडासा हटके असा फोटो. उन्हाच्या झळा फोटोतुनही जाणवत आहे. Happy

girish 2nd.jpgतृतिय क्रमांक :- विभागुन

१. रोहित ..एक मावळा - पाण्यासाठी वणवण (कंपोझिशन आवडले)

rohit 3rd.jpg२. ferfatka - लगबग वाळवणाची

ferfataka 3rd.jpg

विशेष उल्लेखनिय: जागु - रानमेवा

jaagu.JPG

नियमः-
१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

चला तर करुया सुरुवात

मागील महिन्यांमधले स्पर्धा धागे :

१) फोटोग्राफी स्पर्धा.. जानेवारी.."थंडी

२) फोटोग्राफी स्पर्धा.. फेब्रुवारी.."रंग प्रेमाचे"

३) फोटोग्राफी स्पर्धा.. मार्च..""भावमुद्रा"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सीचा पहिला फोटू बाद! Proud ऐन उन्हाळ्यात लईच हिरवाई दिस्त्ये फोटूत! Wink
दुस्रा फोटू आवडला! (चटकमटक जिभल्या चाटणारा चेहरा)

थीम जरा अवघड आहे, पण प्रचंड "स्कोप" असलेली आहे!

जिप्सीचा पहिला फोटू बाद! ऐन उन्हाळ्यात लईच हिरवाई दिस्त्ये फोटूत >>>>>>>>>>>>>> एकदम झाडाकडे बघु नका........आजीबाईच्य आजुबाजु ला असलेल्या गवता कडे बघा........आणि जमिनी कडे बघा Happy
.
.

पहिले चित्र हे (हिरवाई वर फार लक्ष देता देखिल) महाराष्ट्रातील अनेक गावांमधले पावसाळा सोडल्यास उर्वरित वर्षाभर जगण्याच्या वास्तवाचे प्रातिनिधिक चित्र आहे, ते प्रचि 'चाहूल उन्हाळ्याशी' ह्या विषयास पूर्णतः समर्पक वाटत नाही.

दुसरे प्रचि देखिल बदलत्या चाहूलीपेक्षा प्रत्यक्ष उन्हाळ्याशी संबंधित आहे असे मला वाटते.

तसेच उदाहरणार्थ प्रचि दिल्याने स्पर्धकांना झापडे लावल्यागत होऊ शकते, मागच्या महिन्यात (सुरुवातीस आपण स्पष्टीकरण देण्याअगोदर) भावमुद्रा हा विषय, उदाहरणार्थ प्रचि. मुळे बालमुद्रा असा पाहिला गेला होता.

प्रचि पूर्णतः काढून, स्पर्धकांच्या कल्पना-शक्तीला संपूर्ण मोकळिक द्यावी असे मला वाटते.
अर्थातच हेमावैम कसलाही आग्रह नाही Happy

ही चाहुल उन्हाळ्याची या अर्था बरोबर उन्हाळ्याची सुध्दा आहे........ नुसते आंबा मोहर इत्यादींचे फोटो टाकले असते तर ..........संबंध स्पर्धेभर तसलेच फोटो आले असते.........या करिता जरा प्रातिनिधिक फोटोंची उदाहरण म्हणुन निवड केली............
.
.हार्पेन तुम्ही जो म्हणतात तो मुद्दा भावमुद्रा बद्दल्चा बरोबर आहे...... परंतु स्पर्धा ही काय फक्त व्यवसायिक आणि निष्णात फोटोग्राफर लोकांसाठी नाही आहे......... शिकाउ लोकांसाठी आहे....एखाद्या विषय दिल्यावर त्यांना त्या बद्दल काय वाटते यावर जास्त भर देत आहोत आम्ही......उदा. आधी सुरुवातीला फक्त बाळाचे फोटो आले नंतर नंतर जस जसे इतरांना "भावमुद्रांमधे काय अपेक्षित आहे.......हे कळाल्यावर मुलांव्यक्तिरिक्त सुध्दा इतर जणांचे फोटो आलेले आहेत...... हेच आमचे लक्ष्य होते...... Happy
.
सुरुवातीला भटकणे हे तर होतच असते Happy

टपोरी करवंद ,
रानावनात लगडलेली हि करवंद पाहून उन्हाळ्याची चाहूल लागतेच Happy

lm

ग्रीष्माची चाहूल , वृक्ष मिरवत असलेले त्यांचे कोवळे सौंदर्य Happy

lm

प्रतिक्षा नवीन पालवीची..

nishikant.jpgउन्हाळा सुरू झाला अन् महिलांची कुर्डया, पापड, वेफर्स, सांडगे यासारखी उन्हाळी कामे करण्याची लगबग सुरू झाली.

nishikant2.jpg

सुंदर विषय Happy

उन्हाळा म्हणजे फक्त रखरखी पणा नव्हे... वसंत ऋतुचे आगमन... जीर्ण मनाला फुटणारी नवी पालवी... रानमेव्या पासून ते कोकीळे पर्यंत सगळेच यात समरस झालेले दिसतात.. एव्हढेच नव्हे तर रानातल्या पालापाचोळ्यांतूनही निसर्ग आपली किमया दाखवत असतो.

असाच एक रंगी-बेरंगी प्रयत्न केला आहे.

बहावा

साबुदाण्याच्या पापड्या...........स्लर्प, स्लर्प!!

सगळी प्रचि भारी आहेत. थीम अवघड करणार होतात ना?? ही फारच मोठ्या स्कोपची आहे.

waaaaaaa kay mast vishay......zakkaassssssch

maglya velescha result lagla ka??

उन्हाची झळ पानांना...झाडांना ....
धबधबे हि आटले वाहतांना ......

rsz_1rsz_5.jpg

चिखलदरयाचा भीमकाय 'भीमकुंड' सुद्धा असा कोरडा ठाक पडलाय
rsz_1rsz_1rsz_72.jpg

>>>> नवि मज्जा सुरु......चला पेटि उपसुन काढावी परत..... <<<<
अगदी अगदी!
पण काही म्हणा, नुस्ता "उन्हाळा" असा विषय अस्ता तर तो सोप्पा होता. "उन्हाळ्याची चाहूल" असा विषय असल्याने थोडा अवघड आहे हे खरे! Happy
मज्जा येणारे

फेरफटका, असे इतिहासजमा खाण्याच्या गोष्टींचे फोटो टाकू नयेत. जीभ फारच बेचैन होते. आता कशा मिळणार त्या अर्ध्या ओल्या चिकवड्या? परिक्षक तो फोटो बाद ठरवा हो. Happy Light 1

इंद्रा, फोटोमागची कल्पना खूप आवडली. फोटोही मस्तय. फक्त तो बेरंगीपणा नीट नाय झालाय. लय कंटाळवाणे काम असते ते. मी मागे करायचा प्रयत्न केला होता - अर्ध्यावरच सोडून दिला Happy

थीम अवघड करणार होतात ना?? ही फारच मोठ्या स्कोपची आहे.>>>>>>>>>> हळुहळु......भावमुद्रा या धाग्यावरुन ती वेळ अजुन लांब आहे असे वाटले.. म्हणुन... इथे बघु काय होते ते......मग मे महिन्यात करणार .......शेवटी मायबाप तर मायबोलीकरच...... Happy

Pages