हिरवे मुग व पोह्याचे लाडू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 24 December, 2012 - 00:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) दोन वाट्या पोहे
२) दोन वाट्या मुग
३) दोन वाट्या पिठी साखर
४) अर्धी वाटी सुक्या खोबर्‍याचा किस
५) १ ते १/१२ वाटी तुप
६) १ वाटी भाजके डाळे
७) १ वाटी मिक्स ड्रायफ्रुट
८) २ चमचे खसखस
९) १ चमचा वेलची पुड

क्रमवार पाककृती: 

१) मुग, पोहे, डाळे, खोबर्‍याचा किस, खसखस हे वेगवेगळे मंद आचेवर खरपुस भाजून घ्यावेत.

२) मुग व डाळे वेगवेगळे मिक्सरमध्ये दळून त्याचे रवाळ पिठ करावे.

३) पोहे व खोबर्‍याचा किस एकत्र करून कुस्करून घ्यावे.

४) आता तुप सोडून सगळे साहित्य एकत्र करावे.

५) हळू हळू तुपाचा अंदाज घेत लाडू वळण्याइतपत मिश्रणात तुप घालावे.

६) मिश्रण झाले की लाडू वळावेत.

वाढणी/प्रमाण: 
एका वेळी एक लाडू :स्मित:
अधिक टिपा: 

हे लाडू पौष्टीक असुन रुचकरही लागतात.
पोहे मिक्सरमधुन काढलेत तरी चालेल.

माहितीचा स्रोत: 
पुस्तकी ज्ञान
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनुराधा, वैभव, अनुजा धन्स.

गुळ घालून करु शकतो. मी पण पुढले तसेच करणार आहे.

नितीन आहो प्रची पाहून कसा अंदाज येईल वरती रेसिपी दिली आहे त्याप्रमाणे करून पहा मग बरोब्बर चव कळेल. Lol

सुरेख. आमच्याकडे फक्त पोह्याचेच करतात, मुग नाही वापरात. गुळ वापरूनही करता येतात.

Pages