दाल माखनी / लंगरवाली दाल + प्रेशर कूकर टिप्स

Submitted by दिनेश. on 22 April, 2013 - 05:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
हॉकिन्स कूक बूक आणि प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>हे की शिटी होऊन जेव्हढं इंधन जास्त जळेल त्याच्या जास्त पट वेळ आणि शक्ती शिटी होऊ न देण्याच्या खटाटोपात जाईल .. (ऑपॉर्च्युनिस्टीक कॉस्ट च्या संदर्भात विचार केला तर) ..>>> हाच विचार करत होते.
फोटो छान आहे. पण दाल माखनी बहुतेक शिजवलेल्या उडीद डाळीच्या बुळबुळीतपणा(?) मुळे आवडत नाही. अगदी अस्सल पंजाब्यांच्या हातचीही खाल्ली आहे पण एवढे मसाले घालूनही मला ती कायम ब्लँडच वाटत आली आहे.

मंजूडी, डाळीत शिजण्याकरता कमीत कमी दुप्पट पाणी तर घालावंचं लागेल. जेवढी डाळ तेवढंच पाणी घालून नीट न शिजता दडदडीतच राहील.

सशल hmm.
आणि एक कारण शिट्टी न करण्याच हे पण असेल का कि पदार्थातली पोषणमुल्य अगदीच कमी नष्ट होत असतील?

छान रेसिपी Happy

आमच्याकडे लेकीला कुकरच्या शिट्टीची भितीच वाटते त्यामुळे शिट्ट्या होतच नाहित.. वरण वगैरे नुसतेच प्रेशर वर शिजवले जाते Happy

मी पण राजमा घालते दालमाखनीत..

अगदी इंस्टंट करयची असेल तर सरळ कॅनमधला राजमा + कॅन मधले लेंटिल्स वापरते. एमडीएच चा दालमाखनी मसाला वापरते.

दाल पंचरतन नावाने जो प्रकार देशी रेस्टॉरंट्स मधे मिळतो तो कसा करतात?

पुर्वी गजरा की कशात "सोळा शिट्यांचं लिंबाचं झटपट लोणचं"

>>>> सशल, असं मोघम नको. नक्की रेसिपी दे बरं. लोणचं करत असताना १६ शिट्ट्या वाजवायला एक स्वतंत्र माणूस आणून बसवायला लागणार. उपजत बा.बा. ( Wink ) मुळे मला शिट्ट्या वाजवता येत नाहीत.

बापरे!! पूर्णविराम वगैरे काय...

तर कूकर लावताना त्यात थेट पदार्थ किंवा जाळी व डबे ठेवून पुरेसे पाणी ( पाणी नेमके किती ते पण कूक बूक मधे दिलेले असते. त्यापेक्षा सर्रास जास्त पाणी वापरले जाते. उदा. बटाटे शिजवताना बटाटे बुडेपर्यंत पाणी टाकायची अजिबात गरज नसते. ) >>> याच संदर्भाने या कृतीसाठी उडदाची डाळ शिजवण्यासाठी नेमके किती पाणी घालायचे हे लिहायला हवे. Happy

पुरेसे शब्दावर इतका कल्लोळ? छ्या! ह्यात न कळण्यासारखे काय आहे?

कूकर पसरट व चपटा असेल तर डाळ बुडेल इतपत हा अंदाज येणं कठिण आहे का?

दिनेश, तुम्ही म्हटल्याप्रमाणे कूकरच्या आकारमानानुसार व डाळीच्या प्रमाणानुसार तसेच डाळ कितपत गळवायची(दाल गलना) ह्यावर पाणी घालावे, बरोबर ना?

नाहीतर ती डाळ जो कोणी मनुष्य बनवेल त्याच्या आवडीनुसार/अकलेनुसार(म्हणजे अंदाज हो...) बदलेल बहुधा पाण्याची पातळी. Wink

... Proud

दिनेश, पुढच्या वेळी तुम्ही नीट प्रमाण लिहा हो. किती गोंधळ होतो माझा.

सर्व डाळी मिळून पाव किलो, पसरट अरुंद २ लिटरचा कूकर, ४ वाट्या गरम पाणी.
अर्धा किलो डाळी, उंच अंगाचा ४ लिटर कूकर, ३ वाट्या गरम पाणी... वगैरे.

बाकी , शिट्या काढायच्या का मारायच्या आपल्या मर्जीनुसार ठरवू देत लोकांना. Proud

आणखी एक, ह्यात मटण घातले तर किती पाणी लागेल?

ह्या डाळी नसतील तर कोणत्या घालू?

पावट्याची डाळ नाही का चालणार?

असे प्रश्णांची उत्तरे पण लिहा ना आधीच.

जो जिन्नस नसेल तो घालून कसे होइल ते पण लिहा. कारण असे प्रश्ण नेहमीच येतात.

बटाटा घालू का? पनीर नसेल तर कोंबडी घालू का? लाल मीठ नसेल तर काळे चालेल का? Proud

छान रेसिपी Happy Happy मी पण राजमा घालते दालमाखनीत..

माझ्या एका पंजाबी (आणी हेल्थ कॉन्शीअस) मैत्रीणीने कमी तेला/तुपातील पंजाबी ग्रेव्हीची सांगितलेली पद्धत: कांदा, टोमॅटो बटर/तेलात न परतता कुकर मधे कांदा, टोमॅटो, आले व लसूण शिजवून, मिक्सर मधून बारिक वाटून घ्यायचे. मग अगदी कमी तेलात (१ च) जीरे, हिंगाची फोडणी करून त्यात मिश्रण घालावे. झाकण ठेवून चांगली ऊकळी येऊ द्यावी. बाकी भाजी/डाळ नेहमीच्या पद्धतीने करावी.

ह्या पद्धतीमुळे तेल्/तुप कमी लागते, सतत परतत बसावे लागत नाही (वेळेची, मेहनतीची बचत) व डाळ शीजवताना त्याच कुकर मध्ये दुसरया भांड्यात कांदा, टोमॅटो इ. शिजवता येते (इंधन बचत). सर्वात महत्त्वाचे म्हणजे चवीत फारसा फरक पडत नाहि.

मी कुठ्लीही पंजाबी ग्रेव्हि ह्याच पद्धतीने करते. मम्मी भी खुश और टम्मी भी खुश!

(दिनेशदा, मी तुमच्या धाग्यावर अतीक्रमण केले आहे का? तसे वाट्ल्यास अनावश्यक भाग खुशाल उड्वून लावा. मी टाईप केल्यानंतर मला जाणवले. Happy Happy :स्मित:)

दिनेशदा, तुमच्या रेसिपीनं आजच माझ्या मैत्रिणींकरता केली. निव्वळ अ प्र ति म!!!

मी दूध किंवा क्रीमही नाही घातलं. आणि आख्ख्या उडदाऐवजी सालीसकट उडदाची डाळ वापरली. उडदाची डाळ, चण्याची डाळ आणि राजमा रात्रभर भिजत घातल्यावर दुप्पट पाण्यात २५ मिनिटात उत्तमरीत्या शिजले गेले.

धन्यवाद. Happy

दाल माखनी अति आवडते. पण रेसिपी खटपटीची दिसते. माझ्या क्षमतेबाहेरची. तर कुणीतरी मला खायला बोलवा. Happy

दिनेशदा, रेसिपी मस्त , प्रचिसकट.मी कधी न केलेली.
>>तरी शंका असेल तर उडदाच्या सोबत आपल्याल्या हव्या त्या प्रमाणात, मूग वापरावेत>>
मूग म्हणजे हिरवे अख्खे मूग की मूगडाळ ?
एक प्राथमिक शंका.कूकर बद्दलची माहिती आवडली.

प्रेशर कूकरच्या टिप्समधे एक अ‍ॅडिशन: हल्ली नवीन कूकर्सना प्रेशर इंडीकेटर असतो. हा प्रेशर इंडिकेटर बघून प्रेशर पूर्ण चढले आहे किंवा उतरले आहे ते सहज सांगता येतं. त्यामुळे आधीसारखं वाफ जायला लागल्यावर मग शिट्टी ठेवाय्ची आवश्यकता नसते. शिट्टी आधीपासून ठेवली तरी चालते.

कूकिन्ग टाईम म्हणून प्रेशर इंडीकेटर चढल्यापासूनचा वेळ मोजायला घ्यायचा.

दिनेशदा,

खुपच उपयुक्त माहीती दिलीत कुकरबद्दलची,

दुबईत, ओमान मध्ये पाकीस्तानी हॉटेलात मिळणार्या माशकी दाल म्हणजे उडदाची दाल
एवढच माहीती होते. हा "माष " शब्द कसा व कुठून आला हे माहीती नव्हते, कारण आपल्या ईथे ऊडदाला कोठेही "माष" असे संबोधले जात नाही, अगदी दक्षिणेत जिथे ऊडदाचा जास्त वापर होतो
तेथेही ऊळींण (मल्याळं मध्ये) असा शब्द आहे.

ड्यांबीस ( हे तुम्ही वर स्वतःचे नाव अर्धचंद्र देऊन कसे लिहीले? ) उडदाला माश/ माष असे म्हणतात. मी हे श्री देवी महात्म्य म्हणजे श्री सप्तशतीत ( मराठी ) वाचले आहे. यज्ञात समिधा म्हणून उडिद आणी मसूर ब्राम्हणांनी वापरावे असे लिहीलेय. तरीही वाचुन सांगते.

आता इथे ब्राम्हणांचा उल्लेख का ? तर त्याकाळात बहुतेक राजे हे क्षत्रिय असल्याने शिकार करुन देवांना प्राण्यांचा बळी द्यायचे, पण त्याच काळात ( म्हणजे बराच जूना ) ब्राम्हण हे मांस भक्षण करीत नव्हते. तसेही उडदात खूप प्रथिने ( मांसाइतकी ) असल्याने उडिद हे बळीचे एक स्वरुप म्हणून चालत होते. त्याच प्रथिनांच्या दर्जामुळे आणी ताकदीमुळे त्याला माश असे म्हणतात.

दिनेशजी अवांतराबाबत क्षमस्व.:स्मित:

सॉरी, दोन दिवस सवड झाली नाही, या बीबी वर यायला.

भारती, अख्खे मूग वापरले तर चांगले. सालवाली डाळ वापरली तर शिजल्यावर ती वेगळी होते.
माष या शब्दाचेच पुढे माह, माख असे रुपांतर झाले. म्हणून हि माही / माखी दाल झाली.
आपल्याकडच्या काही गिरीजन लोकांच्या लग्नसमारंभात उडदाच्या डाळीचे वरण असते. पण हिचा वापर जास्त करुन, भारताच्या वायव्येलाच. दक्षिणेकडे प्रथिनांची कसर भरून काढण्यासाठी, तिचा तांदळाबरोबर संयोग झाला.

पण सहसा उडदाच्या डाळीचे पदार्थ करताना, ती भरपूर शिजवणे, फेट्णे, आंबवणे हे करावेच लागते. तसे केल्यावरच ती पचायला हलकी होते.

मी डाळ वापरून अल्पनाच्या रेसिपीनं केली.. जबरा झालेली..
खूप मजा आली खायला Happy
(हॉटेलमधे मिळते तशी नव्हती मात्र)

आता दिनेशदांच्या रेसिपीनं केली की परत इथे टाकेन

मी ही रेस्पि नेहमी मैत्रीणींकडे किंवा बाहेर खाल्लीय.

मस्त फॉटॉ ..दिनेशदा खरं कु़करच्या टिप्सबद्दल वेगळा धागा काढायला हवा Happy एकंदरित बर्याच लोकांना ते माहित नसतं. तो लोकसत्ताचा लेख वाचून मी शिटी न करता शिजवायला शिकले. .
मागच्या वेळी मटण पण न शिटी करता केलं. फक्त ते तसं नीट शिजेल ़का याचं प्रेशर मलाच जास्त आलं होतं बहुतेक...;)

ही डाळ करणार आहेच.. पण कुकरबद्दल चर्चा वाचुन ३-४ दिवसांपासुन शिट्टी न करता डाळी शिजवु लागलो आहोत आणि नीट शिजल्या पण गेल्या. फक्त वेळ जास्ती लागतो त्यामुळे ऐनवेळी करायचे टाळावे लागते(नाहीतर शिट्ट्या कराव्याच लागणार).

वेका.. इतना प्रेशर मत ले !! Lol
नुकताच एक कुकर घेतला ,' फ्यूचूरा" हॉकिन्स चाच आहे बहुतेक
हा कुकर शिटीच मारत नाही.. त्यामुळे प्रेशर आल्यावर गॅस बारीक करायला , अगदी बारीक लक्ष देऊन तिथेच उभं राहावं लागतं.. मला पसंत आहे हा कुकर पण बहुतेक मैत्रीणींनी रिजेक्ट केलाय या एका कारणामुळं

सॉर्री दिनेश्,अवांतरच झालं हे ..

Pages