दाल माखनी / लंगरवाली दाल + प्रेशर कूकर टिप्स

Submitted by दिनेश. on 22 April, 2013 - 05:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
हॉकिन्स कूक बूक आणि प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा , मस्त रेसीपी. उपयोगी टीप्स.
फोटो चूकून वेगळा टाकलात का?
एका पंजाबी मित्राने सान्गितल्या प्रमाणे, मी यात थोडे राजमा पण टाकते.

रेसिपी चांगली आहे, सोबत फोटो मात्र भलताच आहे Happy

कुकरबद्दलची माहितीही खासच. मी 'स्वयंपाकघरातले विज्ञान' वाचल्यापासुन माझ्या घरात कुकरच्या शिट्टीचा आवाज घुमलेला नाही Happy

मस्त रेसिपी. मी बरेचदा करते ही डाळ पण जरा वेगळ्या पध्दतीनं.

शिट्यांना आमच्या घरातही बंदी आहे पण जेवण करणार्‍या बायका शिट्या करतातच - कितीही सांगितलं तरीही. आणि ती बाई इंधनापेक्षा जास्त मोलाची असल्याने मी बरेचदा दुर्लक्ष करते. Happy

मस्त! एकदम डिटेलवार रेशेपी दिनेशजी. आणी कुकरच्या शिट्ट्यांबाबत सांगायचे तर " ये हुई ना बात ".:स्मित:

शिट्ट्यांबाबत माझा पण आधी हाच गैरसमज होता. आमच्याकडे मग हॉकिन्स फ्युच्युरा आल्यावर हायसे झाले. प्रेशर आल्यावर मग ५ मिनिटे वेळ बघुन मग बंद करणे हा कार्यक्रम झाला होता. नंतर श्री व सौ या मराठी मासिकात ( पाककृती विशेषांक ) कुकरविषयी सर्व माहिती परत नीट वाचल्यावर उलगडा झाला.

साबांना पण समजावुन सांगीतल्यावर त्यांना थोडे पटले आहे असे वाटते, कारण मधुन मधुन त्यांचाही शिट्ट्यांचा आग्रह जरा कमी झालाय.

दाल माकनी मी कधी खाल्लेली पण नव्हती अथवा केली पण नव्हती. आता तुमच्या सविस्तर कृतीने धीर आलाय. असु दे इकडे उन्हाळा, करायला पाहीजेच्.:स्मित:

फोटो छान!

चिनूक्सच्या 'अन्नं वै..' च्या एका भागात दाल-माखनीची कृती आहे, मी त्याप्रमाणे तीन-चार वेळा केली होती, फारच चविष्ट झाली होती. फक्त त्यात दिलेल्या प्रमाणाला पाव किलो लोणी सांगितलेले आहे, तेवढे लोणी घालणे अशक्य होते.

उडिद + चण्याची डाळ + हळद + हिंग व वरचे अर्धे वाटण व पुरेसे पाणी घालून हे सगळे प्रेशरकूकरमधे शिजवा.>>>> इथेही पुरेसे पाणी म्हणजे नेमके किती हे लिहिलेले नाही.

कूकरची शिट्टी होऊ दिली तर किती इंधन जाळलं जातं आणि नाही होऊ दिली तर किती हे कोणीतरी सप्रमाण सिद्ध करायला हवं.
कूकरची शिट्टी होऊ न देता पदार्थ शिजवणं हे फक्त डाळ (तुरीची आणि मुगाची) आणि भात यालाच लागू होतं. बाकी इंधन बचावासाठी इतर डाळी आणि कडधान्य शिजवण्यासाठी कूकरच्या शिट्ट्या करणंच योग्य असं माझं मत झालेलं आहे.

कुकरच्या शिट्यांबद्दल मी पण वर्षा जोशींच्या 'स्वयंपाकघरातील विज्ञान ' मधे वाचले आणि तेव्हापासून नक्कीच वेळेची आणि गॅसची बचत होते. फ़क्त मला हॉकिन्सच्या कुकबुक मधे असे वाचल्यासारखे वाटतेय की एक शिटी झाल्यावर गॅस बारीक करायचा.(शिटी हलायला लागल्यावर नव्हे) . शिटी झाली म्हणजे पूर्ण प्रेशर आलेले असते. कमला सोहोनींच्या 'आहारगाथा' मध्ये पण त्यांनी प्रेशर कुकरबद्दल खूपच चांगली शास्त्रीय माहिती सान्गितली आहे. या विषयावर इतक्या चांगल्या प्रकारे लिहिल्याबद्दल धन्यवाद दिनेशदा. तुमच्या रेसिपीज नेहमीच छान असतात.

मंज़ूडी, पुण्यच्या एका शाळेतील मुलीने तिच्या प्रोजेक्ट मधे हे दाखवलं होतं की नेहमीच्या स्वैपाकात कुकरचा असा एफ़िशिअंट वापर केला तर फ़क्त ३५ टक्के गॅस वापरला जातो. मी हे पेपरमधे वाचलं होतं. मुलीचं नाव आता आठवत नाही. पण बचत नक्की होते, विशेषतः बटाटे उकडताना आणि रोजच्या वरणभाताला!

कूकरची शिट्टी होऊ दिली तर किती इंधन जाळलं जातं आणि नाही होऊ दिली तर किती हे कोणीतरी सप्रमाण सिद्ध करायला हवं.
कूकरची शिट्टी होऊ न देता पदार्थ शिजवणं हे फक्त डाळ (तुरीची आणि मुगाची) आणि भात यालाच लागू होतं. बाकी इंधन बचावासाठी इतर डाळी आणि कडधान्य शिजवण्यासाठी कूकरच्या शिट्ट्या करणंच योग्य असं माझं मत झालेलं आहे.

अगं वर वावेने ज्या मुलीबद्दल लिहिलंय ते बहुतेक 'स्व.वि.' मध्येही आहे. मी तर कुठल्याही पदार्थासाठी - अगदी काळे वाटाणे सुद्धा जे शिजायला थोडे कठिण जातात - शिट्टी होऊ देत नाही. वाफेचा आवाज येऊ लागला की लगेच गॅस झिरोवर ठेवते. झिरोवर ठेवला की मात्र थोडे लक्ष ठेवावे लागते (शिट्टीमुळे लक्ष द्यावे लागत नाही, त्या आपले लक्ष खेचुन घेतात Happy ) बाईलाही शिकवुन शहाणे केलेय... Happy

माझी लेक तर म्हणते की आता शिट्टीची सवयच गेली... Happy

मामी, काय खास टिप ?
टुनटुन, लंगरमधे नेहमीच म्हणजे वर्षभर अशीच करतात. म्हणजे सध्यादेखील करता येईल आपल्याकडे.
मी हॉकिन्समधे काही काळ होतो. तिथे फॅक्टरीमधे प्रत्येक शिट्टी ( अर्थात वेंट वेट ) चेक केली जाते. एका भल्या मोठ्या कूकरच्या झाकणाला दहा वेंट ट्यूब्ज होत्या आणि त्याला प्रेशर मापणारे यंत्र होते. ठराविक प्रेशर आल्यावर दहाही शिट्ट्या एकाचवेळी वाजल्या तरच त्या पास होत. दहा शिट्यांचा एकसाथ आवाज प्रचंड होत असे.
तिथल्या तंत्रज्ञाला मी विचारले कि कसे सहन करतोस, घरी आम्हाला एक शिट्टी असह्य होते. तर तो म्हणाला
माझ्याकडे इयर प्लग्ज आहेत पण तूम्ही घरी शिट्टी का होऊ देता ?

मंजूडी, पाणी किती घालायचे ते उडिद भिजवलेले आहेत किंवा नाहीत आणि कूकरची साईझ यावर ठरते. बाकी, वावेने आणि साधनाने लिहिलेले आहेच.

मामी, काय खास टिप ?
>>> टिप काय हो दिनेशदा? माझी पद्धत फक्त वेगळी आहे इतकंच. उडीद, राजमा रात्रभर भिजत घालायचे. मग कुकरात तूप, जिरे, हिंग, किसलेलं (किंवा अगदी बारीक ज्युलिअन्स कापून) आलं टाकायचं. बारीक चिरलेले टोमॅटो टाकून दोनेक मिनिटं परतल्यावर त्यात उडीद्-राजमा घालून परतायचं. मग पाणी घालून, त्यात तिखट आणि मीठ घालून, नीट ढवळून झाकण लावून चांगली अर्धा तास तरी शिजून द्यायची. याकरता पाणी जरा जास्त लागतं. कुकर वाफ गेल्यावरच उघडायचा, डाळ चांगलीच जमून आलेली असते. यात अगदी थोडासा बेसिक गरम मसाला घालायचा. गरमगरम खायची.

जर इंस्टंट लंगरवाली दाल (डाळी न भिजवता) करायची असेल तर, आख्ख्या उडिदाच्या ऐवजी सालासकट उडदाची डाळ (काली दाल) घ्यायची. डाळीच्या निम्म्यापेक्षा कमी चण्याची डाळ. हिंग, मीठ, हळद घालून कुकरमध्ये या डाळी शिजत ठेवायच्या. बाजूला पॅनंमध्ये तुपाची फोडणी करुन त्यात जीरे, हिरवी मिरची, आलं-लसूण चिरलेलं, कांदा-टॉमॅटो वैगरे छान परतून घ्यायचं, धण्याची पुड आणि गरम मसाला घालायचा आणि शिजलेल्या डाळीत कुकरमध्ये हा मसाला घालून प्रेशर येईपर्यंत परत शिजवायचं.

ही अशी इंस्टंट मा की दाल किंवा मा चने की दाल आमच्याकडे आठवड्यातून एकदातरी होतेच (गावी तर आठवड्यातून ३-४ दा होते). नवरा या डाळीला पंजाब्यांची नॅशनल डाळ म्हणतो. Proud कालच रात्री केली होती ही डाळ.

ही डाळ बर्‍याचदा बिना-कांदा लसणाची पण करतात. स्पेशली आमच्याकडे करवा चौथला उपास सोडायला आणि दिवाळीला, मंदिरातल्या पुजेनंतरच्या गावजेवणात वैगरे करताना चण्याची डाळ न घालता फक्त उडदाची काळी दाळ घेवून कांदा-लसणाशिवाय करतात. मस्त लागते ती डाळ गरम गरम.

मंजू, या डाळींमध्ये साधारणतः तिपटीपेक्षा थोडं जास्त पाणी घालतात.

उडिद भिजवलेले आहेत किंवा नाहीत आणि कूकरची साईझ यावर ठरते.>>> कूकरची साईझ कोणतीही असली तरी भात शिजवण्यासाठी तांदुळाच्या दुप्पट पाणी घालावे किंवा धुतलेल्या तांदुळाच्यावर दोन अंगळं पाणी हे जसं सर्वमान्य आहे तसंच या डाळींसाठीही निम्मं, पाऊणपट, दुप्पट, अडीचपट, तिप्पट असं काहीतरी प्रमाण असेलच की...

अल्पना, खरेच त्यांना ती अतिप्रिय आहे.
मी हि डाळ, ओमान, केनया, भारत अशा अनेक देशांतल्या अनेक गुरुद्वारात खाल्ली आहे, आणि तिच चव अनुभवली.

मंजूडी,
कूकरची साईझ कोणतीही असली तरी भात शिजवण्यासाठी तांदुळाच्या दुप्पट पाणी घालावे किंवा धुतलेल्या तांदुळाच्यावर दोन अंगळं पाणी हे जसं सर्वमान्य आहे तसंच या डाळींसाठीही निम्मं, पाऊणपट, दुप्पट, अडीचपट, तिप्पट असं काहीतरी प्रमाण असेलच की...

म्हणजे एक कप तांदूळ १२ लिटरल्या कूकरमधे शिजवला तरी वर दोन अंगळं पाणी घालायचं ?
सॉरी, मला आपले प्रश्न कळत नाहीत ! माझ्यातर्फे पूर्णविराम.

दिनेशदा,

<उडिद + चण्याची डाळ + हळद + हिंग व वरचे अर्धे वाटण व पुरेसे पाणी घालून हे सगळे प्रेशरकूकरमधे शिजवा.> यातलं 'पुरेसे' म्हणजे किती असा प्रश्न आहे. Happy

दिनेश दा ..

फार टेस्टी दिस्तीये दाल.. एका पंजाबी मैत्रीणीने दिलेली टिप.. ही दाल ओवर नाईट भिजवा . एका वाटीला दोन लवंगा ही घ्या ( उडीद, छोले भिजवताना लवंगा घालाव्या त्यामुळे पोटात गॅस होत नाही) . दुसर्‍या दिवशी पाणी उपसून टाकून , फ्रेश पाण्यात दाल शिजवा..

<उडिद + चण्याची डाळ + हळद + हिंग व वरचे अर्धे वाटण व पुरेसे पाणी घालून हे सगळे प्रेशरकूकरमधे शिजवा.> यातलं 'पुरेसे' म्हणजे किती असा प्रश्न आहे.

>>>> मलाही वाटतं की असं प्रमाण नेमकं सांगणं कठीणच असतं. डाळ कितपत पातळ, जाड हवी आहे, किती वेळ कुकरमध्ये शिजणार आहे, कोणती डाळ आहे, शिजवल्यानंतर किती वेळाने जेवणार आहेत अशा अनेक गोष्टींवर ते अवलंबून असतं. आणि नेहमी स्वयंपाक करणार्‍याला ते तितपत साधारण कळतं.

एक अजून टिप : जर समजा ही डाळ जास्त घट्ट झाली तर त्यात चांगलं उकळतं पाणी घालूनच मग नीट घोटून गरम करावी. थंड पाणी घालू नये. हे कोणत्याही शिजवलेल्या पदार्थाला लागू होतं. माझ्या साबा नेहमी म्हणतात, ठंडे पानी का 'तासीर' अलग होता है और गरम पानी का अलग. तासीर म्हणजे इन्हेरंट क्वालिटी किंवा अंतर्भूत गुणधर्म. शिजवलेल्या पदार्थात गार पाणी घातल्याने त्याची मूळ चव बदलू शकते (म्हणे). जाणकारांनी अजून प्रखर प्रकाशझोत टाकावा.

परवा काही पाहुण्या येताहेत त्यांच्याकरता खास दिनेशदा स्पेशल दाल माखनी करते आता. Happy

माझ्या साबा नेहमी म्हणतात, ठंडे पानी का 'ताशीर' अलग होता है और गरम पानी का अलग. ताशीर म्हणजे इन्हेरंट क्वालिटी किंवा अंतर्भूत गुणधर्म. शिजवलेल्या पदार्थात गार पाणी घातल्याने त्याची मूळ चव बदलू शकते (म्हणे). >>>> हे माझ्या साबा पण म्हणतात. अगदी प्यायला कोमट पाणी हवं असेल तर पाणी कोमट करुन प्यायचं, गरम पाण्यात थंड पाणी घालून कोमट नाही करायचं, नही तो तासिर बदल जाती है म्हणे Happy

हो हो मामी.. साबांच म्हणण दुरुस्त है बिल्कुल..
तासीर महत्वाचीये.. मटन ,चिकन परतून झाल्यावर, शिजण्याकरता गरम पाणीच घालायचं , थंड टाकलं तर नॉन वेज ची चव कमी होते .. (म्हणतात)
सॉर्री दिनेश दा दाल मधे नॉन्वेज चा उल्लेख केल्याबद्दल

वरच्या फोटोत सोबत होल मील पराठे आहेत
<<
मी हे पटकन वाचताना 'हलाल मीट पराठे' वाचलं Proud
छान आहे रेसिपी.

माझ्या साबा चण्याबरोबर त्याचप्रमाणात राजमा सुद्धा घालतात! छान चव येते दोन्हिचि.
प्रेशर कुकरची माहिति नविनच मला. पुढच्या वेळि ट्राय करुन बघेन.

रेसिपी छान आहे ..

चिली ऑईल वगळता फोटोही मस्त ..

ते शिट्यांबद्दल (चुकीचा (?)) समज मला वाटतंय कन्व्हिनिअन्स् च्या कारणामुळे पसरला असावा .. एकदा कुकर लावला की शिटीचा आवाज आल्यावर जाऊन बारीक करायचं मग दहा मिनीटांनीं बंद असा साधारण भात करण्यासाठी आमच्याकडे संकेत होता .. शिटी होऊ देणं गरजेचं नाही हे जितकं खरं तितकंच सूँ सूँ आवाज येण्याची / शिटी डोलण्याची वाट बघत बसणं गैरसोयीचं असावं .. ह्यापेक्षा शिटी वाजली की असाल तिथे आपोआपच "आता बारीक करायला हवा गॅस" ह्याची आठवण होते ..

इंधन बचतीबद्दल इथे अमेरिकेत (प्रेशर कुकर वापरणं इथे विरळाच ) तर बर्‍याच जणांकडे इलेक्ट्रिक शेगड्या असतात .. माझ्या हॉकीन्स् च्या कूकरमध्ये तर मला प्रेशर तयार झाल्याचा आवाज आला की मी शेगडी पाशी पोचायच्या ५-६ सेकंद वेळेतही दोन शिट्या आपोआप होऊन जातात .. आच कमी केली तरीही होतात कारण इलेक्ट्रिक शेगड्यांवर हीट कन्ट्रोल करणं गॅस शेगड्यांइतकं सोपं नाही .. आणि मला तर खरंच प्रश्न आहे की शिटी होऊन जेव्हढं इंधन जास्त जळेल त्याच्या जास्त पट वेळ आणि शक्ती शिटी होऊ न देण्याच्या खटाटोपात जाईल .. (ऑपॉर्च्युनिस्टीक कॉस्ट च्या संदर्भात विचार केला तर) ..

तेव्हा शास्त्रीय दृष्ट्या शिटी करणं गरजेचं नसलं तरी प्रॅक्टीकली ते कितपत जमणं शक्य आहे कळत नाही ..

एव्हढं प्रवचन झालं पण तरिही पुर्वी गजरा की कशात "सोळा शिट्यांचं लिंबाचं झटपट लोणचं" अशा कुठल्या तरी रेसिपीची खिल्ली उडवली होती त्याचं हसू येतं .. Lol

Pages