पंच लाईन - प्रेक्षकाच्या मनातली

Submitted by अवल on 17 April, 2013 - 00:03

काही जाहिराती बघताना, चित्रपट-नाटक बघताना प्रेक्षकाच्या मनात काही पंच लाईन्स उमटतात. त्या इथे लिहूयात.
सध्या जाहिरातीत तर इतक्या गमती जमती असतात की रोज काही ना काही घरात गमतीशीर संवाद होतातच.

ते इथे लिहू, वाचू, थोडे हसू Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. सध्या रेड लेबलची जाहिरात प्रसारित होतेयः
मुलगा कॉलेजला चाललाय. आई विचारते, "लंचचे काय?" स्वत:च उत्तर देते... कॉलेज मे खाऊंगा....डिनर?....फ्रेंडकेसाथ...चाय... मुलगा लगेच येऊन चहा पितो . तो आणि त्याचेच वाक्य आई एकत्र बोलतात... मा तुम्हारी हाथ की चाय.... आई, बाबा, लेक सा-यांचे अतिसमाधानी चेहरे...जाहिरात संपता संपता माझ्या तोंडून सहज निघाले.... " गधडे उठ डबा दे त्याला..."

. अजून एक जाहिरात. व्हिम बार ची
गृहिणी मॉल मध्ये खरेदी करत असते. साक्षी तन्वर अचानक भेटते, विचारते " महिने भर का राशन? ये लो महिने भरका व्हिम बार "... मग अजून काही "प्रेमळ " संवाद.... मग साक्षीचे चॅलेंज... ये एक बार महिने भर चलेगा... सीन चेंज... महिना उलटला...साक्षी घरी येते... गृहिणी आनंदाने ओतप्रोत...या बसा न म्हणता डायरेक्ट किचन कडे..."मै चाय लाती हू...अरे चिनी खतम..." साक्षी चक्क घरात-स्वयंपाक घरात घुसून, सिंक पाशी छान बिन करून " पर व्हिम अभितक चल रहा है..." कित्त्येक वर्षांच्या मैत्रिणी अति समाधानाने हसतात.... माझ्या मनात पंच लाईन तरळते " मग बैस, उकळते पाणी देते कपात; डुबवून खा तो राहिलेला व्हिम बार ! "

आमच्या लहानपणी मोबाईल फोनच काय, रेडिओही नव्हते. नवरा बायकोची भांडणे व्हायची ती मुलगा कितवीत आहे हे बाप विसरल्यामुळे वगैरे. काही वेळा आपल्याला किती मुले आहेत हेही बाप विसरल्यामुळे काही वाद झालेले स्मरतात. आज टी व्ही वर पाहतो तो एक कार्टं आई बापाचे फोन बदलतं आणि स्वतःवरच खुष होतं. नुसते एकमेकांचे फोन घेतल्यामुळे ज्यांना एकमेकांवरील जबाबदारीची जाणीव होते व ज्यांना ती जाणीव फोनशिवाय होऊ शकत नाही ते या युगातील मूढ आई बाप पाहून कार्टं असंच असणार हे मान्य होतं. दोन थोबाडात ठेवाव्याश्या वाटतात त्या कार्ट्याच्या. ते कार्टं म्हणालं व्हॉट अ‍ॅन आयडिया की म्हणावसं वाटतं ऑफ किकिंग यू आऊट ऑफ होम फॉर एव्हर

गेट अ‍ॅज लकी अ‍ॅज धिस अ‍ॅस्ट्रॉनॉट ही पंचलाईन पाहिली की माणूसकीने मुलीला शार्कपासून वाचवण्यापेक्षा विशिष्ट अत्तर लावणे हे मुलीला जाळ्यात पकडण्यास सोपे जाते हा नालायक विचार कसा ठसवला जात आहे हे आठवून तिडीक जाते मस्तकात. अश्या वेळी म्हणावंसं वाटतं की 'ऑर मेक दॅट शार्क लकी बाय नॉट सेव्हिंग द गर्ल'

डूबवून हा शब्द वाचून तिलकधारीच्या कपाळावरील आठ्यांचे जाळे अधिक क्लिष्ट झाले. डुबाके या हिंदी शब्दाचे मराठीकरण करण्यापेक्षा बुडवून म्हण. डुबवणे हे ठकवणे या अर्थी आहे.

तिलकधारी निघत आहे.

कोणे एके काळी सरकारने संततीनियमनाच्या जाहिरातींचा दूरदर्शनवरून भडीमार लावला होता. त्या काळची गोष्ट आहे. अशाच एका वारंवार दिसणार्‍या एका जाहिरातीत एक जोडपे महाबळेश्वराच्या वेण्णा तलावात पायनावेने (paddle boat) फेरफटका मारतांना दिसे.

त्यावेळी ठाण्याला रहात होतो. तिथे नौकाविहारात अशाच पायनौका आणायचं ठरत होतं. मग आम्ही चावटपणे म्हणायचो की हे नि##च्या जाहिरातीत दाखवतात, पण यावर केवळ पुरुषांचीच मक्तेदारी नाही बरंका! मग हे विधान दूरदर्शनवर कुठेही पायनावेचे दर्शन झाल्यास तोंडातून बाहेर पडे.

-गा.पै.

प्रिया गोल्ड बटरबाईट बिस्कीट

आजुबाजुच्या बायका नवरीला चेहरा दाखवण्यासाठी हिर्याचा हार ...मोटर कार काय काय आमिष देतात पण नवरी मागते ५ रुपये...का तर तिला ५ रुपयाची प्रिया गोल्ड बटरबाईट बिस्किट हवी असते...
मनात येतेकी..भिकारीन ती भिकारीनच राहीली Wink इतके काही मिळत होते..... तरी ५च रुपये मागितले

जाहिरात लाईफबॉयची. लहान मुलगा अंगाभोवती रग वगैरे कायतरी गुंडाळुन बसलाय, चेहेरा लाल, सारखा खोकतोय. त्याचे पप्पा चिंतातूर होऊन त्याच्या कडे आणी स्वतःच्या डॉ. मित्राकडे पहात असतात. तेव्हा तपासुन डॉ. मित्र चक्क म्हणतो. मागच्याच वेळी मी आलो होतो, पण हा रोज अंघोळ करतो ना?

माझ्या मनात "मग काय तू सांगीतले नसते तर तो आठवडाभर पारोसाच बसला असता का"?:अओ::राग::फिदी:

आणी तसेही लाईफबॉयने अंघोळ केली तरच का ती खरी अंघोळ? बाकी काय दुष्काळातला गजरा?:खोखो:

ग्राइपवॉटर का तसल्याच कशाची एक जुनी जाहिरात ज्यात चार पिढ्यांतल्या बायका होत्या.
सगळ्यात लहान - तान्ही मुलगी रडायला लागायची. तिची आजी तिच्या आईला "अगं ग्राइपवॉटर दे तिला. तू लहान असताना मीही तुला हेच द्यायचे."
लगोलग पणजीही हाच डायलॉग मारायची.
दूरदर्शनवरच्या गजरा किंवा तत्सम कार्यक्रमात ही पंचलाइन :" अगं कानाखाली दे तिला . तुझ्या लहानपणी मी हेच करायचे." अशी केली गेली.

या ग्राईपवॉटरच्या जाहीरातीवर माझ्या सासुबाई जाम खवळतात (मला मनातुन लई मज्जा येते.:फिदी:) कारण त्यांचे म्हणणे असे की त्या मुलीची आई, तिची आजी म्हणजे सगळी माहेरचीच का माणसे? सासरची का नको? ( माझी मिथुन किंवा कन्या सारखी मार्मिक रास असती तर मी लै खवचट उत्तर दिले असते त्यांना.:खोखो: )

ग्राइपवॉटर का तसल्याच कशाची एक जुनी जाहिरात ज्यात चार पिढ्यांतल्या बायका होत्या.
<<< 'गुडबर्स' द्यायला सांग तिला, असं ऐकायला यायचं. (पण ते नक्की काय आणि बाळाला दिल्यावर ते रडायचा का थांबतं हे अजूनपर्यंत कळले नाही.)
पण आमच्या मनातही अशीच पंचलाईन यायची - कानाखाली जाळ काढ तिच्या. तू लहान असताना मीही तेच करायची.)

ग्राईअपवॉटर हा प्रकार आमच्या पालकांनी आम्हाला कधी दिला नाही त्यामुळे त्याच्याबाबतीतही प्रचंड उत्सुकता असायची.

शेतकरी हेल्पलाइनची आकाशवाणीवरची जाहिरात.

स्त्री स्वर :अरं द्येवा आता काय करू कुटं जाऊ?
पुरुष स्वर :अगं कसला घोर हाय वयनी?
स्त्री स्वरः शेतीचाच घोर हाय भाऊ. चिंगीचा बा असता तर त्यानं समदं निस्तरलं असतं. आता मी एकली कुटं जाउ?

माझ्या मनातली पंचलाइन : कुठे काय निस्तरतोय. दारू पिऊन कुटंतरी पडला असता.

आणी माझा चुलतभाऊ म्हणायचा कानाखाली पावशा मार तिला.:फिदी: ( पावशा म्हणजे तो ढेकुण डास मारायचा रॉकेलचा पंप.)

>> 'गुडबर्स' द्यायला सांग तिला, असं ऐकायला यायचं.
वुडवर्ड्स ते गजाभाऊ. Happy
तान्ह्या बाळांना देतात. तुम्हाला दिलं असेल तरी तुमच्या लक्षात नसण्याची शक्यता आहे. Proud
आणि विकतचं दिलं नसलं तरी शोपा-वावडिंगांचं पाणी नक्कीच प्यायला असाल. Happy

>> जाहिरात संपता संपता माझ्या तोंडून सहज निघाले.... " गधडे उठ डबा दे त्याला..."
अवल, आता काळ बदलला आहे, लिंनी व्हा बरं. Light 1

ओह, ते वुडवर्ड्स का? धन्यवाद, बाई.

शोपा-वावडिंगांचं पाणी नक्कीच प्यायला असाल. <<< शक्यता आहे. आजीबाईच्या बटव्यातल्या लहान मुलांच्या औषधांविषयी आमच्या आऊसाहेबांना भारी जिव्हाळा आणि विश्वास.

उप्प्स्स्स.....
पंच लाईन - प्रेक्षकाच्या मनातली हा धागा आहे का?
मला मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती ह्या धाग्यावर आल्या सारखं वाटल Proud

स्वाती, अग तिचा तो तोरा पाहून मनात आलं ग Happy
म्हणजे ही मस्त आरामात जरा इकडची तिकडे काडी न हलवता उगाचच लेकाच्या कॉमेंट्स वर कॉमेंट मारायची याला टोला तो.
रच्याकने , बापाने हीच वाक्ये, अशीच टाकली असती तर " गधड्या उठ, डबा दे त्याला " अशी पंच लाईन आली असती. Light 1