पंधराशे हॅरीसन - रोलर कोस्टर

Submitted by Barcelona on 9 April, 2013 - 11:16

(अन्यत्र पूर्वप्रकाशित)

काचेच्या अंक्वेऱियममध्ये राज आणि जेनी, जेनीचा betta फिश घेऊन आलॆ. राज माझा एकुलता एक लेक, जेनी त्याची पहिली स्टॆबल गर्लफ्ऱॆंड आणि तिचा तो एकुलता एक ‘बेटा’ फिश. ‘जेनीची परीक्षा संपेपर्यंत सांभाळ’ म्हणून त्या माशासाठी, राज मला गळ घालत होता. सासरच्या कुत्र्याला हाड् म्हणू नये हे ऐकले होते, पण गर्ल फ्रेंडच्या माशाला कसे वागवावे हे कुठे ऐकले नव्हते. म्हणून जेनीची परीक्षा संपेपर्यंत पुढचे ६ आठवडे ह्या माशाची काळजी घ्यायला मी तयार झाले. त्या माशाचे नाव निमो ठेवायचे की मॉली ह्यावर राज आणि जेनीचं एकमत नव्हतं.... त्या गोंधळात तो मासा दोन वर्षाचा होऊन गेला होता, म्हणजे सरासरी दोन-चार वर्ष जगणाऱ्या बेटा फिशच्या दृष्टीने हा मध्यमवयीन होता तर. पण माशांना बहुतेक कल्ले-दुखी, शेपूट-वात असे आजार होत नसावेत. त्यामुळे हा पठ्ठा अगदी आरामात पोहत होता. संधीवाताने दुखऱ्या माझ्या बोटांना त्याचा क्षणभर हेवा वाटला. fluroscent ब्लू रंगाच्या त्या माशाचे नाव मी मनोमन 'निळोजी' ठेवले.
ते दोघं गेले आणि माझ्या सहकारी मेलिसाचा कॅम्पिंगला बोलावण्यासाठी फोन आला. मी तिला सांगितलं, "नाही ग, जेनीच्या बेटा फिशला सोडून असं आठवडाभर नाही येता येणार." मेलिसा उद्गारली, "ओह माय माय! एकदम सिरिअस दिसतायत. आरती, तुला माहित नसेल म्हणून सांगते - काहीवेळा इथे कपल्स मुलं होऊ देण्याआधी एखादा प्राणी एकत्र पाळतात. आपला पार्टनर आणि त्याच्या घरचे किती केअरिंग आहेत हे कळून येते. माझ्या मेलानीचा boyfriend कधी तिच्या मांजराला खाऊ घालत नसे. ते मांजर मेलं तेव्हा त्याची बहिण गावातच होती पण फोन नाही केला कि आली पण नाही. बरच झाला त्या boyfriend च आणि मेलानी चा ब्रेक-अप झाला. तू मात्र ...." तिचं पुढचं बोलणं ऐकण्या आधीच मी माझ्या विचारात गढले. जेनी गोड मुलगी होती. सैपाकाचा कंटाळा होता पण तो तिच्या वयाचा दोष. बाकी रंग, धर्म आणि भाषा वेगळी असली तरी सगळ्यांशी ती आपुलकीने वागत असे. मी निळोजीला निरखू लागले. त्याचा रंग जेनीच्या डोळ्यांसारखा निळा असला तरी त्याचे डोळे माझ्या राजसारखे काळे होते. बेटा फिशच्या मानाने निळोजी जरा मोठाच होता, जसा माझा राज भारतीय मुलांमध्ये मोठा वाटायचा. पण ह्या निळोजीच्या अक्वेरीम समोर आरसा ठेवला कि तो गिरक्या घेत असे - अगदी जेनी सारख्या. मी ठरवले जेनीला तक्रार करायला जागा द्यायची नाही. राघवन माझा नवरा. जेव्हा तो घरी आला तेव्हा मी त्याला सारे समजावले. त्याने आधी सोयीस्कर दुर्लक्ष केले. मग म्हणाला "मासा हा खाण्याचा विषय आहे, संगोपनाचा नाही. यू आल शूड नो दाट!" मी त्याला निक्षून सांगितलं "असं घरात राहून माशाशी वैर बरं नाही!"
निळोजीला निरखण्यात माझी सकाळ-संध्याकाळ मजेत जात असे. पण काल निळोजी अचानक असा तिरपा झाला आणि पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगताना त्याच्या हालचाली मंद मंद वाटत होत्या. मी तातडीने राजला फोन केला. तोही ताबडतोब आला. आधी त्याने माझ्यावरच कस ‘केअरिंग’ असल पाहिजे ह्याबद्दल तोंडसुख घेतलं. अरे कार्ट्या! अडीच किलोचा अडीचशे पौंड झालास ते माझ्याच केअरिंग मुळे ना ... पण असो ते सांगण्याचा क्षण हा नोहे. राजने गुगल वरून माहिती काढली - त्याच्या मते निळोजीला Constipation झाले होते. मध्यमवय कोणाला सोडत नाही हेच खरे. राजच्या मते निळोजीला रोज एक उकडलेला वाटणा खाऊ घातला पाहिजे. मी Toothpick वर वाटणा लावून रोज अक्वेरीम मध्ये धरू लागले. निळोजीला माझ्या दुखऱ्या बोटांची दया येत नसे. तास सव्वा तास वाटणा धरावा तेव्हा तो संपवत असे. राज आणि जेनीच्या मुलांना मला भरवावं लागेल का? माझ्या दुखऱ्या बोटांचा थोडा विसर मला पडला. पण वाटणा खात असला तरी निळोजीची तब्बेत एकूणच मला तोळा-मासा वाटत होती.
आता ३ दिवसांनी निळोजी परत जेनीकडे जाणार होता. आज सकाळी मी कॉफी घेऊन त्याला गुड मोर्निंग म्हणायला गेले तर ..तर निळोजी हे जग सोडून गेला होता. जेनीची आता नक्कीच खात्री होईल कि राज ची family अन्केअरिन्ग आहे! तिला फोन करणे योग्य नाही. निदान एक व्यवस्थित funeral करावं शनिवारी. जेनीला बरं वाटेल. राघवन कॉन्फरेंस साठी गेलेला. शुक्रवारशिवाय तो येणार नाही. एकूण मलाच सगळ बघावं लागणार. येण्या-जाण्याचा क्षण आपल्या हातात नसतो. असतं ते फक्त प्रेमपूर्वक स्वागत आणि सन्मानपूर्वक निरोप. भारतीय संस्कृतीत आगमनाचा सोहळा बायकांचा तर निरोपाची जवाबदारी पुरुषांची. पण आता हे funeral मलाच organize करावं लागणार होतं. मी आधी निळोजीला बर्फाच्या box मध्ये घालून फ्रीझर मध्ये टाकला. माशाचे funeral मी बिल कोसबी शो मध्ये पहिले होते - toilet flush करून. छे!! आधीच तिला निमो हे नाव आवडत नाही. त्यातून त्याला ड्रेन मध्ये निमोसारखे पाठवायचे. त्यापेक्षा त्याला गुलाबाच्या रोपाखाली पुरुया. गुगल वर काही अजून आयडिया मिळतात का ते पाहू लागले. Fish funeral kit मिळतं म्हणे. ५०% discount हि होता. पण नकोच मी स्वतःच box सजवते. माझा एक परफ्युम चा box मी घेतला. अमेरिकेत माशांचं पण नशीब उघडता. गीवान्शे चं कोफिन! राजचे आर्ट चे समान घेऊन मी एक सुंदर मासा मी काढला. खरंच मी परत स्केचिंग सुरु करायला हवं. एखादी माशाबद्दल कविता मिळेल का कुठे? त्या ऐवजी मेलिसा कडून एखादा 'हायकू' घ्यावा. निळोजीचं निरोप घेताना उगीच दुःखाच प्रदर्शन नको. काळ्या ऐवजी प्रिंटेड ड्रेस घालीन. निळोजीचं एक फोटो आत्ताच काढला पाहिजे. मुलांना दाखवायला राज-जेनी ने scrap बुक सुरु केलं तर 'अवर फर्स्ट पेट' म्हणून फोटो लावता येईल. माशाच्या funeral ला सीफूड करणं बरं नाही दिसणार. वेज कटलेट आणि फ्रुट सलाड केलं कि झालं. राघवन आला कि घालेल राज ची समजूत. रसेल पीटर्स च्या बापासारखा नाहीये माझा राघवन. राज सावरला कि घेईल जेनीची काळजी.
शुक्रवारी दुपारी राघवन आला. कॉफी झाल्यावर मी त्याला सगळं सांगितलं. box , ड्रेस, cutlet , स्क्रापबुक अशी सगळी तयारी दाखवली. राज टीन एजर असताना जसा डोळे फिरवून खांदे उडवायचा, तसा क्लासिक आय रोल आत्ता राघवनने केला आणि म्हणाला " पटकन तयार हो, Let's just get another stupid blue betta fish. betta fish थोडीच सांगतो तो मी नव्हेच. मला समजत नाही आरती तुझं प्रेम कशावर आहे - मुलावर कि त्या माशावर कि ह्या असल्या सोहोळ्यांवर!" Roller coaster संपल्यावर जसं हसू येतं तस ओशाळ हसू मला आलं. खरंच माझं प्रेम कशावर आहे - निदान ह्या क्षणी राघवन वर!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा भाग नाही आवडला. लिहीला झकास आहे. विनोद मस्त आहेत.

पण आरतीच्या व्यक्तिरेखेतले बदल नाही आवडले.
मागच्या दोन भागात आरतीला व्यक्तिमत्व होते, आणि विचार करण्याची कुवत होती. यात तिला उगाचच बळेच टिपिकल बायकी बावळट झाक दिल्यासारखी वाटली.

मागच्या दोन भागात आरतीला व्यक्तिमत्व होते, आणि विचार करण्याची कुवत होती. >> Happy मान्य!
मला स्वतःला एखाद्या भागातील 'आरती' आवडणे allowed असेल तर मला 'शोध' मधली आरती आवडते...

मागच्या दोन भागात आरतीला व्यक्तिमत्व होते, आणि विचार करण्याची कुवत होती. यात तिला उगाचच बळेच टिपिकल बायकी बावळट झाक दिल्यासारखी वाटली.>>> काय कळले नाही बा काय म्हणायचे आहे ते. मोस्ट्ली आई-मुले नात्याभोवती, टीनएजर मुलं असलेल्या आईच्या तिन्हि गोष्टी आहेत, त्यानुसार मूळ मुद्द्याला धरून वाटते. त्या-त्या वयात ते ते बदल होत असावे स्त्रीमधे अस वाटत..... ते बदल व्यवस्थित टिपले आहेत की... आरती फक्त 'आई' म्हणून विचार करते हे बायकी कसे झाले.... लेखिकेने उगिच अनुमोदन दिले... मला तरी पूर्ण कथा normal वाटली .... अस घडू शकतं.

आणि असं घडलं आहे.
आम्ही आमच्या पोपटाला असाचं Funeral दिला होता तेही चक्क भारतात. कोणाच्या सुखासाठी कोण काय करेल ह्याची काही कल्पना नाही....................
मी आज पुन्हा एकदा वाचुन काढली.

राजसी +१
आरती बायकी बावळट वाटली? तो राजही बिचारा मैत्रिणीच्या माशासाठी इतका जीव टाकतोय तो नाही का बायकी बावळट वाटला? सगळ्यांनी काय विनोदबुद्धी वगैरे गुंडाळून सारखं तलवार उपसून जगण्यातच 'पुरुषार्थ' मानायचा का!
इथे उल्लेख आला म्हणून 'शोध' पुन्हा शोधून वाचला. आपला मुलगा टॅटू काढून घेणार की काय म्हणून (“अरे, आपल्यात ना Sही गोन्दावत”) कावरीबावरी झालेली आई! त्यात काय व्यक्तिमत्त्व आणि विचार करण्याची कुवत दिसली जी इथे दिसली नाही ही शोध घ्यायचीच बाब वाटते आहे आता!

सिमंतिनी, खूप आवडलं . सा.बा. ना वाचून दाखवलं तर त्यांन त्यांच्या मैत्रीणींच्या ग्रुपला वाचून दाखवायच आहे म्हणाल्या. तुमची परवानगी असेल तर प्रिंट आउट काढुन, तुमच्या नावाचा उल्लेखानिशी वाचलं तर चालेल?

त्यात काय व्यक्तिमत्त्व आणि विचार करण्याची कुवत दिसली जी इथे दिसली नाही ही शोध घ्यायचीच बाब वाटते आहे आता!>>> मी सांगू..मी सांगू..एका भागात मुलीचा बेक सेल सोडून गेलेली आई (तरी बरं ती पूर्ण वेळ त्याचाच विचार करत असते... पण त्याच्यामुळे सासू-नवरा कामाला लागले नां ..) आणि दुसर्‍या भागात नवर्‍याने एकदा आवरलेली मुलाची खोली .. जय स्त्रीमुक्ती Sad ह्या भागात ना ती नोकरीला जाताना दाखवली ना नवरा माश्याची काळजी घेताना .... उगिचच आपलं संधिवाताचं तुणतुण पुढे करत का होईना माश्याची काळजी घेतली.... मासा replace करायच तिच्या नवर्‍याच्या आधी नाही ना लक्षात आलं (बायका इतक्या सहजासहजी things replace करत नाहीत living or non-living too) ..... "ते व्यक्तिमत्त्व आणि विचार करण्याची कुवत" हो!

ऑर्किड: Happy वाचा जरूर. दाद: थान्क्स Happy

स्वाती_आंबोळे: शोध गोष्ट गोन्दाण्याबद्दल आहे, पण तशीच ती आपला मुलगा मोठा झाला हे स्वीकारण्याची ही आहे. ते सहज जमल पाहिजे. मला स्वतःला वेळ येईल तेव्हा जमेल अशी खात्री वाटत नाही. म्हणून त्या गोष्टीतील आरती मला आवडते.
ह्या गोष्टीत आरती मनाला रोलरकोस्टर वर पाठवते, 'माइंडफुलनेस' नाहीये म्हणून तिथे विचार करण्याची कुवत नाहीये. बायकी किंवा पुरुषी ह्या बद्दल मला काही मत नाहीये. पण रैनाने जे 'विचार करण्याची कुवत' नाही हे मांडले त्याच्याशी मी सहमत आहे....

तृष्णा, वंदना: Happy घरातील 'पेट' मरणे आणि मुले लहान असणे, मी काय बोलणार. तुम्ही बेस्ट आया आहात...

हे आपलं असचं general info. around same line>>>>

आपल्याला जमेल ना नक्की? घरी मुलगी राहील ना नीट? आधीच स्वतःसाठी अशी एक आत्यंतिक गरजेची नसलेली सुट्टी घेणे, त्यात आणि लहान मुलीला घरी ठेवून, म्हणजे अपराधीपणाचे कडवट, मुरलेले, उग्र लोणचे. 'अँटी-हिरकणी सिंड्रोम' इथपावेतो येडचॅपपणाची आणि स्वनिर्भत्सनेची मजल जाऊन पोचली. 'तू गेली असतीस?' असे कोणाही बाईला विचारण्याइतपत घोळ घातला. 'मी नसते जाऊ शकले, पण तू जा' अशी उत्तरे येऊ लागली तसा Guilt Quotient चा पारा उपकरण फुटेस्तोवर चढू लागला. पारा चढला की त्रास नुसता. घालमेलडॉटकॉम. मग नवरा तापमान उतरवण्याचे काम 'पेप टॉक' देऊन इमानेइतबारे करी. शेवटी त्याचा 'कोणाला काहीही विचारायची गरज नाही' हा सल्ला मानला. 'बाळ माझ्याशिवाय राहील ना नीट' ही दुधारी तलवार असते. दोन्ही बाजूने वेदना.

सिमंतिनी, तुमच्या मताचा आदर आहे.
पण खरं सांगायचं तर मी जरा डिसअपॉइन्ट झाले खुद्द लेखिकेनेच असं म्हणावं हे वाचून.

गोंदावण्याबाबतही काही क्षण तुमची आरती गडबडून गेलीच होती. इथे ते गडबडणंच जरा विनोदी पद्धतीने एक्सप्लोअर केलं गेलं इतकंच. त्यातला वेडेपणाही एकीकडे तिला कळत नसता तर हा 'वृत्तांत' इतका मजेशीर झालाच नसता. जे राघवनने शेवटी सांगितलं ते तिलाही एका पॉइन्टला सुचलंच असतं याची खात्री वाटावी इतकी स्मार्ट ती तिच्या थॉट प्रोसेसमधून दिसतेच आहे. राघवन मुळातच या (एका पर्टिक्युलर) गोष्टीपासून अलिप्त राहिला होता म्हणून त्याला लवकर सुचलं इतकंच. 'शोध'मधे तोही मासिक सापडल्यावर प्रथम गडबडला होताच.

>> ह्या गोष्टीत आरती मनाला रोलरकोस्टर वर पाठवते, 'माइंडफुलनेस' नाहीये म्हणून तिथे विचार करण्याची कुवत नाहीये
या गोष्टी म्हणजे क्विक स्नॅपशॉट्स आहेत. जुना अल्बम काढून त्यातले फॅमिली फोटोग्राफ्स बघत बसावं तसे. एका फोटोत आरतीचे मजेशीर वेडपट हावभाव कॅप्चर झाले असतील, एखाद्यात राघवनचे आणि लहान म्हणून कदाचित कित्येक फोटोंमधे राजचे. तर एखाद्या फोटोत सगळेच शहाणे तत्त्ववेत्ते दिसतील. त्यावरून आपण त्यांची पॅकेजं ठरवायची का?!

असो. तुमच्या लेखाबद्दल मी तुम्हालाच सांगणं बरं नव्हे, पण लेख जितका आवडला तितकाच तुमचा तो प्रतिसाद निराशाजनक वाटला हा अभिप्राय नोंदवणं आवश्यक आहे.

हा अभिप्राय नोंदवणं आवश्यक आहे. >> थान्क्स, आरती जशी डेव्हलप होतीये, तशी मी ही एव्होल्व्ह होतीये Happy मते, अभिप्राय देत रहा...

तुमच्या लेखाबद्दल मी तुम्हालाच सांगणं बरं नव्हे, पण लेख जितका आवडला तितकाच तुमचा तो प्रतिसाद निराशाजनक वाटला.>>>+१

स्वाती, अख्या पोस्टला पूर्ण अनुमोदन.>>>+१

स्वाती_आंबोळे +१
एवढ्या लाइट हार्टेड आणि मस्त किश्श्याचा कीस नको पाडुया आता.

सिमन्तिनी, अजून एपिसोड्स लवकर येउ दे.

स्वाती, पोस्ट आवडली.

एवढ्या लाइट हार्टेड आणि मस्त किश्श्याचा कीस नको पाडुया आता. >>> असं नाही वाटत मला. कुठलंही लिखाण हे थोडंफार आरशासारखंच. वेगवेगळी प्रतिबिंबं दिसतात लोकांना. त्यामुळे अशी मतमतांतरे वाचायला मजा येते Happy

त्यामुळे अशी मतमतांतरे वाचायला मजा येते >> ती मला पण येतेच अगो. एस्पेशली स्वातीचं नेमक्या साध्या सोप्या शब्दात विचार थेट मांडायचं कौशल्य मला फार्च आवडतं.

पण माबोवर (किंवा जनरली ऑनलाइन) मस्करीची कुस्करी व्हायला वेळ लागत नाही आणि मतमतांतरं फारच चटकन वादावादीत रुपांतरीत होतील की काय अशी भिती वाटते.

एस्पेशली स्वातीचं नेमक्या साध्या सोप्या शब्दात विचार थेट मांडायचं कौशल्य मला फार्च आवडतं. >> +१ एखाद्या फोटोत सगळेच शहाणे तत्त्ववेत्ते दिसतील >> ... तो फोटो काढला पाहिजे उकरून आता Happy

सिमन्तीनी,
धन्यवाद. तुझा अभिप्राय आवडला आणि पटला. पुढील भागाची वाट पहाते आहे.

राजसी,
धन्यवाद. जूने लेखन वाचायची तसदी कोणी घेईलसे वाटले नव्हते. दिल भर आया. Proud

अरे, थँक्स, पण इथे डिस्कशन फक्त लेखाबद्दलच करू या. Happy

>> तो फोटो काढला पाहिजे उकरून आता
सिमन्तिनी, वाट पाहते. Happy

रैना,

वाचलं तेंव्हाच होतं आत्ता फक्त आठवणीनी copy + paste केलं .... so नो धन्यवाद needed as it was not a तसदी Happy

इथे डिस्कशन फक्त लेखाबद्दलच करू या>>>+१

Pages