चालला आहे कशाचा खल इथे -तरही

Submitted by वैवकु on 14 April, 2013 - 00:42

शांततेसोबत कशी कलकल इथे
चालला आहे कशाचा खल इथे

चल हिमालय व्हायची इच्छा धरू
वैभवा कित्येक संह्याचल इथे

हा कशाचा दाह आहे नेमका
वाटते आहे किती शीतल इथे

याच जागी येत जाऊ यापुढे
चालतो माझातुझा अंमल इथे

मी कितीदा सर्च करतोही तुला
विठ्ठला पण गंडते गूगल इथे

-----------------------------------------------------
चालला आहे कशाचा खल इथे - डॉ.साहेबांची ओळ
इथे पहा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा कशाचा दाह आहे नेमका
वाटते आहे किती शीतल इथे

याच जागी येतजाऊ यापुढे (येत जाऊ हे शब्द वेगळे लिहाल का कवी वैभव?)
चालतो माझातुझा अंमल इथे

छान.

गूगलचा शेर अत्याधुनिक भक्तीतंत्रावर आधारीत दिसतो.

कळावे

गं स

धन्यवाद गं स जी

'येत जाऊ' असे केले आहे

गूगलचा शेर >>>> जरूर ! आपणास हवे तर तसेही म्हणू शकता

पुनश्च धन्स

मी कितीदा सर्च करतोही तुला
विठ्ठला पण गंडते गूगल इथे

-----/\-----

मस्त. आवडले वैभव .
लिंकवरच्या फोटोत पवारद्वयी आहे ना ? तोही संदर्भ शोधत होते..

गूगलचा शेर अत्याधुनिक भक्तीतंत्रावर आधारीत दिसतो>>>+१

चल हिमालय व्हायची इच्छा धरू
वैभवा कित्येक संह्याचल इथे>>>
तसे सगळेच भारी पण हा वाटे जरतारी ...
शुभेच्छा!!

गझल मस्त झाली आहे वैभवराव…

याच जागी येत जाऊ यापुढे
चालतो माझातुझा अंमल इथे
सुंदर…

शुभेच्छा.

>> याच जागी येत जाऊ यापुढे
चालतो माझातुझा अंमल इथे
मस्त.
सह्याचल हवं ना ते? स वर अनुस्वार नको असं वाटतंय. Uhoh

वैवकु
तुझ्या विठ्ठलाच्या शेराचे बौस्वाहक्काचे इथे उल्लंघन झाले आहे का हे सांग. असल्यास सेटलमेंट कशी करायची ते सुचवणे.
http://www.maayboli.com/node/42479

हा कशाचा दाह आहे नेमका
वाटते आहे किती शीतल इथे>>> चित्तरंजन ह्यांची सहज आठवण झाली.

याच जागी येत जाऊ यापुढे
चालतो माझातुझा अंमल इथे

छान शेर आहेत. गझलही बरी झालीय.

याच जागी येत जाऊ यापुढे
चालतो माझातुझा अंमल इथे >>>> हा सर्वात आवडला.

मी कितीदा सर्च करतोही तुला
विठ्ठला पण गंडते गूगल इथे >>> यातील खयाल छान आहे.
तसेच इंग्रजी शब्दांचा वापर चपखल.

तिलकधारी आला आहे.

तू तरहीत डोकेफोड करण्यापेक्षा स्वतंत्र गझला अधिक चांगल्या करतोस असे निरिक्षण!

शीतल आणि अंमल हे शेर जमलेले आहेत.

तिलकधारी निघत आहे.

धन्यवाद तिलकधारीजी

डोकेफोड वरून कर्दनकाळ यांचा एक शेर आठवला जो त्याना माझा या गझलेतला एक काफिया वाचून सुचला आहे

तू न डोकेफोड केलेली बरी
मूढतेचा केवढा अंमल इथे

Happy

काफियांवर/शब्दांवर/प्रतिकांवर कुणाची मालकी नसते!
डोकेफोड वरून कर्दनकाळ यांचा एक शेर आठवला जो त्याना माझा या गझलेतला एक काफिया वाचून सुचला आहे

तू न डोकेफोड केलेली बरी
मूढतेचा केवढा अंमल इथे <<<<<<<<

तुझ्या गझलेतला काफिया वाचून की, तुझ्याकडे बघून?

तुझ्या गझलेतला काफिया वाचून की, तुझ्याकडे बघून?>>>>

तुम्ही म्हणताय्चय्त तर 'तुझ्याकडे बघुन'च असेल

____________________________________

मी तितकाही बुद्धू नाही बरका मित्रा
हीच हुशारी तुला शहाणा म्हणणे म्हणजे
........~ही माझी धारणा.. हा माझा पिंड !!

Light 1

घोटाळता न आले मज भोवती कुणाच्या......
माझ्याशिवाय बाकी सारे हुशार होते!
.................इति कर्दनकाळ

चांगला आहे हा शेर

माझ्याकडे हुशारी या विशयाचा एकच शेर होता त्यामुळे हा शेरांच्या भेंडया खेळ तूर्तास थांबवूयात

शेरांच्या भेंडया>>>> मस्त कल्पनाय नै ??

करायचा का सुरू नवा धागा ?

याच जागी येत जाऊ यापुढे
चालतो माझातुझा अंमल इथे
.
मी कितीदा सर्च करतोही तुला
विठ्ठला पण गंडते गूगल इथे

अहाहा! क्या बात. Happy

गझल चांगली झाली आहे. आवडली. पण एक शंका
आपण दिलेल्या दुव्यावर गेल्यावर खालील ओळी दिसल्या

ओळ क्र. ३८ : चालला आहे कशाचा खल इथे
वृत्त : मेनका
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया :खल्,चल्,निश्चल्,बल्,कल्,दल्,कोलाहल
लगावली : गालगागा गालगागा गालगा

आता गैरमुरद्दफ म्हट्ल्यावर काफिया का सांगितलाय? आणि सगळ्यांच्या गझलेत "इथे" का आलाय?

कोणत्या शत्रूस पाडू पालथे
चालला आहे कशाचा खल इथे
असे काहीसे हवे ना?

माफ करा माझे या बाबीकडे लक्षच गेले नाही

पण मी जेव्हा डॉ .साहेबांशी बोललो तेव्हा त्यांच्या मुखीही असे काही आले नाही उलट "अता" या आधीच्या शब्दाऐवजी "इथे" हा शब्द असावा यावर आमचे एकमत झाले

मग मी "इथे" ही रदीफ घेवून सर्वप्रथम तरही केली मग ती वाचून नंतरच्या शायराना तसेच आहे असे वाटले असेल अशीही शक्यता आहे

"इथे" हा शब्द काफिया ऐवजी रदीफ जास्त चांगला /सोयीचा होतो असे माझे मत जे आधीपासूनच नकळतपणे / आजवरच्या अनुभवामुळे तयार झाले असावे ..त्यामुळे मी तसे केले असावे

कदाचित डॉ साहेबांची नकळत टायपिंग मिस्टेकही झाली असू शकते

असो

धन्यवाद गझलूमिया प्रतिसादासाठी व या निरीक्षणासाठी
Happy

Pages