चालला आहे कशाचा खल इथे -तरही

Submitted by वैवकु on 14 April, 2013 - 00:42

शांततेसोबत कशी कलकल इथे
चालला आहे कशाचा खल इथे

चल हिमालय व्हायची इच्छा धरू
वैभवा कित्येक संह्याचल इथे

हा कशाचा दाह आहे नेमका
वाटते आहे किती शीतल इथे

याच जागी येत जाऊ यापुढे
चालतो माझातुझा अंमल इथे

मी कितीदा सर्च करतोही तुला
विठ्ठला पण गंडते गूगल इथे

-----------------------------------------------------
चालला आहे कशाचा खल इथे - डॉ.साहेबांची ओळ
इथे पहा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह.... गजलुमिया माफ करा..... वरचं कॉपी -पेस्ट करण्यात ते गैरमुरद्दफ राहूनच गेलं.....
चूक ध्यानात आणल्याबद्दल धन्यवाद.

Pages