हितगुजच्या कोणत्याही ग्रूपमधे नवीन "गप्पांचं पान", "लेखनाचा धागा", "कार्यक्रम" किंवा "नवीन प्रश्न" कसा सुरू करायचा?

Submitted by मदत_समिती on 15 September, 2008 - 01:58

सगळ्यात प्रथम ज्या ग्रूपमधे तुम्हाला हे सुरू करायचंय त्या ग्रूपचे तुम्ही सभासद असणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रूपच्या पानावर जाऊन, पानाच्या वर उजव्या बाजूला पहा. तिथे तुम्हाला "सामील" होण्यासाठी दुवा किंवा अधिक माहिती मिळू शकेल.

मायबोलीवरील सर्व हितगुज ग्रूपची यादी इथे बघायला मिळेल. ही यादी बघतांनाच "सामील व्हा" हा पर्याय दिसतो. तो वापरूनपण ग्रूपमध्ये सामील होता येईल.

ग्रूपमधे सामील झाल्यावर तुम्हाला पानाच्या वर उजव्या बाजूला "गप्पांचं पान", "लेखनाचा धागा" , "कार्यक्रम" किंवा 'नवीन प्रश्न" सुरू करण्यासाठी दुवा मिळेल. तिथे टिचकी मारून योग्य तो प्रकार तुम्ही सुरू करू शकता. हा प्रकार सुरु करतांना तो दुवा सार्वजनिक (सगळ्या मायबोली वाचकांना वाचता येईल) करायचा की त्या ग्रूपच्या सभासदांपुरताच मर्यादित ठेवायचा हे ठरवता येते.


एखादे पान्/धागा सार्वजनिक करण्यासाठी पान संपादन करा (वर शीर्षकाच्या बाजूला उजवीकडे )
आणि तिथे खाली "ग्रूप" असे लिहिले आहे त्यावर टिचकी मारा. तो उपविभाग उघडला जाईल. आणि तिथे धागा सार्वजनिक करण्यासाठी चेकबॉक्स दिसेल. तो भरून ते पान साठवल्यावर सार्वजनिक होईल.



गप्पांचं पान: वाहून जाणारी पानं. या पानावर ठराविक प्रतिक्रियांपेक्षा जास्त प्रतिक्रिया आल्या तर जुन्या प्रतिक्रिया वाहून जातात. वाहून गेलेल्या प्रतिक्रिया कायमच्या नष्ट होतात.
लेखनाचा धागा: या पानांवर जास्त प्रतिक्रिया आल्या तर नवीन आपोआप पुढच्या पानावर जातात. जुन्या प्रतिक्रिया नष्ट होत नाहीत.
कार्यक्रम: आगामी कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी. हे कार्यक्रम ग्रूपमधल्या "चाहूल" विभागातही दिसतात.
नवीन प्रश्न : नवीन सुविधा: प्रश्न, उत्तर, सर्वोत्तम उत्तर

ग्रूपमधे वर लिहिल्याप्रमाणे नुकताच प्रकाशित केलेला कुठलाही लेखनप्रकार सर्वसाधारणतः फक्त त्या त्या ग्रूपच्या सभासदाना दिसतो. तो जर सार्वजनिक वाचनासाठी करायचा असेल तर लेखनप्रकार संपादित करा. आत गेल्यावर ग्रूप लिहिलेल्या दुव्यावर टिचकी मारा. तिथे तुम्हाला लेखन सार्वजनिक करण्यासाठी एक पर्याय दिसले (Checkbox). (त्यावर एकच टिचकी मारून) तो निवडला आणि लेखन साठवले की लेखन सार्वजनिकरित्या दिसू लागेल. मायबोलीवर फक्त वाचनमात्र असणार्‍या (सभासद नसणार्‍या) पाहुण्यांनाही ते दिसू लागेल. लेखन सार्वजनिक करण्यासाठी मुद्दाम त्या लेखनप्रकाराचा ग्रूप बदलण्याची किंवा एकच धागा अनेक ग्रूपमधे प्रकाशित करण्याची गरज नाही.

सगळ्यात प्रथम ज्या गृपमधे तुम्हाला हे सुरू करायचंय त्या गृपचे तुम्ही सभासद असणे आवश्यक आहे. त्यासाठी गृपच्या पानावर जाऊन, पानाच्या वर डाव्या बाजूला पहा. तिथे तुम्हाला "सामील" होण्यासाठी दुवा किंवा अधिक माहिती मिळू शकेल. >>>>>>>>>>

Admin - "पानाच्या वर डाव्या बाजूला पह" च्या ऐवजि "पानाच्या वर उजव्या बाजूला पहा" असे पाहिजे तिथे ... का मिच चुकतो आहे?

नविन गृप (पान, बी बी) तयार करताना तो by default public गृप नाही का करता येणार?

मटीकीचा खाकरा असे पान private ठेवायची काय गरज आहे? ज्यांना वाटतेय एखादी गोष्ट private असावी असे लोक करतील ते पान private. पण उगाच सगळीच नविन पाने private कशाला.

माणसा,
नवीन पान/धागा सुरु करतांना बाय डीफॉल्ट ते प्रायव्हेट असते, ते काढुन सार्वजनिक करावे लागते. काही लोक ते करायला विसरतात त्यामुळे त्यांच्या नकळत ते धागे सार्वजनिक न होता फक्त त्या त्या गृपपुरते मर्यादित रहातात.

म्हणूनच तो कदाचित म्हणत असावा की डिफॉल्ट पब्लिक असायला हवा ..

रुपाली,
'गृपमधे' याऐवजी 'ग्रुपमध्ये' असा बदल करशील का? Happy

बरे हे कळले ते. Happy

नमस्कार

काही हरकत नसेल तर कट्ट्याला मुंबई बरोबर बाकीच्या ग्रुप मध्ये टाकता येईल का?

----------------------------------
If friendship is your weakest point then u r the strongest person in world........... ....

ते सार्वजनिक लेखनाचा धागा म्हणजे काय?
सगळ्या गृप/ गट समुहांवर एकाचवेळी लेखनाचा धागा कसा काय प्रकाशीत करता येइल ते कृपया पायरी पायरी ने सांगावे.
आगाउ धन्यवाद.

Dear All,
Thank you for Information,
Now I will try all those options

हितगुजवर राजकारण, शासन(सरकार) हे ग्रुप्स कुठे आहेत ? Uhoh
मला या ग्रुप्समधे नविन लेखनाचा धागा सुरू करायचा असेल तर कसा करावा ?

महेश
राजकारण, शासन(सरकार) हा ग्रूप "प्रतिमंत्रिमंडळ" यासाठी तयार केला होता, हा ग्रूप फक्त निमंत्रितांसाठी होता.
तुम्हाला राजकारण विषयावर चर्चा करायची असेल तर हितगुजवर सध्या "अवांतर" मध्ये "चालू घडामोडी" नावाचा ग्रूप आहे तिथे बरेच धागे आहेत राजकारणावर. त्या ग्रूपमध्ये तुम्हाला धागा उघडता येईल राजकारणा संबंधी.

मी 'हॅरी पॉटर क्लब' नावाने वाचु आनंदे मध्ये नवीन लेखनाचा धागा सुरू केला आहे. पण तेथे प्रतिसाद देता येत नाही. आणि तो धागा admin ने पुर्विच्या निलम खेळाकडे वळविला आहे. याबाबतीत मला काहीच समजत नाही. मी लेखनाचा धागा चुकिचा सुरू केला आहे का? कि प्रतिसादाचे पान मला दिसत नाहि? मला क्रुपया मार्गदर्शन करा.

मधुरीता
याचा अर्थ तुमचा धागा बंद झालेला आहे. एकाच विषयावर २ धागे झाल्यामुळे admin ने दोन्ही एकत्र केले आहेत. जुन्या धाग्यावर तुमचा प्रतिसाद दिसतोय ना शेवटचा.

chaitrali
तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाबद्द्ल आभार.
पण विषय एकच असला तरी लेखन वेगळया पद्धतीचे होते. असो, मला तो धागा नव्याने सुरू करता येईल का?

मी प्रेरणा देणारी गाणी हे गप्पाचे पान चालू केले पण आता ते आधीच्या पोस्ट नष्ट होत आहेत त्याला धाग्यात कसे बदलू शकतो?

नमस्कार
मला अध्यात्म आणि ज्योतिष, इतर विदयांशी रिलेटेड काही लिखाण करायचे असेल तर कुठे करावे? कोणता ग्रुप निवडावा.
केतकी बापट

अध्यात्म आणि ज्योतिष विषयक लेखन - कोणता ग्रुप ?

१)प्रथम असे काही धागे 'मायबोलीवर शोधा' मधून शोधा.
२) त्या धाग्यांचे ग्रूप उघडून त्या गटात 'सामील व्हा'.
३)तुमच्या खात्यात ते ग्रूप दिसू लागले की ते उघडा आणि तिथे लेखनाचा धागा/वाहते पान/प्रश्न यांमधून एक निवडा.
४) लेखन करण्याचा कोरा फॉर्म येईल. विषय,नाव,मजकूर वगैरे टाकून शेवटी 'ग्रूप accessible to group viewer आणि पब्लिक access दोन्हींवर ओके करा.
५)'पूर्वपरीक्षण'/ 'तपासा' करून 'प्रकाशित करा' बटण दाबा.
६) धागा प्रकाशित झाल्यावरही सात आठ दिवसांत पुन्हा संपादन करून दुरुस्ती करता येते. नंतर स्वसंपादनाचे बटण निघून जाते.