सगळ्यात प्रथम ज्या ग्रूपमधे तुम्हाला हे सुरू करायचंय त्या ग्रूपचे तुम्ही सभासद असणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रूपच्या पानावर जाऊन, पानाच्या वर उजव्या बाजूला पहा. तिथे तुम्हाला "सामील" होण्यासाठी दुवा किंवा अधिक माहिती मिळू शकेल.
मायबोलीवरील सर्व हितगुज ग्रूपची यादी इथे बघायला मिळेल. ही यादी बघतांनाच "सामील व्हा" हा पर्याय दिसतो. तो वापरूनपण ग्रूपमध्ये सामील होता येईल.
ग्रूपमधे सामील झाल्यावर तुम्हाला पानाच्या वर उजव्या बाजूला "गप्पांचं पान", "लेखनाचा धागा" , "कार्यक्रम" किंवा 'नवीन प्रश्न" सुरू करण्यासाठी दुवा मिळेल. तिथे टिचकी मारून योग्य तो प्रकार तुम्ही सुरू करू शकता. हा प्रकार सुरु करतांना तो दुवा सार्वजनिक (सगळ्या मायबोली वाचकांना वाचता येईल) करायचा की त्या ग्रूपच्या सभासदांपुरताच मर्यादित ठेवायचा हे ठरवता येते.

एखादे पान्/धागा सार्वजनिक करण्यासाठी पान संपादन करा (वर शीर्षकाच्या बाजूला उजवीकडे )
आणि तिथे खाली "ग्रूप" असे लिहिले आहे त्यावर टिचकी मारा. तो उपविभाग उघडला जाईल. आणि तिथे धागा सार्वजनिक करण्यासाठी चेकबॉक्स दिसेल. तो भरून ते पान साठवल्यावर सार्वजनिक होईल.

गप्पांचं पान: वाहून जाणारी पानं. या पानावर ठराविक प्रतिक्रियांपेक्षा जास्त प्रतिक्रिया आल्या तर जुन्या प्रतिक्रिया वाहून जातात. वाहून गेलेल्या प्रतिक्रिया कायमच्या नष्ट होतात.
लेखनाचा धागा: या पानांवर जास्त प्रतिक्रिया आल्या तर नवीन आपोआप पुढच्या पानावर जातात. जुन्या प्रतिक्रिया नष्ट होत नाहीत.
कार्यक्रम: आगामी कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी. हे कार्यक्रम ग्रूपमधल्या "चाहूल" विभागातही दिसतात.
नवीन प्रश्न : नवीन सुविधा: प्रश्न, उत्तर, सर्वोत्तम उत्तर
ग्रूपमधे वर लिहिल्याप्रमाणे नुकताच प्रकाशित केलेला कुठलाही लेखनप्रकार सर्वसाधारणतः फक्त त्या त्या ग्रूपच्या सभासदाना दिसतो. तो जर सार्वजनिक वाचनासाठी करायचा असेल तर लेखनप्रकार संपादित करा. आत गेल्यावर ग्रूप लिहिलेल्या दुव्यावर टिचकी मारा. तिथे तुम्हाला लेखन सार्वजनिक करण्यासाठी एक पर्याय दिसले (Checkbox). (त्यावर एकच टिचकी मारून) तो निवडला आणि लेखन साठवले की लेखन सार्वजनिकरित्या दिसू लागेल. मायबोलीवर फक्त वाचनमात्र असणार्या (सभासद नसणार्या) पाहुण्यांनाही ते दिसू लागेल. लेखन सार्वजनिक करण्यासाठी मुद्दाम त्या लेखनप्रकाराचा ग्रूप बदलण्याची किंवा एकच धागा अनेक ग्रूपमधे प्रकाशित करण्याची गरज नाही.
ओके. धन्यवाद वेमा.
ओके. धन्यवाद वेमा.
Pages