रंगपंचमी - एक विनंती

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

महाराष्ट्रातील अनेक गावातील दुष्काळ लक्षात घेता आणि रंगपंचमी साजरी करताना पाण्याचा वापर पाहता, सर्वांना एक विनंती ..
holi_request.jpg(वरील प्रचि फेसबुकवर 'आयुष्यावर बोलु काही' यांच्या वॉलवरुन त्यांच्या ना हरकत परवानगीने घेतले आहे.)

विषय: 
प्रकार: 

ह्यासाठी जेवढे राजकारणी जबाबदार आहेत, तेवढेच तिथे राहणारे लोकही. <<<
सोला आने सच. हे वाक्य कुठेही चपखल होईल.

>>>> आसारामाला पण नाठाळांच्यातच टाका. संत कसला डोंबलाचा.

आणि ते सन्त आहेत का नाही हे ठरवणारे तुम्ही कोण डोम्बलाचे?

>>>> उगाचचं उठसुट राजकारणी मंडळींना नावं ठेवणं सोपं आहे. पण लोकांनी काय केलं एवढ्या वर्षात

लोकान्नी काय कराव अस तुमच म्हणण आहे? seriously.राजकारणात जे जातात त्यान्चे दावे "सामान्य लोकान्च्या साठी त्यान्च आयुश्य सुकर करण्यासाठी आम्ही राजकारणात आलो" असेच असतात ना? मग त्यान्नी खरच कराव की.

>>>>>> बीड - आमच्या लहानपणी नदीला चांगलं पाणी असायचं, आज दिसतचं नाही. आणि ह्यासाठी जेवढे राजकारणी जबाबदार आहेत, तेवढेच तिथे राहणारे लोकही.

त्यासाठी राजकारणीच जबाबदार आहेत लोक नाही... राजकारण्याच्न्ह्या कडे admin, burocracy वगैरे systems असतात, बेसुमार वाळू उपसा, नको तिथे धरण बान्धण, नको त्या ठिकाणी नको ती पिक घेण, सोयाबीन, ऊस वगैरे पिकान्ना दुश्काळीभागात प्रोत्साहन देण आणि अशा अनेक गोश्ती, सामान्य माणूस नाही तर राजकारणीच करतात, त्या मुळे हे प्रश्न उत्पन्न होतात.

लोकान्नी काय कराव अस तुमच म्हणण आहे? seriously.राजकारणात जे जातात त्यान्चे दावे "सामान्य लोकान्च्या साठी त्यान्च आयुश्य सुकर करण्यासाठी आम्ही राजकारणात आलो" असेच असतात ना? मग त्यान्नी खरच कराव की.>>>>
पण ह्याचा अर्थ असा नसतो की लोकांनी कितीही घाण करावी आणि राजकारण्यांनी ती साफ करावी. समाजातील १ घटक म्हणुन प्रत्येकाची हि जबाबदारी असते की त्यानी समाज स्वच्छ राहावा ह्यासाठी प्रयत्न करावेत.

त्यासाठी राजकारणीच जबाबदार आहेत लोक नाही... राजकारण्याच्न्ह्या कडे admin, burocracy वगैरे systems असतात, बेसुमार वाळू उपसा, नको तिथे धरण बान्धण, नको त्या ठिकाणी नको ती पिक घेण, सोयाबीन, ऊस वगैरे पिकान्ना दुश्काळीभागात प्रोत्साहन देण आणि अशा अनेक गोश्ती, सामान्य माणूस नाही तर राजकारणीच करतात, त्या मुळे हे प्रश्न उत्पन्न होतात.>>>>
मी हे आधीच म्हणलेलं आहे की दुसर्याला दोष देणं खुप सोपं आहे. माणसानी स्वतःपासुन सुरुवात करावी, आपण काय करतो आहोत हे पाहणं जास्त गरजेचं आहे.

चेन्नईमध्ये १०-१२ वर्षांपुर्वी अशीच अवस्था होती. पाणी नाही म्हणुन लोकांना दुसरीकडे कुठेतरी हलवणार होते पण लोकांच्या आणि राजकारण्यांच्या सामुहिक प्रयत्नातुन आज तिथे पाण्याचा प्रश्न सोडवला गेला आहे.

>>>>> पण ह्याचा अर्थ असा नसतो की लोकांनी कितीही घाण करावी आणि राजकारण्यांनी ती साफ करावी. समाजातील १ घटक म्हणुन प्रत्येकाची हि जबाबदारी असते की त्यानी समाज स्वच्छ राहावा ह्यासाठी प्रयत्न करावेत.

नाही त्याचा अर्थ असा नाही आहे हे मला पण मान्य आहे. पण समाजातल्या प्रत्येक घटकाला त्याची जबाबदारी समजवण्याची जबाबदारी ही राज्यकर्त्यान्ची आहे. लोकशिक्शण, यथायोग्य दन्ड (शिक्शा), प्रशासनाला काम करायला लावण, पोलीस इत्यादी जे व्यवस्थेचे घटक आहेत त्यान्च्या वर योग्य अन्कुश ठेवण ही राज्यकर्त्यान्ची जबाबदारी आहे. माझा नेता जर तम्बाखू खाउन रस्त्यावर पिचकार्या मारत असला, आणि जर सार्वजनिक स्वछतेचे नियम आणि ती न पाळल्या मुळे होणारी शिक्षा त्याला होंणार नसली, तर या पळवाटा आणि हे आदर्श मी देखील तसेच पाळणार आहे. शेवटी... राजा कालस्य कारणम हेच खर आहे.

>>>>> मी हे आधीच म्हणलेलं आहे की दुसर्याला दोष देणं खुप सोपं आहे. माणसानी स्वतःपासुन सुरुवात करावी, आपण काय करतो आहोत हे पाहणं जास्त गरजेचं आहे.

हे एक आदर्श तत्व आहे पण practical नाही आहे. एक उदाहरण म्हणून... पुण्यात जर traffic signal ला तो लाल आहे म्हणून मी थाम्बलो, तर मागून येणारी बस, रिक्शा किन्वा अजून कोण मला ठोकेल याची मला शाश्वती नसते. आपण काय करतो हे बघण ठिक आहे पण त्यापेक्शा मी हाती पायी सुरक्शीत राहिलो पाहिजे हे माझ्या साठी जासत महत्वाच आहे. traffic jam मध्ये जर मी पण गाडी "घुसवली" नाही तर एक तर मला लोक घासून जाणार आणि नुकसान माझच होणार किन्वा मला लोक अशी मध्ये का घुसत आहेत म्हणून frustration येणार. when in rome act like a roman. आपण व्यवस्थेचा आणि समाजाचा भाग आहोत, जसा समाज वागतो तसच आपण पण वागाव.

>>>>>> चेन्नईमध्ये १०-१२ वर्षांपुर्वी अशीच अवस्था होती. पाणी नाही म्हणुन लोकांना दुसरीकडे कुठेतरी हलवणार होते पण लोकांच्या आणि जकारण्यांच्या सामुहिक प्रयत्नातुन आज तिथे पाण्याचा प्रश्न सोडवला गेला आहे.

actually लोकान्चे प्रयत्न असतात अस मला वाटत नाही. कोणी तरी अण्णा हजरेन्च्या सारखा एखादा माणूस (म्हणजे परत नेता, राजकारणी नसला तरी), किन्वा पान्डुरन्ग शास्त्री आठवले यान्च्या सारखी व्यक्ती ही त्या त्या समाज घटकाला काही कार्य करण्यासाठी प्रव्रुत्त करते. नेते जे आदर्श ठेवतील त्या प्रमाणे लोक वागतील आणि वागतात अस मला वाटत.

पाउस काही फार कमी झालेला नाहीये. पण ह्या देशातली लोक ज्या rate नी पैदास करत आहेत ते बघता कितीही पाऊस पडला तरी कमीच आहे.

ह्यांच्या साठी काही पाणी कमी वापरायची गरज नाही.

पुण्यात पाणी वापरले तर ७०%-८०% पाणी गटारातुन नदीत च जाते ना!!!

साधना,

आपली इथली प्रतिक्रिया वाचली.

१.
>> सध्या मुंबईतल्या वेश्यावस्तीत मराठीतुन बोलणा-या मुलींची संख्या वाढलीय आणि ही आवक
>> दुष्काळग्रस्त भागातुन होतेय.

युक्रेनला युरोपचे अन्नधान्याचे कोठार समजत असंत. तसेच खनिज संपत्तीही विपुल प्रमाणात सापडते. असा सुपीक आणि समृद्ध प्रांत कम्युनिस्ट धोरणांपायी (यात भ्रष्टाचारही आलाच!) दुष्काळी झाला. लोकांना भिकेला लावायचं आणि पोरीबाळींना धंद्याला बसवायचं हा साचा (पॅटर्न) युक्रेनप्रमाणे महाराष्ट्रातही लागू होणार असं दिसतंय.

२.
>> वाटले, ह्या मुलींसाठी कोणी काहीच करु शकत नाही का? मुंबईत घरकाम, घरातल्या लहान्/वृद्ध/आजारी
>> इ. लोकांबरोबर दिवसभर राहायला कोणी मिळत नाही. या अशा मुलींना ह्या कामाला लावले तर?
>> कोणा एनजीओ किंवा इतर संस्थांनी पुढाकार घेऊन, थोडेफार ट्रेनिंग देऊन, त्यांची हमी घेऊन, यांना
>> रोजगार मिळवुन दिला तर विक्रयाचे काम करण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही.

बहुतांश स्वयंसेवी संस्था स्वसेवी आहेत. त्यांना काम करण्यापेक्षा पैसे मिळवण्यात अधिक रस आहे. दुखण्याच्या मूळ कारणाकडे कोणालाही लक्ष द्यायची गरज वाटत नाहीये. हा देहविक्रयाचा धंदा राजकारण्यांच्या आशीर्वादाने पद्धतशीरपणे फोफावला जातोय अशी शंका मला आहे.

३.
>> मुली शिकलेल्या आहेत आणि शिक्षण असुनही आज जर त्यांच्यावर पोटासाठी ही वेळ येत असेल तर
>> मग आपण कसली प्रगती केलीय?

शिक्षण म्हणजे प्रगती हे समीकरण किती बकवास आहे हे आता उघड झालंय. आतातरी व्यवसायशिक्षण सुरू झालं पाहिजे. इंग्रजी शिक्षणातून पैदा होणार्‍या पोकळ पदव्या फुटक्या कवडीइतक्याही उपयोगाच्या नाहीत.

आ.न.,
-गा.पै.

आम्ही केली बर का रन्गपन्चमी साजरी. २००० लिटर चे ३ टाक्या भरून पाणी. सोनेरी चन्देरी रन्ग आणि १०-१२ मन्डळी. प्रचण्ड धमाल. तुम्ही पण यायला हव होत राव. विन्धन विहिरी च्या पाण्या पेक्षा महापालिकेच पाणी जास्ती चान्गल आहे. मित्रान्ना पाण्यात बुडवल, चिखलात लोळवल, मजबूत चिखल पण केला. माती कमी पाणी जास्ती. हिरवा पाला मिळाला नाही, पण तरी देखील. over all good times. नन्तर अन्घोळीलाच भरपूर पाणी लागेल म्हणून खडकवासल्याच्या उजव्या कालव्यात डुम्बून आलो.

जमल्यास काही दिवसात प्रकाशचित्र टाकीनच.

च्यामारी.... आम्ही फारच कमी पाणी वापरल. ४० रुपयाला १००० लिटर पाणी मिळत होत तर आम्ही १० मित्रान्नी प्रत्येकी १०० १०० रुपये काढले असते तरी प्रत्येकी २५०० लिटर पाणी मिळाल असत म्हणजे १० लोकन्च्यात २५००० लिटर. फुल राडा केला असता राव अगोदर माहीत असत तर.

http://saamana.com/2013/April/03/Link/Main4.htm

मला राहून राहून असे वाटतय की मायबोलीवरील माझ्या स्वैर चिन्तनाचा या अशा पोस्टी अनुकरणीय म्हणून भलेभले थोर थोर लोक नक्कीच वाचत असणार... काय म्हणता? Wink
******************
limbutimbu | 1 April, 2013 - 11:32
झकोबा, बोलीभाषेमधे हे सगळे दुर्दैवी आहे, पण याकरता दुर्दैवी या शब्दाद्वारे देव अन दैवाला घाउकरित्या दोषी धरण्याचे कारण नाही. शब्दान्चा असा स्वैर वापरदेखिल हिंदु धर्माला कमीपणा आणतोय. असो.
>>>> सुधारणा न होण्याची प्रवृत्ती एखाद्याच्या जीन्स मध्येच असते. <<< अस्ले काही बोलू नकोस! नस्ती आफत ओढवायची.
सुधारणा म्हणण्यापेक्षा, सकारात्मक बदल >>>>>> >>>>>>> अरे सान्गितले ना, की बापजाद्यान्नी लावलेल्या झाडान्ची तोड, देवरायान्ची तोड सर्रास करणारे नव्याने एकही झाड लावताना दिसत नाहीत, अन का? तर म्हणे याची फळे आम्हाला कुठे बघायला तरी मिळणारेत का? माझ्या पुढच्या पिढीला तरी काही मिळेल का? पुढचे कुणी बघितलय? अरे मोठ्या वृक्ष जातिचे झाड लावुन तिथे गेल्या पाचपन्चवीस वर्षात नियमाने रोज सकाळी मुतले असते तरी झाडे मोठी वाढली अस्ती. पण कोकणातल्या म्हणीप्रमाणे वहात्या जखमेवर करंगळीभर जाडीची मूताची धार घालण्याचे औदार्य व सौजन्य देखिल जो समाज गमावून बसला आहे त्याकडून बाकी कशाचि अपेक्षा करता येणे शक्य नाही. असोच. <<<<<<<
****************************

Pages