रंगपंचमी - एक विनंती

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago
Time to
read
2’

महाराष्ट्रातील अनेक गावातील दुष्काळ लक्षात घेता आणि रंगपंचमी साजरी करताना पाण्याचा वापर पाहता, सर्वांना एक विनंती ..
holi_request.jpg(वरील प्रचि फेसबुकवर 'आयुष्यावर बोलु काही' यांच्या वॉलवरुन त्यांच्या ना हरकत परवानगीने घेतले आहे.)

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

बोअरचे पाणी आहे म्हणून उधळा ह्याला काय अर्थ आहे?
जमिनीतले वॉटर टेबल खाली गेले की कुठल्या बोअरवेलला पाणी रहाणार आहे?

आसाराम बापूंनी दिवे लावलेले पाहिले टीवीवर.. रंगपंचमीच्या दिवशी दिवे लावलेले(अकलेचे).
इतका जर बापूंचा 'यार' पॉवरबाज आहे तर जिकडे तिकडे पाणी का नाही पैदा करत?

बाकी, रंगपंचमी तसाही नावडीचा खेळ आहे सुरुवातीपासून.. त्यामुळे नो कमेंट्स...

आपल्याच राज्यातील काही लोकांचे पाण्यामुळे जीव चालले आहेत. मुलीबाळींना परीक्षेला बसू न देता पाणी शोधत कित्येक किमी फिरावे लागत आहे. अशा वेळेला केवळ त्यांच्या वेदनेमधे सहभागी होण्यासाठी म्हणून कुणी असे आवाहन केले तर लगेच "तुमच्या" धर्मावर घाला कसा काय होतो ब्वा? खेळूच नका असा फतवा कुणी काढलेला नाही ना? बरं खेळल्यावर मी इतके पाणी खर्च केले ही फार अभिमानाने सांगायची गोष्ट आहे का?

रंगपंचमी हा काही फार महत्त्वाचा हिंदुत्व डीफाईन करणारा सण आहे का? ज्या वेळेला हे सण आपल्या संस्कृतीत आले तेव्हा आणि आज मधे चिकार फरक आहे. त्यामुळे आजच्या काळाला सुसंगत होतील अशा पद्धतीने सण साजरे केले तर ते जास्त संयुक्तिक. किंबहुना, भारतातील प्रमुख धर्माचे - हिंदूंचे हे कायमच वैशिष्ट्य राहिलेले आहे -काळानुरूप बदलणे आणि म्हणून इतकी शेकडो वर्षे हा धर्म टिकून आहे.

आयपीएल आणि रंगपंचमी यांची तुलना केवळ हास्यास्पद आहे. आयपीएलमधून पैसा मिळतो. रंगपंचमीमधून पैसा मिळत नाही.

>>>>>> "आधी 'ते' शेण खाताहेत ते थांबवा मग आम्ही 'X' खायचे थांबवू" हा तुम्हा तथाकथित हिंदू धर्मरक्षकांचा जो गळेकाढूपणा आहे, तो तद्दन मूर्खपणाचा आहे.

उचलली जीभ लावली टाळ्याला. मुद्दा काय आपण बोलतो काय? अर्थात तुमच्या सारखे मेणबत्ती सम्प्रदायवाल्यान्कडून दुसरी अपेक्शा पण नाहीच.... वेड पान्घरून पेडगावाला गेलेल्या तुमच्या साठी... मुद्दा असा आहे.... आय पी एल, पाणीचोरी, बीअरला आणि बाटलीबन्द पाण्याला लागणार कोट्यावधी लिटर पाणी सोडून तुमच्या कडचे मुद्दे काय? तर रन्गपन्चमीला पिचकार्या उडवल्यामुळे जे १०० लिटर पाणी जात त्यामुळे दुश्काळ पडतो. अर्थात तुमच्या कडून दुसरी काय अपेक्शा करणार? भोपाळच्या झालेल्या गॅस गळतीमुळे झालेल्या सन्हाराकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्श करून तुम्ही मुद्दा काय उठवणार तर पुण्यातल्या प्रदुशणामुळे माझ्या घरात धूळ किती येते. अर्थात सरड्याची धाव कुम्पणापर्यन्तच. त्यापलिकडे तुम्ही जाउ देखील शकणार नाही.

>>>>> हे मनात पटत असूनही केवळ 'गर्व से कहो' म्हणत, तुम्ही २-३ लोक वेगवेगळ्या आयड्या घेऊन तोच तो धिंगाणा जितक्या वेळा घालाल, तितका तुमचा बावळटपणा जास्त सिद्ध होतो.

हे मात्र खर आहे... आम्हाला बावळटपणा सिद्ध करायला लागतो.. तुम्ही त्या बाबतीत नशीबवान आहात. नैसर्गिक बावळटपण असल्याने तुम्हाला काहीच सिद्ध करायला लागत नाही. ते तर तुमच्या रोमारोमात भिनलेलच आहे.

>>>>>> आयपीएल बंद करा हे तुम्ही म्हणत आहात. मला तर भयंकर आनंद आहे त्यात. क्रिकेट मी पहातही नाही. पण म्याच लागली की मास्तुरेच्या क्रिकेट धाग्यावर धावून जाणारे तुमच्यातलेच असतात.

हे तुम्हाला बर कळत? मास्तुरे च्या धाग्यवर पडिक दिसताय राव तुम्ही. बर आणि असतो त्या धाग्यावर पडिक तर? मुद्दा काय तुमचा? का नेहेमीप्रमाणे काही मुद्दाच नाही? उगाच वेळ जात नाही म्हणून काही तरी टाइप करायच?

>>>>>>> मुद्दा नासाडी थांबवायचा आहे. लॉनला पाणी लागतं. नाही घातलं तर त्या झाडाचा जीव जातो. मग ती लॉन स्टेडियमची असो, की गोल्फ कोर्सची. आंघोळीला लागतं. संडासातही लागतं. ते खर्च करावंच लागतं.

कस आहे ना...लॉन ला पाणी भरपूर लागत. सिताफळाला पाणी खूप कमी लागत. पण तुमची बोम्भाबोम्ब काय तर लॉन जगवण्यासाठी ( पक्शी: बीअर, आय पी ल आणि बाटलीबन्द पाणी) पाणी अवश्यक आहे, पण सीताफळाला (पक्शी: हिन्दू सणान्ना) पाणी घातल की ओह! जीजस ख्राइस्ट.. आकाशच कोसळला आणि आकाशातला बाप पण

परत मुद्दा तोच. लॉन्ला लागणार्या टनावारी पाण्याकडे मुद्दाम डोळेझाक करायची आणी सिताफळाला लागनार्या १० लिटर पाण्याची उथाठेव करायची... मेणबत्तीवाल्यन्न्चा वकूब तेवढाच

दुश्काळ असताना देखील तुम्ही म्हणणार की स्तेडियम च आणि गोल्फ च्या लॉन जगल पाहीजे, मग त्याला कितिही पाणी लागो...

>>>>>>. पण सणावाराच्या नावाखाली पाणी उधळायचं, अन नंतर बोंब मारत बसायचं हे कोणते लॉजिक?

बोम्ब? ती तर तुम्ही मारताय... पाणी वापरू नका म्हणून... बोम्ब तुम्ही मारणार आणि म्हणणार आम्ही बोम्ब मारली. विचारल होत तुम्हाला रन्गपन्चमी खेळू का ते? उगाच नको तिथे नाक खुपसायच आणि ते चेमटल की केकाटत बसायच

>>>>>>>बोअरचं पाणी आहे म्हणे. बोअरचं संपलं की आण टँकर.

हो आणू की... तेवधच काय? घरी पोहायचा तलाव पण बान्धू.

>>>>>> ज्या हिंदू धर्माच्या नावाने या कागाळ्या करत आहात त्यात केवळ माझ्याकडे पैसा आहे म्हणून मी गुर्मीत तो वाया घालवीन. रिसोर्सेस असलेत तर फेकून देईन, असे शिकवले आहे का?

नाही, हिन्दू धर्म अस शिकावतो की पैसा असेल तर त्याचा विनियोग करा, रीसोर्सेस असतील तर त्यान्चा उपयोग करा. अर्थात हे तुम्हाला किती कळेल हा प्रश्न आहेच

>>>>>>> उगा ख्रिश्चनांना शिव्या देत उधळेपणा करायचा याला काय अर्थ आहे?

बर... मग कोणाला शिव्या देत उधळेपणा केला तर चालेल अस तुमच म्हणण आहे?

>>>>>>>> टॅक्स भरला म्हणजे काय देश विकत घेतला का तुम्ही?

नाही... तो अगोदरच विकला आहे... कोणाला ते तुम्हाला माहीत आहेच.

>>>>>>> टॅक्स भरला म्हणून जबाबदार्या संपल्या सगळ्या?

सरकार टॅक्स का घेत? मूलभूत सुविधा निर्माण करायला... जर मी टॅक्स भरून सरकार त्या सुविधा निर्माण करू शकत नसेल तर ... तर मी माझी जबाबदारी पूर्ण केली आता सरकारनी त्याची करावी... यात काय चूक आहे?

>>>>>>>> 'टॅक्स भरतो म्हणून मी रस्त्यांची नासाडी करीन. सरकारी वाहने जाळीन्/तोडीन-फोडीन. टॅक्स भरला म्हणून कॉमन रिसोर्सेसची वाट लावीन. प्रदूषण करीन.' हे सगळे महान हिंदू धर्माच्या नावाखाली करत जा.

रझा अॅकॅडमी आझाद मैदान... आठवतय ना? कोणता धर्म होता बर तो? हिन्दू नक्की नाही...त्यान्नी टॅक्स भरला होता का? मला नाही वाटत. धुळे दन्गल.... कोणत्या धर्माच्या नावाखाली? काल परवाची भिवन्डी... उगाच काहीही बोलायच... साप साप म्हनोन जमीन धोपटायची

>>>>>> जास्त शोभेल तुम्हाला. सुशिक्षित आहात की नुसतेच मठ्ठ? की सोंग आणता आहात बधीरपणाचे?

हो सोन्गच आणत आहोत... काय करणार, तुम्ही ओरिजनल बधीर... आम्ही आपली सोन्गच आणू शकतो.

>>पण होळीला जो हिरवा पाला दुधात मिसळतात तो मिळाला तर नक्किच आवडेल. कोणाला माहित्ये का पुण्यात कुठे मिळतो ते?<<
>>>>>हे जे काय "तत्वज्ञान" आहे, ते कुठून आले? हे पण हिंदू धर्मातलेच का? धर्माच्या नावावर भांग पिणे हेदेखिल श्रेष्ठच म्हणायचे?

नाही... भान्ग कोनाच्याही नावावर प्यायली तरी श्रेष्ठच आहे. माहीत्ये का कुठे मिळेल?

>>>>> मग तर साखर कारखाने बंद करून तुमची पंचाईत होणार. कारण त्याच्या मळीवर तर सगळ्या देशातली दारू बनते दारूचाही नैवेद्य देतात म्हणे?

साखरेचे खाणार त्याला देव देनार.... आमची पन्चाइते होइल का याच्या पन्चायती तुम्ही करू नका... आम्ही समर्थ आहोत ते बघायला.

>>>>>>> (अन हो, ख्रिश्चनांत वाईन चा नैवेद्य असतो. अन आदिवासींत देशी दारूचा. इतर धर्मांच्या उत्तम प्रथा आपण घ्यायला काय हरकत आहे?)

तुम्हाला दारू पिण्यासाठी काही न काही तरी बहाणा लागतोच अस दिसतय. खुले आम, डन्के की चोट पे... अस तुम्ही काही करणार नाही काही.. डोळे मिटून आमक्या आमक्याच्या प्रथा पाळण्याचे बहाणे देत देत तुम्ही दारू पिनार, नाही का?

***

>>>>> आता तुमचे नेहेमीचे "लॉजिकल अन सडेतोड" उत्तर द्या. 'अमुक धर्मात जाऊन मग त्यांना शिकवा' हे उत्तर आल्यावर मग माझ्या भाषेत उत्तर देतो डीट्टेलवार

द्या की... वाटच बघतोय. कधी देताय?

>>>>> आपल्याच राज्यातील काही लोकांचे पाण्यामुळे जीव चालले आहेत. मुलीबाळींना परीक्षेला बसू न देता पाणी शोधत कित्येक किमी फिरावे लागत आहे. अशा वेळेला केवळ त्यांच्या वेदनेमधे सहभागी होण्यासाठी म्हणून कुणी असे आवाहन केले तर लगेच "तुमच्या" धर्मावर घाला कसा काय होतो ब्वा?

याला जबाबदार कोण? आणि यान्च्या वेदने मध्ये आम्ही सहभागी आहोतच. स्वातन्त्य्रा नन्तर देखील ६० वर्षान्नी टॅन्कर्नी पाणी द्यायला लागत असेल तर... तो सरकारी अपराधच आहे... पण परत... मुद्दा असा आहे की आय पी एल बीअर कम्पन्या, शीतपेय निर्माण करणार्या कम्पन्या ज्या अब्जावधी लिटर पाणी वापरतात त्या सोडून एक सॉफ्ट टार्गेट म्हणून तुम्ही अशी आवाहन करत राहीला तर त्याला प्रत्युत्तर मिळणारच आहे. यात धर्मावर घाला येण्याच्या सम्बन्ध नाही आहे.

>>>>>> खेळूच नका असा फतवा कुणी काढलेला नाही ना? बरं खेळल्यावर मी इतके पाणी खर्च केले ही फार अभिमानाने सांगायची गोष्ट आहे का?

ही नाकावर टिच्चून सान्गण्याची गोष्ट मात्र नक्की आहे.

>>>>>>> रंगपंचमी हा काही फार महत्त्वाचा हिंदुत्व डीफाईन करणारा सण आहे का? ज्या वेळेला हे सण आपल्या संस्कृतीत आले तेव्हा आणि आज मधे चिकार फरक आहे.

परत... हिन्दूत्व कशामुळे अधोरेखीत होत हा वेगळा मुद्दा आहे तो आपण दुसर्या बाफ वर बोलू. मला सानगा आय पी एल हा काही फार महत्वाच घटना आहे का की ज्या मुळे भारतियत्व सिद्धा होत? त्यात जर लाखो लिटर पाणी वाया जातय तर त्या बद्दल कव काव करा की.. रन्गपन्चमी आहेच नन्तर. penny wise pound foolish अस तुमच वक्ताव्य आहे आणि आमचा आक्षेप त्यालाच आहे.

>>>>> त्यामुळे आजच्या काळाला सुसंगत होतील अशा पद्धतीने सण साजरे केले तर ते जास्त संयुक्तिक. किंबहुना, भारतातील प्रमुख धर्माचे - हिंदूंचे हे कायमच वैशिष्ट्य राहिलेले आहे -काळानुरूप बदलणे आणि म्हणून इतकी शेकडो वर्षे हा धर्म टिकून आहे.

म्हणूनच रासायनिक रन्ग न वापरता आम्ही कालानुरूप शुद्ध पाण्यानी होळी साजरी केली.

>>>>>> आयपीएल आणि रंगपंचमी यांची तुलना केवळ हास्यास्पद आहे. आयपीएलमधून पैसा मिळतो. रंगपंचमीमधून पैसा मिळत नाही.

हे विधानच हास्यास्पद आहे. रन्गपन्चमी मधुन छोटे उद्योजक पैसा मिळवतात. त्यान्च्या घरातल्या चुली पेटतत त्यान्न टॅन्कर्च पाणी विकत घेता येत म्हणून रन्गपन्चमी हा जास्ती आवश्यक सण आहे. आणि मला सान्गा... एक तर दुष्काळामुळे पाणी उडवू नका हा तुमचा मुद्दा आहे का पैसे मिळतात म्हनून इवव्हेन्ट साजरे करावेत असा तुमचा मुद्दा आहे? आपण दोन्ही पैकी कोणत्याही मुद्या वर वाद घालू.

>>>>> बोअरचे पाणी आहे म्हणून उधळा ह्याला काय अर्थ आहे?

खर अहे... चुकलच जरा.. पुढच्य वेळी कॉर्पोरेशननी दिलेल पाणीच वापरू...

>>>>> जमिनीतले वॉटर टेबल खाली गेले की कुठल्या बोअरवेलला पाणी रहाणार आहे?

हे उस पिकवणार्या आणि जमिनीतून अनियन्त्रीत उपसा करनार्या आस्थापन्नान्ना विचारा.. केरळ मध्ये पन्जाब मध्ये विदर्भात मराठवाड्यात ९०० १००० फूट का खाली जायला लागत? दर वर्षी भूजल पातळी २-३ फुटान्नी का खाली जाते? रन्गपन्चमी मुळे तर नक्किच नाही.

बापरे! इथे लोक होळी-धुळवडीलाच सर्रास रंगपंचमी म्हणायला लागलेत!

आमच्या कॉलनीतला पाण्याचा पाईप महीन्यातुन दोनदा फुटत असतो.... चारवेळा तक्रार केल्यावर पालिकेचा माणूस येऊन काहीतरी थातुरमातुर डागडूजी करुन जातो... परत आपल ये रे माझ्या मागल्या
त्या फुटक्या पाइपातुन एका दिवसात जेव्हढे पाणी वाया जाते तितक्या पाण्यात आख्ख्या कॉलनीच्या चार रंगपंचमी खेळून होतील!

आमच्या जवळच्या एका अपार्टमेंटमध्ये मारे मोठ्ठे बॅनर-बिनर लावलेत की यावर्षी सामजिक जाणीव ठेवून पाण्याने "होळी" नको खेळुया वगैरे वगैरे.... त्याच अपार्टमेंटच्या टेरेसवरच्या टाक्या सर्रास ओव्हरफ्लो होत असतात... एकदा न राहवून माझ्या सासर्‍यांनी तिथल्या वॉचमनला विचारले होते तर तो म्हणतो साहेब ती माझी ड्युटी नाही.... पाण्याच बघायला वेगळा माणूस आहे.... आता बोला!

असली प्रचारकी थाटाची पाणीबचत काय कामाची?

रंगपंचमीला पाणी उधळा असे नाही मला म्हणायचे.... वापरा ना थोडेसे पाणी.... लुटा आनंद Happy
आणि ते भरुन काढण्यासाठी गाडी धुवू नका एखाद महीना किंवा शॉवर घेउ नका काही दिवस किंवा 'शिळं' पाणी ओतुन देउन रोजच्या रोज 'ताजं' पाणी भरु नका
दरवेळी सणासुदींवर गदा कशाला?

पण हे सगळ न करता फक्त पाण्याने रंग खेळू नका वगैरे होर्डिंग लावणे आणि चौकाचौकात तश्या प्रतिज्ञा करणे म्हणजे 'मोरीला बोळा अन दरवाजा उघडा' असला प्रकार आहे Sad

>>>>>इतका जर बापूंचा 'यार' पॉवरबाज आहे तर जिकडे तिकडे पाणी का नाही पैदा करत?

त्यानी पाणी पैदा केलेलच आहे हो... पण त्याच नियोजन हे तुम्हीच केल पाहीजे, नाही का? इस्राएल मध्ये एवढा कमी पाउस पडून ते त्याच नियोजन करतातच ना.. का त्यानी तिथे आय पी एल आणि शीतपेय उत्पादक आस्थापनान्ना मोकळ रान दिलय. ते सोडा हो... राजस्थान मध्ये राजेन्द्र सिन्हान्नी तिथल्या पारम्पारिक व्यवस्था वापरून पाण्याच नियोजन केल आहेच ना? उगाच पाणी पैदा का करत नाही म्हनून काय विचारतय? जरी तुम्ह्लाला पाणी दिल तरी ती वापरन्याची तरी योग्यता हवी?

मानसी, अनुमोदन, नेमक्या शब्दात व्यथा मान्डली आहे अन ब्यानरवाले/मेणबत्तीवाल्यान्चा ढोन्गीपणाही उघड केला आहे. धन्यवाद अचूक उदाहरणे दिल्याबद्दल
झोटीन्ग, बराच वेळ दिस्तोय की! Wink पण झक्कास!
त्यामुळे प्रचारक कोणी बोध घेतील याचि अपेक्षा नसली, तरी एकतर्फी ढोन्गी पाणीवाचवा मोहिम जी की अशाच इतर मोहिमान्प्रमाणे केवळ हिन्दू सणान्वरतीच घसरते, याची जाण असलेल्या असन्ख्यान्ना आपले मत तावुन सुलाखुन या ढोन्गी प्रचाराच्या अवघा आसमन्त व्यापणार्‍या धुरळ्यातही स्वःच्छ ठेवता येईल.
तुमची लेखणी थोडी परजुन तयार ठेवा, लौकरच गुढी पाडवा आहे, मग त्यानिमित्ते गुढीला वस्त्र लावणे, बाम्बु वापरणे वगैरे मुळे नैसर्गिक सम्पत्तीचा नाश होतो वगैरे कोल्हेकुई सुरू होईल, नन्तर येतिल गणपती... तयारित रहा बरं, कुणाला सुधरवायला नाही, तर माझ्यासारख्या सामान्यान्ना त्यान्चे मतासमान मत असलेलेही कुणीतरी आहेत इतपत मानसिक आधार मिळावा म्हणून कारण असत्य पुन्हा पुन्हा अन गोबेल्स थाटात प्रचारात आणल्याने सत्यासारखे भासायला लागते यानुसार हे अपप्रचाराचा दु:ष्परिणाम मजसारख्या सामान्यावर होऊन विनाकारण अपराधीपणाची भावना निर्माण होते, ती घालविण्याकरता तरी तुम्ही लिहाच.

मानसी ,
सुंदर पोस्ट .
रंगपंचमीला बेसुमार पाणी वाया घालवा अस कोणीही सुज्ञ माणूस म्हणणार नाही . पण रंगपंचमी नाही खेळली तर लगेच तुम्ही सामाजिक बांधिलकी नसणारे वगैरे हे जे चित्र उभे केल जातय त्याला माझा विरोध आहे . परीस्थितीच भान ठेऊन कमीत कमी पाणी वापरून रंगपंचमी साजरी करायला (जर रंग लावणारा आणी लाऊन घेणारा दोघेही तयार असतील तर ) काय हरकत आहे ?
सर्वात महत्वाचे म्हणजे हे फक्त प्रातिनिधिक आहे(Empathy वा सहवेदना म्हणून , बरोबर शब्द सुचत नाहीये) हेच लोक विसरलेत . याचा अकारण बाऊ होतोय .
खर तर रंगपंचमीला वाया जाणार पाणी एकूण पाण्याच्या नासाडीच्या ०.००००००१ % ही नसेल . त्याच्या कितीतरी पट पाणी लोक नेहमी शॉवर , एक्स्ट्रा फ्लश , गाड्या धुणे वगैरेसाठी वापरतात .
पाईप फुटून गळणारे पाणी , सार्वजनिक नळाना तोट्या नसल्याने , टाक्या ओव्हरफ्लो झाल्याने जाणार पाणी याची तर गणतीच नाही !
यावर कंट्रोल ठेवण , त्यासाठी जनजाग्रुती करण जास्त गरजेच आहे .

रंगपंचमी हा धार्मिक सण कसा? हा सांस्कृतिक उत्सव आहे. सगळ्या धर्मांचे लोक रंग खेळतात.

पाणी वाचवण्याच्या बाबतीत 'थेंबे थेंबे तळे'. जितके जमेल तितके वाचवावेच. दुसरे लोक हजारो लिटर वाया घालवतात म्हणून मीही ५ / १० लि ओतून देईन या युक्तिवादात नुकसान आपलेच आहे.

नंदिनी,

>> आयपीएल आणि रंगपंचमी यांची तुलना केवळ हास्यास्पद आहे. आयपीएलमधून पैसा मिळतो.
>> रंगपंचमीमधून पैसा मिळत नाही.

आयपीलचा पैसा दुष्काळग्रस्तांना मिळत नाही. त्यामुळे पैशाच्या निकषावर आयपीएल आणि रंगपंचमीची यांची तुलना करणे हास्यास्पद आहे. म्हणूनच वापरण्यात येणारे पाणी हा तुलनेचा निकष असावा.

आ.न.,
-गा.पै.

१. पशूवधगृहात (कत्तलखान्यात) प्रतिदिन १८ लाख लिटर पाण्याची नासाडी होते.
२. एक लिटर शीतपेय बनवायला ५५ लिटर पाण्याचा वापर केला जातो.
३. मद्याच्या कारखान्यात बाटल्या धुवायला कोट्यवधी लिटर पाणी वापरले जाते.
४. दुष्काळी भागात जाणार्‍या राजकीय नेत्यांच्या हेलिकॉप्टर्सची धूळ उडू नये म्हणून सहस्रो लिटर पाण्याचा शिडकावा केला जातो.
५. भिवंडीत २१ मार्चला जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले होते.
६. सहा मार्चला पिंपरी-चिंचवडमध्ये जलवाहिनी फुटल्याने २० लाख लिटर पाणी वाहून गेले.
७. मुंबईत गळतीमुळे प्रतिदिन ६५ कोटी लिटर पाणी वाया जाते
बीअर आस्थापनांच्या पाण्याच्या कोट्यामध्ये वाढ
१. मिलेनियम बीअर इंडिया लिमिटेड - १ सहस्र २८८ कोटी लिटरवरून २ सहस्र १४ कोटी लिटर
२. फॉस्टर्स इंडिया लिमिटेड - ८८८ कोटी लिटरवरून १ सहस्र कोटी ७ लाख लिटर ३. इंडो-युरोपियन बीवरेजेस - २५२ कोटी लिटरवरून ४७० कोटी लिटर
४. संभाजीनगर ब्रेवरी - १ सहस्र ४०० कोटी लिटरवरून १ सहस्र ४६२ कोटी लिटर

नेत्या, ते जरी काहीही असले तरी --
मला तर भिती वाटते की उद्या मी यजमानाला सान्गितले करा आचमन, तिन पळ्या पाणी प्या, अन एक पळी सोडून द्या तर तो माझी मानगुट धरायचा अन म्हणायचा की का म्हणून एक पळी पाणी वाया घालवायला सान्गताय??? Proud उगीच नै समर्थ रामदास तेव्हा तिनएकशे वर्षान्पूर्वी म्हणाले की "उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया!".
तू दिलेल्या ठिकाणी काहीही करणे राहूदेच (म्हण्जे तोन्डी निषेध वगैरे गै! Wink ), त्यावर विचारदेखिल करण्यापेक्षाही, मजसारख्या सामान्य "हिन्दू" माणसाच्या चालिरीतीन्वर "हात साफ" करणे केव्हाही सोप्प्यात सोप्पे काम, अन त्यातुन हे काम गेली साठ-सत्तर वर्षे सत्ताधार्‍यान्ची इनथीम राहिलिये तर सत्ताधार्यान्च्या कृपाप्रसाद अन कृपाकटाक्षाप्रित्यर्थ तेच करत रहाणार ना? असो.
अजुन तरि कोणी मला भेटले नाहीये की तिन पळी पाण्यानन्तरची चौथी पळी ताम्हनात का सोडाता म्हणून, पण सद्य स्थिती बघता तो दिवसही दूर नाही ही की...... चौथी पळीभर पाणी वाया का घालवता? हिन्दूधर्मातील "उदक सोडणे", तिलान्जली देणे वगैरे कर्मकाण्डे ही पाण्याचा नास करतात वगैरे वगैरे...... बाबीन्चे ब्यानर/फलक लागतील, अन त्यावर स्टारमाझा वगैरे वर तथाकथित "पुरोगामी" बुद्धिवन्तान्च्या तावातावाने चर्चा झडतील Proud

असा,

ही घ्या बातमी (इंग्रजी दुवा) : http://www.dnaindia.com/india/report_22-5-lakh-litres-water-down-the-ipl...

महाराष्ट्र शासन आयपीएलावर बंदी केव्हा घालणार याची मी वाट बघत आहे. आसारामबापूंच्या होळीवर घातली तशी!

आ.न.,
-गा.पै.

इतके पाणी वाया जात आहे. हजारो शेतकर्‍यांचा दुवा घेऊन गेले असते हे लोक तितके पाणी शेतीला दिले असते तर. Sad

आयपीएल मुळे पैसा मिळतो म्हणे.....कुणाला मिळतो?

१. दुष्काळग्रस्तांना मिळतो?
२. दुष्काळामुळे देशोधडीला लागलेल्या शेतकर्‍यांना मिळतो?
३. दुष्काळामुळे शेती बोंबलल्यामुळे उपजीवीकेचे साधन गमावलेल्या भूमीहीन मजूरांना मिळतो?
४. गोरगरीबांना मिळतो?
५. दुष्काळामुळे आत्महत्या कराव्या लागणार्‍या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना मिळतो?
६. दुष्काळामुळे चारा छावणीत दाखल कराव्या लागलेल्या जनावरांना आयपीएल साठी ज्या मैदांनांवर पाणी मारुन गवत उगवणार आहे त्याचा चारा देणार का? त्यासाठी पैसा मिळेल आयपीएल मधून?

@ गापै
तुम्ही आम्ही तशा फक्त इच्छा बाळगू शकतो आणि दिवास्वप्न बघू शकतो. गोरगरीब जनता आणि शेतकरी असेच मरणार.......आणि संक्रांत येणार आपल्या सणांवर. Sad

>>>> महाराष्ट्र शासन आयपीएलावर बंदी केव्हा घालणार याची मी वाट बघत आहे. आसारामबापूंच्या होळीवर घातली तशी! <<<<
आसारामाबापून्च्या होळीवर ज्याप्रमाणे तोन्डसुख घेत दोन दिवसान्चा रतीब मिडीयाने घातला, ते तमाम तज्ञ या बाबत काय बोलणारेत? की आयपीएल मधुन पैका मिळतो तर तिकडे दुर्लक्ष करा, अन आसारामबापू कोण कुठचा हिन्दू सन्त,, अन हिन्दू सन्त आहे म्हणूनच सहज झोडपता येऊ शकणारा तर झोडपा अन टीआरपी वाढवुन घ्या, हेच गणीत आहेना?
अन आमची "सुशिक्षित" पण तरीही "भोळीभाबडी" जन्ता यान्च्या टीआरपीच्या बातम्यान्ना भुलते, अन त्यावर आपल्या आयुष्याची तत्वे तयार करत जाते.

[ताक. भोळेभाबडे असणे ही सद्वर्तनाची एक पायरि असली तरीही ते रामराज्यात ठीके, रावणांच्या राज्यात भोळेभाबडे असणे हा अक्षम्य अपराध अस्तो हे विसरुन चालत नाही.]

काल एका गावाला गेलो होतो.
गावं दुष्काळीच आहे. वर्षानुवर्षे (!!!!!!!!!!!!)
उन्हाळात पिकं घेवुच शकत नाही अस दुष्काळी.
गावच्या बाहेर असलेल्या नद्या कोरड्याठक.
त्यात खोल खोल पाडलेले खड्डे आणि त्यात घातलेले पाणी खेचण्याचे पाइप दुष्काळाची खोली दाखवतात.

पण गावात रंगपंचमी मात्र लै लै जोरात.
रस्ते सगळे रंगाने भिजु घातलेत. दोन दोन मोठे बॅरेल्स चौकातच.
जाणार्‍या येणार्‍या वाहनांवर रंग उडवणे, अंडी मारणे किंवा अशी धमकी देउन पैसे उकळणे.
आमची एमच १४ पासिन्ग गाडी बघुन तर पोराना लैच चेव चढलेला.
बर्‍याच वर्षानी खास कोल्हापुरी शिव्या देण्याचा प्रसंग आला. करणार काय अहो, गाडीच्या आत रंग आणि अंड्याचा बलक. (पैसे घेवुनही)
सुधारणा न होण्याची प्रवृत्ती एखाद्याच्या जीन्स मध्येच असते.
ती ह्या गावात आणि आजुबाजुच्या पंचक्रोशीत आहे हे नक्की. Happy

पुणेकर तुम्ही मात्र पाणी जपुन वापरा हं.
तुम्ही फार वाया घालवता बॉ... Proud

झकोबा, तुम्ही तर एका फार मोठ्या विषयाला तोन्ड फोडलय!
"गुन्डागर्दीकरता समाजातल्या नाठाळांकडून हिन्दू सणान्चा वापर", असा तो विषय आहे.
जाता जाता गावाचे नाव / किमान पन्चक्रोशीचे नाव तरी सान्गून टाका ना. की असे सान्गण्यात घाबरण्यासारखे काही आहे? तसे असेल तर नका सान्गू, मी समजू शकतो ही "नवश्रीमन्तान्ची सांस्कृतीक दहशत", आम्हाला खूप म्हणजे खूपच अनुभव आहे या गोष्टीन्चा! कारण या सांस्कृतिक दहशतवाद्यान्ची पहिली धाड आमच्यावरच पडते!

माझ्या धर्मनिरपेक्षतेवर गालबोट नको म्ह्णून सणासुदीच्या निमित्ताने रामेश्वर आणि मदुरैला देवदर्शनाला गेले होते ....

लिम्ब्या गावाच ना इथे फारसं कोनाला माहिती असेलसं वाटत नाही.
सोलापुर आणि उस्मानाबादच्या बाउन्ड्रीवरचं गाव आहे.
बार्शीच्या पुढे.
नवश्रीमंत वै नाहीच्चेत रे तिकडे.
खाण्याचे वांदे मात्र बढाइदार लोक आहेत तिकडे.
पारंपारीकतेचा मुखवटा ओढुन रडगाणं गात बसतात सगळे.
अजुनही गावाला जायला चांगला रस्ता नाहिये.
तो कसा मिळवावा ह्याचा विचार करणारे कोणी नाहीत.
जलसंधारणासाठी काही काम होतय असही दिसत नाही. (ही कदाचित फारच मोठी अपेक्षा आहे.)

झकोबा, बोलीभाषेमधे हे सगळे दुर्दैवी आहे, पण याकरता दुर्दैवी या शब्दाद्वारे देव अन दैवाला घाउकरित्या दोषी धरण्याचे कारण नाही. शब्दान्चा असा स्वैर वापरदेखिल हिंदु धर्माला कमीपणा आणतोय. असो.

>>>> सुधारणा न होण्याची प्रवृत्ती एखाद्याच्या जीन्स मध्येच असते. <<< अस्ले काही बोलू नकोस! नस्ती आफत ओढवायची.
सुधारणा म्हणण्यापेक्षा, सकारात्मक बदल घडविण्याची व ते घडविण्यासाठी आत्मावलोकन करून आत्मपरिक्षण करुन स्वतःच्या आत्यन्तिक टोकाच्या ताकदीचा वापर "सगळ्यान्साठीच" करण्याची मनोवृत्ती जाणिवपूर्वक लहानपणापासूनच शिकवली/जोपासली गेली तर "जीन्स" वगैरेवरही मात करता येते व असलेले अन्गभूत गुण (सद्गुण/दुर्गुण) चांगल्या व क्रिएटीव्ह कामाकरता वापरता येतात. पण हे कोण करणार? जो तो आपापल्या चौकटीबद्ध स्वार्थापुरताच विचार करू लागला आहे, व यालाच कलियुग असेही म्हणता येते. अरे सान्गितले ना, की बापजाद्यान्नी लावलेल्या झाडान्ची तोड, देवरायान्ची तोड सर्रास करणारे नव्याने एकही झाड लावताना दिसत नाहीत, अन का? तर म्हणे याची फळे आम्हाला कुठे बघायला तरी मिळणारेत का? माझ्या पुढच्या पिढीला तरी काही मिळेल का? पुढचे कुणी बघितलय? अरे मोठ्या वृक्ष जातिचे झाड लावुन तिथे गेल्या पाचपन्चवीस वर्षात नियमाने रोज सकाळी मुतले असते तरी झाडे मोठी वाढली अस्ती. पण कोकणातल्या म्हणीप्रमाणे वहात्या जखमेवर करंगळीभर जाडीची मूताची धार घालण्याचे औदार्य व सौजन्य देखिल जो समाज गमावून बसला आहे त्याकडून बाकी कशाचि अपेक्षा करता येणे शक्य नाही. असोच.

सगळीकडे ही या माझ्या आत्ताच्या जन्मापुरते व या क्षणापुरते मला काय मिळतय व मी कितीकिती उपभोगुन घेतोय इतकेच बघण्याची चार्वाकवृत्ती भिनलेली असताना वेगळे काय नि:ष्पन्न होणार? अन तरीही म्हणायचे की हा समाज आपला आहे! अन मी ही याच समाजातील आहे Happy

"गुन्डागर्दीकरता समाजातल्या नाठाळांकडून हिन्दू सणान्चा वापर", <<
आसारामाला पण नाठाळांच्यातच टाका. संत कसला डोंबलाचा.

मी मराठवाड्यातला. आमच्या गावाला माझ्या जन्मापासुन तरी नक्कीच पाणी नाहीये. पण जलसंधारण करावं असं आयुष्यात कुणाला वाटलेलं नाहीये.

उगाचचं उठसुट राजकारणी मंडळींना नावं ठेवणं सोपं आहे. पण लोकांनी काय केलं एवढ्या वर्षात!
Rain water harvesting system - अजुनही कुठे सापडणारं नाही. का, माहित नाही.

आज मी पुण्यात राहतो, इथं पाणी वापरायला मिळतं म्हणुन कोणाच्याही पोटात दुखायचं कारण नाहीये.
बीड - आमच्या लहानपणी नदीला चांगलं पाणी असायचं, आज दिसतचं नाही. आणि ह्यासाठी जेवढे राजकारणी जबाबदार आहेत, तेवढेच तिथे राहणारे लोकही. ती नदी म्हणजे केवळं गटारगंगा झालीये. आणि अशीच अवस्था मराठवाड्यातल्या प्रत्येक गावाची आहे. जेव्हा पाणी आहे तेव्हा मनमुक्त वापरायचं आणि कमी पडतयं तेव्हा दुसरे का वापरतं आहेत म्हणुन ओरडतं राहायचं!

दुसर्यांना दोष देत राहणं खुप सोपं आहे.

The Oath of Vayuputras मध्ये १ छान वाक्य आहे, 'weak people always blame to the people, circumstances around them.'

नीधप,

>> आसारामाला पण नाठाळांच्यातच टाका. संत कसला डोंबलाचा.

पुरावे असल्यास जरूर तसे करावे.

आ.न.,
-गा.पै.

दुष्काळग्रस्तांचा विषय चाललाय म्हणुन इथे लिहिते.

कालच्या डिएनए वृत्तपत्रात एक बातमी वाचली. सध्या मुंबईतल्या वेश्यावस्तीत मराठीतुन बोलणा-या मुलींची संख्या वाढलीय आणि ही आवक दुष्काळग्रस्त भागातुन होतेय. एका मुलीबद्दल लिहिलेले. तिच्या वडलांनी दुष्काळी परिस्थितीमुळे आत्महत्या केली, घरी आई, इतर भावंडे. तिला कोणीतरी औरंगाबादेला घेऊन गेले घरकामासाठी आणि तिथुन थेट मुंबई. आपल्याला काय काम करावे लागणार हे कळल्यावर तिथे आईला फोन करुन कळवले. आईने जे आहे ते स्विकार नाहीतर सगळेच उपासमारीने मरतील हा सल्ला दिला. ही मुलगी ११वी शिकलेली आहे, इंग्रजीत संभाषण करु शकते. (तिच्या इंग्रजीमुळे ह्या बाजारातल्या इतरजणी तिची खिल्लीही उडवताहेत Sad ) तिच्यासारख्या अजुन ब-याच आहेत, ज्या १०-१२ वी पर्यंत शिकल्या आहेत आणि आज मुंबईच्या बाजारात उभ्या आहेत स्वतःला विकुन घरच्यांची पोटात दोन घास घालत.

वाटले, ह्या मुलींसाठी कोणी काहीच करु शकत नाही का? मुंबईत घरकाम, घरातल्या लहान्/वृद्ध/आजारी इ. लोकांबरोबर दिवसभर राहायला कोणी मिळत नाही. या अशा मुलींना ह्या कामाला लावले तर? कोणा एनजीओ किंवा इतर संस्थांनी पुढाकार घेऊन, थोडेफार ट्रेनिंग देऊन, त्यांची हमी घेऊन, यांना रोजगार मिळवुन दिला तर विक्रयाचे काम करण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही.

मुली शिकलेल्या आहेत आणि शिक्षण असुनही आज जर त्यांच्यावर पोटासाठी ही वेळ येत असेल तर मग आपण कसली प्रगती केलीय? Sad

Pages