वर्षाविहार २०१३: संयोजक आणि नवीन कल्पना कळवा

Submitted by admin on 22 March, 2013 - 00:13

यंदाचा (२०१३) वर्षाविहार हा आपला ११वा ववि आहे.. दहा वर्ष दणक्यात झालेल्या या उपक्रमात आता नवीन काहितरी भर टाकली पाहिजे , याचं स्वरुप बदललं पाहिजे असा विचार आहे. पण काय आणि कसं ते नक्की ठरलेलं नाही...

या करता आवश्यक गोष्ट म्हणजे नवीन संयोजक आणि त्याचबरोबर नवीन कल्पना...आणि त्याला पुरेसा वेळ मिळावा म्हणून आजच धागा सुरू करत आहोत.

तर मायबोलीकरांनो,
यंदाच्या ववि संयोजनात भाग घ्यायला आवडणार असेल तर तुमचं नाव या धाग्यावर कळवा.

संयोजनात भाग घ्यायला जमणार नसेल तरी हरकत नाही. पण तुम्हाला ववि कसा हवा आहे?...काही नवीन कल्पना ? लोकेशन्स ? स्वरुप, आवडणार्‍या नावडणार्‍या गोष्टी ? हे सांगू शकता. चांगल्या कल्पना आल्या तर त्याचा या वविमध्ये नक्कीच अंतर्भाव करता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रूनीच्या पिशवीच्या कल्पनेला अनुमोदन Happy अतिशय उपयुक्त बाब आहे ती.

(वॉऽऽव, मायबोलीचा लोगो असलेली पिशवी घेऊन लिम्ब्या रविवारी मंडईतून भाजी घेतोय, आजुबाजूचे लोक, भाजीवाला, त्या देखण्या पिशवीकडे अन त्यावर ठसठशीत पणे लिहीलेल्या "मायबोली" अक्षरे अन लोगो कडे आसूसून बघताहेत, मायबोली असे लिहिलेले वाचल्यामुळे एरवी सदान्कदा हिन्दी मधे तोन्डाची टकळी चालविणरे भाजीवाले लिम्ब्याशी आदरेखून मराठीतच बोलु लागले आहेत...... Proud वगैरे वगैरे! मज्जा येईल
प्रॉब्लेम एकच होईल, आमच्यात ती पिशवी वापरायची कुणि यावरुन भान्डणे होतील. सबब मी तरी किमान चार पिशव्या घेणार! Happy )

माळशेज घाटात सुशांत आणि एम टी डी सी असे रिसोर्ट असल्याची माहीती मिळाली....

माळशेज घाट

मुंबईपासून - १२६, पुण्याहून - १२०, नगरहून - १२४ आणि नाशिकहून - १३३ कि.मी. आहे.

ववि होण्यासाठी अगदी आदर्श ठिकाण वाटत आहे मला तरी......

असंख्य धबधब्यांच्या सानिध्यात फुल टु धम्माल!!!!!!!
<>
विदिपांना, फुल्ल टु, अनुमोदन!

मायबोलीच्या पिशव्या! भारी आयडिया!

आणि, एक सामाजिक कार्य मायबोलीद्वारे केल्याचे समाधान!

'प्लास्टीक हाटाव' मोहीम!

पिशवीपेक्षा सॅक वापरायला मला आवडेल.
(ज्याला हवं त्याला टीशर्ट्स पण द्या प्लिज माझी बहिण मागच्या वर्षीपासून मागे लागलीये )
माळशेज घाट ला अनुमोदन

माझी बहिण मागच्या वर्षीपासून मागे लागलीये >>>>>>>>>>> साधा टिशर्ट घे..........कॅम्लिन चे कलर घे.......आणि मायबोली चे नाव लिही त्यावर................आणि दे तिला.......... Happy

एमटीडीसी च्या फ्लेमिंगो रिसॉर्टचे लोकेशन चांगले आहे मात्र प्रॉपर्टी मेन्टेन केलेली नाहीये नीट.

एमटीडीसी च्या फ्लेमिंगो रिसॉर्टचे लोकेशन चांगले आहे मात्र प्रॉपर्टी मेन्टेन केलेली नाहीये नीट. <<
टिपिकल एमटीडीसी म्हणजे.
एमटीडीसी लोकेशन्स एकदम मोक्याची. मेंटेनंस बोंब आणि रेटस कैच्याकै....

कापडी पिशव्या झकास उपक्रम. ज्यांना १पेक्षा जास्त हव्या असतील त्यांना २ घेतल्यास १ मोफत. शुभेच्छा ... शुभेच्छा ... परदेशी पाठविण्याचीही सोय करावी.

मायबोली पिशव्या आवडतील. सॅक तर त्याहीपेक्षा जास्त आवडेल. Happy

आम्ही जुनच्या शेवटच्या आठवड्यात परत दिल्लीला येणार..म्हणजे नेहेमीप्रमाणे वविला येता येणार नाही. Sad

मायबोली पिशव्या >> +१!! मायबोली लोगो असलेल्या सॅक, झोळ्या / शबनम, बटवे आणि तर्‍हेतर्‍हेच्या कापडी पिशव्या लगेच डोळ्यांसमोर आल्या!! Happy

सॅक तर त्याहीपेक्षा जास्त आवडेल. + सॅक, झोळ्या / शबनम, बटवे > >>>>>>> मोबाईल सुध्दा चालेल मायबोली चे कवर असलेला Wink

खुप छान कल्पना आहेत सगळ्यांच्या
पण याच बरोबर आपल्याला संयोजकही लागतील

मुंबई पुणे नाशिक नगर प्रत्येक ठिकाणाहुन कमीत कमी ४ जण तरी ...

पण याच बरोबर आपल्याला संयोजकही लागतील
>>> विनय ... Lol

रुनीची पिशव्यांची कल्पना अतिशय झक्कास. तसंच मंजूडीची सॅकची कल्पनाही भारीच आहे. संयोजक, मनावर घ्याच.

तसंच रियाची सॅकची कल्पनाही भारीच आहे.>>> ओय् मामे! मेरा श्रेय मत हिराओ! इसी पानपे सबसे पैला प्रतिसाद देखो!

मला ववि संयोजक मंडळात यायला आवडेल.

मामी का हसत्येस ? >>> अवो, शंभराहून अधिक पोस्टी आणि अनेक सुचवण्या, वाद, संवाद, शाब्बासक्या, आठवणी, खाणीपिणी वगैरे वगैरे करून झालं पण संयोजनाकरता कोणी अजून नावं फारशी दिली नाहीत, त्या पार्श्वभूमीवर तुमचं वाक्य जरा गंमतीशीर वाटलं. Happy

मंजूडी, श्रेय जिचं तिला देण्यात आलं आहे. स्वारीच आहे हां. माप करून टाक. Happy

संयोजकांना काय काम असतं ते इथे सविस्तर लिहा, अथवा आधी कुठे लिहिलं असेल तर दुवा द्या इथे. म्हणजे उत्सुक नवीन संयोजक कामाचा आवाका पाहून ठरवू शकतील संयोजनात उडी मारायची की नाही ते.

जव्हार मस्तच आहे,
नाशिक जव्हार - ६० किमी.
मुंबई जव्हार - १२५ किमी
पुणे जव्हार २३० किमी
पावसाळ्यात मुंबई जव्हार/नाशीक जव्हार हा ड्राईव्ह मस्त अनुभव आणि सगळा परिसर एकदम हिरवाकंच होऊन जातो. सनसेट पॉईंट रीसॉर्ट हे एकमेव रिसॉर्‍ट आहे आणि चांगले आहे. बहुतेक डॉर्मेटरी पण आहे ग्रुप युज साठी.
सनसेट पॉईंट जवळ जयसागर डॅम आहे , त्यालगत एक दोन रिसॉर्टस चे काम चालु होते. ती तयार झाली असतील तर अजुन ऑप्शन्स मिळतील.
जवळच दाभोसा वॉटरफॉल आहे आणि तीथे नेचर ट्रेल्स कॅम्प्साईट्/रुम्स आहेत ,पण थोडे आड्वाटेवर आहे.
ठाणे जिल्यातले महाबळेश्वर असा लौकिक असला तरी अजुनहि पर्यटकांची फारशी वर्दळ नसल्याने जव्हार फारसे कमर्शिअलाईझ झालेले नाहीए.
जव्हारला ववी असेल तर माझी नावनोंदणी आत्त्ताच करतोय.

Pages