बालुशाही

Submitted by प्राजक्त्ता on 30 March, 2013 - 08:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ १/२ वाटी मेदा, ३ १/२ वाटी साखर, ४ वाटी पाणी, पाव किलो दही, पाऊण वाटी कोमट केलेले तूप ,तेल

क्रमवार पाककृती: 

प्रथम मेदा चाळून घ्यावा. त्यात कोमट केलेले तूप घालून मिक्स करावे. नंतर त्यात लागेल एतके दही घालून कणिकेसारखे मळावे. त्याचे लहान लहान गोळे करून तेलात मंद आचेवर तळून घ्यावेत.
साखरेचा एकतारी पाक करून त्यात हे तळलेले गोळे टाकावेत. थोड्या वेळाने एका ताटात १ तास थंड करावेत.

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे ३० ते ४० नग होतात.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राजक्ता त्या गोळ्यांना मध्ये मेदूवड्यासारखे छिद्र ( भोक ) पाडले की त्याला पदर सुटुन पाक आतपर्यंत मुरतो आणी त्या खुसखुशीत लागतात.