वर्षाविहार २०१३: संयोजक आणि नवीन कल्पना कळवा

Submitted by admin on 22 March, 2013 - 00:13

यंदाचा (२०१३) वर्षाविहार हा आपला ११वा ववि आहे.. दहा वर्ष दणक्यात झालेल्या या उपक्रमात आता नवीन काहितरी भर टाकली पाहिजे , याचं स्वरुप बदललं पाहिजे असा विचार आहे. पण काय आणि कसं ते नक्की ठरलेलं नाही...

या करता आवश्यक गोष्ट म्हणजे नवीन संयोजक आणि त्याचबरोबर नवीन कल्पना...आणि त्याला पुरेसा वेळ मिळावा म्हणून आजच धागा सुरू करत आहोत.

तर मायबोलीकरांनो,
यंदाच्या ववि संयोजनात भाग घ्यायला आवडणार असेल तर तुमचं नाव या धाग्यावर कळवा.

संयोजनात भाग घ्यायला जमणार नसेल तरी हरकत नाही. पण तुम्हाला ववि कसा हवा आहे?...काही नवीन कल्पना ? लोकेशन्स ? स्वरुप, आवडणार्‍या नावडणार्‍या गोष्टी ? हे सांगू शकता. चांगल्या कल्पना आल्या तर त्याचा या वविमध्ये नक्कीच अंतर्भाव करता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> आणि कोणी गाद्या टाकून बसला असेल तर, तिथे क्यू लागला <<<< Lol
ही आयडीया देखिल चान्गली आहे, कुणी जाळीच्या झोक्याचा डिलर असेल, तर दहा पाच जाळ्या लटकवुन दहा दहा मिन्टाची वामकुक्षीची सोय पुरवता येईल! नै? Wink

[मराठी जनहोऽ, व्यापारी बना.... अन्गी व्यावसायिकता बाणवा, नफ्याला/पैशाला नाही म्हणू नका, पैशे (अन प्रसिद्धी) कमावण्याकरताच सगळे करतोय हे सान्गायला लाजू नका, अन उगा सामाजिक फामाजिक बान्धिलक्यान्चे गालबोट लावून घेऊ नका - त्या गुजराथीमारवाड्यान्कडे बघा, वर्षाचे १२ महिने बत्तीसकाळ सकाळी सहापासून रात्री अकरापर्यंत दुकाने उघडी ठेवताना ते कोणत्या बान्धिलक्या (सामाजिक राहूदेच, कौटुम्बिक तरी?) पाळतात याचा कधी विचार केला आहे? विशी विद्या तिशी धनम, थोडक्यात हाती असलेली दहावीस वर्षे जरुर पैशामागे धावा! पुरेसा पैका गाठी मारा, अन मग निवान्त पणे सामाजिकवगैरे बान्धिलक्यान्ना कुरवाळत बसा! असो.]

उगा सामाजिक फामाजिक बान्धिलक्यान्चे गालबोट लावून घेऊ नका - त्या गुजराथीमारवाड्यान्कडे बघा, वर्षाचे १२ महिने बत्तीसकाळ सकाळी सहापासून रात्री अकरापर्यंत दुकाने उघडी ठेवताना ते कोणत्या बान्धिलक्या (सामाजिक राहूदेच, कौटुम्बिक तरी?) पाळतात याचा कधी विचार केला आहे? विशी विद्या तिशी धनम, थोडक्यात हाती असलेली दहावीस वर्षे जरुर पैशामागे धावा! पुरेसा पैका गाठी मारा, अन मग निवान्त पणे सामाजिकवगैरे बान्धिलक्यान्ना कुरवाळत बसा! असो.]>>>>

अ‍ॅडमिनांनी नव्या कल्पना मांडण्याचं आवाहन केलं आहे म्हणून सामाजिक कार्याची कल्पना मांडली होती. त्याची अशी खिल्ली उडवली जाईल असं वाटलं नाही.
असो!

- त्या गुजराथीमारवाड्यान्कडे बघा, वर्षाचे १२ महिने बत्तीसकाळ सकाळी सहापासून रात्री अकरापर्यंत दुकाने उघडी ठेवताना ते कोणत्या बान्धिलक्या (सामाजिक राहूदेच, कौटुम्बिक तरी?) पाळतात याचा कधी विचार केला आहे? >>> Lol

माबो ववि म्हणजे पैसे कमवण्याचा मोका आहे? Uhoh

>>> त्याची अशी खिल्ली उडवली जाईल असं वाटलं नाही. <<< मंजुडी, सॉरी, पण माझा नक्कीच तो उद्देश नव्हता.

>>> माबो ववि म्हणजे पैसे कमवण्याचा मोका आहे? <<<< कोण म्हणले? पण पैशे/प्रसिद्धी कमविण्याचे "शिकण्याचा" मोका नक्कीच होऊ शकतो. मला तरी त्यात गैर काही वाटत नाही. Happy

सॉरी, पण माझा नक्कीच तो उद्देश नव्हता>>> आणि तरीही ही अशी भाषा?

<<सामाजिक फामाजिक बान्धिलक्यान्चे गालबोट>> गालबोट? गालबोट???
<<सामाजिकवगैरे बान्धिलक्यान्ना कुरवाळत बसा!>>

>>> आणि तरीही ही अशी भाषा? <<<
अलबत, ही अशी भाषा, कारण ती कुणा एका व्यक्ति/आयडीला उद्देशून नाहीये, तर एकुणातच काहीही करायला गेले तर त्यात ओढुनताणुन "तथाकथित सामाजिक वंचितांचा संदर्भ" आणुन, जे करतोय ते करतानाही "अपराधी" वाटावे अशी वातावरण निर्मिती होते/केली जाते, याचा माबोवरील वा बाह्यजगातील संदर्भ घेऊन सांगीतले की, जे करायला जाताय, नेमके तेच करा, इतर काही घुसडवू नका. हो ना, सध्या दुष्काळ आहे तर रंगपंचमी खेळू नका असे कुठे कुठे बोलले जातेच आहे, परवा पाण्याच्या संदर्भातून कोणतरी अशा अर्थाचे म्हणाले की म्हणे इकडे तुम्ही जे सुखासीन जगताहात ते म्हणे तिकडचे ओरबाडून आणले आहे, बहुधा कालपरवा मुंबई का कुठचेसे आयुक्तान्नी देखिल साम्गितलय की रंगपंचमी खेळू नका!
उद्या काय? पाऊस जास्त झाला, तिकडे पूर आला म्हणून ववि साजरा करू नका म्हणायला लोक कमी करणार नाही, अन असल्या सामुहिक दुखवट्यान्चे प्रसार करणार्‍यान्चा संदर्भ घेऊन तो मजकुर आहे. हे असे सामुहीक दुखवट्याचे शहाजोग प्रसार गालबोट म्हणायचे नाहीत तर काय म्हणायचे?
खरे तर मी एकुणातच इथे प्रयत्नपूर्वक फारच सौम्य भाषा वापरतोय.
उद्या जर खरोखरच फनफेअर करायचे ठरलेच तरी त्यानिमित्ते देखिल कुठल्यातरी काही घटनेचा संदर्भ घेऊन हे करा वा ते करू नका असे शहाजोग सल्ले मिळू शकतील, त्यांचेकरता हे होते.
अन असे सामाजिक दुखवटे पाळायचेच असले, तर जरा गुगलुन बघा, भारतात दर मिन्टाला निव्वळ रस्ते अपघातात किती मरतात, प्रत्येकाकरता किमान एक मिनिट उभे रहायचे ठरवले तरी आख्ख आयुष्य पुरणार नाही, वा आयुष्यभर स्वस्थ उभेच रहावे लागेल! Proud असोच.
पुन्हा सांगतो, तुमच्या वा अजुन कुणाच्या सूचनेची खिल्ली उडवावी या उद्देशाने ते विचार मान्डले नाहीत, तर केवळ फ्याक्ट मान्डली आहे. याउप्पर तुमची मर्जी Happy

इकडचे तिकडचे संदर्भ जोडून दिले की मूळ मुद्द्यापासून फारकत घेऊन हातभर लांबीची पोस्ट लिहिता येते.

असोच!!

व्वा व्वा... वविची दवंडी आली Happy

आम्ही नेहमीप्रमाणेच इकडुनच हजर Sad

ववि साठी आयडियाच हव्या असतिल तर माझाही हातभार Happy

१. ३-४ जणांच्या ५-६ टीम्स बनवून 'माय किचन रुल्स' किंवा 'मास्टर शेफ' टाईप्स स्पर्धा ... दुपारच्या नाश्त्याची सोय Proud

२. जिप्सी / सावली वगैरे सारख्या दिग्गजांकडुन प्रकाशचित्रणाचे धडे / प्रात्यक्षिकं;

३. त्याच वेळात जागू, साधना, दिनेशदा (उपस्थित असल्यास) सारख्या निसर्ग प्रेमींकडुन मुलांसाठी निसर्गाच्या गप्पा.

४. शक्य असल्यास आणि साधन / जागा उपलब्ध असल्यास इथल्या रेग्युलर गिर्यारोहकांकडुन रॉक क्लाईंबिंग / रॅपलिंग इ इ चे धडे;

५, श्रमदानाची तयारी असल्यास जवळपासच्या गावात आधी चौकशी करुन काही सोयी सुविधा, मदत हवी असल्यास ती करु शकता.

६. प्रत्येकाने येताना आपल्यासोबत २-४ जुने (पण चांगल्या स्थितीतले) किंवा नवे - जसे जमेल तसे कपडे / चप्पल जोड आणावे आणि एखाद्या जवळपासच्या गावात हे सगळे कपडे गरजूंना द्यावे. किंवा शिधा आणावा आणि तो गरजुंना वाटावा....

सध्या इतकेच बास....अजुन काही सुचले तर लिहिते Happy

लाजो.. सेम पिंच मी पण हेच सुचवणार होते. पण वर चाललेलं संभाषण वाचुन धडकीच भरली. ( मी तर माझे, माझ्या नवर्‍याचे आणि रनयाचे न वापरलेले कपडे पण डोक्यात आणलेले.. Happy ) ...

मी एकदाही अजून वविला आलेले नाही, तरी लिहितेय Proud

मायबोलीवर एक्सपर्ट निसर्गवाचक खूप आहेत. पावसाळ्यात जर एखादा मान्सून नेचर ट्रेल आयोजित केला तर? जसे सिल्होन्डा, येऊर वगैरे ठिकाणी निघतात तशा धर्तीवर हे करता येईल. पावसाळ्यातल्या वनसृष्टीची सुंदर ओळख होईल सर्वांना या निमित्ताने. संख्या खूप असली तरी ग्रूप्स पाडून हे करता येईल. प्रत्येक ग्रूपसोबत एक एक्सपर्ट.
(मायबोलीवर खरं तर आता एक नेचर क्लबही निघायला हरकत नाही जो असे नेचर ट्रेल्स आयोजित करेल. पण ते नंतर)

वविच्या निमित्ताने फोटोग्राफी, आर्ट-क्राफ्ट शिबिर/मेळावाही यानिमित्ताने करता येईल. नीरजाची कल्पनाही त्या दृष्टीने आवडली.
तयार वस्तूंच्या विक्रीतून जमा झालेली रक्काम दुष्काळ निवारण निधीला किंवा एखाद्या पाझर तलाव योजनेला देता येऊ शकेल.

वरती सगळ्यांनी केलेल्या सूचना नक्कीच कल्पक आहेत पण वविला एखाद्या कार्यशाळेच स्वरुप येऊ नये असे मला स्वताला वाटते!

भोरजवळचे "अ‍ॅडव्हेंचर पार्क" चालू शकेल का?

लोनावळा, मुंबई-पुणे हायवे वरच आहे, त्यापासुन २० कि. अंतरावर कोरायगड आहे. गडावर सहज चढण्यासाठी पायय्रा आहेत. आणि एकदा गड सज्ज केला कि चोहीकडे फक्त निसर्गाचा आनंद घ्यायचा.
खाण्या-पिणाची ( म्हणजे नशा नसलेले कोणतेही पेय) सोय मात्र स्वःतालाच करावी लागेल.

beaten-up-animation-animated-beaten-up-smiley-emoticon-000385-large.gif

खाण्यापिण्यातली चंगळ कमी करा.
अर्थात भोजन हे साध, मग वरण-भात, झुणका भाकर अस ठेवा,
बक्षिसाची लयलुट ठेवा. (लहान-थोरांपासुन)

वरण-भात, झुणका भाकर अस ठेवा,
>>>>

आजकाल हेच चंगळीचं जेवण समजलं जातयं शहरवासियांसाठी!

मध्ये त्या गोखले मळ्यात गेलो तर १७५ रु. पिठलंभाकरी वरण भात! एक ग्लास ताक मगितले तर १५ वरती मागितले त्या गोखल्याने!

>>>> एक ग्लास ताक मगितले तर १५ वरती मागितले त्या गोखल्याने! <<< Lol
कित्ती तो सात्विक संताप जीवाचा! अहो बिसलेरी घेतलीत तर एक लिटर १५ रुपयेच पडतात. मग त्या पाण्यात थोडे दह्याचे सत्व मिसळलेले ग्लास भर ताक १५ ला दिले तर काय हरकत आहे? असो.
मला ताक अतिशय आवडते, पण चालत नाही तब्येतीला.

मध्ये त्या गोखले मळ्यात गेलो तर १७५ रु. पिठलंभाकरी वरण भात! एक ग्लास ताक मगितले तर १५ वरती मागितले त्या गोखल्याने!
>>
आळंदी जवळचा का?
मला जाम आवडतं तिथे जेवायला :सर्लपः
आता या रविवारी जाऊन येते

सश्या हे तेच असेल ज्याबद्दल मी बोलतेय तर वर्थ वाटतात मला १७५ रुपये देणं......
बास ना पिठलं भाकरी ची चर्चा प्लिज

सश्या हे तेच असेल ज्याबद्दल मी बोलतेय तर वर्थ वाटतात मला १७५ रुपये देणं......
>>>>

रिया, अजिबात वर्थ नाही! ज्यांनी कधी चुल पाहिली नाही किंवा शेत पहिले नाही त्यासाठी ठिक!

मागिल वेळी बरे वाटले होते ह्यावेळी गंडवले त्याने! Sad

मध्यंतरी मी कोल्हापूरच्याही पुढे कागल की कुठेसेसे गेलो होतो, तेव्हा तिकडे १७ अन १८ रुपये किलोने ज्वारी मिळाली. ती वीसेक किलो घेतली.
मजसारखा सामान्य माणूस क्रेझपोटी घालविलेल्या १७५ रुपयात किती किलो ज्वारी अन किती ग्रॅम बेसन येईल याचा हिशोब करतो! काय करणार? जित्याची खोड.... Proud असो.

माळशेज घाटात सुशांत आणि एम टी डी सी असे रिसोर्ट असल्याची माहीती मिळाली....

माळशेज घाट

मुंबईपासून - १२६, पुण्याहून - १२०, नगरहून - १२४ आणि नाशिकहून - १३३ कि.मी. आहे.

ववि होण्यासाठी अगदी आदर्श ठिकाण वाटत आहे मला तरी......

असंख्य धबधब्यांच्या सानिध्यात फुल टु धम्माल!!!!!!!

>>>> सामाजिक उपक्रम करावा का नाही , केलाच तर कसा करावा ..हाही विचार महत्वाचा आहे लिंबुदा <<<<<
महत्वाचा विचार नक्कीच आहे मालक. किंबहुना, टीशर्टविक्रि वा अन्य उत्पन्ने (असल्यास) त्यातिल काही हिस्सा आपण देतोच.
रहाता रहातो प्रश्न, "प्रत्यक्ष सहभागाचा". अन तिथे गोची होते की "वेळ थोडा सोन्गे फार".
इच्छा खूप असते, पण मौजमजेच्या वातावरणाशी पूर्णपणे विसंगत वा बर्‍याचशा विरोधी अन गम्भिर अशा स्वरुपात घेण्याच्या सामाजिक कामान्ची सान्गाड घालू नये, (घालता येते पण त्याकरता पराकोटीचे उच्च सूत्रसंचालन अन "सहभाग" लागेल) असे माझे मत. [असली बाब संघाच्या शाखेच्या शिबिरात होऊ शकते, ववि मधे होऊ शकेल की नाही याबाबत मी साशंक आहे].

मला सहज आठवले, की कित्येक वर्षांपूर्वी म्हणजे १९८० ते १९८७ चे दरम्यान, जेव्हा मी मूर्तिकार/आर्टिस्ट म्हणूनच नोकरी करीत होतो, तेव्हाची माझी एम्पॉयर तिच्या काही मित्र/संघटन्नांकरता वेगवेगळ्या झोपडपट्ट्यान्मधे जाउन, तेथिल मुलांचे करता "क्राफ्टचे" वर्कशॉप घ्यायचे, त्यात शिक्षक म्हणुन माझा सहभाग असायचा. ते अजुनही वेगवेगळे उपक्रम चालवायचे, क्राफ्टचे वर्कशॉप हा त्यातिल निव्वळ एक लहानसा भाग होता.
माबोकरांनाही जर असे काही करायचे असेल, तर सर्वप्रथम आपल्यातीलच अशा विशेष योग्यता/शक्यता असणार्‍यान्चा शोध घेणे जरुरीचे आहे. ववि हे एकत्र येऊन अशा शोधाकरता उपयुक्त व्यासपीठ बनू शकते. व दोन ववि दरम्यानच्या काळात, अशी विशेष प्राविण्यता असलेले व विनावेतन हौसेखातर काम करू इच्छिणारे लोक एकत्रित येऊन, निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे उपक्रम राबवू शकतात, भले एखाद्या गटात एखाददोन लोक असतील तर दुसर्‍या कोणा गटात दहावीसपन्चवीस असे असतील. सुरवातीस हे अशक्य वाटले वा सुरवातीस आकडेवारीदृष्ट्या प्रत्यक्ष कृतिचा तुटपुन्जा प्रतिसाद आढळला तरीही कालान्तराने हेच कार्य फार मोठे रूप धारण करते असा स्वानुभव आहे.

माझा विरोध म्हणण्यापेक्षाही सावधगिरीची सूचना आहे, ती म्हणजे - वविच्या निमित्ताने एकत्र येतोच्चोत तर जाता जाता हे पण करुन टाकावे, (म्हणजे नन्तर उर्वरित ३६४ दिवस कसली जबाबदारि नको, पण वविच्या एक दिवशी "काहीतरी" केल्याचे मानसिक समाधान मात्र सदैव कुरवाळता येईल) अशा प्रकारे यातिल कोणत्याच उपक्रमाची गत व्हायला नको.
माफ करा, कुणाला दुखवायचा वा खिल्ली उडविण्याचा हेतू बिलकूल नाही, पण, एकन्दरीत अशीच गत होऊ शकेल असे भासते/जाणवतेवाटते कारण,
वृक्षारोपणाचा उल्लेख दिसला, - तर एखाद दिवशी जाऊन झाडे लावून वा बीया फेकून जर वृक्षारोपण यशस्वी होत असते तर आत्तापर्यन्त हा भारत देश गच्च झाडीने जन्गलमय होऊन गेलेला दिसला असता. तसे होत नाही. याकरता मध्यन्तरी / नुकतेच इथे माबोवर की न्युजपेपरमधे सातारा का कुठशाशा ठिकाणच्या एका महिलेचे वृक्षरोपणाबाबतचे कार्य वाचनात आले होते त्यातिल आशय आठवतोय. कुणाला संदर्भ लक्षात आला तर प्लिज लिन्क द्या बरं. ते एकूणच काम दीर्घ चिकाटीचे व अवघड असे आहे. एखाद दिवशी तासदोनतास जाऊन काहीतरी करण्यासारख्या या बाबी नाहीत (असे माझे प्रामाणिक मत). मग वविमधे हे वा तत्सम काम काय कारणे घुसडावे? वा ते हास्यास्पदरित्या घुसडवल्यासारखे होणार नाही का? असो.
आपल्या सर्वांचीच इच्छा काहीतरी "भरीव" करावे अशि आहेच आहे, व त्यास समर्थनच आहे. फक्त त्याची रचना वास्तविक पातळीवर व्हावी, निवळ भावनीक पातळिवर होऊ नये असे वाटते.
वविला अन वविनिमित्ते राबविण्याच्या सर्वच उपक्रमान्ना शुभेछा Happy धन्यवाद, जयहिन्द जयमहाराष्ट्र.
अन येवढे बोलून मी आपली रजा घेतो.

यंदा टी शर्ट सोबत किंवा टी शर्ट ़केले नाही तरी Reuse Recycle Reduce तत्वाखाली मायबोलीच्या चांगल्या कापडी पिशव्या करता येतील का? यात मापाचा प्रश्न येणार नाही तसेच भेट म्हणून (मायबोलीकर नसलेल्या लोकांनाही) सहज देता येतात, शर्टापेक्षा पिशव्या जास्त वापरल्या जातील त्यामुळे मायबोलीचे नाव अजून जास्त लोकांपर्यंत पोहचू शकेल

Pages