डबल इन्कम नो किड्स

Submitted by सौ. वंदना बर्वे on 25 March, 2013 - 00:43

डबल इन्कम नो किड्स

मूल हवे असणे ही कुठल्याही स्त्रीची सहजसुलभ नैसर्गिक भावना असते. दांपत्यजीवनाची वीण आणखी घट्ट करण्याचे काम पुढची पिढी करते. निसर्गाला अपेक्षित असलेल्या निर्मितीशी अपत्यप्राप्ती ही संयुक्तिकच आहे. निसर्गत: ती जवाबदारी स्त्रीकडे आली आहे. स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकालची माता होते.

मूल हवे असणे ही स्त्रीची निसर्गसुलभ व सहजभावना असते हे त्रिकालाबाधित सत्य असले तरीही परिस्थितीनुसार त्यात माणूस बदल करीत आला आहे. मूल का हवे याच्या कारणपरंपरेनुसार त्याची व्याप्तीही बदलते. परंपरागत दृष्टीकोनातून पाहता बऱ्याच ठिकाणी मूल हवे असते ते वंशवृध्दीसाठी. आपले नाव लावणारं पुढे कुणीतरी असावे या भावनेतुन. म्हातारपणाची काठी, असेट, वैवाहिक आयुष्यातला अनुबंध दृढ करणे, प्रेम, भावनिक ओढ, कुटुंबातला दबाव, पुरुषाच्या दृष्टीने विचार केल्यास त्याचा मर्दानगीशी लावलेला संबंध ही व अशी अनेक कारणे निसर्गसुलभ भावनेव्यतिरिक्त असतात. या भावनेला पूरक मूल होणे किंवा न होणे हे क्षमता, इच्छा, पर्यायाची निवड, प्राथमिकता या व इतर अशा अनेक कारणावर अवलंबून असतात.

आपले नाव लावणारे कुणीतरी असावे यासाठी, वंश वाढावा असं वाटणे ही भावना चुकीची नाही. आपल्या मागून आपले विचार आपले कार्य कुणीतरी पुढे न्यावे असे नवराबायकोला वाटणे ही सहजभावना आहे. त्याची पूर्तता केवळ मुलाकडूनचे होते मुलीकडून नाही हा विचार बदलत्या परिस्थितीनुसार बदलला पाहिजे. मुलगी ही मुलापेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाही हे स्विकारले पाहिजे. स्त्री हे दुसऱ्याचे धन त्या मुळे ती ज्या घरी जाते ते नाव लावते, आपले नाव लावणारा मुलगाच असतो या विचारातून मुलाला प्राधान्य देणे क्रमप्राप्त होते. केवळ नाव लावल्यानेच पुत्रत्व सिध्द होते का? दिवे लावणारा "वंशाचा दिवा" पाहून अनेक वृध्द जोडप्यांना अशा मुलापेक्षा जरी दुसऱ्या घरी असली तरी आस्थेने विचारपूस करणारी, भावनिक अनुबंध असणारी मुलगी जास्त जवळची व प्रिय वाटते. मुलगाच हवा या विचारातून स्त्रीभ्रूणहत्या करणे क्रूर व रानटीपणाचे आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाने मुलगीसुध्दा आपले नाव पुढे नेते हा विचार जोपर्यंत रुजत नाही, तोवर स्त्रीभ्रूण हत्या थांबणार नाही.

म्हातारपणाची सोय म्हणून जोडप्याला मूल हवे असते. दांपत्यजिवनात सुरवातीच्या काळानंतर आपल्या दोघांशिवाय बोलायला, विचार शेअर करायला कुणीतरी हवं असतं. भावनिक अभिव्यक्ती ही जवळच्या किंवा विश्वासातल्या माणासाशी होते. संसार स्थिर होऊ लागला की बरेचदा मध्यमवयात एकाकीपणाही वाढतो. अवतीभवती माणसे असूनसुध्दा एकलेपणा छळतो. परावलंबित्व वाढीस लागतं. साध्या साध्या गोष्टीसाठीही इतरांवर अवलंबून रहावं लागतं. याकाळात स्वत:चं असं कुणीतरी असावं असे वाटणे सहाजिकच आहे. संभाळणे पैशाने विकत घेता येत नाही. प्राधान्यक्रमाने आधार हा भावनिकदृष्ट्या जवळच्या व्यक्तीचा घेतला जातो. शारीरिक परावलंबनाबरोबर आर्थिक परावलंबित्व येऊ नये. पैसे मागावेच पडले ते अपत्याशी मागावे ही भावना त्यामागे असते.

वैवाहिक सौख्य अपत्यप्राप्तीतच आहे असे मानणारी अनेक जोडपी आहेत. अपत्यप्राप्ती झाली नाही तर त्याना आपल्या आयुष्यात कमतरता वाटू लागते. जोडप्याला अशी ओढ असणे स्वाभाविक आहे. पण त्या जोडप्याला बळजबरी करणे अयोग्य आहे. मूल होवू द्यावे अथवा नाही किंवा ते कधी होऊ द्यावे याचा निर्णय त्यादोघांखेरीज कुटुंबातली इतर माणसे करताना दिसतात. वडिलधाऱ्यांची इच्छा हा भाग वेगळा आणि सक्ती हा भाग वेगळा. इच्छा जरूर असावी पण सक्ती नसावी. मूल न होण्यावरून टोमणे मारणे, वांझोटी ठरवणे हे उपद्रवी उद्योग दुर्दैवाने आम्ही बायकाच जास्त करतो. नवपरिणीत जोडप्यानेही आपले मुलांविषयीचे मत खुलेपणाने मांडले पाहिजे. होणारी घुसमट थांबते.

आजची युवा पिढी शिक्षणासाठी खूप कष्ट घेते. आपले करियर निवडते. त्यावरून यशस्वी वाटचाल करते. अशी वाटचाल करीत असताना त्यांना वाटेत अडथळे नको असतात. लग्न करणे ही गोष्ट सहसा नाकारली जात नाही. कारण दोघेही कमावती असतात. कुणीही कुणावर अवलंबून नसतं. त्यामुळे अडचण होत नाही. मुल होणे अडचणीचे असते. अनेक समस्या त्यातून निर्माण होतात. मूल संभाळायचं कुणी, त्यासाठी करियर सोडायचं का?, सोडायचच झालं तर कुणी? असे अनेकानेक प्रश्न उद्भवतात. यातूनच नवीन पिढीने काढलेला मार्ग म्हणजे डिंक (डबल इन्कम नो किड)

प्रजननाच्या निसर्गातल्या सहज नियमाला किंवा प्रक्रियेला खीळ बसणार नाही का? कुटुंब व्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होणार नाही का? अपत्यसुख नकोच असेल तर मग लग्न तरी का करायचं? फक्त इन्कम डबल करायला? असे अनेक प्रश्न उभे राहतात. आपण काही पिढ्या मागे जाऊ. कुटुंबात किमान दहा मुले असणे सामान्य गोष्ट होती. आर्थिक स्थिती किंवा करियरचा प्रश्नच नव्हता. विभागणी ठरलेली होती. नवऱ्याने शेती, व्यवसाय किंवा नोकरी करायची व बायकोने घर संभाळायचे. बदलत्या काळानुसार स्त्री शिक्षणात पुढे आली. शिकून आपले कार्यक्षेत्र निवडून त्यावर मार्गक्रमण करू लागली. संसाराला हातभार लाऊ लागली. नोकरी किंवा करियर संभाळून अथवा वेळप्रसंगी करियर सोडून मुले व घर संभाळू लागली. आता करियरसाठी मूल नकोच अशी मानसिकता निर्माण होतेय, खास करून उच्चशिक्षित व उच्चमध्यमवर्गीय युवापिढीत.

मूल होणे म्हणजे नोकरीवरून घरी येताना उशीर झाला तर पार्सल आणण्याइतकं सोपं नाही. मूल ही दांपत्यजीवनातली सर्वात मोठी जवाबदारी आहे. मुलासाठी गुणात्मक वेळ देणे जमत नाही. पाळणाघरात ठेवावे लागते. पाळणाघरात ठेवले तरी घरी परतल्यावर त्याच्यासाठी बालविश्वात रमावेच लागते. उद्या मिटींग आहे, रिपोर्ट तयार करायचे आहेत हे त्याच्या आकलन शक्तीच्या बाहेरचे असते. मूलाला वेळही द्यायचा आहे आणि करियरही सोडायचे नाही अशा कुचंबणेत, मानसिक ओढाताणीत अनेक कुटुंबे अडकलेली दिसतात. अशा ओढाताणीत अडकण्यापेक्षा मूल नकोच अशा निर्णयाप्रत एखादे जोडपे आलेच तर त्याला गुन्हेगार ठरवणे चुकीचे ठरते. प्राप्त परिस्थितीनुसार दोघांचा जवाबदारीने घेतलेला निर्णय म्हणून त्याचे स्वागत करावे. त्याचा अवश्य आदर करावा.

काही अधोरेखित करण्यासारखे मुद्दे याबाबतीत समोर येतात. लग्न होण्याअगोदरच त्याबाबत होणाऱ्या जोडीदाराला तशी स्पष्ट कल्पना देणे आवश्यक आहे. निर्णय दोघांचा असावा. डिंकचे पुढचे होणारे परिणाम याविषयी साकल्याने विचार करणे व त्यावर ठाम राहणे हे दोघांनाही जमणे आवश्यक आहे. मध्येच मूल हवे असे कुणा एका जोडीदाराला वाटणे सहजीवनात समस्या निर्माण करणारे ठरू शकते. करियरीस्टीक पिढीला जसे मागची पिढी नकोशी असते तशीच पुढलीही. मूल ही जवाबदारीच्या जाणीवेने नको म्हणणाऱ्या जोडप्याने ते संभाळण्यासाठी स्वत:च्या पालकांचा पर्याय का निवडू नये? तसे नसेल तर करियर आणि पैसा हेच प्राधान्य ठरते. बाकी काहीच नाही.

डिंक ही अवस्था आहे की समस्या हा भाग वेगळा. तो पाहणाऱ्याच्या दृष्टीकोनावर ठरतो. सहजीवनातल्या प्राथमिकतेवर ठरतो. मला असे वाटते, बदलत्या काळात, बदलत्या कुटुंब व्यवस्थेच्या तुटलेल्या दुव्याना जोडले तर डिंक ही समस्या होणार नाही. मुलांना संभाळायला, संस्कार करायला समंजस व जवाबदार मागची पिढी आणि त्यांची जवाबदारीने, जाणीवेने काळजी घेणारी युवा पिढी सामंजस्याने लुडबूड न करता वावरली तर निश्चितच अपत्य ह्या निसर्ग सुलभ भावनेला "डिंक" लागणार नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'Dink' navacha navin contraceptive yetay ka market madhye? Happy

विस्मया आपल्या पहिल्या प्रतिसादाशी १००% सहमत..
परंतु, आपल्या दुसर्‍या प्रतिसादाचा सूर असा आहे की जणु वंदनाताईंनी इथे अपत्यसंगोपनात येणार्‍या अडचणी मांडल्या आहेत आणि आपण म्हणता आहात की सर्वांनी त्यांना मुले वाढवतांना येणार्‍या अडचणी आणि आपापल्या प्रायोरीटीज इथे शेअर कराव्यात.

पण इथे "दुप्पट उत्पन्न असतांना मुले जन्माला घालणे योग्य की अयोग्य" अश्या टाईपची चर्चा आहे. त्यातसुद्धा या वेळी वंदनाताईंनी कुणा एकाची बाजु न घेऊन ते सुज्ञ वाचकांवर सोडले आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता तशी चर्चा वंदनाताईंना नक्कीच अपेक्षीत नसावी.

बाकी इतर सर्वच्या सर्व प्रतिसादांना खुप अनुमोदन.

फक्त सिमन्तिनी यांचा सरोगेट मदर चा मुद्दा कळला नाही.

Happy पियुपरी >> पैशासाठी सरोगेट कोणी झाली असेल आणि नन्तर खर्या आइने मुल नेले नाही तर काय असे मी गिरिजाला विचारत होते... Happy तिने त्याब्द्द्ल नाही मत विचारले....

फारच बाई बाळबोध लिहीता तुम्ही!!! पण आधीच्या लेखांवर शतकांनी प्रतिक्रिया येऊनही लिहायचे थांबला नाहीत, >> वत्सला! याचा अर्थ मायबोलीवर काय लिहले तर प्रसिद्धी मिळेल हे गणित मात्र लेखिकेला अचुक जमले आहे.

>>वत्सला! याचा अर्थ मायबोलीवर काय लिहले तर प्रसिद्धी मिळेल हे गणित मात्र लेखिकेला अचुक जमले आह>><<

तुम्हाला कसे कळले की प्रसिद्धी मिळण्यासाठी असे करत असावे? की नुसताच आरोप उगाचच?

तुम्हाला कसे कळले की प्रसिद्धी मिळण्यासाठी असे करत असावे? की नुसताच आरोप उगाचच?>> आरोप?? अहो! तारिफ करतेय मी! smiley2.gif

>>आरोप?? अहो! तारिफ करतेय मी>><<
हि तारीफ आहे का?
पण तुम्ही प्रश्णाचे उत्तर दिलेच नाही. नक्की प्रसिद्धी "ह्या कारणासाठीच" लेखिका लेख लिहितेय हे तुम्हाला कसे काय कळले? तारीफ हि पुढची बात आहे.

ताईना कोपरापसून नमस्कार.
ताई आपल्या प्रत्येक लेखातून बायकांना योग्य जीवन कसे जगावे याची सुंदर शिकवण देत आहेत.
आणि 'बोले तैसा चाले' या उक्तीचा ... अरेरे चुकलेच बोले तैसा चाले नव्हे यांचे उलटच आहे. यांचे चालून झालेले आहे आणि अता यांनी चाललेली वाटच कशी सर्वोत्तम आहे आणि त्याशिवाय वेगळे काही करणे कसे अयोग्यच आहे याचे ज्ञान समस्त बायकांना करून देण्याचा विडाच ताईंनी उचललेला दिसतो.
अत्तापर्यंतची ताईंची शिकवण थोडक्यात इथे मांडण्याचा मोह आवरत नाहीये ..
१. बायकांनी जास्त शिकू नये. ( जास्त म्हण्जे कीती तर भावी नवर्‍यापेक्षा कमीच शिकावे.) नवर्‍यापेक्षा जास्त शिक्षण घेतल्यास ते शिक्षण अहंकारास कारणीभूत ठरते.
२. लग्न केलेच पाहिजे पण लव्ह मॅरेज करू नये. ठरवून विवाहच करावा.
३. सासरी एकत्रच राहिले पाहिजे. वेगळे राहण्याचा विचार करू नये.
३. पैसे कमवू नये. कारण अहंकार् आणि घराकडे दुर्लक्ष.
३. मूल पाहिजेच, पण कीती मूले ते अजुन ताईंनी सांगितले नाही. १ का २ ? कीती मुले असावीत ओ ताई ?

डेलीया मला वाटते वंदनाताई हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. माझ्या माहितीत शेजारीपाजारी अश्या अनेक काकवा आहेत ज्यांची मते थोड्याफार फरकाने अशी आहेत. म्ह्णजे एखादीचे मत यांच्या पहिल्या लेखासारखे.. एखादीचे दुसर्‍या लेखातल्या मतासारखे इत्यादी. तुझ्या आसपससुद्धा अश्या बायका असतीलच.

त्यांना बायकांनी कायम पडते घेणे, नमते घेणे, कमी शिकणे, संसारालाच सर्वस्व वाहुन टाकणे, मुले जन्माला घालणे आणि त्यांना वाढवण्यातच इतिकर्तव्यता मानणे हेच योग्य वाटते. याचे कारण म्हणजे त्यांच्या आसपासच्या वातावरण आणि संस्कार ज्याला आपण "सोशल कंडिशनींग" म्हणतो. आपण ज्या वातावरणात वाढलो किंवा शिकलो त्यामुळे आपल्याला हे कळते की ज्याला त्या नैसर्गीक, स्त्रीसुलभ म्हणतात तो "सोशल कंडिशनींग" चा परिणाम आहे. पण त्यांना हे कळणे अवघड आहे. त्यामुळे त्यांना त्यातच आनंद वाटतो. त्यात आपण उपदेश करुन काही फायदा आहे का?

मूळ लेखापेक्षा प्रतिसाद जास्ती इण्टरेस्टिंग!
'Dink' navacha navin contraceptive yetay ka market madhye?>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> मामे............वात्रट कुठली!

आता सगळे विचारतच आहेत तर मी सुध्दा विचारुन घेतो.................
..
लग्न ठरल आहे.........३-४ महिन्यात भर पावसाळ्यातच करायचा विचार आहे....

माझा पगार ३०-३५ हजारा पर्यंत जातो......आणि होणार्या बायकोचा ४० च्या वर आहे.. घर स्वतःचे आहे...
म्हणजे किमान ६० तरी घरात येतील .. अश्यावेळेला मुल किती होउ द्यावी.../??????????????
.
.
कृपया मार्गदर्शन वेळेत करा अन्यथा वेळ निघुन जाईल ............... Uhoh

पियू परी... १००००००००००००००००० मोदक!!!

वंदना,
तुम्ही लिहीलेले बरेच लेख वाचले... न पटण्याची कारणे
१) एका वेळी एका विषयावर न लिहीणे
२) अनेक विषय एकाच लेखात मांडण्याचा अट्टाहास / प्रयत्न त्यामुळे लेखिकेचा पर्यायाने वाचकांचा गोंधळ
३) आपण ज्या विषयावर लिहीणार त्याचा व्यवस्थित अभ्यास न करता, बदललेल्या काळाचे भान न ठेवता याचा व्यापक दृष्टीकोन न ठेवता अनेक जनरलाईज्ड सेंटेंसेस... आणि तीच बरोबर असल्याचा Naive/Narrow दृष्टीकोन
४) उदाहरणे देताना त्यावर मते देण्याचा अट्टाहास! आपल्याला वाटतात ती मते सोदाहरण देऊन निर्णय वाचकांवर सोपवता आला असता... कोणाला काही आवडतं/नाही आवडत... कोणाला काही पटतं/ काही नाही पटत... हेच/तेच बरोबर हे कोण ठरवणार? कारण ज्या साठी लेख लिहीलेत ती परीस्थिती कधी/का/कोणामुळे आलेय? ती बरोबर/चूक? चूक असेल तर ती सुधारण्यासाठी काय करावं/काय करू नये... हे काहीच स्पष्ट होत नाहीय!
५) बर्‍याचदा हे मनात आलेले विचार... तुमच्या आजूबाजूची परीस्थिती आणि तुमच्या वाचन्/सर्वेक्षणाचा विचार यांतील तफावत पाहता तुम्ही रँडमली मांडत गेला आहात.. सहज सुचलं अस्वस्थ झालं म्हणून पण ते का लिहीलेत? त्यांतून काय निष्कर्ष काढता येइल? ही परीस्थिती चूक वाटतेय की बरोबर यात बर्‍याचदा तुमचाच गोंधळ झालाय... त्यामुळे बर्‍याचदा विरोधी मते एकाच लेखात येतात. कारण इथली काही मते वाचून नव्या मतांची ओढ वाटतेय (जुने काही लेख व नवीन लेखांतील विचारात झालेली प्रगती पाहता) पण जुने वळणही सोडता येत नसल्याने उडणारा गोंधळ याने विस्कटीत विचार मांडले जाऊन वाचक तर गोंधळतोच. पण तुम्हाला नक्की काय मांडायचे आहे/या लेखांचे प्रयोजन काय, हे ही समजत नाही. याचा तुम्हीही कधी विचार केला नाहीत इतकी ललिते लिहून/मते वाचूनही...
६) बदलता काळ व लग्न, कुटुंब, समाज, नातेसंबंध, मुले, संगोपन, करीयर हे सर्व एकमेकांशी निगडीत असूनदेखील सगळी भेळ एकत्रित मांडण्यापेक्षा एकावेळी एक विषय निवडून, त्याला निगडीत विषय पुढच्या लेखात मांडून, स्वतःला आलेले अनुभव साध्या सरळ भाषेत लिहून, स्वतः मतनोंदणी करण्यापेक्षा वाचकांवर निर्णय सोपवला असता.. तर प्रत्येकाला बदलत्या काळानुसार आलेले अनुभव व मते मांडता आली असती... व त्यातून तुमच्या पुर्वापार मतांना नवा दृष्टीकोन मिळाला असता, नवी मते, नवे अनुभव यांनी तुमच्या आतापर्यंतच्या मर्यादीत क्षेत्रातील/मर्यादित वयोगटातील/मर्यादित परीस्थितीतील सर्वेक्षणाला नवी दिशा मिळाली असती... पुढचा लेख त्याच त्या मर्यादित गटांगळ्या खात भरकटण्यापेक्षा त्या अनुभवांवर लिहीता आला असता... असो... तुम्ही यापेक्षा नक्की चांगलं लिहू शकाल जरा अनुभवांची कक्षा रूंदावलीत तर असा मला अजूनही विश्वास आहे.. सर्व लेख (आणि लेखांवरची मते) एकत्रितपणे वाचून बदलत्या काळाचा जरा खोलात विचार करून पाहा त्याच विचारांना नवी दिशा मिळतेय का...

एवढं मोठ्ठं मांडण्याचं कारण इतरांना काय आवडत नाहीये हेच तुम्हाला कळत नाहीये... रिक्वायरमेंट आणि प्रॉडक्शन गॅप बहुदा!! Happy

उदयन

बिनधास्त लग्न कर आणि होऊ दे ३-४ तरी मुले
त्यानंतर जर घरखर्चात गंडलास तर आणखी एका ४० हजार पगार घेणार्‍या एका बाईशी दुसरे लग्न करायचे पण तिच्यापासून मात्र मुले होऊ द्यायची नाहीत म्हणजे कसे लेवल सेवल होईल.. Wink

तळटीप - कोणाच्या भावना दुखावायचा हेतू नाही पण ही आजकालची पोरं प्रश्नच अशी आचरट विचारतात ना की अशीच उत्तरे सुचतात..

एवढं मोठ्ठं मांडण्याचं कारण इतरांना काय आवडत नाहीये हेच तुम्हाला कळत नाहीये... रिक्वायरमेंट आणि प्रॉडक्शन गॅप बहुदा!!
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
ड्रीमगर्ल
एक भोळाभाबडा प्रश्न
मुळात इतरांना काय आवडते याचा विचार करून लिहायचे असते का?

आजकालची पोरं प्रश्नच अशी आचरट विचारतात>>>>>>>>> अरे अंडेराव........वर हेडींग वाच ना.....डबल इंकम नो किड्स............... मग विचार आला ...........इतके अभ्यासपुर्ण लिहितात तर एक दोन सल्ले घ्यावे Wink

उदयन
हेडींगच तर वाचतोय राव... बेसिक कॅलक्युलेशन मध्येच लोचा आहे..
डबल ईंकम असलेल्यांनीच नो किड केले तर सिंगल ईंकम असलेल्यांनी तर विचारायलाच नको या महागाईच्या जमान्यात.
खरे तर हे "सिंगल ईंकम सिंगल किड" अन "डबल ईंकम डबल किड" असे सुटसुटीत हवे.

वंदनाताई

तुमच्या संयमाचं आणि शांतपणाचं कौतुक करावंसं वाटतं. बघा बरं, तुम्हाला ताई म्हटल्यावर तुम्ही सहजतेने ते स्विकारता. इथं ताई म्हटलं कि अंगावर झुरळ पडल्यासारखं किंचाळणारे(-या) आहेत. सख्खा भाऊ, आई वडील, सासू सासरे, नवरा या कुणाशीच न जमणे म्हणजे स्वतंत्र होणे. या अमेरिकेला आईवडिलांना बोलावतात ते घरातली काम करायला. बाळंतपणं करायला. कशाला बाळंत तरी व्हायचं बावळटासारखं ? नव-याला सांगायचं ना बाळंत व्हायला. यांची मतं वाचा. लग्न नको, जबाबदा-या नकोत, मुलं नकोत हे स्वातंत्र्य. यांना काय सांगता एकत्र कुटुंबाचं महत्व ? आपल्याला चार दिवस झाले कि आईची आठवण येते. मुलं आठवतात. यांना पैसा पाहीजे पैसा. या पैशासाठीच अमेरिकेला गेलेत. वर म्हणणार आम्हाला भारतात संधिच नाही. खोटं वागण्याला अंत असतो का ? एकदा पैसा हे सर्वस ठरवलं कि संधी दिसतीलच कशा ? आपले आई वडील वृद्धाप़काळात एकटे आहेत हे कळत असतं. पण पैसा आणि समृद्धीची धुंदी इतकी असते कि डोळ्यावर जाड जाड कातडं आणि मनावर समर्थनाच्या युक्तीवादाची तितकीच जाड झूल पांघरलेली असते. त्यातून भारतात कसं सगळंच चुकीचं आहे याचे साक्षात्कार व्हायला लागतात. मग लिव्ह इन रिलेशनशिप, इंटरकास्ट मॅरेज, इंटररेशियल, इंटररिलिजियस मॅरेज हे सगळं गोड वाटू लागतं. व्यवहार सांगायला गेलं कि हे संस्कृतीरक्षक म्हणून हिणवणार. समलिंगी संबंधांचं समर्थ करत बसणार. स्त्री मुक्तीचे नारे लावत तुमच्या सारख्या गरीबाला छळणार.

पण वाहत्या पानावर जाऊन वाचा यांच्या गप्पा काय असतात ते. आज मिरची केली, इड्ली केली यंव केलं न त्यंव केलं. अमूक ढमूक मसाला कसा करायचा ? आता फोडणी चाललीय. टॅबवरून वाचतेय म्हणून अपडेटेड राहतेय.

या काय वेगळे दिवे लावतात म्हणून तुम्हाला हिणवतात नेहमी नेहमी ?

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5252206768640833808&Se...

अमेरिकाळलेल्यांचे वाभाडे काढणारा हा परखड लेख या लेखावर टीका करणा-यांच्या डोळ्यात अंजन घालायला पुरेसा आहे. आणि वाचूनही झापडं उतरली नाहीत तर केस सुधारणेच्या पलिकडं गेलीय असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. तुम्ही पण त्यांच्यासारखंच या डोळ्याने वाचा आणि त्या डोळ्याने सोडून द्या. नवा लेख कधी लिहीताय ?

तुमचा फॅन क्लब पण आहे. पण या भुतावळीमुळं कुणी इथं तारीफ करायला येत नाही. तुमचे विचार आम्हाला नेहमीच मार्गदर्शक वाटत आलेत. लिहा अजून चार दोन पाच लेख.

ड्रीमगर्ल
नक्कीच लिहिणार्‍याने असा विचार करू नये,

खरे तर मला स्वतालाही या प्रकाराचे लेख वाचायला आवडत नाही अन मी या धाग्यावर इतर जण काही तरी टाईमपास करताहेत ते वाचायला आलोय हे प्रामाणिकपणे कबूल करतो.

पण मला अमुक तमुक आवडते तेच तुम्ही लिहा असे आपण नाही बोलू शकत किंवा असा सल्ला भले आपण हितचिंतक या नात्याने देत असू तरीही ते बरोबर नाही असे मला वाटते.

जर त्यांना या प्रकारच्या लिखाणातून आनंद मिळत असेल तर त्यांना तो घेऊ देणेच उत्तम ना .. Happy

अर्थात तुम्ही त्यांच्यासाठी एवढी मोठी पोस्ट लिहिलीत याचा अर्थ त्यांच्या चांगल्याचा विचार करूनच त्यामुळे हेतू वर संशय नाहीच फक्त मला जे वाटले ते बोललो.

पेट्रोल पंप.... हा हा हा... नावाला जागलात.. अख्खा टँकर ओतलात.

चला अंड्याचा टाईम अप.. बाय.. Happy

अंड्या, Happy
नक्कीच लिहिणार्‍याने असा विचार करू नये... >> नक्कीच!!
खरे तर मला स्वतालाही या प्रकाराचे लेख वाचायला आवडत नाही >> बर्‍याच जणांना आवडत नाहीत, आवडले नाहीत... "का" याची मोघम कारणे दिलेत. ती स्पष्ट समजली तर आत्मपरीक्षण करता येइल.. अर्थात जबरदस्ती नाहीच, नसावीच!
पण मला अमुक तमुक आवडते तेच तुम्ही लिहा असे आपण नाही बोलू शकत>> तसं नाहीच म्हटलंय मी... (४) मध्ये लिहीलंय ना ...आपल्याला वाटतात ती मते सोदाहरण देऊन निर्णय वाचकांवर सोपवता आला असता... कोणाला काही आवडतं/नाही आवडत... कोणाला काही पटतं/ काही नाही पटत... हेच/तेच बरोबर हे कोण ठरवणार?
पण एखादं साहित्य आवडलं नाही, का आवडलं नाही हे सांगू तर शकतो... लेखकाला निर्भेळ आनंदासाठी साहित्य लिहीण्याची सूट आहे तर वाचकालाही ते आवडलं / नाही ते सांगायची, मत द्यायची! त्यातून ज्याला त्याला काय बरं वाईट घ्यायचंय ते ते त्याने घ्यावं...
जर त्यांना या प्रकारच्या लिखाणातून आनंद मिळत असेल तर त्यांना तो घेऊ देणेच उत्तम ना>> तर मग प्रश्नच मिटला... या धाग्यावरील माझी पोस्ट वंदना यांच्या आत्तापर्यंतच्या लिखाणावरची पहीली व शेवटची पोस्ट! जुनेपणाचा चष्मा सारला तर संवेदनाशील आणि नवीन काहीतरी लिहीण्याचं पोटेंशियल त्यांच्यात आहे असं वाटल्यामुळे हा पोस्टींचा खटाटोप व आगाऊपणा! आपलं लिखाण आपल्याला स्वतःला आवडल्यानंतरचा आनंद इतरांना आवडलं याने द्विगुणीत नक्कीच होतो... असो!
त्यांच्या चांगल्याचा विचार करूनच त्यामुळे हेतू वर संशय नाहीच फक्त मला जे वाटले ते बोललो>> Happy

अवांतर... अंड्याचे फंडे वाचतेय... आवडताहेत.. Happy

ड्रीमगर्ल.. वोक्के... Happy

अवांतर - अंड्याचे फंडे वाचनाबद्दलचे आभार त्या धाग्यावर च उद्या मानेन जेणेकरून जर तो धागा खाली गेला असेल तर वर येईल.. Wink

थोडक्यात स्वत:ला असं स्वातंत्र्य उपभोगायला मिळालं नाही म्हणुन घरातल्या सासवांची जशी फडफड होते ना तसला प्रकार आहे हा वंदना बर्वे म्हणजे !

हे असले संस्कारच स्त्रीयांवर होणार्‍या अत्याचाराला कारणीभुत असतात. आईच अशी शिकवण देते म्हंटल्यावर पोरं वेगळं काय वागणार? कमाल ए या अन असल्या बायकांच्या मानसिकतेची.

<< मला वाटते वंदनाताई हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. माझ्या माहितीत शेजारीपाजारी अश्या अनेक काकवा आहेत ज्यांची मते थोड्याफार फरकाने अशी आहेत. म्ह्णजे एखादीचे मत यांच्या पहिल्या लेखासारखे.. एखादीचे दुसर्‍या लेखातल्या मतासारखे इत्यादी. तुझ्या आसपससुद्धा अश्या बायका असतीलच. >>> अगदी अगदी...!! अगदी काकूच नाही, तर तरूणीही आहेत अशा विचारांच्या! त्यांना सुधारणावादी मते सांगायला जाणे, म्हणजे त्यांच्या सुखाने चाललेल्या आयुष्यात आपण मीठाचा खडा टाकण्यासारखे आहे असे मला वाटते. राहू दे त्याना त्यांच्या समजूतीत. आनंदात आहेत ना त्या....मग ठीक आहे!

पुढच्या लेखासाठी विषय : बंधने नको म्हणून लग्नच न करणारी मंडळी

एन्डीटीव्हीवर परवा बिग फाइट - सिंगल इन द सिटी या कार्यक्रमात शायना एन सी यांनीही लग्न करून मुलांना जन्म देणं, त्यांच्यावर सुसंस्कार करणे हे एक सामाजिक कर्तव्य आहे अशा अर्थाची शब्दमौक्तिके उधळली. स्वतः अविवाहित राहून अंडरप्रिव्हिलेज्ड(टाकलेल्या?) मुलांसाठी (ज्यांचे जन्मदाते लग्न करून किंवा कदाचित न करताही मुलांना जन्म देण्यातच धन्यता मानत असतील) काम करणार्‍या लोकांनाही त्यांच्याकडे माफी नाही.

ड्रिमगर्ल अतिशय संयत आणि मुद्देसुद प्रतिसाद..

मुळात इतरांना काय आवडते याचा विचार करून लिहायचे असते का?

>> त्यांनी इतरांना नीट समजेल की त्यांना नक्की काय म्हणायचे आहे अश्या प्रकारे लिहावे एवढीच अपेक्षा आहे.

पुढच्या लेखासाठी विषय : बंधने नको म्हणून लग्नच न करणारी मंडळी

>> मस्त विषय दिलात भरतजी.

हे असले संस्कारच स्त्रीयांवर होणार्‍या अत्याचाराला कारणीभुत असतात. आईच अशी शिकवण देते म्हंटल्यावर पोरं वेगळं काय वागणार? कमाल ए या अन असल्या बायकांच्या मानसिकतेची.

>> हे एक कारण आहे ज्यासाठी आपण वंदनाताईंना समजवायचा प्रयत्न करतोय.. त्यांचे सोशल कंडिशनींग झाले तेवढे खुप झाले. आता पुढच्या पिढीकडे हे जायला नको.

अवांतर: यावेळी वंदनाताई इथे अज्जिबात फिरकल्या नाहीयेत (किंवा रोमात आहेत) याचे कारण काय असावे?

Pages