डबल इन्कम नो किड्स

Submitted by सौ. वंदना बर्वे on 25 March, 2013 - 00:43

डबल इन्कम नो किड्स

मूल हवे असणे ही कुठल्याही स्त्रीची सहजसुलभ नैसर्गिक भावना असते. दांपत्यजीवनाची वीण आणखी घट्ट करण्याचे काम पुढची पिढी करते. निसर्गाला अपेक्षित असलेल्या निर्मितीशी अपत्यप्राप्ती ही संयुक्तिकच आहे. निसर्गत: ती जवाबदारी स्त्रीकडे आली आहे. स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकालची माता होते.

मूल हवे असणे ही स्त्रीची निसर्गसुलभ व सहजभावना असते हे त्रिकालाबाधित सत्य असले तरीही परिस्थितीनुसार त्यात माणूस बदल करीत आला आहे. मूल का हवे याच्या कारणपरंपरेनुसार त्याची व्याप्तीही बदलते. परंपरागत दृष्टीकोनातून पाहता बऱ्याच ठिकाणी मूल हवे असते ते वंशवृध्दीसाठी. आपले नाव लावणारं पुढे कुणीतरी असावे या भावनेतुन. म्हातारपणाची काठी, असेट, वैवाहिक आयुष्यातला अनुबंध दृढ करणे, प्रेम, भावनिक ओढ, कुटुंबातला दबाव, पुरुषाच्या दृष्टीने विचार केल्यास त्याचा मर्दानगीशी लावलेला संबंध ही व अशी अनेक कारणे निसर्गसुलभ भावनेव्यतिरिक्त असतात. या भावनेला पूरक मूल होणे किंवा न होणे हे क्षमता, इच्छा, पर्यायाची निवड, प्राथमिकता या व इतर अशा अनेक कारणावर अवलंबून असतात.

आपले नाव लावणारे कुणीतरी असावे यासाठी, वंश वाढावा असं वाटणे ही भावना चुकीची नाही. आपल्या मागून आपले विचार आपले कार्य कुणीतरी पुढे न्यावे असे नवराबायकोला वाटणे ही सहजभावना आहे. त्याची पूर्तता केवळ मुलाकडूनचे होते मुलीकडून नाही हा विचार बदलत्या परिस्थितीनुसार बदलला पाहिजे. मुलगी ही मुलापेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाही हे स्विकारले पाहिजे. स्त्री हे दुसऱ्याचे धन त्या मुळे ती ज्या घरी जाते ते नाव लावते, आपले नाव लावणारा मुलगाच असतो या विचारातून मुलाला प्राधान्य देणे क्रमप्राप्त होते. केवळ नाव लावल्यानेच पुत्रत्व सिध्द होते का? दिवे लावणारा "वंशाचा दिवा" पाहून अनेक वृध्द जोडप्यांना अशा मुलापेक्षा जरी दुसऱ्या घरी असली तरी आस्थेने विचारपूस करणारी, भावनिक अनुबंध असणारी मुलगी जास्त जवळची व प्रिय वाटते. मुलगाच हवा या विचारातून स्त्रीभ्रूणहत्या करणे क्रूर व रानटीपणाचे आहे. आपल्या कार्यकर्तृत्वाने मुलगीसुध्दा आपले नाव पुढे नेते हा विचार जोपर्यंत रुजत नाही, तोवर स्त्रीभ्रूण हत्या थांबणार नाही.

म्हातारपणाची सोय म्हणून जोडप्याला मूल हवे असते. दांपत्यजिवनात सुरवातीच्या काळानंतर आपल्या दोघांशिवाय बोलायला, विचार शेअर करायला कुणीतरी हवं असतं. भावनिक अभिव्यक्ती ही जवळच्या किंवा विश्वासातल्या माणासाशी होते. संसार स्थिर होऊ लागला की बरेचदा मध्यमवयात एकाकीपणाही वाढतो. अवतीभवती माणसे असूनसुध्दा एकलेपणा छळतो. परावलंबित्व वाढीस लागतं. साध्या साध्या गोष्टीसाठीही इतरांवर अवलंबून रहावं लागतं. याकाळात स्वत:चं असं कुणीतरी असावं असे वाटणे सहाजिकच आहे. संभाळणे पैशाने विकत घेता येत नाही. प्राधान्यक्रमाने आधार हा भावनिकदृष्ट्या जवळच्या व्यक्तीचा घेतला जातो. शारीरिक परावलंबनाबरोबर आर्थिक परावलंबित्व येऊ नये. पैसे मागावेच पडले ते अपत्याशी मागावे ही भावना त्यामागे असते.

वैवाहिक सौख्य अपत्यप्राप्तीतच आहे असे मानणारी अनेक जोडपी आहेत. अपत्यप्राप्ती झाली नाही तर त्याना आपल्या आयुष्यात कमतरता वाटू लागते. जोडप्याला अशी ओढ असणे स्वाभाविक आहे. पण त्या जोडप्याला बळजबरी करणे अयोग्य आहे. मूल होवू द्यावे अथवा नाही किंवा ते कधी होऊ द्यावे याचा निर्णय त्यादोघांखेरीज कुटुंबातली इतर माणसे करताना दिसतात. वडिलधाऱ्यांची इच्छा हा भाग वेगळा आणि सक्ती हा भाग वेगळा. इच्छा जरूर असावी पण सक्ती नसावी. मूल न होण्यावरून टोमणे मारणे, वांझोटी ठरवणे हे उपद्रवी उद्योग दुर्दैवाने आम्ही बायकाच जास्त करतो. नवपरिणीत जोडप्यानेही आपले मुलांविषयीचे मत खुलेपणाने मांडले पाहिजे. होणारी घुसमट थांबते.

आजची युवा पिढी शिक्षणासाठी खूप कष्ट घेते. आपले करियर निवडते. त्यावरून यशस्वी वाटचाल करते. अशी वाटचाल करीत असताना त्यांना वाटेत अडथळे नको असतात. लग्न करणे ही गोष्ट सहसा नाकारली जात नाही. कारण दोघेही कमावती असतात. कुणीही कुणावर अवलंबून नसतं. त्यामुळे अडचण होत नाही. मुल होणे अडचणीचे असते. अनेक समस्या त्यातून निर्माण होतात. मूल संभाळायचं कुणी, त्यासाठी करियर सोडायचं का?, सोडायचच झालं तर कुणी? असे अनेकानेक प्रश्न उद्भवतात. यातूनच नवीन पिढीने काढलेला मार्ग म्हणजे डिंक (डबल इन्कम नो किड)

प्रजननाच्या निसर्गातल्या सहज नियमाला किंवा प्रक्रियेला खीळ बसणार नाही का? कुटुंब व्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम होणार नाही का? अपत्यसुख नकोच असेल तर मग लग्न तरी का करायचं? फक्त इन्कम डबल करायला? असे अनेक प्रश्न उभे राहतात. आपण काही पिढ्या मागे जाऊ. कुटुंबात किमान दहा मुले असणे सामान्य गोष्ट होती. आर्थिक स्थिती किंवा करियरचा प्रश्नच नव्हता. विभागणी ठरलेली होती. नवऱ्याने शेती, व्यवसाय किंवा नोकरी करायची व बायकोने घर संभाळायचे. बदलत्या काळानुसार स्त्री शिक्षणात पुढे आली. शिकून आपले कार्यक्षेत्र निवडून त्यावर मार्गक्रमण करू लागली. संसाराला हातभार लाऊ लागली. नोकरी किंवा करियर संभाळून अथवा वेळप्रसंगी करियर सोडून मुले व घर संभाळू लागली. आता करियरसाठी मूल नकोच अशी मानसिकता निर्माण होतेय, खास करून उच्चशिक्षित व उच्चमध्यमवर्गीय युवापिढीत.

मूल होणे म्हणजे नोकरीवरून घरी येताना उशीर झाला तर पार्सल आणण्याइतकं सोपं नाही. मूल ही दांपत्यजीवनातली सर्वात मोठी जवाबदारी आहे. मुलासाठी गुणात्मक वेळ देणे जमत नाही. पाळणाघरात ठेवावे लागते. पाळणाघरात ठेवले तरी घरी परतल्यावर त्याच्यासाठी बालविश्वात रमावेच लागते. उद्या मिटींग आहे, रिपोर्ट तयार करायचे आहेत हे त्याच्या आकलन शक्तीच्या बाहेरचे असते. मूलाला वेळही द्यायचा आहे आणि करियरही सोडायचे नाही अशा कुचंबणेत, मानसिक ओढाताणीत अनेक कुटुंबे अडकलेली दिसतात. अशा ओढाताणीत अडकण्यापेक्षा मूल नकोच अशा निर्णयाप्रत एखादे जोडपे आलेच तर त्याला गुन्हेगार ठरवणे चुकीचे ठरते. प्राप्त परिस्थितीनुसार दोघांचा जवाबदारीने घेतलेला निर्णय म्हणून त्याचे स्वागत करावे. त्याचा अवश्य आदर करावा.

काही अधोरेखित करण्यासारखे मुद्दे याबाबतीत समोर येतात. लग्न होण्याअगोदरच त्याबाबत होणाऱ्या जोडीदाराला तशी स्पष्ट कल्पना देणे आवश्यक आहे. निर्णय दोघांचा असावा. डिंकचे पुढचे होणारे परिणाम याविषयी साकल्याने विचार करणे व त्यावर ठाम राहणे हे दोघांनाही जमणे आवश्यक आहे. मध्येच मूल हवे असे कुणा एका जोडीदाराला वाटणे सहजीवनात समस्या निर्माण करणारे ठरू शकते. करियरीस्टीक पिढीला जसे मागची पिढी नकोशी असते तशीच पुढलीही. मूल ही जवाबदारीच्या जाणीवेने नको म्हणणाऱ्या जोडप्याने ते संभाळण्यासाठी स्वत:च्या पालकांचा पर्याय का निवडू नये? तसे नसेल तर करियर आणि पैसा हेच प्राधान्य ठरते. बाकी काहीच नाही.

डिंक ही अवस्था आहे की समस्या हा भाग वेगळा. तो पाहणाऱ्याच्या दृष्टीकोनावर ठरतो. सहजीवनातल्या प्राथमिकतेवर ठरतो. मला असे वाटते, बदलत्या काळात, बदलत्या कुटुंब व्यवस्थेच्या तुटलेल्या दुव्याना जोडले तर डिंक ही समस्या होणार नाही. मुलांना संभाळायला, संस्कार करायला समंजस व जवाबदार मागची पिढी आणि त्यांची जवाबदारीने, जाणीवेने काळजी घेणारी युवा पिढी सामंजस्याने लुडबूड न करता वावरली तर निश्चितच अपत्य ह्या निसर्ग सुलभ भावनेला "डिंक" लागणार नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<<<अवांतर: यावेळी वंदनाताई इथे अज्जिबात फिरकल्या नाहीयेत (किंवा रोमात आहेत) याचे कारण काय असावे? >>>>>>> नवीन विषय कोणता घ्यावा यावर मंथन चिंतन करीत असतील्.:फिदी:

लेखिकेला सवयच आहे अशी, या पुर्वीही लिहिलेल्या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांना उत्तर द्यायला त्या फिरकतच नाहित.

चांगली सवय आहे. खरे प्रथितयश लेखक असे धाग्यांवर प्रतिक्रिया नोम्दवत फिरत नाहीत..
पहाता पहाता ६० पेक्षा जास्त प्रतिसाद. याला म्हणावे ट्यार्पी.

खरे प्रथितयश लेखक असे धाग्यांवर प्रतिक्रिया नोम्दवत फिरत नाहीत..याला म्हणावे ट्यार्पी.. Lol

म्हणजे जे आपल्या लेखावर येणार्‍या प्रतीक्रियांना प्रतीसाद देतात, ते प्रतिथयश या क्याटेगिरीत बसत नाहीत तर्.:फिदी::दिवा:

सर्व प्रतिसादांना धन्यवाद.

बरेच दिवस व्यापामुळे येणे जमले नाही. आपले प्रतिसाद, सुचना हे माझे लिखाण सुधारावे या हेतुनेच असतात याचा मला मनापासून आनंद आहे. त्याबद्दल मी आपली ऋणी आहे. दोष आणि सवयी जायला तशा कठीण असतात. त्यांची पुनरुक्ती होते. मी प्रयत्नपूर्वक टाळण्याचा प्रयत्न करीन . आपले मार्गदर्शन व आशिर्वाद असेच पाठीशी असू द्या. माझ्यासारख्या नुकतेच लिहू लागलेलीला तरी आणखी काय हवे?

सौ. वंदना बर्वे.

वंदना ताई माफ करा थोडं स्पष्ट बोलते. लिखाणात सुधारणा म्हणजे शुद्धलेखन किंवा व्याकरण म्हणताय का?
बेसिक विचारसरणीला योग्य वळण... देणं गरजेचं वाटतंय मला. असो..
आता प्रत्येकजण आपापल्या जागी योग्य असतो कोणताही विचार योग्य किंवा अयोग्य नसतो असे वाद/चर्चा सुरू होईल. त्यामुळे इथेच थांबते.

दक्षिणाजी,

माझे शुध्दलेखन व व्याकरण आणि त्यातली सुधारणा हा घरी मी नेहमी बोलणी खाण्याचा विषय आहे. त्याविषयी न बोललेलच बरं.

विचार मनात असणे आणि तो योग्य पध्दतीने मांडता येणे यात फरक आहे. मला जे म्हणायचं आहे ते वाचकाला न समजणं, विपरीत समजणं हा माझ्या लेखनातला दोषच आहे. तो दूर होणं अपेक्षित आहे. बाकी विचार, विचारसरणी यावर मते मतांतरे आहेतच. जसा मला माझ्या विचारांचा आदर आहे तसाच इतरांच्याही.

सौ. वंदना बर्वे.

विचार मनात असणे आणि तो योग्य पध्दतीने मांडता येणे यात फरक आहे.>> दक्षिणा जे विचारसरणी ला वळण म्हणाली त्याचीच पुनरुक्ती मी करते. विचार मनात असणे आणि विचारसरणीला वळण असणे ह्यात फरक आहे.

उदा: "तसे नसेल करियर आणि पैसा हेच प्राधान्य ठरते. बाकी काहीच नाही." अशा सारखे विचार मांडण्यासाठी कितीही योग्य पद्धत वापरलीत तरी जे बेसिक वळण पाहिजे ते दिसून येत नाही. करीयर करण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी जे काही कष्ट, जिद्द, हुशारी, चिकाटी इ इ लागतात त्याबद्दल तुमची ठायी ठायी दिसून येणारी अनास्था, इतके सर्व गुण असलेली व्यक्ती जेव्हा कौटुंबिक सुख/अपत्य सुख नाकारते तेव्हा त्यास कारण काय असावे, फक्त महत्त्वाकांक्षा?? करीयर आणि पैसा प्राधान्य असणे हे वाईट हे गृहीतक, "बाकी सर्व असले" पण करीयर पैसा नसले तर एखाद्या व्यक्तीचे (स्त्री असो कि पुरुष) आयुष्यात काय होते हा अनुभव नसणे, आपण जे बालसंगोपनासाठी 'model' मांडतोय त्यात काय तोटे आहेत ह्याचा उल्लेखही न करणे इ इ बर्याच गोष्टी "विचारसरणी ला वळण" बाबत सांगता येतील. पण सगळ्यात महत्व्वाचे कमी पडतोय तो अभ्यास. आपल्याला स्वताची वैचारिक भूमिका मांडणे शक्य नसेल तरी इतरांच्या विचारांचा अभ्यास आणि संकलन कुठल्याही शिक्षित व्यक्तीला सहज जमेल - उदा: मुले नसणे/दोन पालक एक बालक इ इ ह्याचे दूरगामी परिणाम काय होतात हे चीन किंवा इतर देशांच्या उदाहरणाने दिसून येते. त्याबद्दल वाचून मग हा लेख लिहिला असतात तर ते उत्तम झाले असते. देवाने जर इतके सुंदर आयुष्य आणि स्वच्छ मन तुम्हाला दिले आहे तर ते अभ्यास, मनन आणि चिंतनात घालवा. मग रामदासांनी सांगितल्याप्रमाणे "अभ्यासे प्रकट व्हावे".

वंदनाजी धाग्यावर फिरकल्या नाहीत तरी प्रॉब्लेम, वंदनाजी धाग्यावर फिरकल्या तरी प्रॉब्लेम, वंदनाजींनी लेख लिहीला तरी प्रॉब्लेम, वंदनाजींनी लेख नाही लिहीला तरी प्रॉब्लेम, वंदनाजींनी नेहमीच्या विषयावर लेख लिहीला तरी प्रॉब्लेम, वंदनाजींनी नेहमीच्या विषयावर लेख लिहीला नाही तरी प्रॉब्लेम, वंदनाजींनी परंपरांचा गौरव केला तरी प्रॉब्लेम, वंदनाजींनी परंपरांचा धिक्कार केला तरी प्रॉब्लेम.

प्रॉब्लेम नेमका कसला आहे ?

वंदना ताईंचे तेच ते लेख अगदी "नित्य नेमाने" वाचून, तेच ते आहे, नुसता वैताग आहे असे प्रतिसाद देणारे पण प्रॉबलेम..

.......आता पेट्रोलपंप , मग डांबरी रस्ता , बटाट्याची चाळ..... नंतर तळलेली वांगी..... कापलेल्या मिरच्या...... सोललेली काकडी.......... एकदम विनोदी.......चालु द्या............!ताईंचे तेच ते लेख अगदी "नित्य नेमाने" वाचून, तेच ते आहे, नुसता वैताग आहे

डांबरी रस्ता , बटाट्याची चाळ..... नंतर तळलेली वांगी..... कापलेल्या मिरच्या...... सोललेली काकडी.......... Lolzz...gif

नो इन्कम, नो म्यारेज, नो किड्स, नो घर, नो दार, नो अन्न, नो इंटरनेट
अश्यानी काय करावे ? Happy
नीती तत्वे फसवी गणिते दूर बरी !!
रक्तातील आदिम जीण्याचीच ओढ खरी Happy

Pages