मुपीसाठी लेख : कृपया मदत करा

Submitted by खटासि खट on 22 March, 2013 - 12:11

लिखाणाचे निमित्त : लिहीण्याची खुमखुमी
उद्देश : मनोरंजन, विरंगुळा, वेळ जात नसणे
फायदे : मायबोलीवर (कु)प्रसिद्ध होणे
टार्गेट ऑडियन्स : मुक्तपीठचे नियमित वाचक

प्रस्तावना : नमस्कार सदस्यहो. मला पुण्यनगरी देशी प्रसिद्ध व्हावेसे वाटत असल्याने एक लेख लिहून वर्तमानपत्रास पाठवावयाचे ठरवले. मी तसा चांदोबा. चंपक, ठकठक आणि सकाळ नियमित वाचतो. सकाळ मधे इमारतीच्या शेजारच्या मुतारीचा वास हे पत्र लिहीले होते. ते छापूनही आले होते. पण प्रसिद्धी मिळाली नाही. लोक म्हणतात लेख लिही. मी आवडीने मुक्तपीठ वाचतो. त्यासाठी लेख लिहावा असे मनी आले. एक कच्चा मसुदा आपल्याला दाखवत आहे. मार्गदर्शनाची अपेक्षा आहे.
कळावे
आपला नम्र

खट
--------------------------------------------------------------------------------------------------------------

साधारण पंधरा वर्षापूवीची गोष्ट. माझे लग्न होऊन नुकतीच सौ. घरी आली होती. सौ शीच लग्न झालं होतं त्यामुळे कृपया गोंधळ वाढवू नये. ( सौ माझ्याच घरी आली होती). तिची हौसमौज पुरवण्यात दिवस चांगले चालले होते. तिचा पहिलाच नोव्हेंबर असल्याने तो साजरा करण्यासाठी आम्ही दापोलीला पिकनिकला जाण्याचे ठरवले. आम्ही नुकतेच एक विमान खरेदी केले होते. सर्वांनी ठरवले कि विमानानेच जाऊ. माझी सौ, एम ए, पीएचडी, मातोश्री, एम (ऑनर्स), पिताश्री (बालिष्टर) आणि मी स्वतः (बारावी नंतरची प्रमाणपत्रे सापडत नाहीत) असे चौघे दापोलीस विमानातून कूच करते झालो. जाताना आम्ही वरंधा घाटातून जायचे ठरवले. त्या वेळी टोल नाका असल्याने या संधीचा फायदा घ्यावा असे ठरले. रस्त्याने मीच विमान चालवत होतो. साठच्या पुढे वेग नको असे पिताश्रींनी बजावल्याने त्यांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन केले. हास्यविनोद करीत आणि गाण्याच्या भेंड्या खेळत आम्ही दापोलीस पोहोचलो. जेवण वगैरे करून विमानाने कर्दे या गावी पोहोचलो. दिवसभर समुद्र्वर मजा केल्यावर अंधार पडायच्या आधी निघावे असे ठरले. कारण या आधी विमानाने कुठेच गेलेलो नसल्याने हेडलाईट आणि डीपर ( डिप्पर) चालतात किंवा नाही याबद्दल काहो कल्पना नव्हती.

जाताना ताम्हणी घाटातून जायचे ठरवले होते. ताम्हणी घाटातून जात असताना ब्रेक दाबलाच जाईना. बाका प्रसंग होता. आम्ही सगळे खूपच घाबरलो होतो. तरीही एका हाताने विमानाचे स्टियरींग सौ ला पकडायला सांगून मी खाली वाकून पाहीले तर काय, ब्रेकच्या खाली फूटबॉल आलेला ! आम्ही बीच वर व्हॉलीबॉल, फूटबॉल, बॅडमिंटन हे सगळे खेळ खेळल्यानंतर ते सगळं साहीत्य मागच्या सीट्खाली टाकलेलं. हा बॉल घरंगळ येऊन कधी ब्रेकखाली आला कळलंच नाही. जेव्हां बॉल काढला तेव्हां ब्रेक लागायला सुरूवात झाली. सगळ्यांच्या जिवात जीव आला.

आम्ही आता वर चढून जंगलात आलो होतो. आजूबाजूला चिटपा़खरूही नव्हते. आमचे विमान आणि आम्ही इतकेच काय ते हलत होतो. अंधार मी म्हणत होता. आणि इतक्यात रस्त्यावर काहीतरी चमकलं. पुन्हापुन्हा पाहील्यावर खात्रीच पटली. शंकाच नको. दोन डोळे होते ते. सर्वांची भीतीने गाळणच उडाली. अचानक कुठलं जनावर पुढ्यात येऊन ठाकलंय याची कल्पना नव्हती. मागच्या मागे जाणं धोक्याचं होतं. वळणं वेडीवाकडी होती आणि विमान रिर्व्हर्समधे चालवायची माहिती नव्हती. घरी गेल्यावर काशीहून तज्ञांना बोलावून शिकून घ्यायचा मनोमन निश्चय केला. पण सध्या वेळ मारून न्यावी लागणार होती.

पिताश्री मनाचा हिय्या करून खाली उतरले. ( आमच्यापुढे भविष्यकाळ होता तर पिताश्रींकडे भूतकाळ ). हेडलाईटच्या प्रकाशात चमकणा-या डोळ्यांकडे ते सावकाश जाऊ लागले. मला हेडलाईट बंद करायला लावला. जवळ गेल्यावर ते डोळे इकडे तिकडे पळू लागले. पिताश्रींनी देखील त्यांचा पाठलाग केला आणि जवळचा टॉर्च काढून त्यांच्यावर प्रकाशझोत सोडला. त्याबरोबर डोळे गायब झाले.

पिताश्री विजयी मुद्रेने परत आल्यावर विमानातील दोन्ही महिलांनी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहीले. पिताश्रींनी सांगितले आता घाबरायचं कारण नाही. पण कुठले जनावर होते हे विचारल्यावर पिताश्रींनी हसतच उत्तर दिले, तो एक मोठ्या आकाराचा उंदीर होता. हे ऐकताच मातोश्री आणि सौ किंचाळल्या. त्याबरोबर आम्ही हसत सुटलो.

आजही तो प्रसंग आठवल्यावर आम्ही खूप हसतो. पण त्याच वेळी जर खरंच एखादं मोठं जनावर असतं तर ? या विचाराने अंगावर शहारा येतो.

आपला नम्र
खटासि खट

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी सौ, एम ए, पीएचडी, मातोश्री, एम (ऑनर्स), पिताश्री (बालिष्टर) आणि मी स्वतः (बारावी नंतरची प्रमाणपत्रे सापडत नाहीत) > >एव्हढ्या सगळ्या जंत्रीमधे अमेरिकेला गेलेल्या एकाही नातेवाईकाचा उल्लेख नसल्यामूळे फाऊल Lol

ते दोन डोळे लुब्रंचे असतील अशी मला फार्फार आशा होती. विमान बंद पडलं मग लुब्रंनी ह्या चौघांना लिफ्ट दिली इ तपशील यायला हवे होते.

लुनावले ब्रह्मे said:
मीसुद्धा एकदा विद्यापीठातून निघून लुनावरून ताम्हिनी घाटात फिरायला गेलो होतो. एका सुंदर तरुणीने लिफ्ट मागितली म्हणून थांबलो पण मग लुना पुढेच जाईना म्हणून पाहिले तर चाकाखाली विमान आले होते (खेळण्यातले)
शेवटी पंक्चरवाल्याला ४००० रुपये द्यावे लागले तेव्हा कुठे लुना सुरु झाली.

श्री,
परवानगी देणारे तुम्ही कोण? तो आमचा एक्स्लुझिव राईट आहे.
Wink
=============
ओ लेखक.
तुम्ही ताम्हीणी किंवा पळी पंचपात्री घाटावर किंवा कोकणात लूना नेली असती तर असं झालं नसतं. लूनावर गॅस सिलिंडर वाहून नेता येते. शिवाय डिकीत ठेवलेले बॉल ब्रेक खाली येत नाहीत. आजकाल मी ४ हजार रुपयांचे चेक सोबत घेऊन फिरत असतो. पंक्चरवाल्याबद्दल वर कुणीतरी खोटे लिहिले आहे. ४ हजार चा चेक फक्त सुंडर युवतींना देण्यात येतो.

तेव्हा, मुपी चा मू म्हणताना विचार करून म्हणा.

सरस्वतीचंद्र काकांनी ताम्हिणी घाट प्रसिद्ध करून ठेवला आणि ते स्वतःही प्रसिद्ध झाले. ब्रह्मेंचं आगमन होईपर्यंत लोकप्रियतेत तेच अग्रस्थानी होते. उगीचच कपिलदेव आणि सचिन यांची तुलना आठवली.

लुनावाले ब्रम्हे
>>> निदान नावाला जागा प्रतिसाद देताना, महापुरुषाला कमीपणा आणु नका
आणि ते ब्रह्मे नीट लिहा जरा

अमेरिकेचा उल्लेख पाहिजे, हा घ्या!

विमानाच्या इंजीनात चिट्पाखरु आले --मग बाबांनी विमान जवळच्या समुद्रात उतरवले. असे वैमानिक फक्त अमेरिकेतच असतात असं नाही काही. पुण्यात देखील ,पाण्यात विमान उतरवण्याची प्रॅक्टीस करता येते. नदीत पाणी असेल तेव्हा पाण्यात उतरवण्याची प्रॅक्टीस, पाणी नसेल तेव्हा जमीनीवरच्या लॅडींगची प्रॅक्टीस. अशी सोय आहे का आहे का अमेरिकेत कुठे?

छ्या! काय दम(कथेत) नाही.

तुम्ही बाहेर फिरायला जाता सर्व फॅमिली हे इतकेच सांगायचे होते तर त्यासाठी हा उपद्व्याप कशाला लेख पाडायचा?
बाकी तुमच्या सौची विशेष तारीफ, पहिलाच नोव्हेंबरचे साहस वाचून..घाबरल्या नाहीत आल्या प्रसंगाला.

Proud
आम्ही पर्वतीवर जातो फिरायला त्याचा लेख पाडायला हवा. Proud

अजून थोडा मसाला हवा आहे. तुम्हाला विमान चालवताना नैसर्गिक कॉल कसा आला, मग तुम्ही ढगात जाऊन बसलात, मग तिथे दगड घरंगळत कसा आला, मग तुम्ही धावतपळत विमानात जाऊन कसे बसलात, नाहीतर तुम्हाला बिबट्याने धरलं असतं ते पण लिहा. डिटेल्स आठवत नसतील तर २९ डिसेंबरचा सकाळ वाचा.

ओ ब्रह्मे , तुम्हाला फक्त सुंडर युवतींना डबलशीट घेऊन लुना चालवायची परवानगी आहे , सोबत ४००० रुपये विसरु नका . Wink

तुमच्यासारखे लोक आमच्या कोकणात विमान घेऊन येतात आणि मग हवेचं आवाजाचं प्रदूषण होतं आणि मग आंबे काजू नीट येत नाहीत, आम्चे नुकसान होते. तुमच्यासारख्या लोकांना बंदीच घालायला हवी सरकारने.

नंदिनी, आंबे-काजूवर परीणाम होत असतील पण सर्वात जास्तं परीणाम होतो तो चिमण्यांवर. मग त्या चिमण्या प्रत्येक नातेवाईकांसोबत अमेरिकेत जातात विमानाची सवय व्हायला नी तिथे दोन दिवसात येणारी फळे खात बसतात चिवचिवाट करत.

दापोलीला जाऊनही तिथे काय खाल्लं ते सांगितलंच नाही.. शिवाय चढंण चढण्यापूर्वी खाल्लं की नंतर तेही लिहायला हवं.. अजुनही तिथलं मार्केटींग तसंच चालतं की त्यातही कोणी घुसलं?
ते डोळे वाघाचे होते किंवा हत्तींचे हवे होते ना?
आणि दिशादर्शनाला पोतदार-पावसकर मॅडम नाही आल्या तर कसली ती कथा?
अज्जिबात आवडली नाही मला Wink

आणि तुमच्या विमानात कुठल्या तरूणीने लिफ्ट कशी मागितली नाही? मी जेव्हा जेव्हा दापोलीला जातो तेव्हा सुंदर तरूणी माझ्याकडे लिफ्ट मागतात. अर्थात मी खूप हॅण्डसम आहे हे त्याचं कारण असेल. मग मी विमान ऑटो-पायलटवर टाकतो आणि त्यांना घेऊन पंखावर बसतो. हवा खायला. मग त्या माझ्या अंगचटीला यायचा प्रयत्न करतात. पण मी त्यांना चार हजार रुपये अज्जिबात देत नाही...

काय चाल्लाय काय? प्रतिसादवाले सुटलेत नुसते. ते लुब्र बिब्र काय वाचल्याचे आठवत नाही. अभ्यास कमी पडतोय. (खटासे मदत करताय तर आम्ही काघोमाका?) Happy .. हम भी काल मध्यरात्री अंधारात निर्भयपणे खाली स्वयंपाकघरात जाऊन पाणी पिऊन आलो त्यावर आता लेख पाडण्याचे काम चालु केले आहे. उंदीर भलताच उंच्बिंच होता की. Proud

अहो मीच तो ओरिजिनल लुनावाले ब्रह्मे.
हे कोण आता आमचा आयडी चोरणारे चोर ज्याला ब्रम्हे असे चुकीचे स्पेलिंग लिहावे लागले Uhoh

अरे चोरा सुधार रे आतातरी , नको असे आयडी चोरुस त्यापेक्षा काहीतरी चांगलं काम कर .
हवे तर आमचे मार्गदर्शन घे बाळा

ह्म्म्म्म ,
तर आता इथे कोणीतरी आमचे मार्गदर्शन घ्यावे असे लेखिकेस सुचवलेले दिसते त्यास आमची हरकत नाही. पण त्ये ४००० रुपये ..............

Pages